Submitted by र।हुल on 22 September, 2017 - 10:08
ठेऊनी पाय मुंडक्यावरी
दे फेकूनी सगळे जोखड
न रूळलेली वाट हाकारी
चालणे आहे एक अवघड ॥१॥
न उमगल्या रितींना काय
तू उगाची कवटाळून आहे
धरतात जन कुणाचे पाय
म्हणूनी धरणे व्यर्थ आहे ॥२॥
गंडवितात सिद्धी मार्गावरी
ज्ञानीजन पथ दाखवून गेले
दिसतील तुला जे चमत्कारी
चालताना ते ध्येयं विसरले ॥३॥
तुला मार्ग दाखविला ज्यांनी
बडेजाव ना कधी मिरवीला
तुझे ब्रह्म आहे शोषित जनी
समर्पण हवे फक्त कान्ह्याला ॥४॥
―₹!हुल/२२.९.१७
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अप्रतिम
अप्रतिम
न उमगल्या रितींना काय
न उमगल्या रितींना काय
तू उगाची कवटाळून आहे
धरतात जन कुणाचे पाय
म्हणूनी धरणे व्यर्थ आहे >>>>> अप्रतिम!!!
धन्यवाद दत्तात्रेयजी, मेघाजी.
धन्यवाद दत्तात्रेयजी, मेघाजी.
अरे व्वा मस्तच राहुल भारी
अरे व्वा मस्तच राहुल भारी लिहिलय
व्वा अप्रतिम!!
व्वा अप्रतिम!!
धन्यवाद पंडितजी, अक्षय
धन्यवाद पंडितजी, अक्षय