रुद्रम -झी युवा मालिका - २

Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45

पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू Happy
रुद्रम भाग -१ इथे बघा Happy
https://www.maayboli.com/node/63408?page=63

Group content visibility: 
Use group defaults

आज कि क \ परदेशी करवी सरपोतदारचा काटा निघेल आणि कि क तिच्यावर लट्टू आहे ह्या गोष्टीचा फायदा घेऊन रा त्याचा शेवट करेल ?

राजवाडे दिग्दर्शक नाहीय हे नशीब. तो आयत्या वेळी माती खातो. >>> दिग्दर्शकाचा रोल फक्त दिग्दर्शनापुरता असतो.बाकी त्याचा स्टोरी मध्ये काहीच संबंध नसतो . तो फक्त पट्कथाकाराने लिहिलेली स्टोरी आणि संवाद लेखकाने लिहिलेले संवाद कलाकारांनां कसे काय समजावून सांगतो आणि त्या त्या प्रसंगांचे एक्प्रेशन्स कलाकारांकडून कशी काय काढून घेतो एवढ्या पुरताच सीमित असतो.

मुख्य कसोटी पटकथाकाराची असते . काही वेळा गोष्ट त्याची स्वतःची असते काही वेळा दुसऱ्यांच्या गोष्टीवरून ( प्लॉट ) तो फक्त पटकथा बांधतो . आणि प्रसंगाचं संवाद लेखन त्याच्याकडून किव्वा तिसऱ्याच कोणा कडून केलं जात . त्याच अँप्रूव्हल चॅनल च्या लोकांकडून होतच होत . कारण स्टोरी कशी पुढे न्यायची हे चॅनल वाले ठरवतात . त्यातून स्टोरी कशी इंट्रेस्टिंट बनवायची याच ज्ञान पण त्यांनाच असत असं समजलं जात ( कारण जाहिरातदारांकडून मिळालेला पैसा ते पुरवत असतात म्हणून ) त्यामुळेच त्यांना ( चॅनल वाल्याना ) जाहिरातदार पण मिळवायचे असतातच . स्टोरी इंटरेस्टिंग असेल तर टीआरपी वाढेल . टीआरपी वाढला तर त्यांना जाहिरातदार मिळणार आणि पर्यायानी जाहिरातीतून पैसा मिळणार . टीआरपी घसरला कि जाहिरातीतून मिळणारा पैसा कमी होणार . मग मालिका पुढे रेटून काय फायदा ? हि सगळी पैशाची गणित चॅनल च्या एम्प्लॉईज ना बघावी लागतात Happy

कसला भारी होता कालचा भाग...
रा ने राव व विवेक ला जाळून मारलच शेवटी...
फायनली रा ला आलाच की क चा संशय....मी हुश्श केलं एकदम ती तिकडुन सटकल्यावर...
की क ने रा ला मुद्दाम हिंट तर दिली नसेल ना स्वतःबद्दल....की क सारखा हुशार माणुस बोलण्यात ईतकी मोठी चूक कशी करेल....
आता रा आज काट्याने काटा काढणार असं दिसतय...
की क च्या वर कोणी बॉस आहे की काय हाँगकाँग मद्धे बसलेला....

की क ने रा ला मुद्दाम हिंट तर दिली नसेल ना स्वतःबद्दल....की क सारखा हुशार माणुस बोलण्यात ईतकी मोठी चूक कशी करेल....>>> नाही ते मुद्दम नक्किच नव्हत, रा किकला सान्गुन गेली होती की मी परत भेटणार नाही अस असताना ती सरप्राइज म्हणुन आली त्याने किक एक्साइटेड होता तस जाणवत पण होत. मधेह्च त्याला फोन आला त्याने त्याची एकाग्रता नव्हती काय बोलतोय यात, बॉडि लेग्वेज मधे पण एक अस्थिरता होती.
भात-लवान्डे smiley36.gif( आज रा चा गेटप परत रत्ना पाठकची आठवण करुन देणारा वाटला)

कालचा भाग पाहून एकदम ... "नशीब !!!" झालं>>> अगदी अगदी .. मी म्हंटलं पण , अगं हेच सांगतोय केव्हापासून आम्ही तुला !! Happy
कालचा भाग खरंच मस्स्त !! आता अजून फास्ट होणार सगळं .
कसं काय बोलून गेला कि क कुणास ठाऊक !! हातात ड्रिंक्स चा नुसता ग्लास धरला आणि समोर रा मला काहीतरी सांगायचंय म्हणतेय म्हंटल्याबरोब्बर कि क विसरला सगळं Lol
रा मुद्दाम reaction बघायला बोलली असं मला १ सेकंद वाटलं ..कि, मी जर खून केलाय असं कळलं तर काय वाटेल तुम्हाला वगैरे !

काल घरी पोहोचायला उशिर झाल्याने प्राईम टाईम चा एपिसोड चुकला आणि डोकं अतिशय दुखत असल्याने रिपिट पण न पाहता झोपून गेले. ( इथल्या पोस्ट्स वाचून आपण घोर पाप केलंय असं वाटू लागलंय :फिदी:)
आता हापिसात लॅन केबल काढून टाकून व्होडाफोन चा डोन्गल लावला.. पण मी जिथे बसते तिथे रेन्ज चा जाम इश्यु आहे. आणि मग मोबाईल वर पाहण्याचा प्रयत्न केला तर तोच प्रॉब्लेम माझ्या डेस्कवर ४जी चा स्पीड एकदम गोगल्गाय होतोय. Sad आता आज बस मध्ये पाहणार ओझीवर. प्रवासात व्होडाफोन चे डोन्गल मस्त चालते मानबा चे बरेच एपिसोड मी प्रवासात लॅपटॉप वर पाहते.

रा ने राव व विवेक ला जाळून मारलच शेवटी...>>
हे दाखवलं का? माझी सुरुवात मिसली.. ती माखिजाच्या घरी असते आणि तो वाईन ग्लासेस घेऊन येतो तिथून पाहिलं मी

नाही ;जाळलं हे नाही दाखवलं पण मंदार बातम्या सांगतो कि समन्वय चेतना मध्ये आग लागली आणि त्यात राव आणि त्या विवेक चा दुर्दैवी अंत झाला ;वित्तहानी झाली etc
आता मालिका अजूनच मस्स्त होत चाललीये ..आणि संपणार याच वाईट हि वाटतंय
@दक्षिणा पापाचं प्रायश्चित्त म्हणून २दा बघ आता ..काल जगताप स्टोरी सांगत होता तेव्हा फ्लॅशबॅक मधला काही भाग दाखवला ज्यात धुरत दिसतो थोडावेळ
(आपण सगळेच miss करतोय धुरत ला म्हणून म्हंटले दिवे घ्या Happy )

राजवाडे दिग्दर्शक नाहीय हे नशीब. तो आयत्या वेळी माती खातो >>> मला नाही तसं वाटत. असंभवच्या वेळी मतभेद झाले पल्लवी जोशीबरोबर तर त्याला काढून दुसऱ्याला आणला तर फार लो झाले एपिसोड्स, लोकांनी स रा ला आणायला लावलं मध्ये, मग वेग घेतला. परत मतभेद झाले पल्लवी किंवा channelशी नंतर परत स रा कडून काढून संगीत कुलकर्णीला दिली, त्यांनी मात्र चांगली केली.

हे सर्व त्यावेळी पेपरला आलं होतं.

नाही ते मुद्दम नक्किच नव्हत, रा किकला सान्गुन गेली होती की >>> प्राजक्ता , कळतयं पण वळत नाहीयं Happy
काहितरी खटकलं ईतक नक्की . फार सहजपणे कळलं रा ला असं वाटलं , ज्या पद्धतीने गोष्ट रंगत चाललेली त्यामानाने जरा सपकच वाटलं .

खरच फार सहज पणे कळलं तिला मखिजा बद्दल. Direct तोच सूत्रधार आहे असं एकदम वाटणं ,जरा अतीच. थोडा तिचा पण रिसर्च दाखवायला पाहिजे होता

आता रुद्रम मध्ये गुंतले तसेच असंभवमध्ये गुंतले होते मायबोलीकर. तेव्हा वेगळा धागा न काढता संचायामावर चर्चा करत होतो. तेव्हा शेवटी जाम वैताग आलेला आणि शेवट तर एकदम हास्यास्पद. त्यामुळे नंतर सु रा असला की धास्तीच वाटायला लागलेली.

विवेक व राव .. दुर्दैवी अंत. त्यांनी किती आयुष्ये बरबाद केली असतील देव जाणे.

हुश्श , आले १३ नोव्हें पर्यंत !
बर्याच मैत्रीणींनी सांगितल्यामुळे पहायला घेतली आणि अगदी झपाटून टाकलं सिरियलनी.
खरं तर एकदम प्रेडीक्टेबल , पण सगळ्याच पात्रांचा उत्कृष्ठ अभिनय , कथानकाचा वेग यामुळे प्रत्येक एपिसोड मधे उत्सुकता प्रचंड ताणत गेली !
मुक्ता बर्वे, मोहन आगाशे, वंदना गुप्ते, किरण करमरकर सगळेच दिग्गज , अगदी प्रत्येक छोटं कॅरॅक्टर सुध्दा काय सुरेख अभिनय करून गेलं , they all look real !
पण मुक्ता बर्वे खालोखाल किंवा अगदी तिच्या इतकीच अवडलेली कॅरॅक्टर्स म्हण्जे इस्न्पेक्टर धुरत आणि चन्दुकाका.
धुरतला या आधी कशात पाहिलं नवह्तं पण जणु तो माणुस इन्स्पेक्टर म्हणूनच जन्माला आलाय .. जगताप सुध्दा.
जितकी ही कथा रागिणीची होती, तितकीच काही एपिसोड्स तरी धुरतचीही वाटु लागली होती मला, जामच आवडलं ते कॅरॅक्टर !
चन्दुकाकाच्या रोल मधला सुहास पळशीकर या सिरियलआधी अज्जिबात आवडायचा नाही, त्याची भिकार्यांचा नाना पाटेकर वगैरे टिंगल करायचो आम्ही , पण या सिरियल मधे काय कमालीचा रंगवलाय थंड डोक्याचा शार्प शुटर कम मेकप मन कम मुक्ताचा मेंटॉर !
त्याचं ते थंडं आवाजात बोलणं आणि फक्त नजरेनी खूप काही बोलणं , ती बॉडी लँग्वेज हॅ़ट्स ऑफ !
२३ कि २४ ऑक्टोबरला धुरतचा मर्डर म्हणजे फार फार धक्का.. दुखवटा / निषेध वगैरे व्यक्त करावासा वाटला अगदी.. का बरं मारलं त्याला ?
काही गरज नव्हती, मला वाटलं जगतापला मारून धुरतला अडकवणार , काही नाही तर पाठीला गोळी लागलीये तर हॉस्पिटलमधे तरी जाईल.. पण फारच घाईने आणि अगदीच अनपेक्षितपणे एंड केला राव त्याचा Sad
चन्दुकाका गेल्यावरही फार वाइट वाटलं !
मरण्याआधी थंड डोक्यानी तो पेंटींग मागच्या २ गन्स बाहेर काढून मांडून बसतो आणि सिगारेटचं धुराळं करत शान्त् पणे संदीप डाव्याच्या गँग हल्याची वाट पहात बसतो, कम्माल अ‍ॅक्टींग केली बॉस !
मुक्तानी केलेल्या मर्डर्स पैकी संदीप डाव्याचा खून जबरदस्तं !
एक नॉर्मल आयुष्य जगणारी हाउसवाइफ , फार म्हत्त्वांकांक्षा नसणारी अचानक तिच्या आयुष्यात जी म्हाभयंकर उलथापालथ होते त्यातून आलेलं डिप्रेशन आणि सत्त्य समजल्यावर चवताळून पेटलेली रागिणी ज्या लेव्हलची क्रिमिनल बनत जाते , जबरदस्तं साकारल्या मुक्तानी सगळ्या शेड्स, सगळी ट्रान्झिशन्स !
फ्लॉज बरेच होते सिरियल मधे , जसे मुक्ताचे गेटप्स सुरवातीला काही फार मेकोव्हर केल्यासारखे किंवा न ओळखण्यासारखे अजिबात नवह्ते, तिला कोणी ओळखलं नाही हे काही पटण्यासारखं नाही ! ( बॉयकट वाला आणि खेडवळ बाईचा )
त्यातून संदीप डावा जेंव्हा तिची आयडेंटीटी शोधत असतो त्यावेळी ती ऑलरेडी सेन्सेशनल क्राइम रिपोर्टर म्हणून पब्लिक फिगर बनलेली असते, जो माणूस राजेश मूर्तिला शोधु शकतो तो रागिणीला का नाही ?
असो, त्यावेळी अजुन ती मुरलेली नसते क्रिमिनल म्हणून , असा विचार करून बेनिफिट ऑफ डाउट देउ शकतो :).
त्या नंतर केलेला तिचा कॅथरीनचा आणि इतक्यात केलेला लॉयरचा गेटप मात्रं जमला.
बाकी तो किरण करमरकर पण कसला कनिंग दिसतो , त्याची नजर शिकारीवर झडप घालायच्या तयारीत असलेल्या कोल्ड अ‍ॅनिमल सारखी असते अगदी, त्याचं मेन व्हिलन असणं हे सर्वात प्रेडीक्टेबल होतं सिरियल मधे !
Anyways , कित्ती वर्षांनी इतकी खिळवून ठेवणारी मराठी सिरियल पाहिली , was indeed a treat to watch so far , अता बघु कशी संपवतात ही सिरियल !

मखीजा जाळून मारण्याबद्दल बोलतो ते अगदी सहज, फ्लो मध्ये आलं बोलण्यात आणि त्याने रागिणी सावध झाली हे पण चांगलं दाखवलं.
पण घरी येऊन तिला जितक्या फास्ट या सर्व गोष्टींचा उलगडा/ संशय होताना दाखवलाय ते थोडं विचित्र वाटलं. शोभा माकन टीप वगैरे, जरा पट्कनच झालेलं दिसलं!

आता 3 दिवस असल्याने झटपट चाललंय सर्व. सरपोतदार ला गोळी न मारता दारू पी पी सांगतो पाठक तेव्हा वाटलंच, आता वरून फेकणार.

उलट उशिर लागलाय तिला लिन्क लागायला. माझ्या कौन्सिलर ने एक गोष्ट सांगितली होती मला की पुस्तक अती जवळ किंवा अती लांब धरले तर वाचता येत नाही, ते योग्य अन्तरावरूनच वाचावे लागते. माखिजा खूप जवळ होता रा च्या, तिच्या डोळ्यावर त्याच्या चांगुलपणाचा पडदा होता, त्याने स्वतःच्या हाताने त्याला थोडं भोक पाडलं आणि रा बरोब्बर सावध झाली.
आजचा भाग पण जबरी. खात्री व्हावी म्हणून तिने केलेला खेळ... फारच डोक्याचा होता.
अजून एक काटा निघाला आज.
अजून लोकांनी पाहिला नसेल म्हणून फार चर्चा नाही करत.
पण पुढचा भाग खरोखरी रोमांचक असणार आहे.
रा भिडणार आहे किक ला डायरेक्ट...
नशिब आजचा भाग शुक्रवारी आला नाही.. नाहितर २ दिवस वाट पहावी लागली असती..
उत्सुकता शिगेला का काय म्हणतात तशी अवस्था आहे. Happy

पटकथा, दिग्दर्शन उत्तम आहेच पण मुक्ताच्या जागी इतर कुणी अभिनेत्री "रा" च्या पात्राला इतका न्याय देऊ शकली असती असे वाटत नाही.

Fb वर रुद्रम फॅन्स नावाने एक पेज आहे, तिथेही आपण इथे करतो तशी जोरोसें चर्चा सुरू आहे.
आजचा भाग पाहून पडलेले काही प्रश्न-
सरपोतदार स्वतः पोलीस असून जराही प्रतिकार कसा करत नाही?
त्याच्या फार्म हाऊस वर पोलीस /सुरक्षारक्षक कोणीच कसं नाही ?
सरपोतदार चा गेम करण्याच्या हेतूनेच रागिणीने डबल गेम करत मखीजा ला फोन केला होता ना, मग त्याच्या मृत्यूचे तिला एवढे वाईट का वाटते? की मखीजाने फसवल्याचे दुःख होते ते !
रच्याक... मखीजा खरंच तिच्या प्रेमात आहे वाटतं राव, आज गाडीत असताना तिचा फोन आल्यावर कसली किलर स्माईल होती त्याच्या चेहेऱ्यावर!

कसली किलर स्माईल होती त्याच्या चेहेऱ्यावर! >>> आज काल त्याची स्माईल तशीही किलरच वाटते Blush

हो काल कि क ते जाळून मारण्याचं बोलतो ते अगदी असं वाटलं की आता सिरीअल संपत आलीये तर देऊन टाकु काहीतरी क्लू.. Wink
अजिबात काही सहज निघालं तोंडून असं वाटलं नाही.... रागिणि पण घरी येऊन कॅमेर्यासमोर जे बोलते तेही सहज नाही वाटलं.....

शोभाच्या इथले सीन्स नेहेमी अंगावरच येतात.... त्या मुलींना काही जेवायला देतात का नाही...? ती शोभा वरण भात भरवावा तशी ताटलीतून पावडर भरवत होती....

दोन्ही भाग मस्त होते. दीपांजलीने लिहिलेल्या प्रतिसादामुळे मालिकेच्या छान आठवणी पुन्हा ताज्या झाल्या Happy
हल्ली कोणतीही मालिका पहाणे बंद केले आहे, अगदी इंग्लीशही, कारण भाषा कोणतीही असली तरी ताणतातच, त्यामुळे ही संपणार याची वाईट वाटते आहे.

सरपोतदार चा गेम करण्याच्या हेतूनेच रागिणीने डबल गेम करत मखीजा ला फोन केला होता ना, मग त्याच्या मृत्यूचे तिला एवढे वाईट का वाटते? की मखीजाने फसवल्याचे दुःख होते ते !>>> मखिजाने फसवल्याच्च दु:ख अर्थात! तिच आज कॅमेरासमोर बोलण अतिशय सहज , आणी नॅचरल रिअ‍ॅक्शन अस होत, इतक सगळ झेललय रा ने खरच हे प्रकरण सपल्यावर तिला जो आफ्टर इफेक्ट येइल त्याने ती जगु शकणार नाही
आजची खेळी सगळ्यात भारी!
डिजे ! वेल्क्म टु रुद्रम पेज देर आये दुरुस्त आये ! धुरतच्या आणी चन्दुकाकाच्या म्रुत्युनतर या धाग्यावर इतका चुकचुकाट होता कि विचारु नको, रुद्रम फॅन साठी सगळ्यात वाईट एपिसोड , लय बेक्कार वाटलेले त्यादिवशी सगळ्याना!
रा इतकाच हा तपास धुरतचा ही होता त्यामुळे शेवटापर्यात तो हवाच होता अस अजुनही वाटत.

आता रुद्रम मध्ये गुंतले तसेच असंभवमध्ये गुंतले होते मायबोलीकर. तेव्हा वेगळा धागा न काढता संचायामावर चर्चा करत होतो. तेव्हा शेवटी जाम वैताग आलेला आणि शेवट तर एकदम हास्यास्पद. त्यामुळे नंतर सु रा असला की धास्तीच वाटायला लागलेली. >>> अरे असं आहे काय, तेव्हा मी मायबोलीवर नव्हते ना. मस्त झाली असेल चर्चा.

पटकथा, दिग्दर्शन उत्तम आहेच पण मुक्ताच्या जागी इतर कुणी अभिनेत्री "रा" च्या पात्राला इतका न्याय देऊ शकली असती असे वाटत नाही. >>> अगदी अगदी. जगली ती अक्षरशः ती भुमिका.

बाकी सर्वच पात्रनिवड जबरदस्तच. असा मणिकांचन योग प्रेक्षकांच्या नशिबात क्वचित असतो रुद्रमसारखा.

सरपोतदार मात्र मला फारसा अपिल झाला नाही अभिनयात.

Pages