फाईव्ह गार्डन, मुंबई ईथे पाचव्या बागेत बसायला जागा कशी मिळवावी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 December, 2017 - 13:14

लेखाची प्रेरणा ईथून आली असली तरी माझी समस्या जेन्युईन आणि त्यापेक्षा जास्त महत्वाची आहे.

तर मुंबई म्हटले तर जीवाची मुंबई ! त्यात आमची तिथे तीन तीन घरे ! ईन द हार्ट ऑफ द सिटी, दादर - माटुंगा - वडाळा या आमच्या जोडीने फिरायच्या जागा. आणि त्यातही लाडके ते फाईव्ह गार्डन. एका गार्डनमध्ये वृद्ध चकाट्या मारताहेत, दुसर्‍या गार्डनमध्ये पोरं क्रिकेट खेळताहेत, तिसर्‍यामध्ये त्यांच्या आया व्यायाम करताहेत, चौथ्यामध्ये कोणी नाही तर कुत्रे तंगड्या ताणून पसरले आहेत. यात पाचवे फाईव्ह गार्डन आमचे.. म्हणजे आमच्यासारख्या प्रेमी युगुलांचे.

हातात हात, खांद्याला खांदा, नजरेला नजर, आणि दिवसभरच्या गप्पा.. !
ती सेंट्रल रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर उतरायची आणि त्याचवेळी मी दक्षिण मुंबईकर, हार्बर लाईनच्या वडाळा स्टेशनवर उतरायचो. ईथून आमचा एकमेकांच्या ओढीने, एकमेकांच्या दिशेने प्रवास सुरु व्हायचा. ते फाईव्ह गार्डनमधील पाचव्या बागेत आमची गाठ पडायची. तिथले ते संध्याकाळचे चार साडेचारच्या सुमारास, उतरत्या तांबूस कोवळ्या उन्हातले, खेळणार्‍या मुलांच्या कोलाहलापासून आणि गाड्यांच्या वर्दळीपासून दूर, शांत, आल्हाददायक वातावरण.. हातांना हातांची उब पुरायची, गप्पांसोबत तोंडी लावायला एक सुकी भेळ पुरायची.

तिथल्या पानाफुलांनी आमच्या कित्येक आणाभाका ऐकल्या आहेत, आमच्या कित्येक स्वप्नांना त्यांच्याच कुशीत पालवी फुटल्या आहेत. तिथल्या गवतावर आपल्याच मस्तीत फिरणारा मुंगळा न मुंगळा आमच्या प्रणयाचा साक्षीदार बनला आहे..... हे असे आणि बरेच काही, मी तासन तास त्या आठवणीत रमून पानेच्या पाने ईथे लिहू शकतो.

पण प्रश्न तो नाहीये !

गेले ते दिवस ...

आता आम्ही दोघेही जॉबला लागलो आहोत. आमच्या आयुष्यातील रम्य संध्याकाळ आता रात्री आठनंतरच उजाडते. कधी ऑफिसमधून बाहेर पडताना अस्ताला जाणार्‍या सूर्याचे दर्शन झालेच तर तो क्षण एखादे ग्रहण बघितल्यासारखे एंजॉय करत आठवणीत जपला जातो. आणि हे भाग्य एकाच्या नशिबी आलेच तरी दुसर्‍याच्या नशिबी त्या दिवशी कामाचे भोग असतातच. पण कधीतरी चारसहा महिने वर्षभरातून एखादा अंगारकी संकष्टीचा योग येतो जेव्हा आम्ही दोघेही वेळेत ऑफिसमधून सुटतो. गेल्या महिन्यात असाच एक योग आला आणि आम्ही आमच्या त्या कॉलेज जीवनाच्या रम्य आठवणींना उजाळा द्यायला फाईव्ह गार्डनला जायचा प्लान बनवला. फरक ईतकाच की यावेळी एक वडाळा अन एक माटुंगा असे न करता दोघेही एकत्रच दादर स्टेशनला उतरलो.

आमचा तो फेव्हरेट बाक अजूनही तसाच होता. पण त्या दिवशी तिथे आधीच बूकींग झाले होते. नेक्स्ट फेव्हरेट त्यापलीकडे दोन बाकं सोडून होता. तिथे तर दोन जोडपी एकाच बाकावर मध्ये एक पिशवी ठेवून बसले होते. गपगुमान आपापले काम करत होते. एकमेकांच्या अध्यात न मध्यात पडता सीमेच्या अलीकडे आणि पलीकडे ईतके प्रेम नांदताना असे पहिल्यांदाच बघत होतो. कडेकडेने फेरी मारून एकूण एक बाक तपासला. फेव्हरेट बाकाचा माज केव्हाच गळून पडला होता. जमिनीवर गवतात पेपर टाकून बसायचीही तयारी व्हावी ईतक्या अपेक्षा खाली उतरल्या होत्या. पण तिथेही काही शौकीन निव्वळ प्रेक्षकाची भुमिका वठवत बसले होते. या 4-जी च्या जमान्यात मोबाईलवर हवे ते, हवे तेव्हा आणि हवे तितके बघायची सोय उपलब्ध झाली आहे तरी काही निसर्गप्रेमी लोकांना त्याच्या सानिध्यातच रमायचे असते आणि तिथलेच नेत्रसुख मिळवायचे असते.

एकंदरीत जागा शोधण्यातच अर्धा तास खर्च झाल्याने आणि त्या नादात चालून चालून पाय दुखू लागल्याने आम्ही नाईलाजाने हॉटेलातच बसण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या हॉटेलांचे हे एक चांगले असते. जागा लगेच मिळते ! तशी ती मिळाली देखील. पण गार्डनमध्ये जागा न मिळाल्याचे शल्य मात्र बोचत राहिले. मिळाली असती तरी तिथले वातावरण पाहता तिथे किती मन रमले असते आणि किती मनमोकळ्या गप्पा झाल्या असत्या याबद्दल शंकाच होती.

राहून राहून मनात तेच विचार येत होते. जसे हॉटेलमध्ये अ‍ॅडवान्स बूकींग करता येते, किंवा गेला बाजार नंबर लावत तो येईपर्यंत उपाशी पोटी ताटकळत उभे राहता येते, तसे गार्डन बाबत शक्य होऊ शकत नाही का?
त्यातही ज्यांना फक्त हातात हात घेत गप्पा मारायच्या आहेत आणि ज्यांना त्यापुढे जाऊन काही घडवायचे आहे अश्यांसाठी एकाच गार्डनमध्ये दोन स्वतंत्र कप्पे बनवता येणार नाहीत का?
एकेकाळी ज्या रम्य संध्याकाळी आम्ही फाइव्ह गार्डनच्या परीसरात उपभोगल्या तो अनुभव आता आमच्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही का.......???

असो, तर ज्यांना आपल्या आयुष्यातील या रम्य आठवणी निसंकोचपणे आठवायच्या आहेत आणि जे आताही अनुभवत आहेत अश्या सर्वांचे या धाग्यावर स्वागत आहे. फक्त मला एवढेच सांगा, जे शीर्षकात विचारले आहे... बागेत बसायला जागा कशी मिळवावी Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>१९७०-७५ मध्ये १०वी मॅट्रीक झाल्यावर ११वी बंद झाली.<<

मी १०वी (एससीसी) नंतरच्या ११वी (एफवायजेसी) बाबत बोलतोय. नविन अभ्यासक्रम असल्याने सुरुवातीची काहि वर्षं फक्त निवडक शाळांमध्ये ११वी च्या वर्गांना परवानगी होती; कॉलेजेसना हि न्हवती. कालांतराने ती सगळ्या शाळांमधुन काढुन कॉलेजेस ना दिली गेली...

Pages