रुद्रम -झी युवा मालिका - २

Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45

पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू Happy
रुद्रम भाग -१ इथे बघा Happy
https://www.maayboli.com/node/63408?page=63

Group content visibility: 
Use group defaults

वंदना : गंमतच आहे,
रा. : काय
वंदना : हे सगळं, गंमतच आहे सगळी"
हे बोलून वंदना झोपते
या एका वंदना गुप्तेच्या संवादाने सर्व समाजाचे एक भयानक रूप दाखवले आहे , ज्या ला कशाची काही पडली नाही

@निधी- विद्याताईंचा रांधा वाढा धागा नुकताच वाचनात आला होता आणि ईथेही एक बाई पूरूषाचा खून करते हे त्याच्या साथीदारांना पचत नाही हे बघितल्यावर त्या धाग्याची आठवण आली, बाकी काही नाही. तुमच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा करा.
एटीएसला कोणीही फोन करू शकतं का. परदेशीकडे तो नंबर कसा येतो. त्याआधी रा कुठे फोन करते आणि कट का करते मग. तो वकिल मारला गेला त्याची बातमी अजून आलीच नाही किंवा दाखवली नाही. बाॅॅम्ब ठेवल्याची अफवा पसरवणारे फोन लोक मजा म्हणून करतात एवढंच वाचलंय. पुढे रा काय करणार याची ऊत्सुकता.

कि क चा एक वाईट बिझनेस त्याच्याच channel वरून उघडकीला आणणे जबरदस्त एकदम. अर्थात सुरुवातीला पण तसंच तर सेम. तरी रागिणीला भाव कसा देतोय तो, अर्थात त्यानेच तिला प्रोत्साहन दिलं तेव्हाही त्याने आ बैल मुझे मार असंच केलं. पण त्याचा काही डाव असेल की, प्रेमात खरंच पडलाय.

मोरेला फोन करायला हवाय तिने पहिला आता. मोरेने msg तरी टाकायचा ना एक, धुरत हत्ये संदर्भात महत्वाचं काही सांगायचं आहे जगतापना. मेसेज नावाचा प्रकार असतो, त्याचा योग्य ठिकाणी वापर करा.

ATS वाले एका अनोळखी फोन वर विश्वास ठेवून, लगेच कसे काय येतात? >>> ATS वाले खरंच करतात entertain असे कॉल्स.. आणि रागिणी तर खूप दिवसंपासून संशयास्पद हालचाली सुरु आहेत असं सांगते

आणि ती कंट्रोल रूम ला फोन करुन लगेच कट का करते, इ नीट कळलं नाही मला>>> आधी ती पोलिसांना कळवणार असते वाटतं.. पण पोलीस खातं गुन्हेगारांच्या खिशात आहे ते लक्षात येऊन ती डायरेक्ट ATS ला कळवते.. परदेशी च्या बोलण्यात संदर्भ आला तसा

ड्रग वाहून न्यायला दत्तक मुलं का वापरतात ?ते खूप easy आहे का ? means त्यांनी दत्तक मुलांना पळवले आहे का ?(आणि कदाचित याच कारणासाठी मुग्धा गोडबोले च्या मुलाला पळवण्याचा प्रयत्न झाला असेल का ?)
कारण काल असे दाखवले कि मुलाचे आई बाबा (बहुदा हे खोटे असावेत .. काय माहिती ) मुलाला घेऊन त्या नोटरी ofc/ टपरी ला येतात आणि मुलाला सोडून जातात . सो कदाचित पालकांना पैसे देऊन असे करून घेतले असेल का ? >>>>>

दत्तक न देता त्या मुलांचा वापर या धंद्यासाठी केला जात आहे हेच तर आशीष ने शोधले आहे. म्हणुनच माखीजा आचच्या भागात म्हणतो कि मोठा सेटबैक आहे.

बाकि मालिकेत काहि कच्चे दुवे आहेत हे मान्यच आहे पण ते सर्वच ठिकाणी असतात. अगदी शेरलोक होम्स च्या कथेमध्येहि होते. त्यामुळे काहि गोष्टी सोडुन द्यायला हरकत नसावी असा माझा मुद्दा होता. नाहितर बाकि मालिका आहेतच

जबर्दस्त होता कालचा भाग.. रागिणीने भारी डोकं चालवलं काल..
माखिजा खरच प्रेमात पडला रागिणीच्या असं वाटतं.. सहन करायचं.. असं बोलल्यानंतर हलकीशी स्माईल येते त्याच्या चेहर्यावर.. आणि लगेच पटकन भाव बदलतात..वेतागलेले एक्स्प्रेशन..!

माखिजा सनकी आहे, त्याला त्याच्यासारखी कॉम्प्लेक्स माणसे आवडतात. बऱ्याच वर्षांनी कोणी भेटले असणार त्याला त्याच्यासारखे. बाकी सगळे किरण व परदेशीसारखे. परदेशी पास्ता खायला म्हणून डिश घेऊन पूढे होतो तेव्हा किती हसतो तो, त्याचवेळी थोडा निराश/खट्टूही वाटतो. बहुतेक, त्याच्या वेव्हलेंथच्या जवळपास येणारा माणूस त्याला सापडत नाही म्हणून निराशा असावी.

रागिणीत त्याला तेच सनकीपण दिसतेय म्हणून तो त्रास होऊनही सहन करतोय. आणि स्वतःवर विश्वास आहेच त्याला. एकतर आपल्या पर्यंत पोचायचे रस्ते पूर्ण ब्लॉक आहेत याची खात्री आणि दुसरे जे अजून दाखवले नाहीय तरी त्याला वाटतेय की रागिणी तिथवर पोचली तरी तो सांभाळेल बरोबर. रागीणीला त्याचे खरे रूप माहीत नाही तसाच त्यालाही रागिणीचा क्षोभ माहीत नाही. दोघे समोरासमोर येतील तेव्हा खरेच पाहण्यासारखे असेल.

जरी आशिष ने ही बातमी प्लॅन प्रमाणे किर्तिकरांना सांगितली असती तरी चॅनेल कि क चा आहे त्यामुळे उघडकीला कितपत आली असती कोण जाणे. आत्ता रा ने छान हँडल केलं.

ह्यांचे जीव नको तिथे बरे गुंततात. अरे विषय काय, चाललंय काय? आणि ह्या परिस्थित एवढ्या उलाढाली करणार्या त्या बाईमधे जीव कसा गुंतु शकतो? ते ही मोठ्या लेवलवरच्या डॉन टाइप गुन्हेगाराचा. ज्याला दयामाया प्रेम बीम काही नाही.
छ्या! हिंदी शिणुमाचा इफेक्ट.

त्याच्यासाठी ही परिस्थिती रोजची आहे, धंदा आज उघडून बसला नाहीये ना तो!! आणि त्या उलाढाल्या बघून तर तिच्यात जीव गुंतला Happy Happy

Happy
पण आता हिचाही जीव त्याच्यात गुंतलेला नको ब्वा दाखवायला. नैतर हाच तो स्क्रिप्ट रायटर असं समजल्यावर आश्चर्य, दु:ख, पश्चाताप वैगेरे बरोबर हतबल झाल्याचा, फसवले गेल्याचा आणि आपल्या ध्येयापासुन ढळल्याचा जास्तीचा अभिनय करावा लागेल मुक्ताला. Wink Happy

शेवटचे ६ भाग -

अजून न सुटलेले कोडी -
- डॉ. चा सहभाग
- सं पा पुढे काय करेल ?
- शोभा माकन अजून पकडली गेली नाहीये.
- जगताप कडून परदेशी \ सरपोतदार बद्दल माहीती
- समन्वय चेतना मधले गद्दार - हे आज उघड होईल बहुतेक.
- अजून काही राहीलं का ?

अजून काही राहीलं का ? >>
संदीप डावा च्या माणसांचं काय ?..ते रा च्या मागे लागलेत त्यांना रा कसं चकवणार

आधी ती पोलिसांना कळवणार असते वाटतं.. पण पोलीस खातं गुन्हेगारांच्या खिशात आहे ते लक्षात येऊन ती डायरेक्ट ATS ला कळवते.. परदेशी च्या बोलण्यात संदर्भ आला तसा >> नाही पहिल्यांदा ती ज्या फोन वरून फोन करते तो फोन बहुधा चंदुदादांच्या ओळखिने घेतलेल्या प्रिअ‍ॅक्टिव्हेटेड् सिम पैकी होता म्हणून तिने कट केला. शिवाय पोलिस कंट्रोल रूम ला जर ड्रग्ज ची माहिती द्यावी तर तीला नक्की खात्री नसते त्यापेक्षा एटिएस ला फोन करून 'संशयास्पद हालचाली' असे बोलले की झाले, जे असेल ते आपोआप बाहेर येइलच. Happy

आणि बहुधा रा चा स्वतःचा फोन जो आहे तो ट्रेस होत नाही म्हणाला परदेशी तिने त्यावरूनच एटिएस ला फोन केला होता.

रा ने चंदूदादाच्या सांगण्यावरुन काही प्रीपेड सिमकार्ड मिळवली होती. फोन केला की लगेच सिमकार्ड निकामी करतेय, ती, म्हणजे ट्रेस करता येणार नाही.

अजून न सुटलेली कोडी तशीच ठेऊन देतील. कथा रागिणीच्या दृष्टिकोनातून आहे, त्यात माकन, मिठाबावकर, संदीप, डॉक्टर हे मुद्दे गौण आहेत. तिचा संसार ज्यांच्यामूळे उध्वस्त झाला त्यांना शिक्षा हे तिचे ध्येय. त्यात समन्वय चेतना, माखिजा वगैरे लोक येतात.

आणि ती धडाधड मारत सुटलेय लोकांना कारण आता तिला जे गमवायचं होतं ते तिने आधीच गमवलं आहे. त्यामुळे जो रस्त्यात येइल, आणि जो कोणी यात सहभागी दिसेल त्याचा कत्ले आम.

कालचा एपिसोड होता चांगला पण आता माखिजाला काही सांगितलं नाही म्हणजे मिळवलं.

सगळीच कोडी कशाला हवीयेत सुटायला. सपोर्टिंग कास्ट म्हणूनही असायला हवीत ना लोकं.

आता माखिजाला काही सांगितलं नाही म्हणजे मिळवलं. >>> ती काळजी आहेच. मखीजा आता कारण काढून भेटणार आणि कौतुक करणार तिचं ह्या न्यूजबद्दल आणि माहीती काढायचा प्रयत्न करणार मग ती आपसूक सांगणार त्याला नेहेमीप्रमाणे.

वंदना गुप्ते चा संशय असं नाही, पण प्रत्येक वेळी रागिणी भेटायला आल्यावर जेव्हा जेव्हा वंदना गुप्तेने टीव्ही लावायला सांगितला आहे तेव्हाच नेमक्या रागिणीला उपयोगी पडतील अश्या बातम्या कश्या काय असतात टीव्हीवर?

वंदना अचानक झोपेतून उठून रागिणीला टीव्ही लाव.. टीव्ही लाव.. टीव्ही लाव असं सांगते आणि टीव्ही लावल्या लावल्या नेमकी चंदू दादांची बातमी चालू असते. सेम विथ अष्टेकर बातमी आणि अजूनही काही वेळा. चंदू दादा बातमीच्या वेळेला तर मला वंदना गुप्तेंकडे काही अमानवीय शक्ती आहे अशी दाट शंका आलेली

बातम्या परत परत दाखवतात आणि मोठी बातमी सगळ्या वाहीन्यांवर सतत दाखवत असतात. पियू तुम्ही म्हणताय तो योगायोग असू शकतो. वंगुची अवस्था दिवसेंदिवस कठिण होत चालली आहे मालिकेत.

बरा होता आजचा भाग, डार्टची कल्पना चांगली, पण मला आधी वाटलं त्याने ती त्या पाळत ठेवणाऱ्या माणसाला मारेल.
राव आणि विवेक कायमचे अपंग होणार तर, चांगला सूड।
मोरे लवकर जागा झाला म्हणायचा!

Pages