आस

Submitted by पुरंदरे शशांक on 27 September, 2017 - 01:09

आस

चित्ती असो द्यावा येक
बरवा वैकुंठनायक ।।

नाम मुखी वसो सदा
लोपो ऐहिक सर्वदा ।

संतसंगती लाभावी
बुद्धी गोविंदी वसावी ।

हरीरूप व्हावे सारे
नयो मागुते अंधारे ।।

अास हीच जागो चित्ती
दान द्यावे रखुमापती ।।

........................................

आस = इच्छा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर !
आपल्या तलम वस्त्राला ठिगळ जोडण्याचा माझा पुढील प्रयत्न म्हणजे कृपया अधिक्षेप समजू नका:

हृदयंगम ऐसी आस
न्यावी तार्किक अंतास
अन्ती मिटवावे द्वैत
उरो कैवल्य सर्वत्र !

हृदयंगम ऐसी आस
न्यावी तार्किक अंतास
अन्ती मिटवावे द्वैत
उरो कैवल्य सर्वत्र !
>>>

अन्ती मिटवावे द्वैत
उरावे केवळ अद्वैत! Happy

सुंदर रचना .. Happy
अनंतयात्री आणि राहुल दोघांचीही रचना मस्तच!!!!!!! Happy

@मेघा, माझी रचना वैगरे काही नाहीये. सगळं श्रेय शशांकजी न् अनंतजींचं आहे. मी फक्त दोन शब्द बदलण्याचा प्रयत्न केला. Happy

सुंदर !!!