"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार घेवुन रा चा माणूस पक्षी स.डाव्याचा माणुस जाणार त्यात मिठबावगकर उर्फ ढोलकिया सातव चे पैसे ठेवणार , ती कार रागिणि टेकओव्हर करणार पैसे काढुन घेणार , राच्या घराचा पत्ता डाव्याला कळु नये म्हणुन रा गाडी मधे एखाद्या गॅरेजला सोडणार..
आजचा भाग सॉल्लिड! मुक्ता ग्रेट्च !

आजच्या भागात फोन उचलल्या उचलल्या समोरून कोण बोलतंय हे कळायच्या आत मिठबावकर "सौरभ ढोलकिया (त्याचं खरं नाव) बोलतोय" असं म्हणाला ते अजिबात पटलं नाही.

तो विशिष्ट नंबर फक्त 5च लोकांकडे असताना त्या नंबरवर कोणत्याही इतर अननोन नंबरवरून आलेल्या कॉलवर (मला नाही वाटत रा ने जो फोन वापरलेला तो नंबर याआधी मिठबावकरकडे गेला आहे) समोरून कोण बोलतोय याची खात्री होण्याच्या आत डायरेक्ट खरं नाव?

बाकी वंदना गुप्ते हे मिठबावकरचं पण धुरतला सांगून बसेल कधीतरी अशी भीती वाटते. अगदी नाट्य रूपांतरण किंवा काहीही सांगितलं तरी सदाला संशय येणारच. ऑलरेडी त्याने आज बरोबर गेस केला अनुराधाचा मिठबावकरला फोन झाल्यावर. त्याला मिठबावकरचा नंबर ट्रेस नाही का करता येणार? तसं तर सदाकडे रागिणीलाच ट्रेस करून पकडायचे बरेच मार्ग असताना तो तिला सध्या मोकळं सोडतोय ते पटत नाहीये तितकं. पण कदाचित ढिल देऊन देऊन योग्य वेळ आल्यावर मांजा खेचणार असेल तो.

बाय द वे आजच्या भागात त्या संदीप डावा आणि मुक्ता त्याला भेटते तेव्हाचा दोघांचा अभिनय खूप आवडला.

आजच्या भागात फोन उचलल्या उचलल्या समोरून कोण बोलतंय हे कळायच्या आत मिठबावकर "सौरभ ढोलकिया (त्याचं खरं नाव) बोलतोय" असं म्हणाला ते अजिबात पटलं नाही.>> का? तो सान्गतो की मिठबावगकर हे त्याच धन्द्याच नाव आहे त्यामूळे दुसर्‍या कोणाचा फोन आला तर तो ओरिजनल नाव साग्नतो, ५ लोकाना फक्त हे नाव माहित आहे ते कोण हे माहित आहेत त्याला

तो डावा कामाचा मोबदला मागतो मुक्ताकडे तेव्हा ती काय बोलते ते कळलं नाही. ती एवढी प्रसिद्ध झालीये त्या न्यूजमुळे मग वेषांतर केलं तरी लोकं तिला ओळखणार नाहीत का. किमान तसा उल्लेख तरी. तीला कदाचित गाडीच्या काचेतून सदा दिसेल आणि ती गाडी घेऊन जाणारच नाही. अनुराधाला गाडीचं लोकेशन माहित नाही मग सदाला कसं कळतं. फोन नंबर जसा ट्रेस करतात तसा गाडीचा नंबरही ट्रेस करता येतो का. तिखटमीठकर Proud

मुक्ता बर्वेनी गावरान बाईच काम छान केलं. अगदी खुर्चीवरपण कशी झुकून वेगळीच बसली होती. उद्या गाडीचे कसे होणार ? रागिणी कशी तावडीत न सापडता सुटेल याचा विचार चालू आहे.

‘घडलय बिघडलय’ या मालिकेत तिची आणि आतिशा नाईकची अशा ग्रामीण भूमिकात छान जुगलबंदी चालायची त्याची काल आठवण आली...

अनुराधाला गाडीचं लोकेशन माहित नाही मग सदाला कसं कळतं. >>> मिठबावकर अनुराधाला सांगतो - कोणत्यातरी होटेलचे नाव आणी लौबीच्या बाहेर ठरल्याप्रमाणे गाडी असेल म्हणुन.

नाही लोकेशन नाही सांगत तो. म्हणतो तुम्ही सांगितलेल्या लोकेशन वर निळ्या रंगाची गाड़ी आणि मग नंबर वाचून दाखवतो..
तसं तर सदाकडे रागिणीलाच ट्रेस करून पकडायचे बरेच मार्ग असताना तो तिला सध्या मोकळं सोडतोय ते पटत नाहीये तितकं. सहमत. काल मी हेच लिहिलं होतं. सदा एवढा हुशार आहे तर रागिणी पर्यंत सहज पोचू शकतो आता. पण असे लुपहोल्स मुद्दाम ठेवले असावेत का?

कालचा भाग ठीक होता. सध्या फक्त सदा आणि रागिणीच दाखवत आहेत. रागिणी बातम्या देते ते सुहास आणि त्याचे बाबा पण दाखवले बघताना. समन्वय चेतना, किरणभाऊ, माखिजा यांच्या वर बातमी चा काय परिणाम झाला तेही नाही दाखवलं.. मिठबावकर आणि पैसे ह्यावरच फोकस आहे..

सदा मुद्दाम करतोय बहुतेक, एक पत्रकार म्हणून ती जास्त मदत करू शकेल केसच्या मुळाशी जाण्यात असं त्याला वाटत असावं. एक पोलीस म्हणून त्या केस बाबत त्याच्याकडे अधिकार नाहीयेत तसे काही. असा माझा अंदाज.

ढोलकीया कडे बरेच फोन नंबर्स आहेत त्यातला एक तो खबर्या मिळवून देतो सदा ला, रागिणी ने केलेला नंबर 5 जणांकडे आहे असं तो म्हणतो.

गाडी कशाच्या तरी समोर अस तो म्हणतो, शोरूम का गॅरेज काहीतरी. अर्थात त्यावरून सदाला ट्रेस करणं जरा फार फेचड आहे.

रागिणी ची घालमेल मस्त दाखवली काल.

पाच नंबर असतील तर ज्या नं वर रागिणीने केला त्याच नं वर केला का अनुराधाने आणि तसं नसेल तर आवाजही वेगळा वाटला तरी तो माहीती कशी काय देतो.

अनुराधाला नंबर लक्षात राहतो हे पटले नाही. एकतर ती फोन करण्याआधीच घाबरलेली आहे, त्यात तो जे बोलतो त्यावरून ती गोंधळलीय. आपल्याला नंबर ऐकायचाय हे आधीच माहीत असले तर आपण तो नीट ऐकतो व लक्षात ठेवतो. ह्याने अकस्मात वाचून दाखवलेला नंबर ती कशी लक्षात ठेवणार?

मिठबावकर कुठून ऑपरेट करतो हे सदाला कळले तर तो बाहेर निळ्या गाडीसाठी फिल्डिंग लावू शकतो। पण गाडी वेगळ्या जागी लावली असेल तर कठीण आहे.

अनुराधाला नंबर लक्षात राहतो हे पटले नाही. >>> हो ना. तेव्हा सदा फोन स्पीकरवर ठेवायला का सांगत नाही? म्हणजे गाडीचा नंबर सदानेही ऐकला आणि पोलिसकामाच्या सरावाने तो त्याच्या लक्षात राहिला हे अधिक विश्वासार्ह वाटलं असतं.

गाडीच्या नंबरवरून गाडी ट्रेस करणं पोलीस यंत्रणेला शक्य असेल ना? त्या पद्धतीनेच तो गाडी शोधत असेल.

माझा अंदाज - संदिप पाठक>> नसावा. कारण त्याने चंदुदादाच्या घरी जाऊन बाबूच्या बायकोला मारलं>> +१०१

अनुराधाला नंबर लक्षात राहतो हे पटले नाही >>> हो हे मलाही आधी अजिबात पटले नव्हते पण मग वाटलं की काही जणांना आकडे एकदा ऐकल्यावर लक्षात राहतात, तशी असेल ब्वा अनुराधा. एवढी मोकळीक देऊया कथानकाला, असं अगदी वाटलं.

मी कालचा भाग अजुन बघीतला नसल्याने वरचे बरेच मेसेज वाचणार नाही. Proud

पण संदिप डावा जर संदिप पाठक असेल तर आणखी एक शंका. चंदुकाका, संदिप वगैरे लोक रागीणीचा वापर करुन मिठबावकराचे पैसे मिळवण्याकरता नाटक तर करत नसतील? त्यात कि.क. पण सामील असेल त्यामुळे तो म्हणतो की मी त्या चित्त्याला पिंजर्‍यात बंद केले व फक्त बघत बसलो.

हल्ली मुक्ता ने रेकॉर्डिंग करणं बंद केलं आहे.रा आईला सगळ्या कारवायांमधलं थोड खरं थोड खोटं सांगताना दाखवल्ये, नाव सांगायला नको होत खरंतर. सदाला प्रकरणाच्या मुळाशी जायचं आहे, रा ला तो कधीही पकडू शकेल असं वाटलं असेल त्याला.

हल्ली फक्त रा आणि सदा, समन्वय चेतना नाही, कि क नाही, बातमीचा त्यांच्यावर परिणाम दाखवलाच नाही.

२६ तारखेच्या भागात रागीणी व चंदुकाका यांच्या संभाषणात मला अनेक दिवसांनी मुक्ता बर्वे दिसली. इतके सगळे इपिसोड ती रागीणी हे पात्र होती. तिच्या आवाजात जरा माज वाटला. मे बी शेवटची बातमी दिल्याचा,पोलीस मदत करत आहेत व मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यामुळे थोडा आलेला कॉन्फिडंस मुळे असेल. तसे असेल तर कमाल अ‍ॅक्टींग.

Pages