"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या भागात मंदार आणि एडिटर मधला संवाद छान..
माखिजाने शिपिंग आॅफिस मध्ये बोलवलं रागिणीला ते नाही दाखवलं. सरपोतदार आणि सदा यांच्यातील शाब्दिक चकमक भारी.. उघड उघड दाखवलं की सरपोतदार पण यात गुन्हेगारांना सामील आहेत. वरून म्हणतात.. सीबीआई चौकशीने काही होणार नाही..
सदाची थिअरी त्याला रागिणी पर्यंत बरोबर पोहचवते.. तो एवढा हुशार आहे तर रागिणी विरूद्ध पुरावे सहज शोधू शकतो.. हे मुद्दामच दाखवत नसावे. तो तिचे कॉल रेकॉर्ड चेक करु शकतो, खुनाच्या दिवशी तिचे मोबाईल लोकेशन शोधू शकतो, वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे अभयच्या मोबाईल वरुन कुणाला कॉल गेला हे ही शोधून काढू शकतो..
पुढील भागात अनुराधा मिठबावकरला फोन करते.. आता रागिणीला पैसे मिळतील का?

उघड उघड दाखवलं की सरपोतदार पण यात गुन्हेगारांना सामील आहेत >> त्यांच्या वरचा पण सामील आहे. फोनवर ते म्हणतात कि धुरतवर संशय आहे.

काल सातवच्या बायकोचं काम आवडलं.. एकदम इंटरेस्ट घेऊन सदाची थेअरी ऐकत होती >> शेवटी टेबलवर फक्त रागिणीच्या नावाचा ग्लास उरतो. Happy

कदाचित असं होईल की खर्या अनुराधाने केलेला फोन मिठबावकर ला फेक वाटेल, आणि तो रा ला पैसे पोचते करेल.
कारण रा ने फोन अभय च्या फोनवरून केला होता त्यामुळे तो जास्त खरा वाटू शकतो.
पण सदाला मिठबावकर चा फोन नंबर कसा मिळेल ? मि. तर म्हणत असतो की माझा नंबर ५ जणांकडेच आहे. म्हणजे तो सहजासहजी कोणाला देत नाही असं दिसतयं.

पण सदाला मिठबावकर चा फोन नंबर कसा मिळेल ? खबरी कडून.
कदाचित असं होईल की रागिणी तयारीनिशी पुन्हा फोन करेल तेव्हा सांगेल की भेटायची जागा बदलूया म्हणजे जी अनुराधाने खरोखर ठरवलेली असेल ती.. आणि सदा मिठबावकर कडे पोचायच्या अगोदर रागिणी पैसे घेऊन फरार होईल

काल सदाने त्याचा रा वरचा संशय मस्त घुमा फिरा के बोलून दाखवला, ह्याचा अर्थ तो थालिपिठ ह्या थियरी वर फसला नाहीये - हे बघून बरं वाटलं, इतका हुशार पोलिस आधिकारी खोटं लगेच पकडू शकत असेल - जसं त्याने अभय ला पकडलं होतं जेव्हा तो म्हणाला होता कोणी बाई नव्हती बरोबर निघताना.

कालचा भाग चुकला होता माझा, पहायला वेळ नाही मिळाला. रात्री अकरा वाजता ओझी वर अपलोड नव्हता झाला.

अनुराधा म्हणजे कोण ?सातव ची बायको का?तिच्याकडे मिठबावकर चा नंबर आहे का ? तिला तर तो माहित नाही असं म्हणालेली ना ती ? आणि मानसोपचार संपले का रागिणी चे?बऱ्याच दिवसात त्यांची पण एन्ट्री नाही (मोहन आगाशे )!?धुरात चा खबऱ्या ज्याला ठार मारलं (दादू कि काय नाव त्याच मी विसरले ) त्याला लागलेल्या गोळ्या आणि पोलीस व्हॅन मधल्या पोलिसांना लागलेल्या गोळ्या सेम रिव्हॉल्व्हर मधून मारलेल्या असू शकतात का ?I mean पोलिसांना हे शोधून काढायला कठीण नाही

त्याला लागलेल्या गोळ्या आणि पोलीस व्हॅन मधल्या पोलिसांना लागलेल्या गोळ्या सेम रिव्हॉल्व्हर मधून मारलेल्या असू शकतात का ?I mean पोलिसांना हे शोधून काढायला कठीण नाही >>>> पोलिसांना हे सगळं प्रकरण दाबूनच टाकायचं आहे त्यामुळे असा काही शोध लागला तरी ते दुर्लक्ष करणार.

सदाचा तो सहकारी सावंत बातमी काढायला बघतोय, सदाने मस्त कटवलं त्याला.

पुढच्या भागात मधे - तो माणूस "सौरभ ढोलकिया" असं म्हणतो का ? तो तर मिठबावकर आहे ना ?

सातवचा खुन झाल्यानंतर त्याच्या बायकोला एक चिठ्ठी मिळते ना, तिच्याच नवर्याने लिहीलेली की मला काही झालं तर ह्या xyz नंबर वर मिठबावकरला फोन कर म्हणुन.
तिने ती धुरत पण दाखवलीये.

हो तो काही वेग्ळच नाव संगतो.
मे बी सदाला कॉल रेकॉर्ड वरुन मिळाला असेल त्याचा नंबर आणि अंधारात तीर मारला असेल.

पुढच्या भागात मधे - तो माणूस "सौरभ ढोलकिया" असं म्हणतो का ? तो तर मिठबावकर आहे ना ? >> हे पाहिले नाहि मी. हे नवीन नाव आलेले दिसते.

मे बी सदाला कॉल रेकॉर्ड वरुन मिळाला असेल त्याचा नंबर आणि अंधारात तीर मारला असेल. >> खबरी कडुन मिळालेला असेल. त्याने काल खबरिला माहिती काढायला सांगीतली होती.

सातवचा खुन झाल्यानंतर त्याच्या बायकोला एक चिठ्ठी मिळते ना, तिच्याच नवर्याने लिहीलेली की मला काही झालं तर ह्या xyz नंबर वर मिठबावकरला फोन कर म्हणुन>>> पण त्यात फोन नंबर नसतो दिलेला , माझ्या मोबाईल मधून मिठबावकर ला कॉल कर असं लिहिलेलं असतं i think .. तेव्हा मग ते म्हणतात पण मोबाईल तर गायब आहे etc

तो सदाचा सहकारी विचित्र वाटतोय मला. सदाला अल्बम मिळतो व त्याच्या ऑफिसात तो पाहत असतो तेव्हा हा सहकारी खिडकीतून ते सारे पाहत असतो, पुढच्याच दृश्यात साहेब फोटोसकट सदा व त्याची थियरी उडवून लावतात. नंतर सदा रागिनीचे लोकेशन बघत असतो तेव्हा तो म्हणतो साहेब तुमच्यामुळे वाचलोय मी मागे एका केसमधून, तुम्हाला विसरणार नाही, तुम्ही प्रामाणिक आहात माहितेय इ.इ. तो फॉर की अंगेंस्ट ते कळत नाही.

कल साहेबांची चिडचिड होत होती तेव्हा सदा मस्त भोळा चेहरा ठेऊन चिडचिडीत अजून भर घालतो.

ओझीवर पुढच्या भागात... हे दुसऱ्या दिवशी दाखबतात, जेव्हा त्या दिवसाचा विडिओ यायचा असतो. बाकी झी वर दिवसभर मालिकांचे जे प्रोमो चालतात त्यात अजून जास्तीचे दाखवत असतील जे ओझीवर येत नाही.

मंदार जेव्हा आपल्या कोणालाच शिपिंग ऑफिसात बोलावले नाही पण हिला मात्र बोलवले म्हणतो तेव्हा एडिटर त्याच्या खांद्यावर थोपटून she deserved it म्हणून विषय सॅम्पवतो ते खूप आवडले. ती खास मर्जीतली आहे बाबा असे म्हणून तो चीप गॉसिप करू शकला असता, पण ते टाळले.

ती कारमधुन जात असताना दाखवली आहे ते शिपिंग ऑफिसात जात असताना असे मला वाटले. तेव्हाच तील धुरतचा फोन येतो.

ती कारमधुन जात असताना दाखवली आहे ते शिपिंग ऑफिसात जात असताना असे मला वाटले हो पण त्यांची भेट दाखवायला हवी होती. कदाचित असेल पुढे.

पुढच्या भागात मधे - तो माणूस "सौरभ ढोलकिया" असं म्हणतो का ? तो तर मिठबावकर आहे ना ?>>>>>> असं कधी म्हणतो? नाही बघीतल मी पण.

त्यांच्या वरचा पण सामील आहे. फोनवर ते म्हणतात कि धुरतवर संशय आहे. >>>>> सपोदार "भाऊ" अस म्हणतात का त्यावेळी फोनवर ???

पुढील भागात डावा अनंत जोग आहेत. आज एन्ट्री.

फक्त डावा news channel बघत नाही का, तसं असेल तर तिने वेषांतर केलं तरी ती खरी कोण ओळखू शकतो की.

she deserved it म्हणून विषय सॅम्पवतो ते खूप आवडले>> अगदी अगदी. संवाद लेखक व एडिटींग चे काम सुद्धा छान जमलंय इतर सर्वांसोबत. असंभव व एलदुगो नंतर बर्याच दिवसांनी एखादी मराठी मालिका आवडतीये.

पुढील भागात डावा अनंत जोग आहेत. आज एन्ट्री.>> ह्म्म्म! एक्दम ईन्ट्रेस्टिन्ग! अनत जोग नुसत्या नजरेतुन स्त्रीलपन्ट, लाचखोर्,धुर्त, लबाड सगळ सगळे व्हिलनचे गुण साकारु शकतो.

तो माणूस "सौरभ ढोलकिया" असं म्हणतो का ? तो तर मिठबावकर आहे ना ?>> हो तो मिठबावकरच आहे तो धंद्याकरता मिठबावकर नांव वापरतो . आजच्या भागातलं एकच बोलायचं आहे त्या अनुराधा सातव ला गाडीचा एवढा मोठा नंबर घडाघडा कसा आठवतो ? तो मिठबावकर पण वाचून दाखवतो Proud
पुढील भागात डावा अनंत जोग आहेत >> ते अनंत जोग आहेत ? वाटत नाही Happy

आजचा भाग जबरदस्त होता.
संदीप डावा झालाय तो 'चार दिवस सासूचे' मधला सुशांत सुभेदार ना.

Pages