काँडम काँडम काँडम काँडम... निरोध निरोध निरोध निरोध...

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 December, 2017 - 15:10

फार फार लहान असताना टीव्हीवर एक निरोधची जाहीरात लागायची. नेमकी काय कशी ते आता आठवत नाही. पण असे सातत्याने काँडम काँडम निरोध निरोध त्यात बोलले जायचे. बहुतेक हेतू हा होता की काँडम हा शब्द उचारायला जो संकोच आपण करतो तो निघून जावा. बहुधा ती जाहीरात कुठल्या काँडम बनवणार्‍या कंपनीची नसून सरकारची होती. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणारी कॉंडमसारखी साधने वापरताना लोकांनी मेंगळटासारखे वागू नये असा त्यामागे हेतू असावा. आणि तो आमच्यापुरता तरी सफल झाला. म्हणजे ते आमचे काँडम वापरायचे वय नव्हते, पण तो शब्द उच्चारतानाचा संकोच निघून गेला. आणि म्हणूनच अगदी आजही बिनधास्त काँडम काँडम निरोध निरोध असे उच्चारू शकतोय, तसेच ईमेजची पर्वा न करता शीर्षक म्हणून त्या जाहीरातीतील काँडम नामाचा जप ठेवू शकतोय.

असो, तर ती जाहीरात आठवायचे कारण म्हणजे,
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या कंडोमच्या जाहिरातींच्या प्रसारणावर निर्बंध घातले आहेत. यापुढे सकाळी सहा ते रात्री दहा वाजपर्यंत कंडोमच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घातलीय.

अर्थात हल्लीच्या काँडम जाहीरातींतील वाढलेला वाह्यातपणा पाहता हे योग्यच वाटते.
पण मग त्या वाह्यातपणावर निर्बंध लादायचे सोडून काँडम जाहीरातींवर निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे.
कारण वाह्यातपणा करायचे म्हटल्यास कुठेही करता येतो. कॉफीच्या जाहीरातीत तर बरेचदा विनाकारण दिसतो.
आता या बंदीमुळे दारूच्या जाहीरातींवर बंदी आणि काँडमच्या जाहीरातींवर बंदी - यांची एका तागडीत तुलना होणारच.
आणि काँडमवरची बंदी नेमकी का कश्यासाठी आहे याचे कारण सामान्य जन आपल्या सामान्य बुद्धीने शोधताना कॉंडम हा काहीतरी असभ्य निषिद्ध वाह्यात प्रकार आहे असा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचणार.
जे मला सुरुवातीला दिलेल्या जाहीरातीच्या हेतूशी विसंगत वाटतेय.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या वाह्यातपणावर निर्बंध लादायचे सोडून कॉंडमच्या जाहीरातींवर निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे. >>> अनुमोदन

त्या मुलाला त्या कंडोमच्या फ्लेवरचा काय उपयोग असेल असा विचार कल्पना काढणार्‍याच्या मनात आला नाही हे दिव्य आहे. >>> Rofl
किंवा मुलगा गे आहे असेही सुचवायचे असावे. कुणास ठावूक.... >>> पण गे असण्यावरसुद्धा कायद्याने बंदीच आहे की!!!

भारतीय समाज फार वेगाने प्रतिगामी होत चाललेला आहे!!

त्या मुलाला त्या कंडोमच्या फ्लेवरचा काय उपयोग असेल असा विचार कल्पना काढणार्‍याच्या मनात आला नाही हे दिव्य आहे. किंवा मुलगा गे आहे असेही सुचवायचे असावे. कुणास ठावूक....
>> गे? का? त्याच्या सेक्स पार्टनरला पुदिना आवडतो असे आहे ना? पार्टनर तो किंवा ती कोणीही असू शकेल.
परवा एक कार्टून बघितलं होतं. एक माणूस आलं फ्लेवरचा काँडोम मागतो दुकानदारकडे, गर्लफ्रेंडला खोकला झालाय म्हणून.

मोदी काँडमस Happy

ज्या नेत्याने काँडम वापराचे महत्व ओळखले, ज्याच्या जाहिरातीसाठी आपला चेहरा वापरायची परवानगी दिली.
भर दुकानात स्त्री पुरुषांना हे काँडम दाखवा आणि वापरायची गळ घाला असे निर्देश दुकानदारांना दिले,
त्याच नेत्याच्या सरकारने असा निर्णय घ्यावा हे अगम्य आहे.

भारतीय समाज फार वेगाने प्रतिगामी होत चाललेला आहे!!
Submitted by सुमुक्ता on 15 December, 2017 - 11:37
>>
असली दिलखेचक वाक्य विद्रोही चळवळीत फेकायला बरी असतात.भारतीय समाज हा बहुतांश प्रतिगामी आहे हे का नाकारतो आपण?
पण सध्या जागतिकीकरनाने हा प्रतिगामीपणा जरा दडपला गेला होता इतकेच.पण सध्या २०१४ नंतर संस्कारी जुमलेबाजांचे सरकार असल्याने पद्धतशीरपणे प्रतिगामीपण हेच कसे पुरोगामी असते हे ठसवायचे चालू आहे.

त्या वाह्यातपणावर निर्बंध लादायचे सोडून कॉंडमच्या जाहीरातींवर निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे.>>> +१११११

शाळांमधे लैंगिक शिक्षणही सुरु करणार होते पण त्यामुळे आपली संस्कृती बिघडेल अशी भीती दाखवत त्यावर बहुतेक ठिकाणी बंदी आणण्यात आली. Sad

<< अर्थात हल्लीच्या कॉंडम जाहीरातींतील वाढलेला वाह्यातपणा पाहता हे योग्यच वाटते.
पण मग त्या वाह्यातपणावर निर्बंध लादायचे सोडून कॉंडमच्या जाहीरातींवर निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे.>>> इथे एक शंका, 'मग त्या वाह्यातपणावर निर्बंध लादायचे सोडून' असे केल्यास, सेन्सॉरशिप चा अतिरेक, अभिव्यक्तीस्वातंत्र्याची मुस्कटदाबी तसेच प्रेक्षक सूज्ञ आहेतच की काय पहावे काय नाही ठरवायला, असा युक्तीवाद नाही का होणार? फ्रँकली स्पीकिंग, ती सनी ची जाहिरात सहकुटुंब पाहताना मला तरी अजूनही अवघडल्यासारखे होते. तरीही, जाहीरातीच्या वेळा बदलायचा सरकारचा निर्णय चूकच आहे.

एक माणूस आलं फ्लेवरचा काँडोम मागतो दुकानदारकडे, गर्लफ्रेंडला खोकला झालाय म्हणून.
>>> ह्या असल्या ads असतील तर निर्णय बरोबरच वाटतोय.
लहान मुले नको ते शिकतील अशाने.

सेन्सॉरशिप चा अतिरेक, अभिव्यक्तीस्वातंत्र्याची मुस्कटदाबी तसेच प्रेक्षक सूज्ञ आहेतच की काय पहावे काय नाही ठरवायला, असा युक्तीवाद नाही का होणार?

>>> नाही होणार. जाहिरातींना हे लागू नाही.

ती सनी ची जाहिरात सहकुटुंब पाहताना मला तरी अजूनही अवघडल्यासारखे होते. तरीही, जाहीरातीच्या वेळा बदलायचा सरकारचा निर्णय चूकच आहे.
नवीन Submitted by अजब on 15 December, 2017 -
>>
रिमोट नावाचे फडतुस साधन घरी नसते का हो! च्यायनल बदलून टाकायचा जर अवघडत असेल तर.संस्कार टिव्ही चॅनल लावायचा.किंवा डीश टीव्ही रिचार्ज करताना फक्त धार्मिक चॅनलचे पॅकेज घ्यायचे.
च्यायला ह्या दुटप्पीपणाच्या,म्हणजे शनया गुरुनाथच्या मांडीवर बसून लाड पुरुवुन घेताना म.म.लोक चवीने बघतात,अगदी म्हातर्या बायाही चवीने असले कार्यक्रम बघतात.पण सनीची जाहीरात लागली की संकोच येतो,का बुवा असला दुटप्पीपणा?

हा अश्लील पणा कोण थांबवणार?

तरुण आहे रात्र अजुनी
राजसा निजलास का रे?
एवढ्यातच त्या कुशीवर
तू असा वळलास का रे?

अजुनही विझल्या न गगनी
तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे?
हाय ! तू विझलास का रे?

सांग, ह्या कोजागरीच्या
चांदण्याला काय सांगू?
उमलते अंगांग माझे
आणि तू मिटलास का रे?

बघ तुला पुसतोच आहे
पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध
तू लुटलास का रे?

उसळती हुदयांत माझ्या
अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्‍यासारखा पण
कोरडा उरलास का रे?

ह्या असल्या ads असतील तर निर्णय बरोबरच वाटतोय.
लहान मुले नको ते शिकतील अशाने.
>>असल्या जाहिराती नाहीत. ते विनोदी कार्टून होतं. पुदीना फ्लेवर काँडम गे साठी असेल असे नाही हे सांगायला लिहीलं.

कतरीना आंबा खात / चाटत असलेली जाहिरात, डिओ नी परफ्यूम च्या जाहिराती सनीच्या जाहिरातींपेक्षा वेगळ्या नाहीत. नानांनी दिलेल्या सिरीयलींच्या लिंका पण तशाच. मग काँडोमने काय घोडं मारलय?

संतती नियमनाच्या गोळ्या नी unwanted 72 सारख्या गोळ्यांच्या जाहिरातींवर पण वेळेचं बंधन आहे का?

आक्षेप कशाला आहे हे नक्की नको का?

आक्षेप कशाला आहे हे नक्की नको का?
>> तेच तर. आक्षेप काही कळला नाही.

बाकी कंडोम जाहिरात बॅन मागे गुज्जूलॉबी आहे असे वाटते. मागे मॅनफोर्सच्या नवरात्री होर्डिंगने धुमशान झाले होते तिकडे.... तीच लिंक वाढत वाढत टीवीपतुर पोचलीया...

बाकी कंडोम जाहिरात बॅन मागे गुज्जूलॉबी आहे असे वाटते
>>
काय सांगता काय नाना?
ते गरब्यानंतर ॲबॉर्शन करायल एवढ्या लेडीज बाया का जातात याचं गुपित कळलं.

गे? का? त्याच्या सेक्स पार्टनरला पुदिना आवडतो असे आहे ना?
>> सोनूतै, जाहिरातीची लिंक मिळाली तर देतो. संदर्भ असा आहे की आईवडील चिडलेले असतात, आई जास्तच. मुलगा विचारतो तर बाबा ओरडतात आईला तुझ्या बॅगेत-कपड्यात हे मिळालं. मग आई सुरु होते मी तुझ्यासाठी पुदिन्याचे हे बनवते, ते बनवते, किती काय काय प्रकार करते पण तू कधी खात नाही, तुला पुदिना आवडत नाही म्हणतो मग तुला हे काँडोम पुदिना फ्लेवरचे कसे चालते. बाबा म्हणतो की तू आईचे मन दुखावलेस वगैरे वगैरे...

माझी थेरी: (१८+ अलर्ट) फ्लेवर किंवा चव हे खाण्याच्या पदार्थांना असतात. कंडोमचे सर्व फ्लेवर खाण्याच्या पदार्थांचे आहेत. मस्क, कलोन, गुलाब, मोगरा, जाई जुई शेवंतीचे फ्लेवर नाहीयेत. सो कंडोमचा उपयोग मुखमैथुनासाठी होतो हे लक्षात घेऊनच फ्लेवर ची योजना करण्यात आली आहे. अन्यथा बोथ द ऑर्गन्स इन द प्ले, हॅव नथिंग टू डू विथ फ्लेवर इवन रिमोटली... आता मुखमैथुनासाठी आहे म्हणजे खाण्याच्याच चवी लागतील ना? जरी तो मुलगा गे असेल आणि त्याला पुदिना आवडत नसेल तर तो पुदिना फ्लेवर पार्टनरला कसा वापरु देईल. आणि हा पार्टनरला पुदिना आवडतो म्हणून सोबत ठेवत असेल तर आईने याच्यावर 'पुदिना आवडत नाही पण त्या फ्लेवरचा कंडोम बरा बाई आवडतो' म्हणून चिडण्यात काय लॉजिक......?

किती लिहायला लावता रे तुम्ही लोक.... श्या.... तुम्हा लोकांसाठी त्या प्यार हुआ जाहिरातीच बर्‍या. Sad

ते गरब्यानंतर ॲबॉर्शन करायल एवढ्या लेडीज बाया का जातात याचं गुपित कळलं.
नवीन Submitted by अक्कलशून्य on 15 December, 2017 - 21:40

>> हे पॉपुलर बिलिफनुसार बरोबर असले तरी खरे नाही. गरबा आणि गर्भवती होण्याचा संबंध नाही. गरब्यानंतर गर्भवती होणार्‍या मुली ह्या गरब्याला न जाता त्याच्या नावाखाली प्रियकरांसोबत एकांतात असतात असे कळते. गरब्याला म्हणून सांगून जाणार्‍या मुलींवर शक्यतो घरचे अविश्वास दाखवत नाहीत. रात्री कितीही उशीर झाला तरी विचारत नाहीत.

काय पो चे चित्रपटात असंच काहीसं दाखवलं आहे का? नीट आठवत नाही.

>>अन्यथा बोथ द ऑर्गन्स इन द प्ले, हॅव नथिंग टू डू विथ फ्लेवर इवन रिमोटली... <<

अजुन एक कारण आहे फ्लेवर मागे, फलेशियो व्यतिरिक्त....

सोनूतै, जाहिरातीची लिंक मिळाली तर देतो. संदर्भ असा आहे की आईवडील चिडलेले असतात, आई >>>>>
लिंक मिळाली तर द्याच,
मला वाटते जाहिरातवाल्या ना वेगळा मेसेज द्यायचा असेल,
आई वडील बॅगेत काँडमस सापडल्यामुळे चिडले नाहीत, असा काहीसा मेसेज असावा

आई वडील बॅगेत काँडमस सापडल्यामुळे चिडले नाहीत, असा काहीसा मेसेज असावा

>> मेसेज तोच आहे हो सिम्बा.... पण ते काँडोम वर चिडले नाहीत हे दाखवण्यासाठी तर्कहिन बडबड घातली आईच्या तोंडी.

सोनूतै, जाहिरातीची लिंक मिळाली तर देतो.
>>
म्हणणं तुमचं रास्त हाय. पुदिन्याचं काही "खायला" आवडत नाही तर हे कसं "चालतं" असं विचारतेय आई.

http://bestmediainfo.com/2017/12/mtv-promotes-safe-sex-with-a-tinge-of-p...

रिमोट नावाचे फडतुस साधन घरी नसते का हो! च्यायनल बदलून टाकायचा जर अवघडत असेल तर.संस्कार टिव्ही चॅनल लावायचा.किंवा डीश टीव्ही रिचार्ज करताना फक्त धार्मिक चॅनलचे पॅकेज घ्यायचे.>>> ह्यो लय आवडला Wink , आता ते फडतूस साधन वापरून चॅनल बदलायचेच काम करतो... त्या सनीच्या मॅनफोर्सवाल्या बाकीच्या जाहिराती जावू द्या हो, पण ती जॅस्मीन फ्लेवर वाली पाहिलीत का कधी? त्यातला तो जो बेड सीन आहे तो कोणत्याही चित्रपटाला अडल्ट प्रमाणपत्र द्यायला पुरेसा ठरेल... सुदैवाने अजून तरी आम्ही सहकुटुंब असले सीन्स पाहण्याइतके पुरोगामी नाही (आणि व्हायचीही इच्छा नाही!). माझे म्हणणे फक्त अशा प्रकारच्या जाहिरातींवर काही प्रमाणात निर्बंध आणणे इतकेच आहे. त्यावर संस्कार चॅनल, धार्मिक चॅनल वगैरे आचरटपणा चालू द्या... Happy

सापडली सापडली... एम टीवीची जाहिरात आहे.

https://www.facebook.com/mtvindia/videos/10155780815475102/?hc_ref=ARSaD...

खाली कमेंटमध्ये कुणीतरी मी मांडलेला मुद्दाच मांडलाय की स्क्रिप्ट गंडलेये, तरी यडछाप यमटीवी म्हणते की आमचेच बरोबर.

सुदैवाने अजून तरी आम्ही सहकुटुंब असले सीन्स पाहण्याइतके पुरोगामी नाही (आणि व्हायचीही इच्छा नाही!)
>>
पुरोगामी असणे म्हणजे सहकुटुंब अश्लिल चित्रफीती पहाणे अशी व्याख्या केली असेल तर त्याला आम्ही काय करणार!

तुम्ही सोलून म्हणजे त्याचा पार ज्युसच काढून टाकलात.
>>> काय करणार लगा अमितव, आपला सोभाव असा यक यक पान येगळं काडायचा बग.... सोलायला बस्लं का संत्रं काय केळी काय पुदिना काय, काय बी सोलून दिऊ... Happy

@अजब ,तुमचा प्रतिगामीपणा तुमच्यापाशी.विर्यनाश हा मृत्यु आहे त्यामुळे तरुणांनी हस्तमैथुन करु नये अशी आसाराम वाणी करणारे तुम्हा प्रतिगाम्यांचे पूज्य गुरुजी आसाराम बापू ७२ व्या वर्षी अनेक अल्पवयीन साधिकांचा बलात्कार करुन सध्या जेलची हवा खात आहेत,त्यामुळे प्लीजच, नैतिक अनैतिकतेच्या व्याख्या शिकवायला इकडे नाही आलात तर बरे पडेल.

पण ती जॅस्मीन फ्लेवर वाली पाहिलीत का कधी? त्यातला तो जो बेड सीन आहे तो कोणत्याही चित्रपटाला अडल्ट प्रमाणपत्र द्यायला पुरेसा ठरेल...
>>>>
नाही पाहिली, लिंक प्लीज ! Wink

बाकी टीव्हीवर अचानक आलेल्या जाहीराती असे रिमोटने पटकन बदलणे आणि त्यासाठी रिमोट जवळच घेऊन बसणे वगैरे लय अवघड आहे हो. असे मुद्दे मांडताना ईमॅजिन करून बघा तो त्रास.. आणि का सहन करायचा? जाहीराती ठेवा, पण त्या सेन्सॉर ठेवा.. उलट सिंबॉलिक जाहीराती बनवल्या तर क्रिएटीव्हिटी दाखवायला खूप स्कोप आहे या प्रोडक्टमध्ये Happy

जाहिरातींवर आक्षेप घेऊन त्या मागे घेता येणे सहज शक्य आहे. कलाकृतींसारखे त्यात अभिव्यक्ती दडपण्याची बोंबाबोंब होत नाही. कारण जाहिराती ह्या कलाकृती नसतात.

Pages