सरिस्का जंगल सफारी.....
सरिस्का जंगल सफारी ला जायचे जायचे म्हणून इथे भिवाडीत आल्यापासून रोजचे सुरु होते पण आमची सगळीच टीम जवळपासची असल्याने विकेंडला घरी पळायची त्यात मध्ये होळी २ दिवसांची सुटी कुणीच नसल्याने अक्षरश: एकाकी गेस्टहाऊसवर झोपा काढत संपविली...
शेवटी एका रविवारी टीमला अधिकाराचा फ़ायदा घेत झापले... लेको सुटीला घरी पळता आणि आणि सरिस्काला जाऊया म्हणता! ह्या रविवारी कुणीच जायचे नाही असा व्हेटोच काढला आणि रविवारी पहाटे उठुन ३ वाजता जायचे ठरले! भिवाडी - सरिस्का जवळपास १२५ किमी. साधारण स्वत:च्या वाहनाने अडीच तीन तासाचा प्रवास म्हणजे ६ पर्यन्त पोहोचू हा हिशोब..
एरवी ८ वाजेपर्यन्त अंथरुणात लोळत पडणारे आणि सुटीचा दिवस म्हणजे ११ वाजेपर्यन्त अंथरुणात लोळण्याचा अलिखित परवाना बाळगणारे आमचे सगळे संघ सदस्य पहाटे १.३० लाच उठुन आवरू लागले... आणि तेवढयात काही तरी खायला घ्यावे म्हणून कूक ला पराठे बनवायला सांगितले त्याने देखिल मोठ्या आनंदाने त्याच्यासह सर्व ८ जणांची नाश्ट्याची सोय केली आणि ३ वाजता आम्ही सारे घराबाहेर पडलो गाडी घेऊन...
अलवर पर्यन्तचा ९० किमी रस्ता अपे़क्षेपेक्षा खुपच चांगला असल्याने ४.३० लाच अलवरला पोहोचलो.. आणि पुढे रस्ता शोधत चुकत माकत ५.४५ ला सरिस्काला पोहोचलो....
सरिस्का हे अलवरच्या महाराजांचे शिकारीची राखिव जंगल होते.. १९५५ मध्ये वन्यपशु अभयारण्य घोषीत केल्यावर पुढे १९७८ मध्ये तेथे व्याघ्र प्रकल्प आणला गेला. अरावलीच्या पर्वतराईमध्ये दुतर्फा पर्वत रांगात ८६६ चौकिमी पसरले अतिशय सुंदर क्षेत्र आहे... भर उन्हात देखिल अगदी हुडहुडी भरणारी थंडीजाणवत होती... प्रामुख्याने ढोक, बाभळ, रिठा, बोरी, खैर, अडुळसा आदींची झाडं खुप प्रमाणात सर्वत्र पसरलेली..
आम्ही २ जिप्सीत प्रत्येक चार असे निघालो...
सफारीत आमचे स्वागत सुंदर मोराने केले...
पाणवठ्यावरील सांबर अणि मोर...
आम्ही केवळ २० - २५% परिसरातच चक्कर मारू शकलो...
चाहूल घेत फिरणारी हरिणाची जोडी....
तळे....
मासे केंव्हा मिळतायेत???
एकटाच रानकावळा वाट पहतोय.....
किसका रस्ता देखे......
चाहुल लागताच झाडीत लपायची लगबग..
लगबग पाणी पिण्याची....
खडतर वाट पहून
...
बिकट वाट वहिवाट असावी.... असे वाटू लागले!
अजुन असाच एक एकटाच..
हम निले है तो क्या हुआ दिलवाले है!
लांडोरीला आपले नृत्य कौशल्य दाखविताना हा सुंदर पक्षी...:)
अजुन एक अगदी गोल फिरुन....
अजुन.....
आता गिरकी पुर्ण होत आलीये...
आम्ही फिरुन तळ्यावर आल्यावर ही हरणाची जोडी पाणी प्यायला आली.. आधी बिचकली मग आम्हाला शान्त उभे पाहुन निवान्त पाणी पिऊ लागली...
थोड्याच अंतरावर हे महर्षी बक आपल्या ध्यान साधनेत मग्न होते...
काही अन्तरावर ह्या मगरबाई भक्षासाठी टपलेल्या..
ह्यांच्या तपश्चर्येला मात्र बहुदा फळ आले...
वाघोबा नाही भेटले पण त्यांचे दात कोरणे भेटले....
ह्या पक्षांची नांवे आमचे खगमित्र सांगतील....
परतीच्या वाटेवर....
वाटेवर भेटलेले मातेचे वात्सल्य....
आपल्या बाळाला धोका तर नाही ना म्हणून उराशी कवटाळत भेदरून पहाणारे...
शेवटचे दोन फोटो माकडांचे
शेवटचे दोन फोटो माकडांचे आहेत. बघा ओळखलं की नाही!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
झकास...
झकास...
वा प्रत्यक्ष पाहण्यात किती
वा प्रत्यक्ष पाहण्यात किती सुख असेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सर्वांना! केपी,
धन्यवाद सर्वांना!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केपी, इन्द्रा, पक्ष्यांची ओळख करविल्याबद्दल थँक्यु!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कृष्णा.. खूपच सुंदर आलेत
कृष्णा.. खूपच सुंदर आलेत फोटोज, सर्व पक्षी, इस्पेशली ती हरणं एकदम sync मधे पाणी पिताहेत..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुप्पर्ब
माहिती पण छानै..
मस्त फोटो !
मस्त फोटो !
अप्रतिम कृष्णा. अशीच सवड काढा
अप्रतिम कृष्णा. अशीच सवड काढा आणि आमची आवड पुर्ण करत रहा. प्र.चि आणि वर्णन खास.
धन्यवाद वर्षू, रॉक्स, किशोर,
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर्षू, रॉक्स, किशोर,
अजुनतरी परत सवड काही मिळेना...
अजुन डिटेल्स असले पाहिजेत
अजुन डिटेल्स असले पाहिजेत जंगल सफारीत
मस्त प्रचि! आवडले.
मस्त प्रचि!
आवडले.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कृष्णाजी, इतकं चांगलं ओघवतं लिहीण्याची हातोटी असूनही आपण जास्त काही लिखाण माबोवर केलंच नाहीत..
हरणांची जोडी....तीही अगदी
हरणांची जोडी....तीही अगदी 'निश्चल' जल-प्रतिबिंबासह...क्या बात है! जबरदस्त! गजब क्लीक आहे! 'चांदोबाच्या गाडी'ला हीच जोडी तर नसेल?
ध्यानस्थ बकाचा फोटोही उत्तम!
प्रियाराधनेत तल्लीन मोराचा असा मोहक नाच,सलग एवढा वेळपर्यंत पहायला मिळणे म्हणजे नशीबंच!
मस्त फोटो आणि लेखन ही.
मस्त फोटो आणि लेखन ही.
फोटो आणि वर्णन दोन्ही छान....
फोटो आणि वर्णन दोन्ही छान.....
अरेच्चा! इथे नव्याने प्रतिसाद
अरेच्चा! इथे नव्याने प्रतिसाद!!!
विचार, राहुल, सत्यजित, मनीमोहर, निर्झरा, धन्यवाद!
अजुन डिटेल्स असले पाहिजेत जंगल सफारीत>>>
बरोबर आहे!
कृष्णाजी, इतकं चांगलं ओघवतं लिहीण्याची हातोटी असूनही आपण जास्त काही लिखाण माबोवर केलंच नाहीत.. Sad?>>>
राहुल, प्रयत्न असतात कधी तरी जमते लिहायला चुकुन माकुन मग लिहले जाते!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
़खूप सुंदर !!!!
़खूप सुंदर !!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोर तर कसले भारी आलेत..
Pages