"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या भागात अमिता खोपकरांच्या तोंडून चुकून "किराणा वाल मिकत्ये का?" ऐकून गंमत वाटली Happy

मला विचारताय का, मी मस्त. एकदम भारी होता. सर्वाना अपेक्षित.

फार सुंदर काम कि क चं. एकदम किळसवाणा वाटला लास्ट सीनमध्ये. एकदम सायकीक वाटला.

मुक्ताला खरं काय ते एकदम शेवटीच कळेल.

हो हो. माखिजाच निघाला म्हणुन विचारले, तुला तो असायला नको होता ना... त्यामुळे तो प्रश्न वेगळ्या अर्थाने होता Happy

रागिणी त्याला मारेल शेवटी.

हम्मम... समन्वयमधून मानसी सामील आहे, फक्त तिलाच फ्लॅश ड्राइव्ह मिळणार आहे हे कळलंय, बाकीच्यांना मिळालाय हे कळलंय.

आता खरी गंमत... ज्याच्या पर्यंत पोचायचेय त्यालाच रागिणीने आपला राझदार बनवले Happy

कालचा एपी भारी .कि क ने मस्त काम करतोय / पॉसिटीव्ह वगैरे .. अस म्हणेपर्यंत .....
मला अजून एक शंका विचारायची आहे .. पण गोष्ट न फोडता कसं विचारायचं ??
थोड्यावेळाने विचारते

कालचा एपिसोड जाम भारी...
तसं माखिजाच main व्हिलन असेल हा अंदाज होता पण त्याने काम मस्त केलय, especially तो त्याच्या माणसाला ज्या प्रकारे मारतो.. क्षणात ते character स्पष्ट होते की ते खरे कसे आहे!

संदीप आधीच्या भागात किरणच्या घराच्या दिशेने जाताना दाखवलाय, तो आत न जाता बागेत लपून बसतो ते का कळले नाही. तो नंतर फक्त फोटो घेतो. पण उपयोग काय ते कळले नाही. कारण त्याने ज्या स्थितीत फोटो घेतलेत त्याच स्थितीत पोलिसांना किरण सापडणार. याचे फोटो काही गुपित राखून ठेवत नाहीयेत.

माखिजा किरणच्या घरातून बाहेर पडायच्या आधी आत झटापट झाल्याचे दृश्य उभे करतो, तो बाहेर पडल्यावर दारात जी बॉडी दाखवलीय ती बहुतेक रखवालदाराची असावी.

रागिणी रात्रभर विचार करूनही हा हल्ला आपल्यावर होता हे जाणू शकली नाही याचे आश्चर्य वाटले. आपण कोणाशी डिल करतोय, माणसे मारणे त्यांना रोजचे आहे हे तिला माहीत आहे. रावसर यात आहेत यावर विश्वास आहे, त्यांच्याकरवी बातमी पोचणार हेही माहीत आहे, तिने मुद्दामच त्यांना सांगितलंय, तरी तिला आपल्यावर हल्ला होईल असे का वाटले नाही?

विचारा की.... काय टेंशन नाय >>+१ Happy

माखिजा किरणच्या घरातून बाहेर पडायच्या आधी आत झटापट झाल्याचे दृश्य उभे करतो, तो बाहेर पडल्यावर दारात जी बॉडी दाखवलीय ती बहुतेक रखवालदाराची असावी.>>> +१ हां हेच मला विचारायचं होतं कि आत जाताना कोणी दाखवल नाही वॉचमन वगैरे ..मग बाहेर येताना बॉडी कधी कुठून कशी आली .. आपल्याला दाखवले नाही कि अशी झटापट झाली etc

संदीप फोटो may be धुरत किंवा रागिणी किंवा शोभा ताई ..किंवा अजून कोणालातरी पाठवेल का?( पोलीस यायच्या आधी कि क ने कुणाकरवी तरी त्याची विल्हेवाट लावली तर ?? )

कालचा भाग मस्तच होता. माखिजाच मेन आहे हे प्रेडिक्टेबल असूनही बघायला मजा आली. किरण किती घाबरत होता....!!
मारेकरी फोटो घेत होता की माखिजा किरणच्या घरातून निघतो हे शूट करत होता..
माखिजाचं कॅरॅक्टर मात्र अजूनही गूढ आहे. त्याला रागिणी बद्दल सगळं माहित आहे तरी तिला काहीच करत नाही. आणि तिच्या वर हल्ला प्लॅन केला म्हणून किरण ला मारलं.!! त्याला खरचं ती आवडते का?

वोचमनने आत येताना अडवले नसणार. गाडी एकदम भारी ना, त्यामुळे मोठे साहेब आहेत ही मेंटलिटी असतेच ना. पण किरणचा खून झाला कळल्यावर मात्र तो गाडीबद्दल माहिती देणार. म्हणून त्याचाही खून झाला. आत झटापटीचा भास मखिजच्या माणसांनी केला असणार. त्याची माणसे खूप फास्ट आहेत. किरण नवा मारेकरी घेतो तरी हा माणूस किरणने पाठवलाय हे त्यांनी किती झटपट ओळखले. त्यांनीच रखवालदाराला उडवून दारात टाकले. एकूण आपसी दुश्मणीतून हत्या घडल्याचा भास निर्माण केला. फक्त संदीप पाठक त्यांच्या नजरेत न येता कसा तिथे राहू शकला हे कळले नाही.

माखिजा नमूकर आहे. गाडी MH43 आहे Happy

माखिजाने बिबट्याची गोष्ट सांगितलीय ना. त्याला आधी रागिणीचा राग आला. पण पिंजऱ्यातला बिबट्या अचानक एका क्षणी आवडायला लागला तशी रागिणीची न्यूज पाहून पाहून ती आवडायला लागली. म्हणून तिला ऑफिसात घेतले परत. ती धोकादायक आहे हे माहीत असूनही तिला मारायचे नाही ही ऑर्डर दिली.

आपल्याला कळलं तरी रा ला सगळं कधी आणि कसं कळतं ते बघणं इंटरेस्टिंग ठरेल -- अगदी 100%खरं।
मखीजा लय डेंजरस दिसतोय, कसला मारत होता डोक्यात निर्दयीपणे।
रागिणी जामच अडकणार आता, सॉलिड धोकादायक माणूस मखीजा....

संपदा, सुनिधी Happy .

हो ना मला positive chara हवं होतं त्याचं पण तोच असेल असं जास्तीत जास्त दाखवत होते पण एरवीच्या सस्पेन्स सारखं दाखवायला हवं, धक्कादायक वेगळं कोणीतरी असं वाटत होतं.

पण ह्या charactor ला तोच योग्य न्याय देऊ शकतो एक कलाकार म्हणून. काय सॉलिड केलंय त्याने. आता तिचा तिथे पोचण्याचा प्रवास बघायचा. जाम कठीण आहे तिच्यासाठी.

काल किरण दारात उभा राहून 'सर तुम्ही?' असं म्हणतो! तेव्हा १ सेकंदात वेगवेगळे चेहेरे डोळ्यासमोर आले.. (प्रेडिक्टेबल होतं तरीही)
अगदी सुहासच्या बाबांना पण गेस केलं Proud

गेल्या आठवड्याचा बॅकलाॅग आज भरून काढला. Happy फारच फास्ट घडामोडी घडल्या या चार पाच भागात.

अन्जूताईप्रमाणेच मला पण माखिजा मेन व्हिलन म्हणून नको होता. Proud पण ठिक आहे. काम भारी केलं त्याने. एकदम सायको वाटला किरणला मारताना. त्याचा ड्रायव्हर पण घाबरला त्याला या अवतारात बघून.

फक्त संदीप पाठक त्यांच्या नजरेत न येता कसा तिथे राहू शकला हे कळले नाही.>>+1. त्याचे बाॅडीगार्ड सतत त्याच्यासोबत असतात तर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यावर तर त्याच्यासोबत असायलाच हवेत. आणि मग ते तसे सोबत असतील तर संदीप पाठक इतक्या उघडपणे त्या बागेत लपून शुटिंग / फोटो काढणे कसं काय करु शकला.

माखिजाने किरणला मारणे एक्दम डेन्जर! इतका रक्तपात मला बघवत नाही पण , डिटेलिन्ग फार जबरी घेतात, मारेकरी मरतो तेव्हा त्याला ४-५ गोळ्या लागल्या त्यामूले अगदी चेहर्‍यावर पण रक्ताचे शिन्तोडे... माखिजा च सुत्रधार आहे हे तर माहितच आहे , रा ला कस कळत ते कळेलच , सन्दिप झाडित लपलेला दाखवलाय, तो ज्या सफाइने खुन करतो त्या सफाइने त्याला लपुन बसणे काहिच अवघड नाही,
राचा कधिकधी राग यावा इतक्या चुका ती करते जस माखिजाला सगळ सान्गण, डॉक ला पण सगळ सान्गण, इतका विष्वास ती कसा टाकु शकते? राचा आणि धुरतचा काहिच सपर्क नाही?

मुक्ता थोडी मंद दाखवलीये. म्हणजे जे तिने अंगावर घेतलंय आता त्यात सगळा विचार व्यवस्थित करणं किती गरजेचं आहे. असं असून सुद्धा चारी बाजूंनी विचार करतच नाहीये ती.

आबाच्या बाबतीत तेच केलं. मारेकरी तिला मारायला आलाय हे कळलं तरी ट्यूबलाईट पेट्लीच नाहीये तिची अजून.

ही खन्त त्या हॉस्पिटल वर आख्खा एपिसोड दाखवला त्यावेळेस रा बोलुन दाखवते , कदाचित आइशी शेअर करता आल असत अस म्हणजे आइ ब्रेव्हआअहे म्हणुन पण एका अर्थाने बरच झाल नाही केल ते कारण तिच्या आइने धुरत ला दिल असत सगळ सान्गुन

तो मेलेला वाॅचमन होता का. झटापटीचा देखावा नाही बघितला मी, एपि परत बघावा लागेल. तो मारेकरी कितीवेळ पिस्तुल रोखून धरतो रावर, आणि एकटं गाठून मारतात ना, असं एवढ्या लोकांमध्ये थोडीच, तेही चेहरा न झाकता. तो अनाम मारेकरी एकटं गाठून मारायचा. कसला सायको दाखवलाय कि क. तो किरणला मारतच राहतो आणि तेही जवळ बसून. रक्त उडालेला त्याचा चेहेरा, ईईई, भयंंकर. कि क बघत असेल की रा कुठपर्यंत जातेय, त्याला कुणी काही करू शकणार नाही याची त्याला खात्री असेल. मोरे किंवा जगताप किरणचा खबरी असावा. डाॅला सगळं म्हणजे मी मीडलक्लास बाई नाही टीपीकल वगैरेे का सांगते रागिणी.

आज पण भारी होता एपिसोड . ऑनलाईन लेट येतात आज काल म्हणून वाट बघत बसावे लागते .
ओझी इथे दिसत नाही.
मखिजा वाटतच होता डेंजर आणि निघालाही . मुक्ताला कसा काय बरा वाटला ?
जाधव परत घोटाळा करणार असे दिसतंय . सर्वच कॉम्प्लेक्स होत चाललंय .
धुरत ला बरोबर क्लू मिळालाय . जाधवला पण सर्व माहिती लगेच मिळते . सर्व छान काम करत आहेत .

धुरतचा पचका करणार जगताप असं वाटतंय एकंदरीत. आत्ता ह्या स्टेजला जगतापला बाजूला काढणं आपल्याच पायावर दगड मारण्यासारखं होऊ शकतं.

Pages