लेखाची प्रेरणा ईथून आली असली तरी माझी समस्या जेन्युईन आणि त्यापेक्षा जास्त महत्वाची आहे.
तर मुंबई म्हटले तर जीवाची मुंबई ! त्यात आमची तिथे तीन तीन घरे ! ईन द हार्ट ऑफ द सिटी, दादर - माटुंगा - वडाळा या आमच्या जोडीने फिरायच्या जागा. आणि त्यातही लाडके ते फाईव्ह गार्डन. एका गार्डनमध्ये वृद्ध चकाट्या मारताहेत, दुसर्या गार्डनमध्ये पोरं क्रिकेट खेळताहेत, तिसर्यामध्ये त्यांच्या आया व्यायाम करताहेत, चौथ्यामध्ये कोणी नाही तर कुत्रे तंगड्या ताणून पसरले आहेत. यात पाचवे फाईव्ह गार्डन आमचे.. म्हणजे आमच्यासारख्या प्रेमी युगुलांचे.
हातात हात, खांद्याला खांदा, नजरेला नजर, आणि दिवसभरच्या गप्पा.. !
ती सेंट्रल रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर उतरायची आणि त्याचवेळी मी दक्षिण मुंबईकर, हार्बर लाईनच्या वडाळा स्टेशनवर उतरायचो. ईथून आमचा एकमेकांच्या ओढीने, एकमेकांच्या दिशेने प्रवास सुरु व्हायचा. ते फाईव्ह गार्डनमधील पाचव्या बागेत आमची गाठ पडायची. तिथले ते संध्याकाळचे चार साडेचारच्या सुमारास, उतरत्या तांबूस कोवळ्या उन्हातले, खेळणार्या मुलांच्या कोलाहलापासून आणि गाड्यांच्या वर्दळीपासून दूर, शांत, आल्हाददायक वातावरण.. हातांना हातांची उब पुरायची, गप्पांसोबत तोंडी लावायला एक सुकी भेळ पुरायची.
तिथल्या पानाफुलांनी आमच्या कित्येक आणाभाका ऐकल्या आहेत, आमच्या कित्येक स्वप्नांना त्यांच्याच कुशीत पालवी फुटल्या आहेत. तिथल्या गवतावर आपल्याच मस्तीत फिरणारा मुंगळा न मुंगळा आमच्या प्रणयाचा साक्षीदार बनला आहे..... हे असे आणि बरेच काही, मी तासन तास त्या आठवणीत रमून पानेच्या पाने ईथे लिहू शकतो.
पण प्रश्न तो नाहीये !
गेले ते दिवस ...
आता आम्ही दोघेही जॉबला लागलो आहोत. आमच्या आयुष्यातील रम्य संध्याकाळ आता रात्री आठनंतरच उजाडते. कधी ऑफिसमधून बाहेर पडताना अस्ताला जाणार्या सूर्याचे दर्शन झालेच तर तो क्षण एखादे ग्रहण बघितल्यासारखे एंजॉय करत आठवणीत जपला जातो. आणि हे भाग्य एकाच्या नशिबी आलेच तरी दुसर्याच्या नशिबी त्या दिवशी कामाचे भोग असतातच. पण कधीतरी चारसहा महिने वर्षभरातून एखादा अंगारकी संकष्टीचा योग येतो जेव्हा आम्ही दोघेही वेळेत ऑफिसमधून सुटतो. गेल्या महिन्यात असाच एक योग आला आणि आम्ही आमच्या त्या कॉलेज जीवनाच्या रम्य आठवणींना उजाळा द्यायला फाईव्ह गार्डनला जायचा प्लान बनवला. फरक ईतकाच की यावेळी एक वडाळा अन एक माटुंगा असे न करता दोघेही एकत्रच दादर स्टेशनला उतरलो.
आमचा तो फेव्हरेट बाक अजूनही तसाच होता. पण त्या दिवशी तिथे आधीच बूकींग झाले होते. नेक्स्ट फेव्हरेट त्यापलीकडे दोन बाकं सोडून होता. तिथे तर दोन जोडपी एकाच बाकावर मध्ये एक पिशवी ठेवून बसले होते. गपगुमान आपापले काम करत होते. एकमेकांच्या अध्यात न मध्यात पडता सीमेच्या अलीकडे आणि पलीकडे ईतके प्रेम नांदताना असे पहिल्यांदाच बघत होतो. कडेकडेने फेरी मारून एकूण एक बाक तपासला. फेव्हरेट बाकाचा माज केव्हाच गळून पडला होता. जमिनीवर गवतात पेपर टाकून बसायचीही तयारी व्हावी ईतक्या अपेक्षा खाली उतरल्या होत्या. पण तिथेही काही शौकीन निव्वळ प्रेक्षकाची भुमिका वठवत बसले होते. या 4-जी च्या जमान्यात मोबाईलवर हवे ते, हवे तेव्हा आणि हवे तितके बघायची सोय उपलब्ध झाली आहे तरी काही निसर्गप्रेमी लोकांना त्याच्या सानिध्यातच रमायचे असते आणि तिथलेच नेत्रसुख मिळवायचे असते.
एकंदरीत जागा शोधण्यातच अर्धा तास खर्च झाल्याने आणि त्या नादात चालून चालून पाय दुखू लागल्याने आम्ही नाईलाजाने हॉटेलातच बसण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या हॉटेलांचे हे एक चांगले असते. जागा लगेच मिळते ! तशी ती मिळाली देखील. पण गार्डनमध्ये जागा न मिळाल्याचे शल्य मात्र बोचत राहिले. मिळाली असती तरी तिथले वातावरण पाहता तिथे किती मन रमले असते आणि किती मनमोकळ्या गप्पा झाल्या असत्या याबद्दल शंकाच होती.
राहून राहून मनात तेच विचार येत होते. जसे हॉटेलमध्ये अॅडवान्स बूकींग करता येते, किंवा गेला बाजार नंबर लावत तो येईपर्यंत उपाशी पोटी ताटकळत उभे राहता येते, तसे गार्डन बाबत शक्य होऊ शकत नाही का?
त्यातही ज्यांना फक्त हातात हात घेत गप्पा मारायच्या आहेत आणि ज्यांना त्यापुढे जाऊन काही घडवायचे आहे अश्यांसाठी एकाच गार्डनमध्ये दोन स्वतंत्र कप्पे बनवता येणार नाहीत का?
एकेकाळी ज्या रम्य संध्याकाळी आम्ही फाइव्ह गार्डनच्या परीसरात उपभोगल्या तो अनुभव आता आमच्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही का.......???
असो, तर ज्यांना आपल्या आयुष्यातील या रम्य आठवणी निसंकोचपणे आठवायच्या आहेत आणि जे आताही अनुभवत आहेत अश्या सर्वांचे या धाग्यावर स्वागत आहे. फक्त मला एवढेच सांगा, जे शीर्षकात विचारले आहे... बागेत बसायला जागा कशी मिळवावी
हाल्फ डे टाका एक दिवस.
हाल्फ डे टाका एक दिवस.
हाल्फ डे ची कल्पना छान आहे.
हाल्फ डे ची कल्पना छान आहे.
पण मी एमेनसीत कामाला आहे.
ईथे सुट्टी घेणे म्हणजे सीतेचे अपहरण करण्यापेक्षा कठीण गोष्ट आहे. साधेसोपे बहाणे चालत नाहीत.
डॉक्टर अपॉइंटमेंट हे द्या
डॉक्टर अपॉइंटमेंट हे द्या कारण.
हे अमांच्या धाग्याचे विडंबन
हे अमांच्या धाग्याचे विडंबन का ऋ?
हाल्फ डे >> हे चूक आहे. हाल्फ
हाल्फ डे >> हे चूक आहे. हाल्फ डाय म्हणायला हव.
तसच एमेनसी म्हण्जे मल्टी नॅटिओनल कोम्पन्य का?
विडंबन नाही पियू, जेन्युईयन..
विडंबन नाही पियू, जेन्युईयन.. पण सुचले मात्र त्यावरूनच आणि स्वतःच्या अनुभवावरून..
मुंबईत हॉटेलात जागा मिळते मात्र प्रेमी युगुलांना सुरक्षित, साफसुधरा, सार्वजनिक एकांत मिळणे अवघड झालेय..
डॉक्टर अपॉइंटमेंट हे द्या कारण. >>>> कधीतरी नानाचा प्रहार बघून घ्या.. आमच्या सेक्शन मॅनेजरने पाच वेळा बघितलाय
तिथल्या गवतावर आपल्याच मस्तीत
तिथल्या गवतावर आपल्याच मस्तीत फिरणारा मुंगळा न मुंगळा आमच्या प्रणयाचा साक्षीदार बनला आहे.....>>>
काय ही अवस्था, ३-३ घर आणि उघड्यावर प्रणय. अरेरे...
माटुंगा ... हे अस ठिकाणाच नाव
माटुंगा ... हे अस ठिकाणाच नाव आहे का , कि सोसायटीच नाव आहे ?
फाईव्ह गार्डनच्या आठवणी
फाईव्ह गार्डनच्या आठवणी जाग्या झाल्या. पारसी कॉलनीत मेहर जेसिया बर्याचदा दिसायची आणि म्हातारा झालेला के. एन. सिंग पण बिचारा उदासपणे बसलेला दिसायचा. गेले ते दिवस, आता उरल्यात फक्त आठवणी. फाईव्ह गार्डनला जागा मिळवायची असेल तर सकाळी ८ ते ९ च्या सुमारास जा किंवा संध्याकाळी ४ वाजता. तेव्हा जागा मिळायची "शक्यता" आहे.
>>> मुंबईत हॉटेलात जागा मिळते मात्र प्रेमी युगुलांना सुरक्षित, साफसुधरा, सार्वजनिक एकांत मिळणे अवघड झालेय.. <<<
मुंबईत एकवेळ हॉटेलात/बागेत जागा मिळेल, पण सुरक्षित, साफसुधरा, सार्वजनिक संडास मिळणे अशक्य आहे. हे जास्त गंभीर आहे.
गुड आयडिया BMC ला प्रोपोसल दे
गुड आयडिया BMC ला प्रोपोसल दे,
सगळ्या गार्डन चे 4x4ft चे तुकडे पाडून, पे अँड पार्क च्या धर्तीवर पे अँड सीट म्हणून भाड्याने द्यायचे,
झाडा आड आडोश्याचा स्पॉट असेल तर जास्त रेट.
मग तू म्हणतोस तसे एक्साक्ट स्पॉट, ऍडव्हान्स बुकिंग वगैरे सर्व शक्य आहे .
दादरचा ना तू मग खळ्ळखट्याक
दादरचा ना तू मग खळ्ळखट्याक साहेबांना सांग महाराष्ट्राबाहेरील लोक्स वाढले आहेत.
मी खालसा कॉलेज मध्ये आणि
मी खालसा कॉलेज मध्ये आणि मैत्रीण SIWS मध्ये होती. पाच बगिच्यात एकत्र बसणं म्हणजे अगदीच काहीतरी अवघड वाटायचं. आम्ही VJTI कडे जाणाऱ्या गल्ल्यांमधल्या बस स्टॉप वर गप्पा मारत उभे राहायचो. कधी खिशात पैसे खुळखुळत असतील तर कॅफे मैसूर.
एकदा कॅफे मैसूर मध्ये सकाळीच १०:३० च्या सुमाराला गेलो. वरच्या मजल्यावर आम्ही दोघंच होतो. आणि ट्रे पोटाजवळ धरून आमच्याकडे बघणारे २ वेटर. पाच मिनिटं मेनू बघत टाईमपास केल्यावर दोन फिल्टर कॉफी मागवल्या. तो वेटर अक्षरशः धावत जाऊन अर्ध्या मिनिटांमध्ये स्टीलच्या उलट्या कपमध्ये कॉफी घेऊन आला. १० मिनिटात कॉफी संपल्याबरोबर लगेच कप उचलले गेले. अजून पाच मिनिटांनी खिशाचा अंदाज घेऊन एक मँगोला मागवला. त्याच्यावर अजून अर्धा तास काढला. हा सगळा वेळ ते दोन वेटर आमची आज्ञा पाळायला तत्परतेने ट्रे पोटाशी धरून जवळच उभे होते.
आम्ही एकत्र वेळ काढायला बस
आम्ही एकत्र वेळ काढायला बस प्रवास करायचो. फाउंटनला ९० नाहीतर ८५ नंबरच्या डबलडेकर बस मध्ये चढायचं. वरच्या मजल्यावर डावीकडची पुढून तिसरी खिडकी पकडायची आणि सायन पर्यंत गप्पा मारत यायचं.
पण मी काय म्हणते लग्न केलं तर
पण मी काय म्हणते लग्न केलं तर सगळ्याच अडचणी नाही का संपणार!
काय ही अवस्था, ३-३ घर आणि
काय ही अवस्था, ३-३ घर आणि उघड्यावर प्रणय. अरेरे...
>>>>
तुम्ही ते पिक्चरमध्ये पाहिले नाही का? मोठमोठे टुमदार बंगले असतात. चारचार बेडरूम हॉल डायनिंग असतात. तरीही तेथील जनता चहा पिण्यासाठी मात्र लॉनमधील हिरवळीवरच खुर्च्या टाकते. तसेच आहे हे
दादरचा ना तू मग खळ्ळखट्याक
दादरचा ना तू मग खळ्ळखट्याक साहेबांना सांग महाराष्ट्राबाहेरील लोक्स वाढले आहेत.
>>>>>
मागे कॉलेजला असताना आम्हीच हे मनावर घेतलेले. एका वॅलेंटाईन डे च्या शुभमुहुर्तावर गार्डनमधील पोरापोरींना पकडून त्यांची लग्ने लावून दिलेली. म्हटले आता पुढचा रोमान्स घरातच करा. पण त्या नादात चुकून परप्राण्तीय मुलांची लग्ने मराठी पोरींशी लागली आणि त्यांचे आईबाप साहेबांकडे गेले. आमचाच खळ्ळ फट्ट्याक होता होता राहिला..
असो, बाकी दादर मध्य मुंबई. आम्ही दक्षिण मुंबई .. तरी दादर ही शाळाकॉलेजक्लासगार्डनभूमी !
पण मी काय म्हणते लग्न केलं तर
पण मी काय म्हणते लग्न केलं तर सगळ्याच अडचणी नाही का संपणार!
>>>>
राजसी प्रॅक्टीकल विचार करा. मुलगा मुलगी वयात यायचे आणि त्यांचे लग्नाचे योग्य वय व्हायव्हे यात किती वर्षांचा फरक असतो असे तुम्हाला वाटते?
मायबाप सरकार बागेची सोय करू शकत नाही म्हणून जनतेने बालविवाह करायचा का?
व्यत्यय,
व्यत्यय,
छान आठवणी
उपाशी बोका,
येस्स 4 वाजताच काय ती जागा मिळू शकते. जसे संध्याकाळ रंगात येते तसे त्या रंगमंचावर वेगळेच नाट्य रंगू लागते.
मोरपंखी,
माटुंगा ठिकाणाचेच नाव आहे. बहुधा मद्रासी नाव असावे. गूगल केले की सापडेल.
सिंबा,
पर्रफेक्ट, असेच काहीसे मनात आहे. ऑनलाईन बूकिंगचे ज्यादा पैसे भरावे लागले तरी भरू. घरातून डेटला निघताना साला कसले टेंशनच नाही डोक्याला...
अरेरे! काय ही प्रस्थिती.
अरेरे! काय ही प्रस्थिती. आम्ही जाय्चो तेव्हा तर मिळायची जागा.
आताही जातो आम्ही. पण आता गार्डन पण बदलंलय.
बसत नाही मुलांच्या मागे धावायला लागतं.
कमाल करमणुक धागा आहे.
कमाल करमणुक धागा आहे.
सुट्टी घेणे म्हणजे सीतेचे अपहरण करण्यापेक्षा कठीण गोष्ट आहे>>
मुलगा मुलगी वयात यायचे आणि
मुलगा मुलगी वयात यायचे आणि त्यांचे लग्नाचे योग्य वय व्हायव्हे यात ----- फक्त वय के धरुन बसलात. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ पण असते
अभ्यासाच्या वेळेला अभ्यास, लग्नाच्या वेळेला लग्न / लफड जे काय जमेल / होईल ते.
Submitted by सिम्बा on 19
Submitted by सिम्बा on 19 December, 2017 - 04:59 >>>
ईथे सुट्टी घेणे म्हणजे सीतेचे अपहरण करण्यापेक्षा कठीण गोष्ट आहे. साधेसोपे बहाणे चालत नाहीत. >>>> ह्या साठी मला माझी आत्ताची नोकरी आवडते, सुट्ट्या भरपुर आहेत.
मी तर बरेचदा कंटाळा आला अन शक्यतो जास्त महत्त्वाचे काही काम नसणारे माहित असेल तर बिंदास सिक लिव घेते (अनलिमीटेड SL आहेत आम्हाला
)
ऋ, स्वतःचं बाक स्वतः घेउन
ऋ, स्वतःचं बाक स्वतः घेउन जाण्याची आयडीय कशी वाटते.
चला.... "फोल्डिंग बाक घेणे
चला.... "फोल्डिंग बाक घेणे आहे, कुठून घेऊ ?" धागा काढायची प्रेरणा मिळाली कुऋ ला
सिम्बा
सिम्बा
स्वत:चा बाक न्यायची आयड्या
स्वत:चा बाक न्यायची आयड्या
आपलाच बाक आपलीच गर्लफ्रेंड..
प्रेमात पडलो तरी बाक वर..
होऊ दे खर्च, बाकडा आहे घरचं..
भाऊंशे वाकडं, बागेत बाकडं
रहायला उपनगरात, पण कामाला
रहायला उपनगरात, पण कामाला मुंबईत असूनही गेल्या तीस वर्षात फाईव्ह गार्डनला जाणे झाले नाही हो! त्यापूर्वी आम्ही पंचवीस वर्षे सायन कोळीवाड्यात रहायला होतो. त्यामुळे फाईव्ह गार्डन, माटुंगा, दादर, किंग्ज सर्कल, खालसा कॉलेज, रुईया, म्हैसूर कॅफे, महेश्वरी उद्यान ही सर्व माझ्या पायाखालची ठिकाणं होती. ह्या लेखाच्या निमित्ताने जुन्या आठवणी पुन्हा उफाळून आल्यात.
तुझ्या ३ -३ घरांपैकी एका घरात
तुझ्या ३ -३ घरांपैकी एका घरात गार्डन बनव. थोडी साखर पेरुन ठेव म्हणजे मुंगळे पण येतील साक्षीला.
हाकानाका!
फुडट्रक सारखा एखादा टेम्पो त्यात मस्त गादी वगैरे टाक किंवा गेला बजार हातगाडीपण वापरु शकतो. हातगाडी नेलीस तर आडोश्यासाठी प्लॅस्तिक किंवा ताडपत्री पण ने. मुंबईत आजकाल कधीही पाऊस पडतो.
माझ्यामते हातगाडीच बरी नो एन्ट्रि चे नियम नाही लागू होत
मायबाप सरकार बागेची सोय करू
मायबाप सरकार बागेची सोय करू शकत नाही म्हणून जनतेने बालविवाह करायचा का? >>> धमाल करमणूक चालु आहे ईथे .
थोडी साखर पेरुन ठेव म्हणजे
थोडी साखर पेरुन ठेव म्हणजे मुंगळे पण येतील साक्षीला.
>> चंद्र आहे साक्षीला च्या चालीवर 'मुंगळे आहेत साक्षीला' असं गाणं पण म्हण
Pages