Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी असे वाचलेय कि शरीर गाढ
मी असे वाचलेय कि शरीर गाढ झोपेत असते पण मेंदू मात्र जागा होतो (थंडी वा अन्य कारणांमुळे). पण शरीराकडून (मज्जासंस्था) कोणतेही संदेश येत नाहीत हे लक्षात आल्यावर मेंदू चित्रविचित्र भास निर्माण करून शरीराला जागे करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी आपल्याला आपण जागे आहोत पण काहीही हालचाल करता येत नाही असे वाटत असते.
हे भुता खेतावरुन एकदम स्वप्न
हे भुता खेतावरुन एकदम स्वप्न भास ह्यावर आला धागा!
अमानविय धागा असा शास्त्रीय चर्चा घडविण्यासाठी नाही! इथे केवळ भुत, पिशाच्च, हडळ, खवीस ,वेताळ, संमंध आदीचीच चर्चा करावी ही संबंधीताना विनंती!
>>स्लीप पॅरालिसिस चा प्रकार
>>स्लीप पॅरालिसिस चा प्रकार १६ ते २२ या वयोगटात जास्त होतो का? मला साधारण या वयात बरेचदा अनुभव आलाय, व अनेक मित्रांचाही तसाच अनुभव ऐकलाय. पण त्याआधीच्या व नंतरच्या वयातल्या कोणाला असे अनुभव येत नाहीत.
मला हा अनुभव आला तेव्हा माझं वय २४-२५ होतं.
>>पण त्या आधिही असे काही झाले नव्हते अन त्यानंतरही अजुन तसा काही अनुभव नाही.
स्लीप पॅरालिसिस रोग नाहिये. मला एका रात्री लागोपाठ २ वेळा आणि त्यानंतर लगेच दुसर्या रात्री एकदा हा अनुभव आला. त्यानंतर कधीही आलेला नाही.
>>poltergeist जन्म किंवा
>>poltergeist जन्म किंवा मृत्यूच्या घटनेनंतर अॅक्टीव्ह होतात ही ऐकीव माहिती आहे.
आणि हो.....घरात काही renovation चालू असेल तरीही poltergeist अॅक्टीव्ह होतात (म्हणे!)
>>>>हे वाचून जरा घाबरले. नदीकाठचे वेगळे दिसणारे दगड-गोटे उचलायची सवय आहे. हे वेगळं प्रकरण आहे हे कसं ओळखायचं? उगाच धर्म करता कर्म अश्यातली गत नको व्हायला.
माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर प्लीज द्या ना कोणीतरी.
माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर
माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर प्लीज द्या ना कोणीतरी.
>> काही घाबरु नका. तुम्ही नॉर्मल दगडांत आणि त्यात फरक करु शकणार नाही. ते दगडांच्या रंगरुपावर ते ठरत नाही.
>हे वाचून जरा घाबरले.
>हे वाचून जरा घाबरले. नदीकाठचे वेगळे दिसणारे दगड-गोटे उचलायची सवय आहे. हे वेगळं प्रकरण आहे हे कसं ओळखायचं? उगाच धर्म करता कर्म अश्यातली गत नको व्हायला.
माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर प्लीज द्या ना कोणीतरी. >>>>
वर नानांनी सांगितलं तसंच नदीकिनारी सापडणार्या गोट्यांत न् यांच्यात भेद करून ओळखता येणं शक्य नाही कारण नदीतलेच गोल गरगरीत लहानाले गोटे आणून त्यांच्यावर तांत्रिक विधी करून हे बनवलेले असतात. बनवताना बळी दिलेला असतो. नदीकाठावरील दगडगोट्यांत कोणी पाण्यात सोडलेले वाहून आले असतील तरच हे त्यांच्यामध्ये असण्याची शक्यता असते, जी अगदीच नगण्य आहे.
मुंबईतील काही जागा ....
मुंबईतील काही जागा ....
आरे दुग्ध वसाहत मुंबई शहरातील उपनगरातील गोरेगाव पूर्व येथे स्थित आहे..दोन्ही बाजूंच्या झाडांद्वारे झाकलेले, हे आश्रयस्थान असे दिसते की, रात्री उशिरा रस्त्यावरून चालकांसाठी ड्रायव्हर भयावह नरकच वाटावा.. या आधी रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत आणि सर्व ड्रायव्हर्सनी असा दावा आहे की, एक बाई रात्री रस्त्या वर उभी राहून लिफ्ट मागते..लिफ्ट दिले नंतर काही अंतर पार करताच ती अदृश्य होते. काहींना असे ही सांगतात की जर गाडी थांबवली नाही तर ती गाडी चा पाठलाग करते….त्या शिवाय तेथे एक मुलगा आहे..तो अचानक चालत चालत रस्त्यावर येतो आणि नाहीसा होतो.. याशिवाय ही एका वृद्ध माणसाचे अस्तिव, बाळाचे रडणे यान सारखे अनुभव लोक सांगतात….म्हणून ड्रायव्हरस रात्रीच्या उशीरापर्यंत या मार्गावरून जाणे टाळतात…
मुकेश मील 1870 च्या दशकात बांधली गेले होती.. कुलाबातील या मिलने ऐकेकाळी स्वत: च्या गोदीने संपन्न व्यापार केला होता..पण 1982 मध्ये ही गिरणी संप झाल्यामुळे बंद पडली आणि काही महिन्यांनंतर एका भीषण आगीत जळून खाक झाली..त्यानंतर 80, 90 च्या काळात तेथे बरेच गँगवर्स आणि गुन्हेगारीचे गुणोत्तर वाढले…असे म्हटले जाते की अनेक लोकांचा खून करून त्यांना त्या पाण्यात फेकण्यात आले आहे… त्यानंतर अनेक जुन्या-नव्या चित्रपटा चे शूटिंग इथे झाली आहेत…तेथे काम करताना अनेक जणांना भुताटकी चे अनुभव आले आहेत..
डीसूझा चाळ ही मुंबईतील माहीम येथील कनोजा प्राइमरी शाळेजवळ आहे. चाळ मध्ये एक विहीर आहे पूर्वी च्या काली या विहिरी वरून लोक पाणी भरायचे, कपडे धुवायचे.विहिरी अगदी धोकादायक होती कारण तिच्या सभोवती मजबूत तटबंदी नव्हती. एका रात्री एक स्त्री पाणी भरायला विहिरीच्या काठावर गेली आणि पाणी उपसत असताना तटबंदी कोसळली व ती विहीर पडली त्या महिलेने बराच वेळ संघर्ष केला पण तिचा वेदनादायक मृत्यूचा मृत्यू झाला.
या अप्रिय घटनेनंतर, स्थानिक लोक, विशेषत: चाळीतील रहिवासी असे मानतात की ती स्त्री दर रात्री विहिरी जवळ दिसते…बरेच जणांनी तिला पहिलेच ही सांगतात…पण ती कोणाला ही त्रास देत नाही..
उत्तर मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आणखी एक भयानक ठिकाण आहे.. या उद्यानातील जंगलात विशिष्ट ठिकाणी जंगलाला एक हडळ नी पछाडले आहे…कार चालकांना ती दिसते आणि लिफ्टची मागणी करते.. बर्याच चालकांना तिची कथा माहित आहे, म्हणून ते थांबत नाही व अधिक गति गाडी चालवतात…पण ती गाडी सोबत धावते असं ही काही जणांनी सांगितले आहे..चालक शक्य तितक्या वेग ने गाडी चालुवून निघून जातात.. बर्याचदा ती चालकांना विचलित करण्याचा प्रयत्न करते म्हणून तेथे खूप अपघात घडतात.
प्रसिद्ध ताजमहाल हॉटेल किंवा हॉटेल ताज निःसंशयपणे आशियातील सर्वोत्तम हॉटेल्सपैकी एक आहे…तेथील अनेक अतिथी च्या मते हॉटेल मध्ये एक फिरता आत्मा आहे..
बर्याच अतिथी आणि हॉटेल कर्मचार्यांनीे लिटर कॉरिडॉरमध्ये एक भूत दिसले आहे..
आता तुम्हला प्रश्न पडला असेल की हा आत्मा कोण चा आहे? कोणाचा मृत्यू झाल्यानंतरही हॉटेलशी त्याचा एवढा के संबंध आहे?
दोन भारतीय अभियंता जे हॉटेल ताजचे आर्किटेक्ट्स आणि डिझायनर आहेत. सीताराम खांडराओ वैद्य आणि डी. एन. मिर्झा नंतर इंग्रजी वास्तुविशारद डब्ल्यू.ए.चेंबर्स यांनी हे काम पूर्ण केले. डब्ल्यू. ए.चेंबर्स आपल्या कामात एक प्रतिभावान आणि परिपूर्ण मनुष्य होता. त्याच्यासाठी सर्वकाही त्याचे काम होते…एकदा जेव्हा ते त्यांच्या सुटीतून परत आले, तेव्हा त्याच्या डिझाईननुसार ताजचे प्रवेशद्वार बनवले गेले नव्हते.. यामुळे त्याला इतके दुखवले जाते की त्यांनी हॉटेलच्या 5 व्या मजल्यावरून आत्महत्या केली.
पण नंतर मृत्यू झाल्यानंतर डब्ल्यू. ए. चेंबर्सचा आत्मा हॉटेल सोडून देऊ शकला नाही. त्यामुळे जेव्हा बहुतेक सभागृहे झोपतात, तेव्हा प्रसिद्ध आर्किटेक्टचा भूत बाहेर पडतो आणि सगळीकडे फिरतो. त्याच्या आत्म्याने कोणासही नुकसान केले आहे अशी अजून तरी कोणी तक्रार केलेली नाही..
भुत्या भाऊ, कसले भाषांतर
भुत्या भाऊ, कसले भाषांतर केलेय का?
कॉपी पेस्ट दिसतयं.
कॉपी पेस्ट दिसतयं.
<<<<<<रात्री एक स्त्री पाणी भरायला विहिरीच्या काठावर गेली आणि पाणी उपसत असताना तटबंदी कोसळली व ती विहीर पडली त्या महिलेने बराच वेळ संघर्ष केला पण तिचा वेदनादायक मृत्यूचा मृत्यू झाला.>>>>>
<<<<< यामुळे त्याला इतके दुखवले जाते >>>> हे संदिग्ध वाटले.
ताज वर हमला झाला तेव्हा कुठे
ताज वर हमला झाला तेव्हा कुठे असतिल
चेम्बर्स??
हो कॉपी पेस्ट वाटतेय
हो कॉपी पेस्ट वाटतेय
असल्या खूप स्टोरी वाचल्या आहेत गुगलून
गेल्या आठवड्यातलाच किस्सा आहे
गेल्या आठवड्यातलाच किस्सा आहे हा..
काही दिवसांपुर्वी मला स्वप्नात एक वयोवृध्द बाई दिसली..लाल साडी, मोठ्या फ्रेमचा चष्मा,गोरा चेहरा आणि प्रसन्न हसू...
बोलली काहीच नाही फक्त बघून हसली...
आणि हे स्वप्न मी विसरलोच होतो...कारण बहुतांशी स्वप्ने मला आठवतच नाही...
स्वप्न पडल्याच्याच दोन दिवसांनी..
दुपारी ऑफिसब्रेकमध्ये टपरी वर चहा पित असताना कुणाची तरी प्रेतयात्रा जाताना पाहीली..
माहीत नाही का ते...पण टाचा उंच करून मी प्रेत पाहण्याचा प्रयत्न केला....
तर.
तीच बाई, तोच चेहर, तोच चष्मा..( हो चष्मा पण होता)
मी हे पाहून हादरलोच...
कसंतरीच झालं तेव्हा ...भीतीही वाटली खुप..
त्या रात्री परत तेच स्वप्न ..तीच बाई..तेच हसू ..
त्यानंतर काहीच नाही. आणि का माहीत का ते मला भितीही वाटली नाही किंवा आताही आठवून वाटतं नाही..
आणि परत ते स्वप्न ही पडलं नाही .
हे असं का...हा प्रश्न पडलाय फक्त ...
कोल्हापुरात आमच्या जुन्या
कोल्हापुरात आमच्या जुन्या घराजवळ एक स्त्री भुत प्रसिद्ध् होते. ते ज्याला कोणाला झपाटायचे त्याची तब्येत पुर्णपणे खालवायची. विक्षिप्तपणे बडबडने ,विचित हसणे असे प्रकार व्हायचे. काही वर्षापुर्वी मित्रांच्या वडिलांना झपाटलेले. बरेच वैद्यकिय उपचार केले. त्यात एक वर्ष् गेले. भरपुर पैसाही ओतला. शेवटचा पर्याय म्हणुन मांत्रिकाकडे नेले. आता व्यवस्थित आहेत्. आम्ही ते घर सोडुन १४ वर्ष् झाली. परवा तिथल्या शेजाऱ्यांचा एक मुलगा आजारी आहे म्हणुन भेटायला गेलो तर त्याच्याबाबतीतही तोच प्रकार. त्यालाही मांत्रिकाकडे नेत होते. तो सतत रिक्षातुन बाहेर यायचा प्रयत्न् करत होता. असंबद्ध् बडबडत होता. विक्षिप्तपणे हसत होता. खुप वाईट वाटले. त्याच्याकडे बघुन.
@रश्मी.. - होय हे कॉपी पेस्ट
@रश्मी.. - होय हे कॉपी पेस्ट आहे
धागा एकदम थंड पडला .... एकही
धागा एकदम थंड पडला .... एकही किस्सा नाही?
धागा एकदम थंड पडला .... एकही
धागा एकदम थंड पडला .... एकही किस्सा नाही?>>>
मार्गशिर्ष महिना सुरु आहे ना! श्री दत्तगुरुंचा महिना दत्त जयंती पर्यन्त तरी भुतं खेतं अकार्यक्षम असतात!
धागा एकदम थंड पडला ....
धागा एकदम थंड पडला ....

कारण ठंडी पण फार आहे
त्यामुळे भूते झाडावर आणि माणसे घरात
भेटाभेट होणार कशी
कृष्णा , अंबज्ञ >>>
कृष्णा , अंबज्ञ >>>

बऱ्याच मायबोली करांनी
बऱ्याच मायबोली करांनी सांगितले म्हणून माझी एक आठवण इकडे पेस्ट करत आहे
माझ्या आठवणी हाच माझ्या ह्या लेखाचा विषय कारण कधीतरी खूप आठवणी येतात आणि तश्याच विरून जातात ... एक अशीच आठवण.. माझी आई शिक्षिका आणि आई नोकरी करत असली कि ती मुलांच्या वाटेला खूप कमी येते म्हणजे त्यांना हवी तेवढी येत नाही...माझ्याही बाबतीत तेच त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी आईला सोडत नसे... असाच एकदा आई कोणातरी नातेवाईकांना भेटायचं म्हणून धुळ्याहुन नाशिक ला निघाली होती.. मग मी ही आई बरोबर तीच शेपूट असल्या प्रमाणे निघाले.. तसे आईचे बरेच नातेवाईक नाशकात आहेत नेमकं आम्ही तेव्हा कोणाला भेटलो ते आठवत नाही.. पण संध्याकाळी मी आणि आई नाशिक हुन त्रंबकेश्वराला पोहचलो .. तिथे माझी आतेबहीण राहत होती ... जी तिथल्या गव्हर्मेंट हॉस्पिटल मध्ये nurse होती .. साधारण संध्याकाळी ६ वाजता आम्ही त्रम्बक ला पोहचलो .. त्रंबकेश्व्यरच दर्शन घेऊन.. आम्ही आते बहिणीच शोध घेतला कारण ती तिथे गव्हर्मेंट quarter मध्ये राहते हे माहित होत पण नेमकं कुठे ते माहित नव्हतं आणि हि गोष्ट साधारण २२ वर्षांपूर्वीची आहे त्यामुळे मोबाइल वैगरे नव्हतेच सहज .. मग तिचा शोध घेत आम्ही तिच्या रूम पर्यंत पोहचलो पण quarter बंद मग बाजूला चौकशी केली ते म्हणाले येईल एव्हढ्यात वैगरे ..मग तिथेच तिची वाट पाहत थांबलो ..त्या quarter च्या भोवतीच वातावरण काहीस गूढ वाटत होत का ते माहित नाही पण ती वेळ तशी असेल म्हणून कदाचित .. साधारण ९. ३० पर्यंत वाट पहिल्या नंतर
आम्ही शेजारच्या quarter मधील एका तरुण काकुंशी बोललो त्यांच्या मते ती म्हणजे माझी आतेबहीण बहुधा नाशिकला निघून गेली असावी .. मग आमच्या पुढे प्रश्नचिन्ह ?? आता काय .. कारण नाशिक किंव्हा धुळ्याला आता बसने रात्रीच जाणे शक्य नव्हते मग बहुधा आई ने आणी त्या काकूंनी विचार करून त्या काकूंन कडे राहण्याचे ठरवले .. पण का ते माहित नाही त्या गूढ आणि वेगळ्याच वाटणाऱ्या ठिकाणी आतून खूप शब्दयात न मांडता येणारी अस्वस्थता होती.. ती रात्र जी मी आणि माझी आई कधीच विसरू शकणार नाही .. आम्ही त्या काकूंच्या घरात प्रवेश केला .. पाणी वैगरे घेऊन मी अल्मोस्ट झोपायला आल्याने त्यांनी आमची त्यांच्या हॉल मध्ये व्यवस्था केली म्हणजे एक सतरंजी दिली .. मग अचानक त्या काकूंचे यजमान आले आणि कोणाशी काहीही न बोलता आतल्या खोलीत निघून गेले ज्यांना नतर आम्ही कधीच पाहिलं नाही.. ते परत बाहेर आलेच नाही .. काकू सुद्धा आत गेल्या बहुधा त्यांनी आतला दरवाजा बंद केला मग कुठलाही आवाज नाही.. एक भयाण शांतता.. ते quarter ,तो परिसर ,त्या आवारात असलेलं प्रचण्ड मोठ वडाच झाड .. आणि इतक मोठ झाड असूनही कुठलीच सळसळ नाही.. सगळीच स्तब्धता .... पण झोप येत असल्याने आणि थकल्याने आम्ही दोघी तशात झोपलो पण रात्री अचानक काही तरी खूप अंगावर येत होता डांस सारखं पण ते डास नक्कीच नव्हते आणि आई तिच्या पदराने ते हाकल्याण्याचा प्रयन्त करत होती.माझ्या आजोबा पासून आमच्या घरात दत्तबावनी म्हणायचं प्रघात आहे , आई तीच दत्तबावनी गुणगुणत होती . माहित नाही ज्या रात्रीची कधीच सकाळ होणार नाही असे वाटत होते कदाचित घरी धार्मिक वातावरण असल्याने किव्हा अजून काही त्या रात्रीची प्रचंड भयाण अवस्थे अंतर सकाळम्हणजे पहाट झाली आणि मी आणि आई त्या काकूंना सांगून निघण्यासाठी बरेचदा त्यांच्या खोलीचं दार वाजवून पहिले पण कुठलाही प्रतिसाद न आल्याने .. प्रचंड वेगाने बस स्टॅन्ड कडे निघालो.
आजही कळत नाही की ते काय होत, त्या काकू,ते काका, ते quarter ,ती भयाण शांतता , आणि सकाळीं खूप दार वाजवून ही त्या काकूंनी दार ना उघडणे ..आणि भेट झ्याल्यावर आते बहिणीने सांगणे कि ते quarter बंदच आहे.. तेथे कोणी राहत नाही ...
मिनल हरिहरन >>> भारि अनुभव
मिनल हरिहरन >>> भारि अनुभव
मिनल हरिहरन
मिनल हरिहरन
बाप रे कसला भन्नाट अनुभव आहे
भारी अनुभव
भारी अनुभव
मिनल हरिहरन कसला भयानक अनुभव
मिनल हरिहरन
कसला भयानक अनुभव
थरारक अनुभव. तुम्ही दोघींनीही
थरारक अनुभव. तुम्ही दोघींनीही त्या काका काकुना पाहिलेत. व त्यांच्याशी बोललात सुद्धा. म्हणजे हा भास किंवा मनाचा खेळ आहे म्हणावे तरी कसे.
हो ..कारण जे अनुभवलं आहे..ते
हो ..कारण जे अनुभवलं आहे..ते मनाची अवस्था किंवा भ्रम असं नक्कीच नव्हतं .... पण मग आज ही वाटत आणि त्या नंतर नेहमीच वाटत आलंय ते काय होतं ??? असो काही वेळा काही गोष्टी आपल्या आकलना बाहेर असतात हे नक्की
मिनल, फक्त भेट झ्याल्यावर आते
मिनल, फक्त भेट झ्याल्यावर आते बहिणीने सांगणे कि ते quarter बंदच आहे.. तेथे कोणी राहत नाही ह्यावरुन ते काका-काकु भुत होते असं म्हणु शकत नाही.
नवीन Submitted by सस्मित on 6
नवीन Submitted by सस्मित on 6 December, 2017 - 16:33
एक्झॅक्टली....
मी असा कुठे म्हणाले कि ते भूत
मी असा कुठे म्हणाले कि ते भूत होते ... कारण लहानपणी भूत किंवा देव दिसण्या इतकी मी पापी,किंवा पुण्यवान नक्कीच नाहीये हो .पण हे खूप आकलन बाहेर आहे कि जेव्हा मी आणि माझ्या आईने त्यांना सांगून निघण्या साठी दरवाजा वाजवला तेव्हा त्यांनी तो उघडला नाही... आपल्या घरात परकी बाई आणि मुलगी (म्हणजे मी आणि माझी आई ) आली आहे. ते दरवाजा वाजवत आहेत आपण तो उघडू का >>>>असो हा माझा अनुभव होता,तो सत्य आहे .. मी हे म्हणत नाहीये कि ते भूत होतं. माझ म्हणणं इतकं कि जे अनुभवलं ते आकलना बाहेर होत आणि आहे.. त्या रात्री चा अनुभव फक्त मी आणि माझ्या आई चा आहे कारण ते वातावरण आम्ही अनुभवलं आहे जे आम्ही कधी विसरू शकत नाही इतकंच
आयुष्यात आता पर्यंत फक्त
आयुष्यात आता पर्यंत फक्त दोनदा अनुभव आला आहे तो पण लगातार.... भूत वगैरे दिसले नाही पण जे होत ते त्यावेळी माझ्या करीता टेरीफीक होत. तर त्यावेळस सेकंड ईयर ला असेन वडील सरकारी अधिकारी असल्याने आम्ही सरकारी क्वार्टर मध्ये राहयचो. आमच्या व बाजूला लागून असलेल्या क्वार्टर च्या गच्चीवर जाण्यासाठी जिणा एकच होता. उन्हाळा नुकताच सुरू झाल्याने गच्चीवर झोपण्याचा प्लॅन केला पण एकटाच कशाला झोपतो म्हणून घरच्यांनी आधी नकार घंटा वाजवली पण मी ऐकून न ऐकल्या सारख करत काही होत नाही कुणी खात नाही म्हणून एक गादी., बल्ब असे साहीत्य घेऊन गेलो बल्ब चालू केला व थोड्या वेळ पुरवण्या व मासिक वाचून रात्री एक वाजता डोळे बंद करून झोपेची वाट बघत पडून राहयलो.... काही वेळा नंतर मला अस वाटू लागले की माझा कान कुणी तरी चाटत आहे वाटल कुत्र असल म्हणून हाड हाड करत ताडकन उठून बसलो... तर कोणीच नाही घराच्या आजूबाजूला पण पाहिल पण कुठेच कुत्र दिसल नाही.. भास झाला असेन किंवा आधीच पळून गेले असेल म्हणून नंतर झोपी गेलो. दुसर्या दिवशी जेवण झाल्यावर रात्री साधारण दहा वाजता गच्चीवर आलो कालच्या प्रसंगाची खबरदारी म्हणून गच्चीच्या दरवाज्याची कडी चांगली लावून घेतली बल्ब चालू करून एक कादंबरी वाचत बसलो एकदम दरवाजा समोर... वाचत वाचत एक वाजला असेल तर अचानक धाडकन समोरचा दरवाजा अर्धा उघडला पाच मिनिटे बघतच राहिलो बिलकुल हवा नाही मग कडी लावलेला दरवाजा उघडला कसा?... मग विचार आला बाजूच्या मुलाने घाबरण्यासाठी केल असेल म्हणून बबलू बबलू असा दोन तीन वेळा आवाज दिला पण काहीच उत्तर नाही मग लपला असेल म्हणून दरवाज्याच्या मागे, त्याच्या पुर्ण गच्चीवर तसेच वरून घराच्या आजूबाजूला पाहिले पण कोणाचच मागसूस नव्हता... मग माझी टरकली हे दुसरच काही तरी आहे म्हणून जी धुम ठोकली ते घरात येऊनच थांबलो... चार पाच दिवसांनी तिथल्या बाजूच्या एका वयस्कर माणसाला हा किस्सा सांगितला तर त्याच म्हणने होत की तिथे कोणती तरी शक्ती वास करीत होती जीने तुम्हाला दोन वेळा वार्नीग दिली... बर झाल तिसर्या दिवशी झोपायला गेला नाही वाचला... नंतर कधीच तिथे गच्चीवर झोपायला गेलो नाही पण आज ही तो प्रसंग आठवला तर भीती वाटते...... पण जे काही घडल टेरीफीक होत.
बापरे
बापरे
Pages