सरिस्का जंगल सफारी.....
सरिस्का जंगल सफारी ला जायचे जायचे म्हणून इथे भिवाडीत आल्यापासून रोजचे सुरु होते पण आमची सगळीच टीम जवळपासची असल्याने विकेंडला घरी पळायची त्यात मध्ये होळी २ दिवसांची सुटी कुणीच नसल्याने अक्षरश: एकाकी गेस्टहाऊसवर झोपा काढत संपविली...
शेवटी एका रविवारी टीमला अधिकाराचा फ़ायदा घेत झापले... लेको सुटीला घरी पळता आणि आणि सरिस्काला जाऊया म्हणता! ह्या रविवारी कुणीच जायचे नाही असा व्हेटोच काढला आणि रविवारी पहाटे उठुन ३ वाजता जायचे ठरले! भिवाडी - सरिस्का जवळपास १२५ किमी. साधारण स्वत:च्या वाहनाने अडीच तीन तासाचा प्रवास म्हणजे ६ पर्यन्त पोहोचू हा हिशोब..
एरवी ८ वाजेपर्यन्त अंथरुणात लोळत पडणारे आणि सुटीचा दिवस म्हणजे ११ वाजेपर्यन्त अंथरुणात लोळण्याचा अलिखित परवाना बाळगणारे आमचे सगळे संघ सदस्य पहाटे १.३० लाच उठुन आवरू लागले... आणि तेवढयात काही तरी खायला घ्यावे म्हणून कूक ला पराठे बनवायला सांगितले त्याने देखिल मोठ्या आनंदाने त्याच्यासह सर्व ८ जणांची नाश्ट्याची सोय केली आणि ३ वाजता आम्ही सारे घराबाहेर पडलो गाडी घेऊन...
अलवर पर्यन्तचा ९० किमी रस्ता अपे़क्षेपेक्षा खुपच चांगला असल्याने ४.३० लाच अलवरला पोहोचलो.. आणि पुढे रस्ता शोधत चुकत माकत ५.४५ ला सरिस्काला पोहोचलो....
सरिस्का हे अलवरच्या महाराजांचे शिकारीची राखिव जंगल होते.. १९५५ मध्ये वन्यपशु अभयारण्य घोषीत केल्यावर पुढे १९७८ मध्ये तेथे व्याघ्र प्रकल्प आणला गेला. अरावलीच्या पर्वतराईमध्ये दुतर्फा पर्वत रांगात ८६६ चौकिमी पसरले अतिशय सुंदर क्षेत्र आहे... भर उन्हात देखिल अगदी हुडहुडी भरणारी थंडीजाणवत होती... प्रामुख्याने ढोक, बाभळ, रिठा, बोरी, खैर, अडुळसा आदींची झाडं खुप प्रमाणात सर्वत्र पसरलेली..
आम्ही २ जिप्सीत प्रत्येक चार असे निघालो...
सफारीत आमचे स्वागत सुंदर मोराने केले...
पाणवठ्यावरील सांबर अणि मोर...
आम्ही केवळ २० - २५% परिसरातच चक्कर मारू शकलो...
चाहूल घेत फिरणारी हरिणाची जोडी....
तळे....
मासे केंव्हा मिळतायेत???
एकटाच रानकावळा वाट पहतोय.....
किसका रस्ता देखे......
चाहुल लागताच झाडीत लपायची लगबग..
लगबग पाणी पिण्याची....
खडतर वाट पहून
...
बिकट वाट वहिवाट असावी.... असे वाटू लागले!
अजुन असाच एक एकटाच..
हम निले है तो क्या हुआ दिलवाले है!
लांडोरीला आपले नृत्य कौशल्य दाखविताना हा सुंदर पक्षी...:)
अजुन एक अगदी गोल फिरुन....
अजुन.....
आता गिरकी पुर्ण होत आलीये...
आम्ही फिरुन तळ्यावर आल्यावर ही हरणाची जोडी पाणी प्यायला आली.. आधी बिचकली मग आम्हाला शान्त उभे पाहुन निवान्त पाणी पिऊ लागली...
थोड्याच अंतरावर हे महर्षी बक आपल्या ध्यान साधनेत मग्न होते...
काही अन्तरावर ह्या मगरबाई भक्षासाठी टपलेल्या..
ह्यांच्या तपश्चर्येला मात्र बहुदा फळ आले...
वाघोबा नाही भेटले पण त्यांचे दात कोरणे भेटले....
ह्या पक्षांची नांवे आमचे खगमित्र सांगतील....
परतीच्या वाटेवर....
वाटेवर भेटलेले मातेचे वात्सल्य....
आपल्या बाळाला धोका तर नाही ना म्हणून उराशी कवटाळत भेदरून पहाणारे...
ठीके, पण लौकर, याच संवत्सरात
ठीके, पण लौकर, याच संवत्सरात येऊदे पोस्टी!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कृष्णा, मी किती उत्सुकतेने
कृष्णा,
मी किती उत्सुकतेने बघायला आले.. एप्रिल फूल आहे का?
वॉव
वॉव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पक्ष्यांचे फोटो छान आलेत.
पक्ष्यांचे फोटो छान आलेत. वर्णन अजून थोडं सविस्तर हवं होतं.
सरिस्का जंगल सफारी....kuthe aahe he?
अरे छानच काढलेत की रे फोटो,
अरे छानच काढलेत की रे फोटो, मस्तच
नशिबवान आहेस असे जायला बघायला मिळतय तुला.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
मस्तच ! Chaitrali +१
मस्तच !
Chaitrali +१
अजुन काही फोटो पोस्टायचेत पण
अजुन काही फोटो पोस्टायचेत पण मला हे अप्रकाशित नाही ठेवता आले पुर्ण होई पर्यन्त....![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहेत
छान आहेत
पाणी पिणारी हरणाची जोडी एकदम
पाणी पिणारी हरणाची जोडी एकदम मस्त. एकदम sync मधे उभे राहुन पाणी पित आहेत.
झाले एकदाचे .... माबोवर फोटो
झाले एकदाचे .... माबोवर फोटो पोस्टण्याइतके चेंगट काम दुसरे कुठले नसेल बहुदा...
नाचणारा मोर खुप आवड्ला
नाचणारा मोर खुप आवड्ला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाघोबा नाही भेटले पण त्यांचे दात कोरणे भेटले.... >> नाही समजल , त्या पक्षाच नाव आहे का अस काही ?
सहीच!!!
सहीच!!!
छान आहेत फोटो. मदतपुस्तिका
छान आहेत फोटो.
मदतपुस्तिका बघितली का ? फोटो इथे टाकणे अजिबात चेंगट नाही.
वा, मोरांचे फोटो फारच छान
वा, मोरांचे फोटो फारच छान आहेत.
स्मिता, आमच्या बरोबर असलेल्या
स्मिता, आमच्या बरोबर असलेल्या तिथल्या गार्डने काहीतरी नांव सांगितले पण ते नाही लक्षात राहिले... पण हे वाघाचे दात कोरणे म्हणजे वाघाच्या दातात अडकलेले मांसखंड खाऊन पोट भरतो.. त्याची वाघालाही मदत होते... हे त्याने सांगितलेले लक्षात राहिले.. माबो वर बरेच पक्षी मित्र आहेत त्यांचे नांवासाठी सहकार्य हवे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा! खूपच मस्त फोटो आणि
व्वा! खूपच मस्त फोटो आणि लिखाण!
किती प्रकारचे प्राणी पक्षी भेटले या सफरीत!
आणि कृष्णा.........फोटो पिकासावरून अपलोड कर ना. ते नाही चेंगट काम.
वाघाचे दात कोरणे म्हणजे
वाघाचे दात कोरणे म्हणजे वाघाच्या दातात अडकलेले मांसखंड खाऊन पोट भरतो.. >> लईच danger काम करतो हा पक्षी
मला तर नवीनच आहे ही माहीती ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा, अहो तो प्रत्येक फोटो
दिनेशदा, अहो तो प्रत्येक फोटो एडीट करून १५० KB पर्यन्त आणून पोस्टने खुप त्रासदायक होते..
कृष्णा भाऊ, लईच भारि आहेत
कृष्णा भाऊ,
लईच भारि आहेत फोटो. मजा आली फोटो बघून.
धन्यवाद सर्वांना! ....kuthe
धन्यवाद सर्वांना!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
....kuthe aahe he?>>>>
हे राजस्थानच्या उत्तरेला अलवर जिल्ह्यात अलवर पासून ३३ किमी आहे. दिल्ली अथवा जयपूर हून जाता येते...जयपूर पासून साधारण ११० किमी आहे
मस्त आलेत फोटो
मस्त आलेत फोटो
वाघ बघायला सरिस्का , पन्ना
वाघ बघायला सरिस्का , पन्ना अभयारण्यामध्ये जाने म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे .
http://www.pankajz.com/posts/where-is-indian-tiger
म स्त
म स्त
हरणांचा फोटो मस्त आलाय रे
हरणांचा फोटो मस्त आलाय रे कृष्णा.
बाकी जंगल सफारी हा अनुभवच जबर्या असतो.
हरणांचा फोटो मस्त आलाय रे
हरणांचा फोटो मस्त आलाय रे कृष्णा>>>
धन्यवाद!
पण मला अजुन इतके छान फोटो काढणे नाही जमत!
तरी प्रयत्न करतो..
येस जंगल सफारी भारीच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छोटी सफर... पण सहीच प्रचि ७:
छोटी सफर... पण सहीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि ७: पाणटिलवा
प्रचि ८: पाणकावळा
प्रचि १२: दयाळ
प्रचि २०: पांढरा शराटी
प्रचि २१: रानभाई
प्रचि २२: लालबुड्या
छान फोटो. पिकासावरुन लिन्क
छान फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पिकासावरुन लिन्क देउन फोटो अपलोड करायचे.
१५० केबीत लैच अवघड आहे.
परतीच्या वाटेवरच्या आधीचा
एक साळुंकी आणि एक बुलबुल दिसतोय.
मस्त सफर.. मस्त फोटो
मस्त सफर.. मस्त फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटची जोडी टकाचोरची.
शेवटची जोडी टकाचोरची.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages