Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02
प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पाल घालवायचा हमखास खात्रीशीर
पाल घालवायचा हमखास खात्रीशीर उपाय
बापरे अनु , चक्क पाल उचलून
बापरे अनु , चक्क पाल उचलून टाकतेस ? माझ्यात तर तेवढेही
डेरिंग नाही . आमच्याकडेही पाल दिसलेल्या भागात कर्फ्यु असतो. मी आणि मुलगी दुसऱ्या खोलीत असतो . नवरा एकटाच खिंड लढवत असतो. इथले वाचून हिट चा मात्र खूप उपयोग होतो आहे . आमच्या इथल्या छताऐवजी जमिनीवर पळापळी खेळतात त्यामुळे अजूनच भीती वाटते.
>>आमच्या इथल्या छताऐवजी
>>आमच्या इथल्या छताऐवजी जमिनीवर पळापळी खेळतात >> तुम्ही १० व्या मजल्यावर रहाता का? आता ११ व्या मजल्यावर घर घेऊन बघा.
रच्याकने: हिट ठेवायला आयोटी
रच्याकने: हिट ठेवायला आयोटी वजन मापक ही मजा नाही. कोणी केला नसेल तर आपण पेटंट घेऊन टाकू.
मी रेस्टॉरंट/ बार मध्ये अल्कोहोलच्या बाटल्यांना लावायची आयोटी बुचं.. म्हणजे अल्कोहोल काही पातळीच्या खाली गेलं की स्टॉक अपडेट होऊन शॉपिंग लिस्ट आपोआप बनेल... अशा नॉव्हेल प्रॉडक्ट बनवणार्या कंपनीचा इंटर्व्हू दिलेला आहे. पुढे त्या कंपनीला फॉलो नाही केलं त्यामुळे प्रॉडक्ट बाजारात आलं का काय कल्पना नाही.
मिल्टनवाल्यानी शॉपिंग लिस्ट
मिल्टनवाल्यानी शॉपिंग लिस्ट नाही पण बाटलीतले पाणी कमी झाले तर फोनच्या ऍपवर दिसेल अशी बुचवाली बाटली आणली आहे बाजारात. आता बाटलीत वाकून बघायचे की ऍपवर याने काय फरक पडणार आहे? शेवटी चालत जाऊनच बाटली भरायची आहे ना? का तिला ड्रोन लावून डिस्पेन्सरपर्यंत नेणार आहेत?
यापूर्वी बाटलीतल्या कन्टेन्ट (चहा/कॉफी म्हणतेय मी)चे तापमान दाखवणाऱ्या बाटल्या येऊन गेल्या. साधारण २-३ महिन्यांनी त्याचे जे काय सर्किट असते ते बंद पडते आणि मग ती जड झाकणाची इन्सुलेटेड बॉटल म्हणून पडून राहते कारण हलक्या झाकणाच्या इन्सुलेटेड बॉटल्स घरात असतातच.
इतका यो पणा करायची वेळ नाही
इतका यो पणा करायची वेळ नाही आली अजून पण 3-4 इंस्टा मार्ट डिलिव्हरी नंतर 1 लाल हिट असतं.1 हिट नीट स्ट्रॅटेजी करून वापरलं तर 4 पाली कव्हर होतात.
इथे नाहीत पण सिंगापुरात
इथे नाहीत पण सिंगापुरात चिक्कार पाली असायच्या..मारण्याचे contract माझ्याकडे च ...नवरा राम राम राम राम म्हणत बसलेला असतो..HIT superhit आहे आमच्याकडे . पाली बरोबर मरतात..stock मध्ये कायम असतेच .. साबा म्हणतात काशीला जाऊन सोन्याची पाल देऊन ये
अनु मांजर पाळल्यावर पाल येत
अनु मांजर पाळल्यावर पाल येत नाही म्हणे..तो एक उपाय करून बघ
हा गोड गैरसमज आहे.आमच्या
हा गोड गैरसमज आहे.आमच्या सोसायटीत किमान 6 मांजरं आहेत.त्यातलं कोणीही पाल मारताना किंवा खाताना दिसत नाही.
(No subject)
(No subject)
ह्याप्रमाणे पाहिले तर मांजर (
जिला कुत्री सुद्धा म्हणतात म्हणून रुसल्याने सोसायटी आवारातील उंदीर खाणे सोडून दिलंय) पाळणे उपयोगाचे नसून साप आवश्यक आहेलहान पाली लाल हिटने बेशुद्ध
लहान पाली लाल हिटने बेशुद्ध पडतात, नंतर त्या मारुन टाकून देता येतात, मोठया पालींवर एवढा फरक नाही पडत.
लिफ्ट च्या बाहेरच्या बाजूला
लिफ्ट च्या बाहेरच्या बाजूला बसून येत असतील.लिफ्टमध्ये पाल अजून पहिली नाही(थॅंक गॉड)
just imagine केलं, पालींना एवढ्या घाबरणाऱ्या व्यक्ती top floor ला राहत आहेत.... लिफ्ट ने वर - खाली जात आहेत, automatic doors असलेली लिफ्ट आहे....बटण दाबल्यावर दरवाजे बंद झालेले आहेत... लिफ्ट सुरु झालेली आहे.... आणि.... कुठूनतरी...लिफ्टच्या air vents मधून पालीच्या एखाद्या लहानशा पिल्लाने लिफ्ट कारमध्ये प्रवेश केलेला आहे!!
दोन्हीपैकी एक मरेल, लिफ्ट
दोन्हीपैकी एक मरेल, लिफ्ट डेस्टिनेशन ला पोहचेपर्यंत
शनिवारी संध्याकाळी बाहेर जाऊन
शनिवारी संध्याकाळी बाहेर जाऊन आले. बेल वाजवली, नवऱ्याने एक दार उघडलं, तेवढ्यात माझं लक्ष खाली गेलं, मोठा बेडूक दिसला, एकदम अरे बापरे वाटलं, ईई केलं (मला एकदम अनुने लिहिलेलं बेडकांचे ते आठवलं, म्हटलं अनुची मस्करी उगाच केली, आता माझ्या राशीला बेडूक
) . मी नवऱ्याला म्हटलं थांब सेफ्टी डोअर उघडू नकोस. तो बेडूक प्लेन नव्हता, थोडे ठिपके होते पण मला बघून जिने चढू लागला, मला हुश्श झालं, जरा चार पाच पायऱ्या चढल्यावर दार उघडायला सांगितलं, मग मी आत गेले.
Pages