काँडम काँडम काँडम काँडम... निरोध निरोध निरोध निरोध...

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 December, 2017 - 15:10

फार फार लहान असताना टीव्हीवर एक निरोधची जाहीरात लागायची. नेमकी काय कशी ते आता आठवत नाही. पण असे सातत्याने काँडम काँडम निरोध निरोध त्यात बोलले जायचे. बहुतेक हेतू हा होता की काँडम हा शब्द उचारायला जो संकोच आपण करतो तो निघून जावा. बहुधा ती जाहीरात कुठल्या काँडम बनवणार्‍या कंपनीची नसून सरकारची होती. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणारी कॉंडमसारखी साधने वापरताना लोकांनी मेंगळटासारखे वागू नये असा त्यामागे हेतू असावा. आणि तो आमच्यापुरता तरी सफल झाला. म्हणजे ते आमचे काँडम वापरायचे वय नव्हते, पण तो शब्द उच्चारतानाचा संकोच निघून गेला. आणि म्हणूनच अगदी आजही बिनधास्त काँडम काँडम निरोध निरोध असे उच्चारू शकतोय, तसेच ईमेजची पर्वा न करता शीर्षक म्हणून त्या जाहीरातीतील काँडम नामाचा जप ठेवू शकतोय.

असो, तर ती जाहीरात आठवायचे कारण म्हणजे,
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या कंडोमच्या जाहिरातींच्या प्रसारणावर निर्बंध घातले आहेत. यापुढे सकाळी सहा ते रात्री दहा वाजपर्यंत कंडोमच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घातलीय.

अर्थात हल्लीच्या काँडम जाहीरातींतील वाढलेला वाह्यातपणा पाहता हे योग्यच वाटते.
पण मग त्या वाह्यातपणावर निर्बंध लादायचे सोडून काँडम जाहीरातींवर निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे.
कारण वाह्यातपणा करायचे म्हटल्यास कुठेही करता येतो. कॉफीच्या जाहीरातीत तर बरेचदा विनाकारण दिसतो.
आता या बंदीमुळे दारूच्या जाहीरातींवर बंदी आणि काँडमच्या जाहीरातींवर बंदी - यांची एका तागडीत तुलना होणारच.
आणि काँडमवरची बंदी नेमकी का कश्यासाठी आहे याचे कारण सामान्य जन आपल्या सामान्य बुद्धीने शोधताना कॉंडम हा काहीतरी असभ्य निषिद्ध वाह्यात प्रकार आहे असा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचणार.
जे मला सुरुवातीला दिलेल्या जाहीरातीच्या हेतूशी विसंगत वाटतेय.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती जॅस्मीन फ्लेवर वाली पण मागे घेतलीय बहुदा.
मन क्यों बहका रे बहका!!! नानांनी सिरियलच्या ज्या लिंका दिल्यात त्यातल्या सीन सारखी आहे जाहिरात

उलट सिंबॉलिक जाहीराती बनवल्या तर क्रिएटीव्हिटी दाखवायला खूप स्कोप आहे या प्रोडक्टमध्ये

>> https://youtu.be/cSc_CL-Sa3Y
ही बऱ्यापैकी सिम्बॉलीक आणि श्लील जाहिरात.

@अजब ,तुमचा प्रतिगामीपणा तुमच्यापाशी.विर्यनाश हा मृत्यु आहे त्यामुळे तरुणांनी हस्तमैथुन करु नये अशी आसाराम वाणी करणारे तुम्हा प्रतिगाम्यांचे पूज्य गुरुजी आसाराम बापू ७२ व्या वर्षी अनेक अल्पवयीन साधिकांचा बलात्कार करुन सध्या जेलची हवा खात आहेत,त्यामुळे प्लीजच, नैतिक अनैतिकतेच्या व्याख्या शिकवायला इकडे नाही आलात तर बरे पडेल.>>> @ अक्कलशून्य, आम्ही प्रतिगामी आहोत हा जावईशोध पण लावलात Uhoh अम्हाला तुमच्यासारखा फालतू पुरोगामीपणाही व प्रतिगामीपणाही मान्य नाही.. आणि आमचा आसाराम? Rofl कडक गांजा मारून टायपायला बसता का काय??? नैतिक-अनैतिक व्याख्या (हे कुठे आढळले?), इकडे न आलेले बरे वगैरे उचकवेगिरी केली नसती तर इतका लांबडा प्रतिसाद द्यायची गरज पडली नसती... बाकी जिथेतिथे पर्सनल कमेंट मारून विषयांतरात आपला हातखंडाच दिसतोय! इथे पण लगे रहो!!! Happy
सदर प्रतिसाद हा विषयांतर (प्रत्युत्तरादाखल केलेला) असून त्यावर वेमा अथवा अ‍ॅडमीनने झाडू फिरवल्यास काही हरकत नाही.

झालाय बरं आता काँडम नीट डॉटेड Wink >>>> सोनू Proud

मला माहीत नव्हते त्या डॉटला एवढे महत्व असते अन्यथा अशी चूक केलीच नसती Happy

Manforce club soda, durex मिनरल वॉटर, , कोहिनुर बबलगम, अशा जाहिराती येतील

रामदेव बाबा यांचे पंतजली काँडोम येईल. जे वापरल्याने तुम्ही राष्ट्रसेवा , भारताचे उज्ज्वल भविष्य वगैरे वगैरे याला हातभार लावतील. व होणारा नफा चॅरिटी मध्ये जाईल अशी पण जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. आजकाल तो फारशी पुसण्याच्या लिक्विड जाहिरातीत पण देशसेवा वगैरे घुसवत आहे.

रामदेव बाबा यांचे पंतजली काँडोम येईल. जे वापरल्याने तुम्ही राष्ट्रसेवा , भारताचे उज्ज्वल भविष्य वगैरे वगैरे याला हातभार लावतील. व होणारा नफा चॅरिटी मध्ये जाईल अशी पण जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. आजकाल तो फारशी पुसण्याच्या लिक्विड जाहिरातीत पण देशसेवा वगैरे घुसवत आहे.
>>
कल्पना करुनच Rofl

त्यात हर्बल, स्वदेशी-विदेशी, आयुर्वेदिक, केमिकल रहित वगैरे Wink Rofl

पातंजली कंडॉम.
\\त्यात हर्बल, स्वदेशी-विदेशी, आयुर्वेदिक, केमिकल रहित वगैरे\\\
और पुत्रप्राप्तीहेतू हजारो साल पुराने जडीबुटीसे अभिमंडीत....

पुत्रप्राप्तीहेतू !!! >>> ये तो बेसीक में इच वांदा है Uhoh
"...और पुत्रप्राप्ती बिना सिरफ आत्मतृप्ती के हेतू हजारो साल पुराने जडीबुटीसे अभिमंडीत...." असं पाहिजे नाय का ? Wink

अरे वा धागा वर आला..
कालच आठवण आलेली..
काल मी आणि पिंट्याने कॉंडमची जाहीरात पाहिली
आणि फार रात्र सुद्धा झाली नव्हती.
कॉंडम आता फक्त मध्यरात्रीनंतरच हा नियम बदलला का?

कॉंडम आता फक्त मध्यरात्रीनंतरच हा नियम बदलला का?>>>>>>>>
सोन्या, स्वतःच काय लिहिलंयस ते विसरतोस का?

यापुढे सकाळी सहा ते रात्री दहा वाजपर्यंत कंडोमच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घातलीय.

ओके सिंम्बा..
मी ते लिहिले नव्हते.. कॉपी पेस्ट केले होते म्हणून विसरलो Happy

आम्ही बहुधा साडेदहा अकराच्या सुमारास पाहिली जाहीरात..
मुंबईत लोकं दहालाच साडेदहाच्या सुमारासच टीव्हीसमोर जेवायला बसतात.. तिथे हे फक्त दहापर्यंतचे बंधन हास्यास्पद आहे.. नियम गंडलेला आहे Happy

Pages