रुद्रम -झी युवा मालिका - २

Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45

पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू Happy
रुद्रम भाग -१ इथे बघा Happy
https://www.maayboli.com/node/63408?page=63

Group content visibility: 
Use group defaults

पुढच्या भागात म्हणून जे दाखवलं आहे ते आत्ता इथे लिहित नाही पण ते बघून मला एखादा twist असेल का शेवटी असं वाटायला लागलं.

अरे आता लिहा ना कोणीतरी उद्याच्या भागात काय आहे ते Happy आत्तापर्यंत पाहिला असेल एपिसोड सगळ्यांनी Proud

मुक्ता सरळ जाऊन कि क ला विचारते की शोभा माकनला टीप तुम्हीच दिली होतीत ना, कारण मी हे तुमच्याजवळ बोलले होते. तो हो म्हणतो, मी तुला हळू हळू सर्व सांगणार होतो असं काहीतरी पण म्हणतो. त्यामुळे मला संशय आला इतकं सगळं कसं काय दाखवलं मग काही ट्विस्ट असेल का.

मुक्ता सरळ जाऊन कि क ला विचारते की शोभा माकनला टीप तुम्हीच दिली होतीत ना, >>> ऑ!!!

अंदाज - की क मारणार नाही रा ला, तिच्या घरात स्थानबद्ध करून ठेवेल. पण रा ने सगळं रेकॉर्डिंग मंदार किंवा सुहास ला देऊन ठेवलं असेल. कोणीतरी पोलीस चांगले असतीलच ना जे की क चा माग काढत येतील.

मखीजा रागिणीला त्याला जाॅइन करायची आॅफर देईल. रागिणी वरवर हो म्हणत काढेल त्याचा काटा.

काल सरपोतदारच्या खुनात अनेक न पटणार्या गोष्टी होत्या. कोणतं farmhouse तीन मजली असतं? Senior Police Officer एकटाच असणं शक्यच नाही. रा चा फोन आल्याबरोबर तो दहा मिनिटात civil कपड्यात तिला भेटायला येतो. फोनवर बोलताना त्याने uniform घातलेला असतो... असो!

पुढच्या भागात म्हणून जे दाखवलं आहे ते आत्ता इथे लिहित नाही पण ते बघून मला एखादा twist असेल का शेवटी असं वाटायला लागलं. +१११११११
तसचं असावं....तरच मजा येइल नाहितर आरोपी आपल्याला कधीच कळला आहे..मुक्ताला काल कळला आणि तिने २ दिवसात त्याचा काटा काढला असं सगळं सोपं होईल..रुद्रम चं आत्तापर्यंच चं रेकॉर्ड बघता ईतकं साधं सोपं सरळ नसणार सगळं...

हो ना, सरपोतदार ला जर भिती नाहीये कोणाची तर तो का भेटायला येतो रा ला ? परदेशीचा माणूस किती उघड उघड पाठलाग करतो, रा च्या डोक्यात प्रकाश अचानक पडला काल, टप्प्या टप्प्याने दाखवता आलं असतं जसं शोभाच्या टिप बद्दल तिला आधी एकदा आठवणे.

किरण करमरकरला पहाताना कित्ती आमिर खानचा भास होतो नेहेमीच !
म्हणजे नक्की काय ते सांगता येत नाही, दिसायला असा नाही पण फेस कट्स, त्याची बॉडी लँग्वेज आणि ओव्हरॉल त्याचं अ‍ॅक्टींग पहाताना कायम आमिर खान आठवतो !
जेंव्हा आमिर १९४७ द अर्थ, गझनी असे निगेटिव / ग्रे शेड आसलेले रोल्स करतो तेंव्हा त्याची आणि किरण करमरकरची स्टाइल फार सेम आहे !

दिपान्जली वरच्या पोस्टशी सहमत. अगदी तंतोतंत चेहराच जुळला पाहिजे असे नाही पण काही काही चेहर्‍यावरचे भाव मला पण सेम वाटतात.

काल सरपोतदारच्या खुनात अनेक न पटणार्या गोष्टी होत्या. कोणतं farmhouse तीन मजली असतं? >> सरपोतदार ज्या वेगाने पैसे खात होता या गँग कडून त्यात ३ काय ६ मजली पण फार्म हाऊस बांधूच शकला असता, नालायक कुठला Angry
Senior Police Officer एकटाच असणं शक्यच नाही. >> फार्म हाऊस वर आराम करायला गेला होता तो, आणि या काळे धंदे करणार्‍यांना सामिल होता त्यामुळे त्याच्या जीवाला कुठे धोका होता? एकटाच जाणार की...
इकडे रागिणीने खेळलेली खेळी त्याला कुठे ठावूक होती, म्हणून बिचारा जान से हाथ धो बैठा Proud

रा चा फोन आल्याबरोबर तो दहा मिनिटात civil कपड्यात तिला भेटायला येतो. फोनवर बोलताना त्याने uniform घातलेला असतो... असो! >> हे मात्रं अगदी बरोब्बर आहे. १० मिनिटात येतो म्हणतो आणि कपडे बदलून जातो...
पण इतक्या चांगल्या सिरियलला थोडा ढिला हात देऊ या.

ती जानी नै का दिड वर्ष प्रेग्नंट होती म्हशीसारखी? त्याच्यापेक्षा हे बरंच Lol

रा चा फोन आल्याबरोबर तो दहा मिनिटात civil कपड्यात तिला भेटायला येतो. फोनवर बोलताना त्याने uniform घातलेला असतो... >> हां , हे काल लक्शात आलेलं .
की क मारणार नाही रा ला, तिच्या घरात स्थानबद्ध करून ठेवेल. पण रा ने सगळं रेकॉर्डिंग मंदार किंवा सुहास ला देऊन ठेवलं असेल. कोणीतरी पोलीस चांगले असतीलच ना जे की क चा माग काढत येतील. >>> मग जरा जास्तच फिल्मी होईल .
रच्याकने , डाव्याची माणसं कुठे गेली ? त्यानी नाद सोडला का रा चा?

जरं सगळं दिसत तितक सरळसोपं नसेल तर मजा येईल .
नाहीतर बरेचसे अंदाज लोकांनी बांधलेच आहेत .

मुक्ता सरळ जाऊन कि क ला विचारते की शोभा माकनला टीप तुम्हीच दिली होतीत ना, >>> हायला भारीच !!
हो ते सरपोतदार चं मला ही जाणवलं ;पोलीस स्टेशन मधून आल्या आल्या प्यायला बसला म्हणून युनिफॉर्म मध्ये असणार आणि व्यवस्थित दारू प्यायलेली असल्याने चपळाई करून विरोध करू शकला नाही सं.पा ला !
शोभा माकन आणि परदेशी आणि जगताप यांचं काय होणार याचीही उत्सुकता आहे मला . पण मला वाटतंय आता त्याबद्दल काही नाही दाखवणार.

थोडस अवांतर, अभय सातव च्या बायकोला जर अशा तर्हेने मिळालेला पॆसा नको होता तर तो का या सगळ्यात गुंतला असेल ?
मला अचूक शब्दात मांडता येत नाहीय पण मला असं म्हणायचं आहे कि तो तिला ओळखूच शकला नाही

मला अचूक शब्दात मांडता येत नाहीय पण मला असं म्हणायचं आहे कि तो तिला ओळखूच शकला नाही >> असेच काहिसे. आणी त्याचा स्वभाव असणार पैशाच्या मागे धावणारा

मला वाटत होते संदिप पाठक सरपोतदारांना मारणार नाहि आणी काहितरी वेगळा गेम करेल. पण त्याने मारले शेवटी . तरी पण संदिप काहितरी ट्विस्ट आणेल असे वाटते. तसेच मोहन आगाशेलाहि काहितरी योग्य क्लोजिंग हवे.

मला वाटत होते संदिप पाठक त्याला मारणार नाहि आणी काहितरी वेगळा गेम करेल.. +१ मलाही असेच वाटत होते.

आता ते मुक्ता कि क स्वप्न वगैरे दाखवू नका मात्र सिरीयलवाल्यानो, ही रुद्रम आहे. त्यामुळे तसं काही दाखवणार नाहीत असंही वाटतंय.

मला अचूक शब्दात मांडता येत नाहीय पण मला असं म्हणायचं आहे कि तो तिला ओळखूच शकला नाही >> असेच काहिसे. आणी त्याचा स्वभाव असणार पैशाच्या मागे धावणारा>>हम्म सहमत
संदीप पाठक शेवटी काहीतरी मदत करणार रागिणीला

संदीप पाठक शेवटी काहीतरी मदत करणार रागिणीला >>> नक्कीच त्यासाठीच आला असणार तो. तिला मारायला सांगेल किरण पण हा नाही मारणार, कि क लाच मारेल पण कि क ला मारण्याचा अधिकार फक्त रागिणीला आहे आणि मरण सॉलिड द्यायला हवंय.

मागच्या पानावर कुणीतरी विचारलं की डावाची माणसं त्या बाईला का शोधु शकत नाही.. अरे अशी बाईच नाहीये ना... रागिणीचं वेषांतर माहित नाही त्यांना..!
असो. त्या माणसांचं काय दाखवतात ते बघायची उत्सुकता आहे..
शेवटचे तीन भाग उरलेत.. उत्सुकता शिगेला पोहोचली आहे..
पण त्याचबरोबर मालिका संपणार म्हणून खूप वाईट वाटतंय..
अशी मालिका पुन्हा कधी...??

शेवटचे तीन भाग उरलेत.. उत्सुकता शिगेला पोहोचली आहे..+१११
पण त्याचबरोबर मालिका संपणार म्हणून खूप वाईट वाटतंय.. >> हो ना.... Sad

एक गोष्ट कुणाला अविश्वसनीय वाटली नाही का ?! संदीप पाठक कि क च्या घरात घुसून त्याच्यावरच बंदूक रोखतो आणि मग इमोशनल ड्रामा करतो. तो सटक आहे आणि डेंजरसली हुशार आहे हे चांगलंच सिद्ध होतंय. असा निखारा स्वतःच्या पदरी कोण बाळगेल ! उद्या खरंच कि क ला उडवलं म्हणजे ( म्हणजे असा विचार कि कच्या जागी असलेला कुणीही करेल ना ) तो साधं प्यादं आहे पटावरचं. त्याचा पत्ता ताबडतोब कट केला असता खरं तर. केवळ शेवटी काहीतरी ट्विस्ट आणायचा म्हणून कथानकात ठेवलाय त्याला.

अजुन 2 दिवस काय दाखवणार ? आता की क आणि परदेशी उरलेत.

मला डॉ आणि सुहास च काय झालं बघायला आवडेल.

Pages

Back to top