Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02
प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त फ्राय करून खातो
मस्त फ्राय करून खातो
आमच्या घरात नेहमी झुरळं
आमच्या घरात नेहमी झुरळं व्हायची. गेल्या पंचवीस वर्षांत नाही नाही ते उपाय केले. पैशापरीस पैसा गेला पण उपयोग शून्य. मग दोन वर्षांपूर्वी टीव्हीवर ऍड पाहिली. तीच ती! एक कोक्रोच दुसरेको खा जाता है. 'HIT' चं इंजेक्शन वाली! प्रॉडक्ट् जरा महाग आहे. पण एकदम इफेक्टिव. फक्त एक एक थेंब किचनचा ओटा आणि जिथे जिथे झुरळांचा त्रास आहे तिथे तिथे टाकायचा. दुसऱ्याच दिवसापासून झुरळ मरायला चालू झाले. मरणाऱ्या झुरळांची संख्या एव्हढी असायची की झाडूने कचरा गोळा केल्यासारखी सुपड्यावर गोळा करावी लागायची. एक झुरळ दुसऱ्याला खाऊन मरत होता की नाही, ते माहीत नाही. मला तर काही तसं दिसलं नाही. पण मेलेली झुरळं अक्षरशः ड्राय झालेली दिसायची. एकदम कुरकुरीत! फुंक मारली तर उडतील अशी. बस्! त्या दिवसापासून गेली दोन वर्षे आमच्या घरात झुरळ नावालाही उरलं नाही. अगदी माळ्यावरची जुनी पेटी जरी काढली किंवा किचन ओटा, मांडणी, फर्निचरमध्येसुद्धा एकही झुरळ दिसणार नाही. सगळी गायब झालीत. त्यांना माहीत झालंय वाटतं, की आमच्या घरात काहीतरी डेंजर गोष्ट आहे. त्यामुळे ती आमच्याकडे फिरकतच नाहीत.
आमच्या बाथरूममध्ये आणि त्याच्या आजूबाजूला महिन्यातून एकदोनदा तरी गोम नाहीतर तिची पिल्लं निघतात. मग काय!? तिथलंच कपडे धुवायचं धोपटणं घेतो आणि त्यांना चिरडून टाकतो.
आमच्या सोसायटीत कुठल्या ना कुठल्या बिल्डिंगला नेहमी मधाचं पोळं चिकटलेलं असतं. त्यामुळे अंधार झाला, की ट्युबलाईटच्या प्रकाशाकडे आकर्षून नेहमी एखादी मधमाशी घरात शिरते. आणि सारखी घुंss घुंss करत घरभर फिरत रहाते. एकदा तर मी झोपेत असताना माझा हात मधमाशीवर पडला असता ती माझ्या बोटाला चावलीसुद्धा आहे. अक्षरशः बोटाचं हाड तुटल्यासारख्या टेरिफिक वेदना झाल्या होत्या. म्हणून आता मधमाशी घरात शिरली की तिला झाडूचा रट्टा हाणून धारातीर्थी पाडतो.
अजून बरंच काही लिहिण्यासारखं आहे. नंतर लिहितो.
पाली घरात येऊ नये म्हणून काही
पाली घरात येऊ नये म्हणून काही लोक भिंतीवर "कांची नरदराजा" कि "कुंची नारदराजा" असे लिहीतात.
ह्याबाबतीत कोणाचा काही अनुभव?
रच्याकने, पाली चांगल्या असतात. इतर किटकांना खातात. मी एकदा पालीला झुरळ खाताना पहिले आहे, त्यामुळे पाल चांगली असते असे माझे मत झालेय.
आमच्याकडे एका ठराविक १
आमच्याकडे एका ठराविक १ महिन्यात खूप डास येतात.
गुड नाईट लावून, प्रत्येक खिडकीला डास वाली जाळी असून. गॅलरी उघडी राहील्यास किंवा एक्झॉस्ट मधून.
त्या काळात सर्व आघाड्यांवरुन शत्रूचा नि:पात करावा लागतो.
१. गुडनाईट लावून ठेवणे.
२. डासांना मधून मधून गंडवून लाईट घालवून पटकन लावून बॅट ने शिकार करणे.
३. स्वतःला ओडोमास किंवा रोल ऑन लावणे.
४. पंखा लावून झोपणे.
डासांना सरव्हायवल सेन्स येत जातो.मग ते कॉन्टुर असलेल्या सरफेस वर किंवा एखाद्या शार्प कडेवर किंवा छपरावर बसतात जिथे बॅट हात पोहचत नाही.
पाली कधीकधी येतात तेव्हा भयंकर घाबरवून जातात.
झुरळे जास्त येत नाहीत.
कोळी कधीकधी येतात.
पेस्ट कंट्रोल सध्या वर्षाने करतो पण ६ महिन्यातून किंवा ३ महिन्यातून करावा लागणार आहे.
घरात पाली येऊ नये म्हणून बलक
घरात पाली येऊ नये म्हणून बलक काढलेली कोंबडीची अंडी धाग्यात ओवून दरवाजाला लटकवलेली पाहिलीत.
आमच्या सोसायटीत बदामाची
आमच्या सोसायटीत बदामाची पुष्कळ झाडे आहेत. त्यामुळे त्या झाडांवर बदाम खायला पुष्कळ पोपट आणि खारूताई रहातात. सगळ्यांच्या गॅलरीला ग्रील असल्याने खारुताई खालून वर सातव्या मजल्यापर्यंत ग्रीलला पकडून धावत असतात. आपण गॅलरीत उभे राहिले की बऱ्याचदा आपल्या ग्रीलवर खारुताई खेळताना दिसते, ती सहसा घरात शिरत नाही. पण एकदा एक खारुताई आमच्या घरात शिरली होती. कपाटाच्यामागे जाऊन लपली होती. आम्ही तिला आणि ती आम्हाला घाबरून उड्या मारत होतो. मोठ्या मुश्किलीने मी तिला घराबाहेर हुसकावू शकलो.
सर्व प्रथम संध्याकाळच्या
सर्व प्रथम संध्याकाळच्या जस्ट आधी. साडेपाचला भारतातच हो. सर्व दारे खिडक्या बंद करून ठे वणे. डास संधिकाळात घरात येतात. तसेच दिवेलागणीला इतर किडे , पावसाळी किडे वगैरे आत येतात. किल्ला सर्व बंद करून ठेवणे.
माझा अॅक्वागार्ड सप्लायर व सर्विस मॅन ह्याच्याकडे झुरळांना मारायचा एक हर्बल उपाय आहे. तो दर तिन महिन्यांनी करून घेते. बारके पांढरे ठिपके सर्वत्र लावतो तो एका गन ने. ही ट्रिटमेंट मुम्बईत तरी फार कॉमन उपलब्ध आहे.
घरी स्प्रे ठेवते कॉकरोच व अँट्स वेग वेगळे.
टू द एक्स्टेंट मुंग्या मारत नाही. झुरळे पण नाही इतकी होतच नाहीत. मेन इन ब्लॅक टू मध्ये एक सीन आहे एजंट पाय ठेवणार असतो तो बाजूला घेतो ते झुरळ त्याला डँ म डीसेंट ऑफ यू. म्हण ते . प्रिवेंटिव्ह उपाय करते. किचन स्वच्छ. ऑल स्टफ नीटली कव्हर्ड. ड्राय. मग त्रास होत नाही.
पाल घरात राहात नाही उन्हाळ्यात गारव्या साठी येतात. तात्पुरत्या त्या इग्नोअर करते. व पिल्लू असल्यास कुत्रे मारून टाकते. फार हंगामा होतो.
डास मात्र एकदम दिसला की स्प्रे ऑफ कारण डेंग्यू/मलेरिआ झाला तर प्रॉब्लेम.
झुरळांकरता तो हिट जेल चा
झुरळांकरता तो हिट जेल चा प्रयोग एकदम खात्रिशीर आहे. १५०/- ला एक सिरिंज आहे त्याची.
दीड महिना झुरळं फिरकत पण नाहीत. मग पुन्हा लावावं लागत ते जेल. एक सिरिंज ३-४ वेळा पुरते (डिपेंड किती एरिआ मध्ये लावताय)
आमच्या मजल्यावर एक फ्लॅट बरेच
आमच्या मजल्यावर एक फ्लॅट बरेच दिवस बंद होता. त्या फ्लॅटच्या बाथरूमच्या खिडकीची काच तुटलेली असल्याने कबुतरांनी त्या घरात बस्तान ठोकले होते. एकदा सकाळी त्या फ्लॅटच्या घरमालकाने घराची हालहवाल बघायला मेन डोअर उघडल्याबरोबर एक कबुतर खिडकीतून बाहेर उडून न जाता, घाबरून उलटे मेनडोअरमधून जिन्यामध्ये शिरले. घरमालकाने घरात जाऊन मेनडोअर बंद करून घेतला.
आता कबुतर जिन्यात अडकले. प्रत्येक मजल्यावरचे ओपनिंग सिमेंटच्या जाळीने बंद होते. तर वरच्या गच्चीचा दरवाजाही कुलूपबंद होता. कबुतर फडफडत वरच्या मजल्यावर जायचे. तिथून कोणी हाकलले तर फडफडत खालच्या मजल्यावर यायचे.
संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी आलो तर मला कबुतराचा धुमाकूळ माहीत पडला. माझी कबुतरला पकडायची डेअरिंग होईना. मग मी एक युक्ती केली. मी त्या कबुतरला हुसकावत माझ्या मजल्यावर आणले. सौ.ला आमच्या घराचा मेन डोअर उघडायला सांगितला आणि कबुतरला आमच्या घरात हुसकावले. कबुतर आमच्या घरात शिरले आणि उघड्या दिसलेल्या गॅलरीच्या दरवाजातून बाहेर उडून गेले. मिशन कबुतर सक्सेसफुल झाले.
मच्छरसाठी आम्ही रात्री
मच्छरसाठी आम्ही रात्री कापराची एक वडी त्या गुडनाइटच्या मशीनमध्ये गुडनाइट मॅट ऐवजी लावतो. त्यामुळे मच्छर येत नाहीत असं वाटतंय. पण हल्ली दिवसाढवळ्या फिरणारेही डास आलेत.
पण हल्ली दिवसाढवळ्या
पण हल्ली दिवसाढवळ्या फिरणारेही डास आलेत.}}}}}
रक्तचा तुटवडा असेल म्हणून डे शिफ्ट पण करावी लागत असणार
मच्छरसाठी आम्ही रात्री
मच्छरसाठी आम्ही रात्री कापराची एक वडी त्या गुडनाइटच्या मशीनमध्ये गुडनाइट मॅट ऐवजी लावतो. >>>
ती मॅटवाली मशीन मिळते अजून??? आता तर liquid vaporizer वापरले जातात ना!
जुनी मशीन वापरात असेल.
जुनी मशीन वापरात असेल.
भरत, कापूर पेटत नाही का?
भरत, कापूर पेटत नाही का? सांभाळून.
टोरांटोत सुरुवातीला राहायला आलो तेव्हा स्वस्त अपार्टमेंट मिळाली म्हणून झालेला आनंद 2 3 महिन्यात झुरळं दिसू लागल्यावर मावळला. सगळे उपाय केले पण टेम्परवारी उपयोग. पुन्हा येरे माझ्या मागल्या. मग जागा बदलली.
नाही पेटत.
नाही पेटत.
जुन्या मशीन्सच आहेत.
१) झुरळ - चपलेने मारतो.
१) झुरळ - चपलेने मारतो. अत्यंत किळसवाणा प्राणी. त्याच लायकीचा असतो. चपलेच्या एकाच फटक्यात मेल्यावर एक आसुरी आनंद मिळतो. खरे तर त्याचे पोट फुटून आतला मसाला बाहेर आला की तो आणखी किळसवाणा दिसतो. मात्र मेलेला आहे हे बघून छान वाटते.
२) उडते झुरळ - हे जेव्हा उडत उडत अंगावर येऊन बसतात त्या स्पर्शाची तुलना जगात कश्याशीही होऊ शकत नाही. म्हणून यांना एका फटक्यात न मारता छळून छळून मारायचे. मी यांच्या पायाला दोरी बांधून त्यांच्यासोबत ते मरेपर्यंत खेळतो. दोन उडती झुरळे भेटली तर चंगळच. दोरीच्या दोन टोकांना दोन बांधतो.
३) पाल - अ) मांसाहारी उपाय - पाल येण्याजाण्याच्या मार्गावर अंड्याची टरफलं लटकवायची. पाली स्वाभिमानी असतात. मी अंडी खाल्ली नाहीत, मी टरफले उचलणार नाही म्हणत आल्या पावली परत जातात.
३) पाल - ब) अंड्याला पर्याय काय असे विचारणार्यांसाठी शाकाहारी उपाय - पाल येण्याजाण्याच्या मार्गावर मोरपीस खोचायचे. हे नेमके कसे काम करते कल्पना नाही, पण ही अंधश्रद्दा नाहीये ईतके खरे.
४) उडती पाल - ही फक्त माझ्या स्वप्नात येते. मी दचकून स्वप्न मोडतो. ती गायबते.
५) मुंग्या - ओवनमध्ये गूळाचा तुकडा टाकायचा आणि ओवनचा दरवाजा हलकासा उघडा ठेवायचा. एकदा का आत शिरल्या की दार बंद करून हिट चेंबरमध्ये त्यांना जाळून टाकायचे. उच्च तापमानाला मुंग्या आणि गूळ मिसळून जो पदार्थ तयार होतो तो फ्रिजमध्ये ठेवून गार केल्यावर मोरंब्यासारखा पोळीसोबत लावून खायला छान वाटतो.
६) मच्छर आणि डास - बाजारात ज्या मच्छर मारायच्या मशीनी मिळतात त्या फक्त मच्छर पळवतात. त्यांना मारत नाही. जर मारले तर उद्या तुम्हाला कोण चावायला येणार. आणि मग त्या गूडनाईट ऑलाऊटवाल्यांचा धंदा कसा होणार. म्हणून त्यांच्या नादी न लागता, या मच्छरना दयामाया न दाखवता त्यांना मारायचे. कारण झुरळी, पाली, उंदरे तर तुम्हाला फक्त घाबरवतात. पण हा असा किटक आहे जो तुमचे रक्त शोषून घेतो. आणि तुम्हाला स्वातंत्र्यही देत नाही. म्हणून काही नाही, यांना मारायचेच.
पण जेव्हा हे संख्येने बरेच असतात. तेव्हा ईतक्या उडत्या जीवांना पकडून मारणे सोपे नसते. अश्यावेळी त्यातील एखाद्या धष्टपुष्ट दादा मच्छरला हेरून चिमटीत पकडायचे. आणि त्याच्या पार्श्वभागाला बल्बचा चटका देत सोडून द्यायचे. मग तो जाऊन ईतरांना सांगतो की हा दादा खूप डेंजर आहे, नको तिथे चटका देतो. त्याच्या नादाला लागू नका. किमान चार दिवस कोणी मच्छर आपल्या आसपास फिरत नाही. शेवटी माणूस असो वा मच्छर, प्रत्येकाला आपला पार्श्वभाग प्यारा असतो.
७) साप - ईटस स्पेशालिस्टस जॉब. सो मी माझ्या सर्पमैत्रिणीला फोन लावतो. ती येते. माझ्या गळ्यात हात टाकते. मग सापाला पकडून आपल्या गळ्यात टाकते. आणि त्याला झुलवुत झुलवत निघून जाते.
माझ्याकडे थंडी संपत आली कि
माझ्याकडे थंडी संपत आली कि घरात मुंग्या प्रवेश करायला लागतात. स्वयंपाकघरात कोणतेही विषारी औषध वापरायला नको वाटते. मग त्यासाठी
सगळे lemon grass oil ने नियमीत पुसते.
अन्नकण कुठेही पडून राहणार नाहीत खबरदारी घेते.
रात्री व्हिनेगर + पाणी चा फवारा ओट्याच्या बाजूने व खाली मारते.
बर्याचश्या कप्प्यांमधे छोट्याश्या वाटीत व्हिनेगर व लेमन ग्रास ऑईलचा कापसाचा बोळा ठेवते.
झुरळे येण्याचा मार्ग प्रथम
झुरळे येण्याचा मार्ग प्रथम बंद करावा लागतो. तो बाथरुम /सिंक वगेरेच्या खालच्या पाइपमधून असतो. यातून मोठी झुरळे येतात. छोटी सिताफळ बियांएवढी झुरळे ही किचिन खिडकितून आणि फॅनमधून येतात. क्र १ वाली कोणतेही आमिष हिट/बेगान बेट खाऊन मरतात. क्र २ हे असले काही खात नाहीत. सिमान हलवून खराटा वापरणे॥
उपाय - हल्ली ड्रेनेज पाइपना यु ट्युब पाण्याचे सील नसते म्हणून एक नायलान जाळी बसवा. खिडक्यांच्या,फॅनच्या जाळ्या बरोबर लागल्या पाहिजेत.
>>>>डास, झुरळे, पाली, मुंग्या
>>>>डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?<<<<
काय करतो ? डेलिकसी म्हणून खातो.
पालींना मी घाबरत नाही.
पालींना मी घाबरत नाही.
डास येऊ नयेत म्हणून संध्याकाळी स्ट्रिक्टली दारं खिडक्या पूर्ण बंद. ( जाळीपण उघडी ठेवत नाही). तरीही कधीकधी चुकून दारं/ खिडक्या उघड्या राहिल्या तर डास येतात, मग ते झोपण्यापूर्वी रॅकेट घेऊन मारायचे. तरीही शिल्लक आहेत असा संशय आला तर गुड नाईट/ ऑल आऊट.
मुंग्या आणि झुरळांसाठी लक्ष्मणरेखा/ क्रेझी लाईन्सच्या रेषा पुरतात.
राहुल१२३जी
राहुल१२३जी
"...त्यामुळे पाल चांगली असते असे माझे मत झालेय...." ह्या आपल्या वक्यावरून आपण पालीकडे बोट दाखवून "....क्यों की दाग अच्छे होते है!.." ह्या जाहिरातीच्या चाली सारखे समजवून सांगताय असे दृश्य क्षणभर डोळ्यांसमोर तरळले!!
srdjजी
srdjजी
"...छोटी सिताफळ बियांएवढी झुरळे..." अहो नको हो! सीतफळ मला आवडते! कॄपया दुसरी उपमा द्या!!
संध्याकाळी निर्गुडीच्या
संध्याकाळी निर्गुडीच्या पाल्याचा धूर करायचा डासांवरील उत्तम आणि प्रभावी उपाय आहे!
झुरळांसाठी साबणाचे पाणी वापरायचे. आठवड्यातून एकदा कपाटे स्वयंपाकाचा ओटा, इत्यादी भरपूर साबणाचे पाणी वापरून धुवायचे..
पुर्वी ५५५ वैगेरे जे पिवळे किंवा निंबोळ्याचे साबण मिळायचे ते अतिशय प्रभावी होते...
{{{ शेरास सव्वाशेर प्राणी
{{{ शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.) }}}
पुण्यात घरात बिबट्या शिरला तर आख्ख्या कॉलनीला बोलावून वन् बाय वन् सेल्फी काढतात.
"कांची नरदराजा" >>> हे मी
"कांची नरदराजा" >>> हे मी लिहिलं होतं श्रीरामपुरला असताना. तिथे पाली खूप येत घरात, हे मी कुठेतरी वाचून लिहिलं पण मस्त त्यावरून आरामात पाली फिरायच्या.
मी झुरळांसाठी लाल हिट वापरते. बाकी डास, मुंग्यासाठी काळे हिट, लक्ष्मणरेषा. झुरळे दिसतात अधूनमधून घरात, डास असतात पण मुंग्या आणि पाली नसतात इथे जास्त. मी काही ठिकाणी मध्ये मध्ये लक्ष्मणरेखा उर्फ क्रेझी लाईन्स मारत रहाते. ड्रेनेज पाईपच्या आसपास, ओट्याखाली वगैरे. सध्यातरी trolies नाहीत आमच्याकडे त्यामुळे ओट्याखाली ओपन आहे.
डास आलेचं घरात तर बॅट्ने
डास आलेचं घरात तर बॅट्ने मारायचे. एक दिवस मी ३ का ४ डास मारले तर स्वप्नात मी डास मारत्ये आणि ते संपतचं नाहीयेत
, कळेना स्वप्न आहे का खरचं चालू आहे :ड
पाल घरात येऊ नये ह्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचे, चुकुन आली तर मारल्याशिवाय झोप लागत नाही. एकदा एक अगदी छोटी आली एक्झॉस्ट फॅन च्या गॅप मधून आणि टप्पर्वेअर च्या पाण्याच्या पिंपात पडली. आईने सकाळी गोळी घेतली तेव्हा तेचं पाणी प्यायलं होतं. मी पाणी भरायला झाकण उघडलं आणि पाल दिसली. कामवाल्या बाईंनी ते पिंप टेरेस मधे नेलं आणि पाल घालवली. आईला लगेच डॉ कडे नेलं विषारी अस्ते ऐकलं होतं म्हणून. डॉ नी एक गोळी लिहून दिली पण पाल विषारी असते हा गैरसमज आहे, काही होणार नाही असं आश्वासनही दिलं. अर्थात काही झालं नाही आईला म्हणून ठीक.
मुंग्या , झुरळं क्वचित दिसतात्, लगेच मारणे हा उपाय.
दर ३ महिन्यांनी पेस्ट कंट्रोल करतो.
चुकुन आली तर मारल्याशिवाय झोप
चुकुन आली तर मारल्याशिवाय झोप लागत नाही >>> अगदी अगदी. श्रीरामपूरला मी पाली मारल्यात चक्क. मला जाम भीती वाटते. इथे क्वचित येते पण आधी लाल हिट मारते, ती लहान असेल तर सरबरीत होते मग मारते. मोठी असेल तर उपयोग होत नाही फारसा. फार किळसही वाटते पालींची.
डास-झुरळे-पाली-मुंग्या.
डास-झुरळे-पाली-मुंग्या.
डास :
१.कच्चा डास ही एक डेलीकसी आहे. पण खाण्यापुर्वी त्याला किंचीत कोमट मीठाच्या पाण्यातुन हलकेच बुडवुन काढावा. काही जणांना पंख जिभेला खरखरीत लागतात. मग ते शरीरापासुन ०.३ मिमी एवढे कापुन टाकावेत.
२. २०-२५ डास घेवुन स्वच्छ धुवुन घ्यावेत, मीरपुड आणी समुद्री मीठ भुरभुरवुन प्लास्टिक फिल्म ने ३० मि. रॅप करुन ठेवावे. एका बेकींग ट्रे ला थोड ऑलिव्ह तेल लावुन ५५ डिग्रीला प्रीहिटेड ओव्हन ला साधारण ६ मी. बेक करुन घ्यावेत. दुपारच्या चहा/कॉफी बरोबर उत्तम.
३.२५०-३०० डास स्वच्छ धुवुन घेवुन त्यांना आलंलसुन पेस्ट, अर्धा चमचा दही, तिखट (शक्यतो काश्मिरी), किंचीत हळद, आणी पाव लिंबाचा रस टाकुन व्यवस्थित रित्या ढ्वळुन मॅरिनेट करायला(३-४ तास) ठेवावे. यात दोन व्हर्जन आहेत. विथ ग्रेव्ही आणी तंदुरी अस करुन पाहु शकता, विथ ग्रेव्ही वाला बटरनान बरोबर आणी तंदुरी नुसता किंवा स्टार्टर म्हणुन.
४. ४०-५० डास धुवुन घेवुन त्यांना मैद्याच्या बॅटर मधे घोळवुन सुर्यफुलाच्या बियांच्या तेलात तळुन घेवुन एका नॉनस्टिक पॅन मधे हॉट अॅन्ड सोर, किंवा मशरुम किंवा कॉर्न सुप तयार केल्यावर त्यात सोडावेत, नुसते किंवा गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर खावे.
लवकरच येत आहे झुरळ........ ढँण-ट-ढॅ.............टुगडुक टुगडुक....
कोळी किडे , जाळी कसे साफ
कोळी किडे , जाळी कसे साफ करायचे घरातले? घर खूप घाण दिसते त्या जाळ्यानी.
एक दिवस मी ३ का ४ डास मारले
एक दिवस मी ३ का ४ डास मारले तर स्वप्नात मी डास मारत्ये आणि ते संपतचं नाहीयेत Sad>> मी एके दिवशी. मोजून ५० च्या वर मारलेत
Pages