सूर नवा ध्यास नवा- कलर्स मराठी

Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02

कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.

Group content visibility: 
Use group defaults

घाणेकरांवर चरित्रपट येतोय.. त्यांच्या भूमिकेत आहेत सुबोध भावे!

"‘लोकमान्य टिळक’ सुबोध भावे, ‘नारायणराव बालगंधर्व’ सुबोध भावे आणि ‘डॉ. घाणेकर’ही सुबोध भावेच? मी त्याला आणखी काही भूमिका सुचवू इच्छितो- सेरेना विल्यम्स, डॉ. अब्दुल कलाम व अफझलखान! मराठी व्याकरणात ‘भावे प्रयोग’ म्हणून ओळखला जातो तो हाच असेल का?…." Happy

शिरिष कणेकरांचा पूर्ण लेख इथे वाचा.. http://www.saamana.com/tiwlya-bavlya-by-shirish-kanekar-2/

प्रसन्नजीत आणि चक्क आज मधुरा कुंभार आवडले या आठवड्यात.
वैशालीचं काही तरी बिननसलय, नेहेमीसारखी गात नाहीये सध्या, ट्रॅक वर येउदे लवकर !
वाइल्ड कार्ड एंट्री कोण येतोय उद्या ?

दीपांजली +१
वाइल्ड कार्ड एंट्री कोण येतोय उद्या ? >>> जितेंद्र तुपे यावा अशी इच्छा आहे..

वाइल्ड कार्ड एंट्री कोण येतोय उद्या ? >>> जितेंद्र तुपे यावा अशी इच्छा आहे..
<
या शो मधून एलिमिनेट झालेला नसावा, आय थिंक कोणी नवीनच (पण प्रस्थापित) गायक येतोय.
राहुल सक्सेना ? विश्वजीत ? मला फार माहित नाहीत, अजुन कोण कोण आहेत झी चे पॉप्युलर एक्स गायक ?

यावेळी अज्जिबातच मजा नाही आली दोन्ही एपि बघताना...या लोकांच्या थीम संपल्या म्हणुन मग लावण्या असं वाट्लं.
कोणी पाहुणे परीक्षक पण नाहियेत.
गायकांपेक्षा वादकांनीच मनं जिंकली यावेळी. निहिरा नेहेमीप्रमाणे मस्त गायली.
शमिकाचं "वाजले की बारा" गाणं अगदीच फ्लॅट झालं .
वैशाली माडे ची तब्बेत ठीक नसावी अजुन कींवा तिचा ईथे कंटीन्यु करायचा विचार नसावा असं वाटतय..
जुईली, मधुरा, जयदीप, प्रसेन नेहेमिप्रमाणेच...
तीच तीच "पाडाला पिकला आंबा, उसाला लागलं कोल्हा, सुंदरा मनामद्धे भरली अशी हजारो वेळा गायलेली आणि ऐकलेली गाणी ऐकुन आता कंटाळा आला...काहितरी हटके गाणी गावी आता या लोकांनी नाहितर "सूर नवा ध्यास नवा" या नावाला काय अर्थ राहिला..

येस..... मलाही हे अनुभवायला आलंय की चांगली चांगली गाणीही अती ऐकून अगदी पांचट्ट होतात व मळमळू लागतं ते गाणं कानावर पडलं तरी!!!!

पुरुष स्पर्धकांत कोणीच प्रॉमिसिंग नाहीये म्हणून हा नवा चॅलेंजर आणलाय असं दिसतंय.

ह्या आठवड्यातले लावले पण नाही. मंगेशकर आल्यापासून इंटरेस्ट गेला सूनध्यानमधला. म्हणजे त्यांनी काही नाही केले. पण त्या एपिसोड्समध्ये सगळे इतके ऑकवर्ड होते की कंटाळा आला पाहायचा.

मी जी १-२ नावं गेस केली त्यातलीच आहे वाइल्ड कार्ड एंट्री Proud
विश्वजीत बोरवणकर !
पर्वं जिंकायचं पोटेन्शिअल असणार्या गायकाला इतक्या उशीरा का आणलं Sad
मी फक्तं हिंदीत पाहिलय त्याला, मस्तं गायचा, शंकर महादेवनचा लाडका स्पर्धक होता.

मी फक्तं हिंदीत पाहिलय त्याला, मस्तं गायचा, शंकर महादेवनचा लाडका स्पर्धक होता. >>> मराठी सारेगमपत होता तेव्हा अभिजीत कोसंबी जिंकला होता. Actually विश्वजित आणि दुसरी गायिका जास्त चांगले असून अ को जिंकला होता ह्याचं फार वाईट वाटलं होतं तेव्हा.

>>शमिकाचं "वाजले की बारा" गाणं अगदीच फ्लॅट झालं .

राहुल द्रविड ला कुणी सांगितलं आज T20 मध्ये ओपन करायचय आणि डावखुरं खेळायचय... तसं झालं.. Happy
असो.
म्हणूनच मधुरा व जुईली या नक्कीच सर्वांपेक्षा सरस ठरतात.. कारण सर्वच प्रकारची गाणी ऊत्तम प्रकारे सादर केली आहेत दोघींनी..

>>पुरुष स्पर्धकांत कोणीच प्रॉमिसिंग नाहीये म्हणून हा नवा चॅलेंजर आणलाय असं दिसतंय.
अगदी अगदी... असो. तेव्हडाच श्रोत्यांसाठी 'फ्रेश' अनुभव..
ता.कः सून च्या टीम ने ईथली 'पाट्या' टाकण्याची कॉमेंट फार सिरिय्सली घेतली वाटते.. त्यापेक्षा दाढी मिशी पात्रा बद्दल ईथल्या प्रतिक्रीया सिरीयसली घ्यायला हरकत नाही.. (त्या पात्राला मुळात तिथे आणि ईथेही कुणीच सिरीयसली घेत नाहीत असे दिसते! ) Happy

निहीरा, वैशाली, निव्वळ फुटेज खात आहेत..
बहुतेक निहीरा (जर्मनी चे वेध), मग वैशाली (बोअर..!), मग जयदीप राव (त्यातल्या त्यात कमजोर गडी), मग प्रसन्न .. मग शरयू, मग विश्वजीत, असा एलिमीनेशन क्रम असावा.. शेवटी तीनः जुइली, मधुरा, अनिरुध्द

काल विश्वजीतची एन्ट्री छान दमदार गाण्याने झाली. मात्र कट्यार आळीपाळीने सगळ्यांना एकेकदा द्यायची अस ठरवलेल दिसतय Uhoh

मराठी सारेगमपत होता तेव्हा अभिजीत कोसंबी जिंकला होता. Actually विश्वजित आणि दुसरी गायिका जास्त चांगले असून अ को जिंकला होता ह्याचं फार वाईट वाटलं होतं तेव्हा.
<<
नाही अंजु, विश्वजीत विनर होता मराठी सारेगमप मधे त्याच्या पर्वाचा म्हणूनच त्याला हिंदी सारेगमप २०१२ मधे डायरेक्ट एंट्री मिळाली होती.
हिंदी सारेगमप मधे त्या सिझनला जसराज जोशी जिंकला होता, विश्वजीत टॉप ३ मधे होता.
अभिजीत कोसंबी वेगळ्या पर्वात होता , त्याला सुध्दा हिंदीत वाइल्ड कार्ड एंट्री मिळाली होती २००७ मधे, तो लगेच एलिमिनेट झाला हिंदीत.
तुला बहुदा मंगेश बोरगावकर आणि विश्वजीत मधे कनफ्युजन होतय Happy

मधुरा दोन्ही गाणी चांगली गायली होती. पण कट्यार वालं गाणं ठिकठिकाच वाटलं. बहुतेक सगळ्यांना एकेकदा मिळावी असं असेल.
काल शमिकाला काढायला लागू नये म्हणून एलिमिनेशन केलं नाही बहुतेक. Happy
वैशालीची दोन्ही गाणी अगदीच फ्लॅट वाटली. ती आजारातून पूर्ण बरी झाली नाही बहुतेक अजून.

मधुरा दोन्ही गाणी चांगली गायली होती. पण कट्यार वालं गाणं ठिकठिकाच वाटलं. बहुतेक सगळ्यांना एकेकदा मिळावी असं असेल.
काल शमिकाला काढायला लागू नये म्हणून एलिमिनेशन केलं नाही बहुतेक. Happy
वैशालीची दोन्ही गाणी अगदीच फ्लॅट वाटली. ती आजारातून पूर्ण बरी झाली नाही बहुतेक अजून.
<<
मधुरा आणि वैशालीच्या बाबतीत+१
वैशाली गाणी पण काही चॅलेंजिंग घेत नाहीये आणि फार काही मनापासून गात नाहीये सध्या, as if she isn’t interested anymore , something is definitely wrong !
पण शमिका नसती गेली, जयदीप गेला असता बहुदा . अगदीच हा नकोय तो हवा वाटेल म्हणून काढला नसेल असं वाटलं मला Happy

तुला बहुदा मंगेश बोरगावकर आणि विश्वजीत मधे कनफ्युजन होतय >>> करेक्ट दीपांजली. सो नाईस ऑफ यु. अगदी अगदी असंच झालं.

अभिजीत कोसंबी वेगळ्या पर्वात होता , त्याला सुध्दा हिंदीत वाइल्ड कार्ड एंट्री मिळाली होती २००७ मधे, तो लगेच एलिमिनेट झाला हिंदीत. >>> हो हे आठवतंय. लाज वाटत होती बघायला मलातरी. कसा गात होता. त्यामुळे लगेच बाहेर पडणं obvious होतं. तेव्हा बंगाली सारेगमप विनर ओनिक जिंकला होता. नंतरच्या वर्षी वैशालीने लाज राखली मराठी सारेगमप ची आणि हिंदीत जिंकली ती.

अभिजीत पेक्षा त्याचा भाऊ उजवा आहे प्रसनजीत.

लाज वाटत होती बघायला मलातरी. कसा गात होता. त्यामुळे लगेच बाहेर पडणं obvious होतं >>>> प्रसनजीत भांडला होता तेव्हा जज्जांशी

कालच्या भागातलं ड्युएट मधलं सगळ्यात जास्त मधुरा आणि जुईलीचं पटाखा गुडी आवडलं. निहीराचं ड्युएटपणं छान झालं होतं. शरयू आणि प्रसेनजीतचं झालं चांगलं पण ड्युएटमध्ये जे एक इंटरॅक्शन हवी ती मला तरी मिसींग वाटली. शरयू एकटीच गात असल्यासारखी गात होती आणि प्रसेनजीत बळंच तिच्याकडे बघत ड्युएट असल्यासारखं भासवत होता असं वाटलं.

बाकी वैशाली अजिबातच आवडत नाहीये मलाही. परिक्षकांच्या कमेंट्सवरही इतकं कृत्रीम थँक्यू थँक्यू करत असते.

शरयू आणि प्रसेनजीतचं झालं चांगलं पण ड्युएटमध्ये जे एक इंटरॅक्शन हवी ती मला तरी मिसींग वाटली. >>>> +१ मलाहि असेच वाटले. दोघेहि स्वतःच्याच स्टाइल म्ध्ये स्वतः चे गात होते असे वाटले.

Pages