काँडम काँडम काँडम काँडम... निरोध निरोध निरोध निरोध...

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 December, 2017 - 15:10

फार फार लहान असताना टीव्हीवर एक निरोधची जाहीरात लागायची. नेमकी काय कशी ते आता आठवत नाही. पण असे सातत्याने काँडम काँडम निरोध निरोध त्यात बोलले जायचे. बहुतेक हेतू हा होता की काँडम हा शब्द उचारायला जो संकोच आपण करतो तो निघून जावा. बहुधा ती जाहीरात कुठल्या काँडम बनवणार्‍या कंपनीची नसून सरकारची होती. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणारी कॉंडमसारखी साधने वापरताना लोकांनी मेंगळटासारखे वागू नये असा त्यामागे हेतू असावा. आणि तो आमच्यापुरता तरी सफल झाला. म्हणजे ते आमचे काँडम वापरायचे वय नव्हते, पण तो शब्द उच्चारतानाचा संकोच निघून गेला. आणि म्हणूनच अगदी आजही बिनधास्त काँडम काँडम निरोध निरोध असे उच्चारू शकतोय, तसेच ईमेजची पर्वा न करता शीर्षक म्हणून त्या जाहीरातीतील काँडम नामाचा जप ठेवू शकतोय.

असो, तर ती जाहीरात आठवायचे कारण म्हणजे,
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या कंडोमच्या जाहिरातींच्या प्रसारणावर निर्बंध घातले आहेत. यापुढे सकाळी सहा ते रात्री दहा वाजपर्यंत कंडोमच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घातलीय.

अर्थात हल्लीच्या काँडम जाहीरातींतील वाढलेला वाह्यातपणा पाहता हे योग्यच वाटते.
पण मग त्या वाह्यातपणावर निर्बंध लादायचे सोडून काँडम जाहीरातींवर निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे.
कारण वाह्यातपणा करायचे म्हटल्यास कुठेही करता येतो. कॉफीच्या जाहीरातीत तर बरेचदा विनाकारण दिसतो.
आता या बंदीमुळे दारूच्या जाहीरातींवर बंदी आणि काँडमच्या जाहीरातींवर बंदी - यांची एका तागडीत तुलना होणारच.
आणि काँडमवरची बंदी नेमकी का कश्यासाठी आहे याचे कारण सामान्य जन आपल्या सामान्य बुद्धीने शोधताना कॉंडम हा काहीतरी असभ्य निषिद्ध वाह्यात प्रकार आहे असा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचणार.
जे मला सुरुवातीला दिलेल्या जाहीरातीच्या हेतूशी विसंगत वाटतेय.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं बाई टायटलमध्ये निरोध लिहिलंय नाहीतर मला वाटलं तोंडात लाडू कोंबून कॉडम कॉडम ‘चकली कशी खावी’ असा बीबी आलाय.
दुसरं मी काय म्हणते लहान मुलांनी बोलू नये असं काही. Wink

वाह्यातपणाचा मुद्दा सुरुवातीला मला योग्य वाटला होता. आमच्या घरी गेले कैक वर्ष टीवीसिरियल पाहत नाही, आता तर टीवीच नाही. त्यामुळे नक्की काय चाललंय माहित नव्हतं. ह्या बातमीमुळे खास भारतीय कंडोमच्या रिसेंट जाहिराती बघितल्या त्यात सनीवाली फारच बोल्ड वाटली. टीवीच्या मानाने. आणि असं सारखं तासाभरातून दहा वेळा लागत असेल तर ऑकवर्ड होईल घरात असे वाटले.

पण पण पण.... हाय राम..... जरा अधिक रिसर्च केला असता खुद्द टीवी सीरीयल्समधलीच ही खालील रत्ने मिळाली.... कंडोमवाल्यांनी आता मस्तपैकी एक आयडियाची गम्मत करावी. असले सीन्स टीवी सिरीयलमध्ये सुरु झाले की जसे धूम्रपानसे कर्करोग होता है वगैरे पट्ट्या चालवतात, तशा आता "रोमान्स जरुर करे पर कंडोम बिलकूल न भुले' अशा पट्ट्या चालू द्याव्या. कंडोमच्या ठिकाणी आपआपल्या ब्रँड चे नाव येऊ द्यावे....

https://www.youtube.com/watch?v=vqlbD0yOULU
https://www.youtube.com/watch?v=h3dbGF-_cvg
https://www.youtube.com/watch?v=m9GrLOqcn3I
https://www.youtube.com/watch?v=xS7op1uJA78

बरे झाला धागा काढलास. कितीही उफाळून आले तरी आपण धागा काढायचा नाही हे ठरवले आहे. तु असतांना आपण फिकिर नाही करायची. असो.

आता थोडे ज्ञान माझ्या फेसबुकवरच्या चर्चेतूनः

सातीताई: २०१४ पासून टिव्ही पहाणे जवळपास बंद आहे Wink
त्या पूर्वीही कधीतरीच पहात असे.
तर मी पहायचे तोपर्यंत तरी 'जरासी सावधानी' किंवा 'एक गोली हर रात' टाईप कोड लॅंग्वेजात निरोध/गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिराती असायच्या.
'सुरक्षित यौनसंबंध' हे प्रत्येक हिंदी जाहिरातीत हायलाईट केलेले असायचे. सुरक्षा जाऊन सुमज्जा कधीपासून आले?
खरेच हल्ली निरोधच्या जाहिराती सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेत नाहीत का?
कमाल आहे.
------------
नानाकळा:
बलबीर पाशा को एड्स होगा क्या? ह्या जाहिरातीमुळे हे सर्व सुमज्जा प्रकरण उपटले आहे. बलबीर पाशा जाहिरातीमुळे एड्सबद्दल जनजागृती बरीच झाली पण बलबीर पाशाला एड्स हा यौनसंबंधांमुळे होतो ह्यावर जास्त लक्ष वेधले गेले.(असुरक्षित हा शब्द सायलेंट होतो आपोआप) त्यामुळे असुरक्षित यौन संबंध पेक्षा विवाहबाह्य यौनसंबंध यावर पब्लिकचे जरा जास्तच प्रबोधन झाले. त्यातून एड्स होतो असे पसरले. आता हा आधीच माकड असलेला मदिरा प्यायलेला माकड घेऊन कंडोम कंपन्या कशा तग धरु शकतील, म्हणुन त्यांनी हा सुमज्जा पॅटर्न आणला. त्यात अजून सुमज्जा अशी आहे की परदेशात ज्या तर्‍हेने ह्या जाहिराती बनवल्या जातात तशा आपल्याकडे बनवू शकत नाहीत, संस्कृतीचा फरक. मानसिकता नाही, संस्कृती. विवाहपूर्व संबंध निषिद्ध. त्यामुळे जाहिरातदाराच्या कल्पनेला मर्यादा पडतात. मग ते अ‍ॅक्स इफेक्ट पॅटर्न वापरतात. कसेही करुन, सुरक्षित अंतर ठेवून प्रॉडक्ट आणि जाहिरातीचा काहीतरी संबंध दाखवला की झाले. प्रॉडक्ट चा युएसपी 'अधिक मज्जा' हा झाला, याला दुसरे कारण असे की भारतीयांत बहुसंख्य लोक अजूनही कंडोमला नैसर्गिक लैंगिक सुखास मारक समजतात ही कस्टमर इन्साइट. ही इन्साईट आणि भारतीय मानसिकता, संस्कृती धरुन कल्पना लढवायच्या म्हटले तर फकस्त सुमज्जा जाहिराती निघणार.

वाह्यातपणा टाळून मजेदार अ‍ॅड करता येतीलः https://www.youtube.com/watch?v=Qprp-GvNNf4

यात एक मॅनफोर्सची जाहिरात मात्र खरंच वेगळी होती, ज्यात संभोग फोनमध्ये शूट करणार्‍या जोडप्यांना सावध करणारी होती. https://www.youtube.com/watch?v=7U4TksIi5Bk

दुसरी एक जस्ट आलीये अतिशय भंगार. आई मुलाला पुदिन्याची भाजी, वगैरे करुन खाऊ घालते, पण मुलाला पुदिन्याचं काहीच आवडत नाही, पण पुदिना फ्लेवर कंडोम मात्र कसा आवडतो असे रागावून विचारते. त्या मुलाला त्या कंडोमच्या फ्लेवरचा काय उपयोग असेल असा विचार कल्पना काढणार्‍याच्या मनात आला नाही हे दिव्य आहे. किंवा मुलगा गे आहे असेही सुचवायचे असावे. कुणास ठावूक....

हे. किंवा मुलगा गे आहे असेही सुचवायचे असावे. >> नाना, चांगली इंक्लुझीव्ह जाहिरात केली तर तुम्ही गोडवे गायचं सोडून टेक्निकल मुद्द्यात शिरताय होय! Wink ये नई चालबे Proud
बाकी कोन्झर्वेटीव्ह सरकार असेच निर्णय घेणार! त्यात काही विशेष वाटलं नाही.

अरे बाबा, त्या कॉडम वर अनुस्वार दे नाहितर म्हणतील मुंबईकरांना नीट लिहिताहि येत नाहि...

फार फार लहान असताना टीव्हीवर एक निरोधची जाहीरात लागायची. नेमकी काय कशी ते आता आठवत नाही >> पूजा बेदीची होती
वाटतं...

अरे बाबा, त्या कॉडम वर अनुस्वार दे
>> अनुस्वार आहे.
ऋ,
कॉ नी मग अनुस्वार देण्यापेक्षा का नी ँँ काँ कर रे.
कॉं नाही काँ.

"प्यार हुआ एकरार हुआ" वाली सरकारी जाहिरात ही आद्य जाहिरात म्हणायला लागेल.
बरोबर रविवारी सकाळी रंगोली च्या वेळेला लागायची,
एक दोन वेळा आतल्या खोलीतून ते गाणे लागले वाटून हॉल मध्ये धावत आलेलो, आणि ही जाहिरात पाहून अगदी कुठे तोंड लपवू असे झालेले

कॉ नी मग अनुस्वार देण्यापेक्षा का नी ँँ काँ कर रे.
कॉं नाही काँ.>>>>>>
सोनू, आता तो येऊन आपले इंग्लिश कसे कच्चे आहे यावर 3 4 प्रतिसाद देईल, walking , talking स्टाईल वर,
त्याला "काँ"ग्रेस लिहिता येते तर "काँ"डम लिहिता येणार नाही का?

.... त्याला "काँ"ग्रेस लिहिता येते तर "काँ"डम लिहिता येणार नाही का़
काँन्ग्रेस --> काँडम --> निरोध ???? अशिकशि संगती लावली?

यावरून मला धूम्रपान आणि दारुबंदी बाबातचा एक निर्णय आठवला.. व्यसन धोकादायक आहे, हे अगदी प्रत्येक पाकिट बाटलीवर स्पष्ट अक्षरात लिहायचे.. सिनेमामधे दारु पिण्याच्या एकादा सिन असेल तर त्याखाली ठळक पट्टी दाखविने बंधनकारक करायचे. आणि दुसरीकडे निर्मितीचे कारखाने सुरु.. दारु विक्रीचे परवाने सुरु.. मजेशीर आहे.

>>, आता तो येऊन आपले इंग्लिश कसे कच्चे आहे यावर 3 4 प्रतिसाद देईल>> Lol हो. आणि मुंबईकर कसे मुलखाचे अडाणी असतात आणि त्यांना कसं लिहिता आलं नाही की वेळ नाही म्हणतात..

1) शक्य होईल तिथवर धाग्यात राजकारण आणू नका. आजवर सारेच राजकारणी आपल्याला टोप्या घालत आलेत. आणि आज ते आपल्याला टोप्यांच्या वापरापासून परावृत्त करत आहेत.

2) काँडमवर अनुस्वार दिला होता. म्हणजे माझ्या लॅपटॉपवर बराहा नोटपॅडमध्ये दिला होता. ईथे ते कॉपीपेस्ट केल्यावर दिसत नसेल तर तो का नाही याची कल्पना नाही. अन्यथा काँडमवरचा अनुस्वार म्हणजे एक बूंद जिंदगी का.. त्याला कसे विसरेन Happy

3) सायो, धाग्याच्या शीर्षकावर दिलेल्या प्रतिसादाचे स्वागत आहे. धाग्याच्या विषयावर आपले मत वाचायला आवडेल.

4) सिंबा, काँडमची प्यार हुआ ईकरार हुआ वाली जाहीरात पाहून आपल्याला कुठे तोंड लपवू असे का झालेले? सरकारी जाहीरातीत काय अश्लील होते?

5) हरीदासजी, तेच तर. अश्या बंदीने काँडमला सुद्धा दारू सिगारेटच्या पंक्तीत बसवल्यासारखे झालेय.

6) नानाकळा, काँडमचा संबंध सुरक्षिततेसाठी जोडणे आणि लोकांनी त्याचा वापर करावा म्हणून प्रबोधन करणे हे सरकारचे काम. व्यावसायिक जाहीराती मात्र एकमेकांवर कुरघोडी करायला आमचे प्रॉडक्ट कसे एक्स्ट्रा मजा देते यावरच भर देणे साहजिक आहे.
पण तरी मलाही वाटते की कोणीतरी त्या रबराच्या क्वालिटीबद्दल त्याच्या मजबूतीबद्दलही जाहीरातीत भाष्य करणे गरजेचे. एक्स्ट्रा स्लिम ऐवजी एक्स्ट्रा स्ट्राँग !

सिंबा, काँडमची प्यार हुआ ईकरार हुआ वाली जाहीरात पाहून आपल्याला कुठे तोंड लपवू असे का झालेले? सरकारी जाहीरातीत काय अश्लील होते?>>>>>
सोन्या , काँडम ची जाहिरात सुरू झाली आणि ती पाहायला 11 वि 12वि मुलगा आतल्या खोलीतुन धावत बाहेर आला , आई वडिलां समोर असे चित्र उभे राहिले,
म्हणून म्हंटले कुठे तोंड लपवू असे झालेले

त्या वाह्यातपणावर निर्बंध लादायचे सोडून कॉंडमच्या जाहीरातींवर निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे.<<<<

सहमत आहे ऋन्मेष!

इयत्ता सहावीपासून लैंगिक शिक्षणाचे खास वर्ग घेण्यात काही ग्रामीण विभागातील शाळाही उत्साह दाखवत आहेत, काही डॉक्टर्स फुकट असे वर्ग घेत आहेत. ह्या काळात अशा जाहिरातींना टायमिंग लावून त्याबद्दल आणखीनच चुकीचे कुतुहल निर्माण करण्यापेक्षा जाहिरातींमधील वाह्यातपणा कमी कसा होईल हे बघितले गेले तर उत्तम!

ह्या काळात अशा जाहिरातींना टायमिंग लावून त्याबद्दल आणखीनच चुकीचे कुतुहल निर्माण करण्यापेक्षा जाहिरातींमधील वाह्यातपणा कमी कसा होईल हे बघितले गेले तर उत्तम! >> +११

त्या वाह्यातपणावर निर्बंध लादायचे सोडून कॉंडमच्या जाहीरातींवर निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे.<<<<+ १ सहमत
ती एक पोपटाचे अ‍ॅड पण यायची ना तो पोपट सारखा काँडोम काँडोम बोलायचा आणि लोकांना कानकोंड्यासारखं व्हायचं.
सिकंदर का काय तरी होती टॅगलाइन.

काय आश्चर्य वाटले नाही.ब्रह्मचर्य हेच जीवन विर्यनाश हा मृत्यु अश्या थापा मारणारे भाजपेई लोकांचे सरकार आहे.त्यांचा आणि निरोधचा लांबुनही संबंध नाही ,त्यांना युजलेस वाटणार्या गोष्टींवर ते बंदी घालणारच.
एकाने लग्नच केले नाही ,एकाने सहामहीन्यात बायको वार्यावर सोडली, असला परफॉर्मंस असणारे लोक सत्तेत आहेत मग काय अपेक्षा ठेवणार.

कॉलेजमधे एक कदम आडनावाचा मित्र होता. त्याला सर्रास कंडम म्हणुन हाक मारायचे. कधीतरी कोणीतरी त्याला कंडोम म्हणायला सुरुवात केली. फक्त मुलं असताना कंडोम आणि मुली असल्या की कंडम म्हणायचो. एकदा अ‍ॅन्युअल डे च्या तयारीत संध्याकाळी उशिरा एकाने दुसर्‍याला सांगितलं "त्या कंडोमला आण रे इकडे". ते एका मुलीने ऐकलं. दुसर्‍या दिवशी सगळ्या मुलींमध्ये आमच्या गृपबद्दल कुजबुज सुरु झाली. आम्हाला काही कल्पनाच नाही. शेवटी एकाच्या गर्लफ्रेंडने त्याला जाब विचारला. त्याची फाफलली. अशी सगळी धमाल. मग आम्ही मुलींसमोर पण कंडोम म्हणुन हाक मारायला लागलो Lol Lol

कॉलेजच्या दिवसातले भरपुर किस्से आहेत काँडोम बद्दल. अवांतर मज्जा म्हणुन एकच सांगितला इथे Proud

मग आम्ही मुलींसमोर पण कंडोम म्हणुन हाक मारायला लागलो >> हे बरंय Lol

सस्मित,
ती एक पोपटाचे अ‍ॅड पण यायची ना तो पोपट सारखा काँडोम काँडोम बोलायचा आणि लोकांना कानकोंड्यासारखं व्हायचं.
>>

ऋ ने धाग्यात लिहिलेली तीच जाहिरात

>> फार फार लहान असताना टीव्हीवर एक निरोधची जाहीरात लागायची. नेमकी काय कशी ते आता आठवत नाही. पण असे सातत्याने कॉंडम कॉंडम निरोध निरोध त्यात बोलले जायचे. >>

सोनू येस्स, तीच जाहीरात.
सस्मित, आता मी लहान आहे. तेव्हा फार्फार लहान होतो.
आम्हा मुलांच्या बालपणात साधारण तीन स्टेज येतात.

स्टेज 1- काँडम हा आमच्या वापरातला शब्द नसतो. तसेच वापरातील वस्तूही नसते. (ईथे होळी रंगपंचमीला पाण्याचे फुगे म्हणून होणारा वापर गृहीत धरला नाहीये)

स्टेज 2 - काँडम हा शब्द आम्ही वापरायला लागतो. पण ती वस्तू वापरावी ईतके वय झाले नसते.

स्टेज 3 - काँडम हा शब्द आणि वस्तू आम्ही दोन्ही तितक्याच सराईतपणे वापरतो वा वापरायची क्षमता निर्माण होते. मुंबईबाहेरची लोकं वयाच्या या स्टेजला पौगंडावस्था असेही बोलतात.

@ सिंबा,
ओह त्स्से होय.
आपण आपल्या जागी बरोबर आहात, होता.
पण जर जाहीरातीत काही अश्लील नसेल, तर आजच्या काळात मुंबईतील एखादा पोरगा दहावीबारावीच्या वयात काँडमच्या साफसुधरया जाहीरातीला मन लाऊन बघत असेल तर त्याच्या आईवडिलांना आनंदच होईल Happy

सस्मित+1. Lol
ऋ कधी काय बोलेल सांगता येत नाही. Lol

मग त्या वाह्यातपणावर निर्बंध लादायचे सोडून कॉंडमच्या जाहीरातींवर निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे.>> यासाठी +1.

तुझ्या वाह्यातपणापायी लेखातल्या मुद्द्याला सहमती द्यायची राहून गेली होती. Wink

Pages