सरिस्का जंगल सफारी.....

Submitted by कृष्णा on 8 April, 2013 - 04:32

सरिस्का जंगल सफारी.....
सरिस्का जंगल सफारी ला जायचे जायचे म्हणून इथे भिवाडीत आल्यापासून रोजचे सुरु होते पण आमची सगळीच टीम जवळपासची असल्याने विकेंडला घरी पळायची त्यात मध्ये होळी २ दिवसांची सुटी कुणीच नसल्याने अक्षरश: एकाकी गेस्टहाऊसवर झोपा काढत संपविली...
शेवटी एका रविवारी टीमला अधिकाराचा फ़ायदा घेत झापले... लेको सुटीला घरी पळता आणि आणि सरिस्काला जाऊया म्हणता! ह्या रविवारी कुणीच जायचे नाही असा व्हेटोच काढला आणि रविवारी पहाटे उठुन ३ वाजता जायचे ठरले! भिवाडी - सरिस्का जवळपास १२५ किमी. साधारण स्वत:च्या वाहनाने अडीच तीन तासाचा प्रवास म्हणजे ६ पर्यन्त पोहोचू हा हिशोब..
एरवी ८ वाजेपर्यन्त अंथरुणात लोळत पडणारे आणि सुटीचा दिवस म्हणजे ११ वाजेपर्यन्त अंथरुणात लोळण्याचा अलिखित परवाना बाळगणारे आमचे सगळे संघ सदस्य पहाटे १.३० लाच उठुन आवरू लागले... आणि तेवढयात काही तरी खायला घ्यावे म्हणून कूक ला पराठे बनवायला सांगितले त्याने देखिल मोठ्या आनंदाने त्याच्यासह सर्व ८ जणांची नाश्ट्याची सोय केली आणि ३ वाजता आम्ही सारे घराबाहेर पडलो गाडी घेऊन...
अलवर पर्यन्तचा ९० किमी रस्ता अपे़क्षेपेक्षा खुपच चांगला असल्याने ४.३० लाच अलवरला पोहोचलो.. आणि पुढे रस्ता शोधत चुकत माकत ५.४५ ला सरिस्काला पोहोचलो....

map.jpg

सरिस्का हे अलवरच्या महाराजांचे शिकारीची राखिव जंगल होते.. १९५५ मध्ये वन्यपशु अभयारण्य घोषीत केल्यावर पुढे १९७८ मध्ये तेथे व्याघ्र प्रकल्प आणला गेला. अरावलीच्या पर्वतराईमध्ये दुतर्फा पर्वत रांगात ८६६ चौकिमी पसरले अतिशय सुंदर क्षेत्र आहे... भर उन्हात देखिल अगदी हुडहुडी भरणारी थंडीजाणवत होती... Happy प्रामुख्याने ढोक, बाभळ, रिठा, बोरी, खैर, अडुळसा आदींची झाडं खुप प्रमाणात सर्वत्र पसरलेली..

आम्ही २ जिप्सीत प्रत्येक चार असे निघालो...

jipsi safari.jpg

सफारीत आमचे स्वागत सुंदर मोराने केले...

MOR2.jpg

पाणवठ्यावरील सांबर अणि मोर...

sambar.jpg

आम्ही केवळ २० - २५% परिसरातच चक्कर मारू शकलो...

jangal.jpg

चाहूल घेत फिरणारी हरिणाची जोडी....

harinjodi.jpg

तळे....

panavatha.jpg

मासे केंव्हा मिळतायेत???

shodh annacha.jpg

एकटाच रानकावळा वाट पहतोय.....

किसका रस्ता देखे......

waiting.jpg

चाहुल लागताच झाडीत लपायची लगबग..

moru.jpg

लगबग पाणी पिण्याची....

lagabag.jpg

खडतर वाट पहून
...
बिकट वाट वहिवाट असावी.... असे वाटू लागले! Happy

khadatar.jpg

अजुन असाच एक एकटाच..

ajun ek.jpg

हम निले है तो क्या हुआ दिलवाले है!

लांडोरीला आपले नृत्य कौशल्य दाखविताना हा सुंदर पक्षी...:)

nrutya.jpg

अजुन एक अगदी गोल फिरुन....

Peacocka.jpg

अजुन.....

nrt2.jpg

आता गिरकी पुर्ण होत आलीये...

NRT3.jpg

आम्ही फिरुन तळ्यावर आल्यावर ही हरणाची जोडी पाणी प्यायला आली.. आधी बिचकली मग आम्हाला शान्त उभे पाहुन निवान्त पाणी पिऊ लागली... Happy

harin2.jpg

थोड्याच अंतरावर हे महर्षी बक आपल्या ध्यान साधनेत मग्न होते...

bako.jpg

काही अन्तरावर ह्या मगरबाई भक्षासाठी टपलेल्या..

magar.jpg

ह्यांच्या तपश्चर्येला मात्र बहुदा फळ आले...

bako2.jpg

वाघोबा नाही भेटले पण त्यांचे दात कोरणे भेटले.... Happy

vaghacha mitra.jpg

ह्या पक्षांची नांवे आमचे खगमित्र सांगतील.... Happy

bulbul.jpgpaxi.jpg

परतीच्या वाटेवर....

parat.jpgparat2.jpg

वाटेवर भेटलेले मातेचे वात्सल्य....

vatsaly1.jpg

आपल्या बाळाला धोका तर नाही ना म्हणून उराशी कवटाळत भेदरून पहाणारे...

vatsaly2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव Happy

अरे छानच काढलेत की रे फोटो, मस्तच Happy नशिबवान आहेस असे जायला बघायला मिळतय तुला.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

नाचणारा मोर खुप आवड्ला Happy
वाघोबा नाही भेटले पण त्यांचे दात कोरणे भेटले.... >> नाही समजल , त्या पक्षाच नाव आहे का अस काही ?

स्मिता, आमच्या बरोबर असलेल्या तिथल्या गार्डने काहीतरी नांव सांगितले पण ते नाही लक्षात राहिले... पण हे वाघाचे दात कोरणे म्हणजे वाघाच्या दातात अडकलेले मांसखंड खाऊन पोट भरतो.. त्याची वाघालाही मदत होते... हे त्याने सांगितलेले लक्षात राहिले.. माबो वर बरेच पक्षी मित्र आहेत त्यांचे नांवासाठी सहकार्य हवे... Happy

व्वा! खूपच मस्त फोटो आणि लिखाण!
किती प्रकारचे प्राणी पक्षी भेटले या सफरीत!
आणि कृष्णा.........फोटो पिकासावरून अपलोड कर ना. ते नाही चेंगट काम.

वाघाचे दात कोरणे म्हणजे वाघाच्या दातात अडकलेले मांसखंड खाऊन पोट भरतो.. >> लईच danger काम करतो हा पक्षी Happy मला तर नवीनच आहे ही माहीती Happy

धन्यवाद सर्वांना! Happy

....kuthe aahe he?>>>>

हे राजस्थानच्या उत्तरेला अलवर जिल्ह्यात अलवर पासून ३३ किमी आहे. दिल्ली अथवा जयपूर हून जाता येते...जयपूर पासून साधारण ११० किमी आहे

म स्त

हरणांचा फोटो मस्त आलाय रे कृष्णा>>>

धन्यवाद!
पण मला अजुन इतके छान फोटो काढणे नाही जमत!

तरी प्रयत्न करतो..

येस जंगल सफारी भारीच! Happy

छोटी सफर... पण सहीच Happy

प्रचि ७: पाणटिलवा
प्रचि ८: पाणकावळा
प्रचि १२: दयाळ
प्रचि २०: पांढरा शराटी
प्रचि २१: रानभाई
प्रचि २२: लालबुड्या

छान फोटो. Happy

पिकासावरुन लिन्क देउन फोटो अपलोड करायचे.
१५० केबीत लैच अवघड आहे.

परतीच्या वाटेवरच्या आधीचा
एक साळुंकी आणि एक बुलबुल दिसतोय.

Pages