रुद्रम -झी युवा मालिका - २

Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45

पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू Happy
रुद्रम भाग -१ इथे बघा Happy
https://www.maayboli.com/node/63408?page=63

Group content visibility: 
Use group defaults

पूनमशी सहमत. शेवट्चे दोन तीन भाग उरकून टाकल्यासारखे वाटले. ते आबा हस्तगत करण्यासाठी घालवलेले एपिसोड्स कारणीभूत असावेत याला.

काल मालिका संपल्यावर घाईघाईने करणार हे गृहीत धरलं मी, अर्थात दोन भाग हवे होते मात्र पण आयडिया काय करते एकंदरीत ते बघणे आणि तिचे डायलॉग आणि तीचा आणि किरण क चा अभिनय जबरी एकदम, मेजवानी होती अगदी वेगळ्या अर्थाने. वंदना गुप्ते पण जबरदस्त.

मधले ते आबा भाग खरेच बोअर आणि लांबले होते. पहिल्या पाच मिनिटांचे काम करायला रा ने दोन एपिसोड्स घेतले. मुडेसर हासरे दिसतायेत. नवीन असून छान डायरेक्शन होतं. काही त्रुटी होत्याच पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून सिरीयल enjoy केली.

शेवटी एक तरी भाग हवा होता. सातवची बायको, मोहन आगाशे, कि क चे नेटवर्क ताब्यात घेउन पैसे कोठेतरी चांगल्या ठिकाणी दान करते, वगैरे दाखवता आले असते. असो. चांगली मालिका सपली. आता ९.३० वाजता काहितरी शोधायचे आणी आनंद मानुन घ्यायचा नवीन काहितरी चांगले येइपर्यत.

तिने प्रेस बोलावलीय. आईशी शेवटचे बोलून ती प्रेसला सगळे सांगणार. तिने इतके खून केलेत की पोलिसांना लक्ष घालणे भाग पडणार.

ती उत्तम वकील देऊन शिक्षा कमी करून घेऊ शकते. पण काहीतरी शिक्षा होणार हे निश्चित. तिलाही नक्की काय होणार हे माहीत नाही, असे ती आईला सांगते.

किरण करमरकरने कालही खूप चांगला अभिनय केला. रागिणी मी तुझ्याबरोबर काम करणे शकय नाही हे संगेपर्यंत त्याचे डोळे तिच्यावर खिळलेले असतात, प्रेमाने पाहात. नंतर तेच डोळे निर्विकार व थंड होतात.

रुद्रम क्विझ ** #Just_for_fun
प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत म्हणा, पण ते सर्व अगदीच क्लोज असल्याने मला जरा शंकाच वाटतेय की कितीजणांना हे अचूक सोडवायला जमेल. बघा तरी.. घ्या रागिणीचं नाव आणि पहा प्रयत्न करून, काय आता... जय रुद्रम!!!

(1) आशिष देसाई काम करत असलेल्या एनजीओचे नाव काय?
१. समन्वय चेतना
२. सुसंवाद साध ना
३. स्मशानात पेट ना
४. सुसाइड कर ना

(2) फर्स्ट न्यूजचे मयत न्यूज एडिटर कोण?
१. कीर्तिकर
२. रुईयाकर
३. डहाणूकरकर
४. रुपारेलकर

(3) रागिणीने वकिलाचे रूप घेतले त्या व्यक्तिरेखेचे नाव सांगा.
१. नारळीभातवाढे
२. जिराभातसांडे
३. भातलवंडे
४. मसालेभातसांभाळे

(4) संदीप डावाचा फेमस तकिया कलाम काय?
१. काय पेन्शन नाय
२. टाय आवळत नाय
३. पाय बुटात नाय
४. काय टेन्शन नाय

(5) फर्स्ट न्यूजचे स्लोगन काय?
१. नेहमीच खराब बातमी
२. नेहमीच खरी बातमी
३. कधी कधी बऱ्यापैकी खरी बातमी
४. कधी जाहिरात कधी बातमी

(6) रागिणी देसाईंकडे काम करणाऱ्या कामवालीचे नाव काय?
१. घड्याळाबाई
२. धनुष्यबाणाबाई
३. कमळाबाई
४. हाताबाई

(7) मनी लॉन्डरिंग करणाऱ्या सौरभ ढोलकीयाचे काळ्या धंद्यातले नाव काय?
१. वीट पाव कर
२. मीठ बाव कर
३. गोळा गाव कर
४. नीट डाव कर

(8) शोभा माकनला तिच्या व्यवसायात लागणारी पावडर कोणती?
१. बोरिक पावडर
२. मुंग्यांना मारायची डीडीटी पावडर
३. मुलींना गुंगीत ठेवणारी पावडर
४. पॉन्डस पावडर

(9) माखिजा रागिणीला नेकलेस ऑफर करतो, तेव्हा ती तो नाकारते. याचे कारण?
१. तिच्या तीक्ष्ण पारखी नजरेला दिसते की तो नेकलेस खोटा आहे, आणि तिला खोट्याची प्रचंड चीड असते
२. नेकलेस पाहताच तिला अशी शंका येते की तो सेकंडहँड आहे, आणि सतत नवनवीन गेटअप करणाऱ्या रागिणीला नाविन्याची मुळातच इतकी आवड की तिला नेकलेसही नवीनच हवा असतो
३. तिला हे जाणवते की ही काही टिपिकल सासू सून सिरीयल नाही आपण दागिने फिगिने घालून मिरवायला
४. तिचा सेल्फ रिस्पेकट आणि तिची तत्त्वे

(10) जगतापने रघूला गोळी घातली, याचे कारण?
१. तू मारल्यासारखं कर मी मेल्यासारखं करतो हा गेम ते खेळत असतात आणि मध्येच त्यात चुकून खरेच सिरीयस होतात म्हणून
२. चांदण्या रात्री मढ़ आयलँडला पाठीत गोळी लागून आपल्याला इच्छामरण यावे अशी इच्छा रघूने जगतापकडे व्यक्त केलेली असते म्हणून
३. जीवाचे अभय देऊनही (सातव नव्हे) रघू पळून जातो म्हणून
४. जगतापना एमटीव्हीवरचा रोडीज हा शो अजिबात आवडत नसतो, म्हणून दिसला रघू घाल गोळी ही त्याची पॉलिसी असते
(लेखक -पराग पुजारी . पराग पुजारी यांची परवानगी घेऊन कॉपी -पेस्ट )

हॅकिंग करायचे प्लॅन व नंतरचा 4 ओळीचा कोड लिहायला सुहासला किती वेळ लागला, स्फोटाकासकट गाडी ठरवायला रागिणीला किती वेळ लागला वगैरे प्रश्न >>> ही डिटेल्स दाखवली नाहीत त्यामुळे शेवटपर्यंत ती त्याला नेमकं कसं मारणार याचा सस्पेन्स राहिला. तो इम्पॅक्ट येण्याकरता हे आवश्यक होतं असं मला वाटतं.

@rmd. सहमत.. म्हणूनच माझ्या पोस्ट मध्ये म्हटलं..मला आवडला शेवटचा भाग. आवश्यक तेवढेच डिटेल्स...! परिणाम कारक शेवट.!

@rmd. सहमत.. म्हणूनच माझ्या पोस्ट मध्ये म्हटलं..मला आवडला शेवटचा भाग. आवश्यक तेवढेच डिटेल्स...! परिणाम कारक शेवट.! - १००% सहमत.
अगदी परिणामकारक आणि चपखल शेवट!
Btw आजचा making चा भाग पण छान होता, पण किक, सतीश राजवाडे आणि सुहास पळशीकर यांचा पण interview दाखवायला हवा होता!

मला नाही आवडला शेवटचा एपिसोड>>>>>>>>>>>>> अरे मी फेबु वर वाचले की शुक्रवारी शेवटचा एपिसोड आहे. जाणकारांनी प्लीज प्रकाश टाका....

सुलू, पहिल्यापासून जे जबराकू एपिसोडस बघितले त्या मानाने सिम्पल शेवट तेवढा नाही आवडला..स्पीड चांगला होता पण कन्टेन्ट वाइस जरा आवरत घेतलं..काहीतरी जबरदस्त ट्विस्ट हवा होता..काही अनपेक्षित घडलंच नाही..
किरण करमरकर च्या वर पण थोडं हायर ऑथीरीटीची लोक दाखवयायला हवं होती..त्याचा एन्ड पण मला ड्रमॅटीकच वाटला.. पण अर्थातच बाकीच्या मालिकेपेक्षा ही केव्हाही उजवीच आहे...लिमिटेड एपिसोडस, वेगाने पुढे जाणार कथानक आणि थ्रिलर यासाठी पूर्ण मार्क रुद्रमला..आणि किक डिअर, आय विल डेफिनिटली मिस यू Blush

आज मेकिंग ऑफ रुद्रम छान दाखवलं, पण कि क पण हवा होता. तो नव्हता. बाकी पण बरेच नव्हते पण कि क नव्हता ते जास्त जाणवलं.

आज मेकिंग ऑफ रुद्रम छान दाखवलं, पण कि क पण हवा होता. तो नव्हता. बाकी पण बरेच नव्हते पण कि क नव्हता ते जास्त जाणवलं.- yes, will miss you कि.क

इथे लिहित नसले तरी वाचत होते. शेवटाबद्दल मात्र अगदी लिहावं वाटलं.
मला आवडला रुद्रमचा शेवट. ज्या पद्धतीने संपूर्ण सिरिज जात होती, तिचा शेवट असाच होणं मलातरी आवडलं. आणि सगळ्या अत्यावश्यक गोष्टींचा योग्य तो शेवट, उलगडा, पूर्ण विराम,... सगळच पटलं मला. इव्हन शेवट न्युज वगैरे दाखवताना दाखवली नाही तेही आवडलं. एकदम सटल एंड! आय लव्ह मुक्ता Happy जगातल्या कितीही मोठ्या अडचणी समोर, शत्रू समोर एक सामान्य व्यक्तीने ठरवलं तर नाही मान झुकवत, हे खूप सुरेख मांडलं. माखिजा सारखी माणसं असतात जगात, प्रचंड ताकद, पैसा, सत्ता असणारी... गॉडफादर चित्रपट आठवला , जगातली अगदी भारतातलीही काही लोकं बघितली की लक्षात येतं , असतात अशी माणसं.अर्थात हेही एक प्रतिकच. मुळात जगातला, जीवनातला अशक्य वाटणारा शत्रु, त्यालाही तोंड देता येतं. हे फार छान दाखवलं. ही सकारात्मकता, ताकद देणारी सकारात्मकता भावलीच! मुळात हा रागिणीच्या उद्वस्त झालेल्या आयुष्याचा होम! त्याचमुळे स्वत:चा जीव ओवाळून टाकायला, उधळून द्यायला तयार असलेली रागिणी फार समर्पकपणे आली समोर. सस्पेन्स अन थ्रिलर करण्याच्या नादाला न लागतो एखादी रागिणीसारखी सामान्य व्यक्ती जशी वागेल सेम तसाच शेवट केला हे मला आवडलच. हो, काही गोष्टी खटकण्यासारख्या होत्या पण हे खटकणं व्यक्तिसापेक्ष म्हणून सोडून देता येण्याजोगं. रायटर्स लिबर्टी, दिग्दर्शकाचा दृष्टिकोन म्हणून सहज मान्य व्हावा. एकुणातच, एक फार छान कलाकृती! मराठीत इतकी आव्हानात्मक आणि तरीही बॅलन्स्ड, तारतम्य पाळणारी, शेवटपर्यंत सनसनाटीचा मोह टाळलेली, उगाच भव्यदिव्य न करता मूळ कथेशी प्रामाणिक राहिलेली मालिका म्हणून नक्की बराच काळ मनात राहील. पुन्हा बघायलाही नक्की आवडेल. शेवट अपेक्षित असला तरी त्याचं टेकिंग अतिशय समंजस, प्रगल्भ होतं, आणि म्हणूनच आवडला शेवटही!

लेखक, दिग्दर्शक, कलावंत सगळेच, मुक्ता बर्वे, किरण करमरकर प्रामुख्याने, संगीत, एडिटिंग, कास्टिंग, कॅमेरा( उगा ढँग ढँग ढँग न करणारा), संकलन, मेकअप, कॉश्च्युमस, सगळ्यांनीच एक स्टेटस ठेवलं पूर्ण वेळ. कधीही फोकस हलला नाही. ( आबा हे अतिशय महत्वाचे प्रकरण होते, रागिणीच्या दृष्टीने. कारण ज्या घटनेने तिचे सारे आयुष्यच पालटून गेले त्याचे धागेदोरे त्यातच अडकलेले. सो मला योग्य वाटलं तिचं आबासाठी पराकाष्ठा करणं)
एकुणातच संपूर्ण रुद्रम टीम, हॅट्स ऑफ ____/\____

एक फार छान कलाकृती! मराठीत इतकी आव्हानात्मक आणि तरीही बॅलन्स्ड, तारतम्य पाळणारी, शेवटपर्यंत सनसनाटीचा मोह टाळलेली, उगाच भव्यदिव्य न करता मूळ कथेशी प्रामाणिक राहिलेली मालिका म्हणून नक्की बराच काळ मनात राहील. >>> अगदी अगदी!
मी परत बघणार पहिल्यापासुन

अवल, मीनाक्षी यांनी म्हटल्याप्रमाणे खरच अव्वल आहे पोस्ट आहे तुमची...
>>>बॅलन्स्ड, तारतम्य पाळणारी, शेवटपर्यंत सनसनाटीचा मोह टाळलेली, उगाच भव्यदिव्य न करता मूळ कथेशी प्रामाणिक >>
>>सगळ्यांनीच एक स्टेटस ठेवलं पूर्ण वेळ>>... ++++++111

अवलताई छान लिहिलंस गं. आबाचा मुद्दा थोडा रेंगाळलाच माझ्यामते पण तुझी पोस्ट फार सुंदर आहे.

rmd ने पण impact चा मुद्दा चांगला मांडलाय.

अरे मी फेबु वर वाचले की शुक्रवारी शेवटचा एपिसोड आहे. जाणकारांनी प्लीज प्रकाश टाका.... >>> गुरुवारी संपली सिरीयल.

हम्म्म.....

तसं असेल तर मी फारच आशावादी राहिले की उद्या अजून एकदा रुद्रम बघायला मिळेल.... Happy फारच चटका लावणारा शेवट....

जेव्हा मुक्ता वंगुला म्हणते मी उद्यापासून येणार नाही , आजची आपली शेवटची भेट फारच गलबलायला झालं.... टडोपा मोमेंट... Sad

बाकी काय बोलायचं.... खूप मिस करणार आहे मी पण ..... रोज त्या वेळेला सिरीअल बघायची इतकी सवय झाली होती..... अगदी व्यसनाधीन !

साधेपणा खुप भावला या मालिकेतला..... इन जनरल मेकप, भरजरी साड्या, शब्दबंबाळ डायलॉग्स इत्यादि चकचकाट नसल्याने खुप छान वाटली....

साधेपणा खुप भावला या मालिकेतला..... इन जनरल मेकप, भरजरी साड्या, शब्दबंबाळ डायलॉग्स इत्यादि चकचकाट नसल्याने खुप छान वाटली....>>> अगदी अगदी.

पूर्ण पोस्ट छान अंजली.

अवल..छान पोस्ट.
मेकिंग ऑफ रूद्रम. पण छान होता भाग.
ते म्हणालेत. लवकरच नवीन वर्‍हाडी कथा घेऊन येत आहेत..
होप सो ती पण रूद्रम इतकीच दर्जेदार असेल.!

(1) आशिष देसाई काम करत असलेल्या एनजीओचे नाव काय?
१. समन्वय चेतना

(2) फर्स्ट न्यूजचे मयत न्यूज एडिटर कोण?
१. कीर्तिकर

(3) रागिणीने वकिलाचे रूप घेतले त्या व्यक्तिरेखेचे नाव सांगा.
३. भातलवंडे

(4) संदीप डावाचा फेमस तकिया कलाम काय?
४. काय टेन्शन नाय

(5) फर्स्ट न्यूजचे स्लोगन काय?
२. नेहमीच खरी बातमी

(6) रागिणी देसाईंकडे काम करणाऱ्या कामवालीचे नाव काय?
३. कमळाबाई

(7) मनी लॉन्डरिंग करणाऱ्या सौरभ ढोलकीयाचे काळ्या धंद्यातले नाव काय?
२. मीठ बाव कर

(8) शोभा माकनला तिच्या व्यवसायात लागणारी पावडर कोणती?
३. मुलींना गुंगीत ठेवणारी पावडर

(9) माखिजा रागिणीला नेकलेस ऑफर करतो, तेव्हा ती तो नाकारते. याचे कारण?
४. तिचा सेल्फ रिस्पेकट आणि तिची तत्त्वे

(10) जगतापने रघूला गोळी घातली, याचे कारण?
३. जीवाचे अभय देऊनही (सातव नव्हे) रघू पळून जातो म्हणून.

घ्या. मी दिली बरोब्बर उत्तरे. Happy
पण ऑप्शन लय भारी Biggrin

Pages