Submitted by अनन्त्_यात्री on 27 September, 2017 - 02:15
जांभळ्या टेकडी तळिचे
ते तळे खुणावुन हसले
अन पहाटफुटणी मधल्या
केशरात अलगद लपले
थरथरली तीरावरची
गवताची पाती ओली
वाऱ्याची फुंकर येता
पाण्यावर झुंबर फुटले
घनदाट शांतता तिथली
तोलून थिरकत्या पंखी
पाखरू एक इवलेसे
क्षण एक लकेरुन गेले
नि:शब्द, तरल जे सारे
ते इथेच जन्मा आले
कोवळे ऊन टिपताना
हलकेच धुके शिरशिरले
चल पुन्हा तळ्याच्या काठी
चल पुन्हा, पुन्हा चल जाऊ
अस्वस्थ जगाचे मागे
कोलाहल सोडुनी सगळे.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नि:शब्द, तरल जे सारे
नि:शब्द, तरल जे सारे
ते इथेच जन्मा आले
कोवळे ऊन टिपताना
हलकेच धुके शिरशिरले >>> खूप सुंदर!!!!!!!!
मेघा., आपण वेळोवेळी देत
मेघा., आपण वेळोवेळी देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आभार!
व्वा अप्रतिम खुप आवडली
व्वा अप्रतिम खुप आवडली
व्वा! सुंदर! रम्य... असं
व्वा! सुंदर! रम्य... असं वाटतंय आत्ता कुठे तळ्याच्या काठी जाऊन बसावं अन् कवितेतलं वर्णन, तेथील शांतता सगळं सगळं पुन:पुन्हा अनुभवावं..
mr.pandit, आभार आपल्या
mr.pandit, आभार आपल्या प्रतिसादाबद्दल !
राहुल, उत्स्फूर्त
राहुल, उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार!
इगतपुरीजवळ भावली नावाचं धरण आहे. कळसूबाईच्या टेकड्यांमध्ये वेढलेलं धरणाच्या पाणलोटाचं जे तळं आहे तिथे भल्या पहाटे गेलो असताना या कवितेतला शब्द् न शब्द अनुभवला होता!
असा विलक्षण अनुभव शब्दबद्ध
असा विलक्षण अनुभव शब्दबद्ध करणे म्हणजे वार्याला चिमटीत पकडण्याइतके अवघड....
.....जे तुम्ही सहज करुन दाखवलंत...
तुमच्या सार्याच रचनांनी मा बो वरील कविता विभागाला टवटवी आलीये नक्किच....
____/\____
असा विलक्षण अनुभव शब्दबद्ध
असा विलक्षण अनुभव शब्दबद्ध करणे म्हणजे वार्याला चिमटीत पकडण्याइतके अवघड....
.....जे तुम्ही सहज करुन दाखवलंत
अतिसुंदर !
आहाहा, सुरेख सुंदर
आहाहा, सुरेख सुंदर
अ प्र ति म !!
अ प्र ति म !!
वा वा! सुंदर!
वा वा! सुंदर!
अप्रतिम!!
अप्रतिम!!
शशांकजी, आपल्या मर्मग्राही
शशांकजी, आपल्या मर्मग्राही प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
दत्तात्रयजी, आपल्या
दत्तात्रयजी, आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार !
स्निग्धा, झुलेलाल, स्वाती
स्निग्धा, झुलेलाल, स्वाती_आंबोळे, अक्षय दुधाळ: आपणा सर्वांना आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
प्रसन्न... तळ्याकाठी...
प्रसन्न...
तळ्याकाठी...
शिवाजी, प्रतिसादाबद्दल आभार !
शिवाजी, प्रतिसादाबद्दल आभार !
>>>घनदाट शांतता तिथली
>>>घनदाट शांतता तिथली
तोलून थिरकत्या पंखी
पाखरू एक इवलेसे
क्षण एक लकेरुन गेले>>>जां-कुर्बान ओळी आहेत या! पूर्वी वाचली तेंव्हाही प्रतिसाद नोॅदवला आहेच,पण या ओळी आठवल्या,म्हणून पुन्हा कविता वाचली,मनाचे पुन्हा पाखरु झाले!
शशांकजींचा प्रतिसादही खूप आवडला!
अवांतर—आपल्या गावाकडच्या मावळतीचे बिलोरी रंग माबोच्या कॅन्व्हासवर उतरले नाहीत बहुतेक अजून? येवू द्या!
(फर्माइशच समजा हवं तर!)
सत्यजितजी, रंग मागेच उधळलेत
सत्यजितजी, रंग मागेच उधळलेत ते!!!
सत्यजित..., आपली दिलखुलास दाद
सत्यजित..., आपली दिलखुलास दाद पोचली. आभार!
व्वा! सुंदरच...
व्वा! सुंदरच...
अ प्र ति म
अ प्र ति म
Sayuri, Ambadny- thanks for
Sayuri, Ambadny- thanks for your response!
खुप सुरेख ,आवडली!
खुप सुरेख ,आवडली!
सायु, प्रतिसादाबद्दल आभार !
सायु, प्रतिसादाबद्दल आभार !
मस्त
मस्त
नाजुक व सुंदर कविता.
नाजुक व सुंदर कविता.
मीरा बावनकर, सुनिधी : आपल्या
मीरा बावनकर, सुनिधी : आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!