रुद्रम -झी युवा मालिका - २

Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45

पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू Happy
रुद्रम भाग -१ इथे बघा Happy
https://www.maayboli.com/node/63408?page=63

Group content visibility: 
Use group defaults

तिकडे फेसबुकच्या रुद्रम फॅन्सग्रुप वर " मेकिंग ऑफ रुद्रम "मध्ये या फेसबुक ग्रुप चा उल्लेख सिरीयल च्या लोकांनी केला नाही म्हणून नाराजीच्या बऱ्याच पोस्टी आल्यात म्हणे . आहे कि नाही मज्जा . तरी त्या ग्रुप मध्ये जास्तीत जास्त कलाकारांनी ग्रुप मध्ये ऍड होऊन सगळ्या फॅन्स चे आभार मानले. तरीही ? मग आपण माबोकर बरे . कोणीही आपली दखल घेवो न घेवो आपण जिथे कौतुक करायच तिथे भरभरून करतो परतफेडीची अपेक्षा न ठेवता Happy

कोणीही आपली दखल घेवो न घेवो आपण जिथे कौतुक करायच तिथे भरभरून करतो परतफेडीची अपेक्षा न ठेवता >>> असंच हवं. आपल्याला आनंद दिला ना सिरियलने बास. असा आनंद दुर्मिळ आहे की. त्यासाठी मी तर झी युवा फेसबुक, मुक्ता फेसबुकवर जाऊन त्यांचेच आभार मानून आले.

आज ओझी वर पहिल्यापासुन बघायला सुरुवात केली आणि इकडचा चर्चा ही वाचतेय. सुरुवातीचे अंदाज वाचून मजा येतेय.

अन्जूताईने ३महिन्यापूर्वी भाकित केलं होतं
"मला वाटतं स्टोरी शेवटच्या पंधरा दिवसात उलगडेल. सध्या फक्त एकेक मर्डर. किरण करमरकरचा आणि विवेक लागूचा काय रोल असेल याची उत्सुकता आहे. किरण करमरकर कदाचित मोठा सूत्रधार असेल किंवा मदत करणारा. ...... "

ओहह स्वस्ति थँक यु. मी पण विसरले होते.

अर्थात फार कॉमन सेन्स आणि सर्वांच्याच मनात हेच असणार. पण डॉक्टर आगाशे यांचा पण काहीतरी रोल असेल, असंही वाटलेलं पण ते खरेखुरे प्रामाणिक प्रोफेशनल डॉक्टर निघाले.

तिकडे फेसबुकच्या रुद्रम फॅन्सग्रुप वर " मेकिंग ऑफ रुद्रम "मध्ये या फेसबुक ग्रुप चा उल्लेख सिरीयल च्या लोकांनी केला नाही म्हणून नाराजीच्या बऱ्याच पोस्टी आल्यात म्हणे . आहे कि नाही मज्जा . तरी त्या ग्रुप मध्ये जास्तीत जास्त कलाकारांनी ग्रुप मध्ये ऍड होऊन सगळ्या फॅन्स चे आभार मानले. तरीही ?
<<
दीड हजारापैकी एखाद-दोन लोकांनीच टाकल्या होत्या अशा पोस्ट्स, मॉड नी डिलिट केल्या गिरिश जोशींच्या पोस्ट नंतर.
चालायचच, असतातच असे लोक.तो गृप बाकी भारी आहे !!

तो गृप बाकी भारी आहे !!>> हो पण फार उशिरा कळला अल्मोस्ट लास्टडेलाच >>> हो ना. ठीक आहे आपण इथे मज्जा केली. मी झी युवा फेसबुकवर कधीच जाऊन लिहिलं की तुम्ही रुद्रमच्या पोस्ट्स टाकत का नाही, काही अभिप्राय द्यायचा तर खूप मागे जाऊन, पोस्ट शोधून द्यायला लागतो तरी कोणी तिथे सांगितलं नाही की फेसबुक पेज आहे तिथे लिहू शकता असं. मीन्स युवा वाले सांगणार नाहीत पण प्रेक्षकांपैकी कोणीही सांगितलं नाही.

हा तिथे टीममधले लोक सहभागी होते, त्यांनी डायरेक्ट वाचलं असते आपलं मत म्हणा. इथली लिंक फेसबुकवर द्यायची मात्र माझ्या डोक्यात खरंच आलं नाही.

आताच गुड बाय गर्ल बाय शीजा जोस वाचलं.. 2015 ला पब्लिश झालेलं... बाप रे.... Sad Uhoh
इकडेही रिव्हेंज स्टोरीच आहे... एक टीनएज मुलीवर सिएमच्या खुनाचा आळ येतो..मग तुरुंगात कसे अत्याचार होतात.. चाईल्ड पोर्नोग्राफीच रॅकेट..मग ती बँकॉन्क ला पळून जाते..थैलॅन्डला एका मास्टर कडून सगळं शिकते ..फिजीकल ट्रेनिंग घेते..गन वैगेरे कशी चालवायची शिकते.. इंडियात परत येते..वेगवेगळे गेटअप घेते..खून करते.. थायलंडच्या हॅकर मैत्रिणीची मदत घेते.. हॉस्पिटलच्या आय सी यू मध्ये दुसऱ्या सिएमचा खून करते.. सगळे मोठे लोक या धंद्यात असतात..एक एक करून सगळ्यांना मारते..एका रिपोर्टरला सगळ्या बातम्या ,पुरावे देऊन त्यांचं रॅकेट उघडकीस आणते..आणि हो फ्रिज मध्ये गन ही कन्सेप्ट पण वापरली आहे यात.. Light 1 सगळ्यांचा खून झाल्यावर तिचा सूड पूर्ण होतो आणि ती आई कडे परत जाते तिथेच कादंबरी संपली आहे..प्रेक्षकाने आपापला शेवट ठरवावा की तीच पुढे काय होत? जेल मध्ये जाते का पळून जाते का मरते का थायलंडला परत जाते ..
हम्म..... Light 1

अशा तुलनेला काही अर्थ नाही.
यातील नक्की काय परत परत होउ शकत नाही असे तुम्हाला वाटते?
जगभरातील शेकोडो ख-या गुप्तहेरांनी / सुपारीच्या धंद्यात असणा-यांनी फ्रिजची आयडीया वापरली असेल.
अनेक सुडकथेत कुठल्यातरी कारणाने अन्याय झालेली स्त्री असेल.
अन्याय झालेल्या प्रत्येक स्त्रीला आई असणारच? भावनीक शेवट म्हणुन ती आईकडे परत जाईल की शेजा-याकडॅ परत जाईल?
आंतरजालाच्या प्रसारानंतरच्या कथेत हॅकर का बरे वापरु नये? कोणाचा कॉपीराईट आहे का कथेत हॅकरची मदत घेण्यावर? सुड घेत असलेली स्त्रई हॅकरची मदत घेत नाही का?

यातील सर्व घटना व संदर्भ परत परत घडू शकतात. ख-या सुडकथेतही. तसे ते इथेही झालेले असु शकतात.

मी कुठेही तुलना केलेली नाही..मी कॉपी राईटच ही काही म्हटलेलं नाही..
लगेच रुद्रम पाहिल्यानंतर त्याच सिमीलर विषयाची कादंबरी वाचली फक्त..आणि त्यात काय आहे एवढंच लिहिलं आहे...
तसेही रिव्हेंज ड्रामा वर सिनेमेही आहेतच की..बदलापूर ,आणि जुने काय काय...

३ नोव्हें.नंतरचे एपिसोडस पाहायला मला जमलेलं नव्हतं. म्हणून काल ओझीचं app डाऊनलोड केलं. पण तिथे ४-५ मिनिटांचे एपिसोडसच दिसतात Sad
आपली मराठी साईटवर पण तेच!

या नवीन धाग्यावरची एकही पोस्ट न वाचता विचारते -
उरलेले १० एपिसोडस संपूर्ण कुठे बघायला मिळतील?

रुद्रमचे शेवटचे दहा एपिसोड्स इथे बघता येतील :

http://www.ozee.com/shows/rudram/video?page=1

पहिल्यापासून बघायचे असतील तर : ( खाली पेज नंबर आहेत पुढचे भाग बघण्याकरता )

http://www.ozee.com/shows/rudram/video?page=4

अ‍ॅपवर का दिसत नाहीत माहीत नाही. ह्या लिंक्स लॅपटॉपवरुन पाठवते आहे पण अ‍ॅपवर उघडाव्यात.

ओझी ॲपवर आहेत पूर्ण 22 मिनिटांचे एपिसोडस्. मी तेव्हा ॲपवरच पाहिले होते. आत्ताच पुन्हा चेक केलं तर पूर्ण भाग दिसतायत.
जर वेबिसोड सिलेक्ट झालं असेल तर फुल एपिसोड सिलेक्ट करा. Happy

ल-प्रि,
देसीरुल्झ वर पण दिसत होते. तिथे पण पहा अजुन दिसताहेत का.

माझ्या फोनवरच्या अ‍ॅपवर काही केल्या एपिसोड्स दिसलेच नाहीत.
मग नवर्‍याच्या फोनवर अ‍ॅप डा.लो. केलं आणि रविवारी तिथे उरलेले १० एपिसोडस पाहिले. Proud
सलग सगळं बघायला मजा आली. विचार करायलाही वेळ मिळाला नाही.
मेकिंग एपिसोडमध्ये किरण करमरकर नाहीच आला Sad
काल आणि आज इथल्या सगळ्या पोस्ट्स वाचून काढल्या. मी ९वी-१०वीत असताना दूरदर्शनवर किरण करमरकरची `हसतखेळत' / `सारे हसतखेळत' नावाची मालिका होती, ती त्याची पहिली मालिका असं मी इतके दिवस समजत होते. त्यातल्या कि.क.वर तेव्हा आम्ही मैत्रिणी फुल्ल फिदा होतो. एकदम डोळ्यात बदाम मटेरिअल... त्यातली त्याची भूमिकाही मस्त होती. ती मालिकाच धमाल होती. दर रविवारी सकाळी लागायची बहुतेक.

दिनमान पहिली कि क ची. आम्हा मैत्रिणींच्या पण डोळ्यात बदाम होते त्याच्यासाठी, मला अजूनही आवडतो म्हणा. त्यात प्रतीक्षा लोणकर होती, तिचीही पहिली मालिका आणि रेणुका शहाणे ही रेणुका केंकरे नावं लावायची तेव्हा. नुकतंच तिचे तेव्हा पाहिलं लग्न झालं होतं.

Pages