Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गाणगापूर मध्ये रोज संध्याकाळी
गाणगापूर मध्ये रोज संध्याकाळी असते आरती
७.३० च्या नंतर नगारे वाजवतात, अन त्या नगाऱ्यांच्या तालावर ज्यांना काही बाधा झाली असेल त्यांच्या अंगात येते, एकदम बारीक पण ऊंच अश्या लोखंडी पाईपवर अगदी सराईत असल्यासारखे लोकं चढतात
अगदी सुशिक्षित चांगले राहणीमान असणारे सुद्धा असतात यात.
आम्ही वर्षातून किमान दोन तीन वेळा तरी जातो तिकडे
एकदा आदल्या रात्री ज्या मुलीला वय अंदाजे १५-१६ वर्षे, पहिले होते ती दुसऱ्या दिवशी परत दिसली तेव्हा तिला विचारले होते आम्ही तेव्हा ती बोलली कि गेले ८ महिने ती इथे राहतीये, मूळची कुठेतरी दुसरीकडे आहे तिचे घर पण तिला बाधा झाली होती अन त्यावर काहीच उपाय सापडत नव्हता म्हणून तिच्या घरचे तिला इकडे घेऊन आले
इथे आल्यावर सगळे ठीक झाले पण झाडाने पूर्णपणे सोडले नव्हते म्हणून तिला इथेच राहून दहा महिन्यांची सेवा करायला सांगितले. आता त्यातले आठ महिने झाले पुढच्या दोन महिन्यात घरी जाऊ शकेन मी आता असे ती बोलली
महिन्यातून एकदा कोणीतरी घरचे भेटून जायचे
पूर्ण दिवसातून एकदा संगम, निर्गुण पादुका अन कल्लेश्वर असे रोज दर्शन घेते असे बोलली
पण एकंदरीत हे सगळे खूप भीती वाटणारे आहे.
काही मानसिक रोग / कंडिशन पण
काही मानसिक रोग / कंडिशन पण असु शकते ही
गेल्या आठवड्यात कित्येक
गेल्या आठवड्यात कित्येक वर्षांनी मी बंगलोरला बसने गेलो. आणि त्सुनामी आली सालचा किस्सा आठवला. जेव्हा त्सुनामी आली तेव्हा मी इंटरव्हूवसाठी बंगलोरमध्ये होतो.
परत येताना माझ्या मागेच ते जोडाप होतं आता ते नवराबायको होते की बहीण भाऊ हे माहीत नाही.
ती बाई अर्वाच्य भाषेत कोणा पुरूषाला तळतळाट देण चालू होतं. किती घाण बोलाव त्याला काही सुमार .... अशी भाषा , साक्षात कांती शाह ओशाळला असता. तिच्या बरोबरचा माणूस कानकोंडला झालेला.
लोक मधूनच ओरडायचे तेव्हा जरा गप्प बसायची मग परत चालू.
सकाळी ब्रेकफास्ट साठी लोक उतरली तर रात्री वहाणारी मैली गंगा एकदम गंगा की तरह पवित्र. तोंडावर पदर घेऊन पडली होती. आणि अगदी मृदू आवाजात काही नकोय म्हणाली.
लोक तिच्या बरोबरच्या माणासाला काही बाही सुचवत होते. मी काही ते ऐकायच्या भानगडीत पडलो नाही
गुगु, तिने अपेयपान केल्याची
गुगु, तिने अपेयपान केल्याची शक्यताही आहे. मी एकदा हॉटेलात एका फॅमिलीला एकत्र पिताना पाहिले. गुज्जू होते, गुज्जू बोलत होते. बाई साठीच्या वर वयाची, आधी एकदम नॉर्मल आवाजात बोलत होती. दोन तीन पेग पोटात जाताच तिने मोठ्याने अर्वाच्य अश्लील बडबड सुरू केली. सोबत नवरा व मुलगा होते बहुतेक. नवरा अधून मधून तिच्या हो ला हो देत होता, मुलगा चूप बसून जेवत होता.
"तिने अपेयपान केल्याची
"तिने अपेयपान केल्याची शक्यताही आहे"
नाही, कारण ती जे काही बोलत होती ते खणखणीत आणि सुसंबद्ध होत.
त्याला अत्यंत अश्लिल संवादांच माह्या नवर्याची बायकोच कथानक होतं.
वरचे किस्से शंभर टक्के मानवीय
वरचे किस्से शंभर टक्के मानवीय आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अंगात येणाऱ्या भूतांशी त्या
अंगात येणाऱ्या भूतांशी त्या अवस्थेत न घाबरता गप्पा मारल्या तर चांगली व्यवस्थित माहीती देतात ते.. कोणाला संधी मिळाल्यास मारून बघा. अनुभव आहे.
वरचे किस्से शंभर टक्के मानवीय
वरचे किस्से शंभर टक्के मानवीय आहेत =१++
@ गुगु --> नक्कीच कुठलातरी
@ गुगु --> नक्कीच कुठलातरी नशापाणी केलेलं असणार ...
@ जाई - नक्की कुठले किस्से म्हणायचे आहे आपल्याला ?
??
??
भुत्याभाऊ
भुत्याभाऊ
अरे मला वाटलं काहीतरी नविन टाकलं असशिल
@ गुगु - नाही रे सध्या कुठलेच
@ गुगु - नाही रे सध्या कुठलेच किस्से वाचनात किंवा ऐकण्यात नाही आले म्हणून शांतता आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी लहान होतो तेव्हाची गोष्ट
मी लहान होतो तेव्हाची गोष्ट आहे. त्यावेळी आमच्या गावात पाण्याचा खूप प्रॉब्लेम सुरू होता. पहाटे दोन वाजता नळाच
पाणी विहिरित टाकलं जायचं आणि सकाळी विहिरीवर पाणी भरण्यासाठी भरपूर गर्दी व्हायची. काका काकी दोघे जॉब करायचे त्यामुळे आठावद्यातुन एकदा काका काकी आणि आजी पहाटे २ वाजता उठुन पाणी भरायचे. आमच्या घरापासुन विहिर साधारण १०० मीटर अंतरावर आहे. एक दिवस असच पाणी भरत असताना काकी विहिरीजवळ गेली तर आजी एकदम घाबरलेल्या अवस्थेत खाली बसली होती. काहीच बोलत न्हवती. फक्त हातवारे करुन नको नको बोलत होती. मग पाणी भरायचा बंद केल आणि तीला घरी आणली. दुसऱ्या दिवशी आजीने सांगितल की तीला पाणी भरताना रेड्याच्या ओरडन्याचा आवाज आला. विशेष म्हणजे तो आवाज फक्त तीलाच ऐकु आला होता, काका काकी आसपास असूनपण त्याना ऐकु आला न्हवता. रात्रीच्या प्रहरी गावातुन म्हसोबा रेड्यावरुन जातो आणि त्याच्या मार्गात जर कोणी आला तर त्याचा रेडा आवाज करून समोरच्याला सावध करतो असं म्हणतात.
हायला ! हे भारीय...
हायला ! हे भारीय...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
रेडा हॉर्न वाजवतो तर...
>> पहाटे दोन वाजता नळाच पाणी
>> पहाटे दोन वाजता नळाच पाणी विहिरित टाकलं जायचं आणि सकाळी विहिरीवर पाणी भरण्यासाठी भरपूर गर्दी व्हायची<<
नळाचं पाणी (रनिंग वॉटर) विहिरीत परत टाकणं हेच अमानवीय आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हसोबा कोण असतो?
म्हसोबा कोण असतो?
नळाचं पाणी (रनिंग वॉटर)
नळाचं पाणी (रनिंग वॉटर) विहिरीत परत टाकणं हेच अमानवीय आहे... Happy>>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
नळाचं पाणी (रनिंग वॉटर)
नळाचं पाणी (रनिंग वॉटर) विहिरीत परत टाकणं हेच अमानवीय आहे... Happy। >>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
माझ्या आजोळी पण असे आहे,
गावाबाहेर डोंगरावर नागनाथाचे मंदिर आहे. तिथे बरेच जण नवस बोलतात अन तो नवस पूर्ण झाला की नवस बोलणारा नवरात्रीत नऊ दिवस मंदिरात रहायला जातो. मंदिर तसे मोठे आहे अन नवरात्रीत खूप गर्दी असते तिथे नवस पूर्ण झालेल्यांची.
मंदिरात प्रवेश केल्यावर सरळ पुढे छोटेसे दार आहे अन त्यात देव. तर मुख्यद्वार अन मंदिर यात जी मधली जागा आहे तिथे हे सर्व रात्रीचे झोपतात, एका बाजूला स्त्रीया अन दुसऱ्या बाजूला पुरुष. असे म्हणतात की देव रात्रीचे बाहेर येतात एका मोठ्या नागाच्या रुपात म्हणून मुख्यद्वार ते छोटे दार यातील जो रस्ता आहे तो रिकामी ठेवायचा, त्यात जर का चुकुनही कुणाचा अगदी झोपेत सुद्दा हात किंवा पाय जरी आला तर ती व्यक्ती लगेच खूप आजारी पडते,
नळाचं पाणी (रनिंग वॉटर)
नळाचं पाणी (रनिंग वॉटर) विहिरीत परत टाकणं हेच अमानवीय आहे << हो ना![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नळाचं पाणी (रनिंग वॉटर)
नळाचं पाणी (रनिंग वॉटर) विहिरीत परत टाकणं हेच अमानवीय आहे
कृपया ह्या वाक्याचा विपर्यास करून आपण पाणी टंचाई असलेल्या गावाची खिल्ली उडवू नए असे मला प्रांजलपणे नमूद करावेसे वाटते. कारण अनेक ठिकाणी आर्थिक परिस्थितिमुळे अश्या प्रसंगात वापरायला वेगळ्या स्टोरेज टैंक नसतात (बांधयला परवडत नाही किंवा पुरेसे सर्वाजनिक फंड नसतात) त्यामुळे मग गावात ही पद्धत वापरतात आणि टैंकर ने विकत घेतलेले पाणी विहिरित टाकतात आणि नंतर ते पाणी गांवकरी आपल्या वापरासाठी परत ओढुन घेतात. विहिरितिल झऱ्यामुळे ओतलेले पाणी झिरपुन जाण्याच्या धोका असल्याने ही पद्धत नुकसानीची असली तरी इलाज खरंच नसतो म्हणून मग पाणी असे विहिरित ओतले की ते आपल्या घरासाठी उपसण्यास रात्री अपरात्री सुद्धा अशी सर्वाना लगबग करावी लागते.
@अंबज्ञ+१११११. नळाचं पाणी
@अंबज्ञ+१११११. नळाचं पाणी विहिरीत टाकण म्हणजे. ज्या पाईपलाईनद्वारे नळाला पाणी येतं तो पाईप विहिरीला कनेक्ट केलेला होता. रात्री दोन वाजता पाणी सूरु केलं की सकाळपर्यंत विहिर थोडिफार भरायची आणि पाण्यासाठी लोकाना रांगेत उभ नाही रहायला लागायचं. नळावर भरपूर गर्दी व्हायची आणि लोकांचा वेळ पण भरपूर वाया जायचा त्यासाठी ही उपाययोजना केली होती.
म्हसोबा कोण असतो?>>>>
म्हसोबा कोण असतो?>>>>>ग्रामदैवत असतो असे ऐकून आहे . त्याचा येण्या जाण्याचा एक मार्ग ठरलेला असतो. ठराविक दिवशी मध्यरात्रीनंतर तो त्या मार्गावरून ये जा करतो . कोणाला काही करत नाही पण जर का मार्गात कोण आलं तर त्याच्यासोबत अनर्थ घडतो असे म्हणतात
अस्तित्व : सत्य भयकथा
अस्तित्व : सत्य भयकथा
मी एका सरकारी ट्रेनिंग Institute मध्ये आय. टी. Engineer म्हणून Contract Basis वर ११ महिन्यांसाठी जॉबला होतो.
आमच Office हे Classrooms असणाऱ्या Buliding मध्येच होत. Buliding च्या समोरच Library मागच्या बाजूस दवाखाना. थोड लांब उजव्या बाजूस होस्टेल, डाव्या बाजूस कॅन्टीन, Library च्या उजव्या बाजूस कंट्रोल रूम (सदर Institute हि Cops ला ट्रेनिंग देण्यासाठी आहे ) साधारणतः १००+ एकर चा परिसर. Institute हि इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली १००+ वर्षे जुनी आणि महत्वाची Institute आहे.
Institute सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असल्याने महत्वाच्या ठिकाणी (Entry आणि Exit Gate) बंदुकधारी cops २४ तास तैनात असत आणि रात्री गस्तीसाठी पोलीसगाडी फिरत असे.
मला जॉईन होऊन ३ महिने झाले असतील. दुसऱ्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या महत्वाच्या मिटिंग्ज होत्या. मीटिंग असल्या मुळे आम्ही त्या रात्री उशिरापर्यंत काम करत होतो. माझ्या सोबतीला एक समवयस्क क्लर्क होते.
रात्री १२ ते १२ १/२ च्या दरम्यान आमच काम संपले असावे. आम्ही निघण्याच्या तयारीतच होतो. तेव्हड्यात एका क्लासरूम मधून कसलातरी आवाज ऐकू येवू लागला. माझ्यासोबत असणारे क्लर्क मला क्लासरूम कडे जाण्यास रोखू लागले. नकळतच माझी पावले क्लासरूम कडे वळू लागली. जसजसे मी क्लासरूम जवळ जात होतो तसा आवाज कमी होत होता. मी क्लासरूम उघडण्याची हिम्मत नाही केली. आवाज बेंचवर काहीतरी आपटल्याचा होता. मी क्लासरूम पासून लांब जाऊ लागताच आवाज वाढू लागला. असे २|३ वेळा झाले. मनात धडकी भरली.
मी आणि क्लर्क ताबडतोब कंट्रोलरूमला गेलो. कंट्रोल ऑफिसर ला सर्व हकीकत सांगितली. ऑफिसरने Office बिल्डिंगच्या Incharge ला फोन केला. Incharge पुढच्या पाच मिनिटात कंट्रोलरूमला हजर झाला. Incharge हा Duty वर नसल्या कारणाने स्वतः काही करू शकत नव्हता. Incharge ने गस्तीवर असणाऱ्या Cops ला फोने केला. दहा मिनिटातच गस्तीवरची गाडी हजर झाली. त्यांना झालेल्या घटनेची कल्पना दिली.
मी, क्लर्क, गस्तीवर असणारे Cops आणि Incharge अशी ५ - ६ लोक काठ्या लाठ्या घेऊन आवाज येणाऱ्या क्लासरूम कडे जाऊ लागलो. आवाज येतच होता. जसजसे आम्ही जवळ जात होतो तसा आवाज कमी होत होता. आम्ही दरवाजा पर्यंत पोहोचलो आणि आवाज बंद झाला. हिम्मतीने एकाने दरवाजा उघडला आणि बरोबर घेतलेली Torch चालू केली आणि संपूर्ण क्लासरूम तपासाला. काहीही विचित्र आढळले नाही. परंतु एका बेंचवर पाण्याची बाटली आणि चहाचा एक कप होता. (कोणीतरी एका प्रशिक्षणार्थीचा असावा).
जवळजवळ १५ मिनिटे आम्ही क्लासरूममधेच होतो. परंतु काहीही एक हालचाल झाली नाही. सर्वजन क्लासरूम बाहेर आलो दरवाजा बंद केला. जसजसे आम्ही लांब जाऊ लागलो तसतसा आवाज वाढू लागला. आम्ही सर्व बिल्डिंगच्या खाली येऊन थांबलो. आता तर जेव्हा आवाज यायचा तेव्हा संपूर्ण Instituteची स्ट्रीट Lamps बंद होऊन चालू व्हायची. हा प्रकार न थांबता चालू होता.
माझ्या सोबत असणारे सर्व काहीतरी विचित्र असण्याच्या गप्पा करत होते. काहीच मार्ग नव्हता. झालेल्या घटनेची कंट्रोलरूमला Diaryत नोंद झाली आणि सर्वजन मार्गस्थ झाली. परंतु माझ्या मनात मात्र शंका होती, पूर्वी ह्याच ठिकाणी काहीतरी विचित्र घटना घडल्याची.
रूमवर आलो तर २ वाजले होते. झोप लागत नव्हती. Timepass म्हणून इंटरनेट surfing करू लागलो. surfing करताना सहजच intituteच नाव आणि Suicide एकत्रित गूगलवर search केलं तर पहिल्या ३ लिंक्स intitute मधेच Suicide केलेल्या ३ वेगवेगळ्या बातमीच्या होत्या.
पहिली लिंक ओपन केली आणि धक्काच बसला. ज्या क्लासरूममधून आवाज येत होता त्याच क्लासरूममध्ये एका प्रशिक्षनार्थीने बरोबर त्याच तारखेला एका वर्षापूर्वी आत्महत्या केली होती.
त्या रात्री जणू तो स्वतःच अस्तित्वच सिद्ध करू पाहत होता.
(कथेत थोडे बदल केले आहेत परंतु कथा सत्य घटनेवर आधारित आहे)
(कथा लेखनाचा पहिलाच प्रयत्न होता, चुकल्यास क्षमस्व)
@भूत्याभाऊ, तुम्ही तुमच्या
@भूत्याभाऊ, तुम्ही तुमच्या मित्राचा डोम्बिवलीतिल किस्सा सांगितला तो area कोणता होता ? मी डोम्बिवली ची आहे म्हणून विचारले .
@ Praj_n - भावाला विचारून
@ Praj_n - भावाला विचारून सांगतो नक्की पत्ता
आज सकाळचा एक किस्सा. आता हा
आज सकाळचा एक किस्सा. आता हा अमानविय आहे की नाही माहित नाही.
आज सकाळी ८ च्या सुमारास , मी आणी माझ्या दोन मैत्रीणी, ट्रेन च्या दरवाज्यात ऊभे होतो, अन तेव्हा एक बाई एका मुलीशी गरज नसताना भांडायला लागली. त्या बाईचा हा स्वभाव आम्हाला माहित असल्यामुळे आम्ही त्या मुलीला तसे सांगायचा प्रयत्न केला पण तिचे आमच्याकडे लक्ष नव्हते. अचानक त्या बाईने त्या मुलीचा हात धरुन सोडुन दीला आणी हसायला लागली.
त्याने ती मुलगी घाबरली पण म्हत्वाचे म्हणजे याही मुलीचा हात लगेच सुजला..
मी जसे वर म्हटले याही मुलीचा म्हणजे असे या पुर्वी सुद्धा झाले आहे. मागे सुद्धा या बाईने असच एका मुलीचा हात धरला होता अन तिचाही हात लगेच सुजला होता , तोही जवळपास १५ दिवस. तेव्हापासुन त्या बाईची खुप भिती वाटते.
हायला!
हायला!
<<मुलीचा हात धरुन सोडुन दीला
<<मुलीचा हात धरुन सोडुन दीला आणी हसायला लागली.<<
बापरे.... अस पण काही असते का?
- भावाला विचारून सांगतो नक्की
- भावाला विचारून सांगतो नक्की पत्ता>>>>>>>भुत्याभाऊ धागा थंड पडला की पुन्हा वरती आणण्यासाठी पत्ता सांगाल का?????
@dspawar अतिशय थरारक अनुभव.
@dspawar अतिशय थरारक अनुभव. दूर असताना जोरात आवाज येणे आणि जवळ गेल्यानंतर आवाज थांबणे वगैरे. याचे त्या लोकांनी अजून विविध तर्हेने विश्लेषण करायला हवे होते खरेतर. पण नक्कीच थरार अनुभवला त्यांनी.
Pages