"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंदू दादा स्विच ऑफ करायला सांगूनही "ती आता खूप दिवसात वापरला नाहीये त्यामुळे पोलिसांच्या लक्षात येणार नाही" म्हणते. इतकं कॅज्युअली का घेते? एक तर तिला ओव्हर कॉन्फिडन्स आहे नाही तर नेहमीप्रमाणे सैरभैरलेय . पण चंदू दादांनी जबरदस्ती तिला बंद करायला लावायचा खर तर . पाहिल्यादि तो पर्स मधून काढ आणि स्विच ऑफ कर सांगायला पाहिजे. आजच्या भागात असेल कदाचित .

बहुतेक मालिकेत तुम्ही जास्त हुशार नसला तरी जर इच्छा असेल तर कसलेही शोध लावू शकता हे दाखवायचे असेल. सहमत. आणि मुळात ती गुन्हेगार नाहीच त्यामुळे प्रत्येक वेळी खबरदारी घ्यायची लक्शात नाही रहात तिला.. चंदुदादा सांगतात तेव्हा तिला समजतं विग घालून अनुराधाच्या समोर जाऊ नये असं.

चंदुकाकाहि सो कोल्ड एक्सपर्ट आहेत. म्हणजे ते शार्प शुटर आहेत पण ते काहि डिटेक्टिव्ह नाहित.

रागिणीबरोबर धुरतची अ‍ॅक्टींग पण जामच आवडायला लागलीये.
त्या फोनचं फार टेन्शन येतंय बाबा ... काल शेवटी धुरतला कळतं ना फोन थोड्यावेळसाठि ऑन झाला ते.. असं कसं पोलिस विसरतील? राचं काहिही लॉजिक..

मला वाटलं तो पैसे देणार नाही, सो काॅॅल्ड अनुराधाला फसवणार कारण सगळा काळा पैसा आहे आणि बिटकाॅईन बेभरवसा आहे परत अनुराधाला बिटकाॅईनबद्दल काहीच माहिती नाही.

आजच्या एपिसोडच्या सुरवाती लाच चन्दू दादा सांगतात " तरी तुला मी सांगत होतो फोन ऑफ करायला "त्यावर ती जास्त जादा पणे म्हणतेच " हो पण त्यांना काही समजलं का ?" हे सगळं त्या धुरातला स्वतःला भेटायला पाठवून . धुरत आला तेव्हा ती लेडीज मध्ये होती म्हणून नाहीतर सापडलीच असती. नंतरही तिने ऑफ केला नाही तो नाहीच . मला वाटलं आता ती धुरत ला भेटायला हॉटेल मध्ये जाईल आणि तेवढ्यात मिटबावकरचा तिच्या जवळ असलेल्या फोन वर कॉल येईल की काय ? जरी तिने मिटबावकरला तुम्ही करू नका मीच करेन असं जरी सांगितलं असेल तरी सुद्धा तो स्वतःहून करू शकतोच ना ? पण असं काही झालं नाही . तस झालं असत तर रागिणीचा खेळ तिथल्या तिथे खल्लास

नंतरही तिने ऑफ केला नाही तो नाहीच .>> ती फोन चंदुदादा सांगता क्षणी बंद करते फक्त तिथून निघून जाण्यास नकार देते.

रा एखाद्या दूध पित असलेल्या मांजरासारखी बसली होती धूरतसमोर. निरागस की कशाची भीतीच वाटत नाही तीला. मंदारला कसंं कळलंं पाच लाखाचं, तो फसवतो की काय तीला. धूरत ज्या पद्धतीने तीची उलटतपासणी घेतो त्यावरून त्याला राबद्दल काही कळलय असं वाटतंय. राच्या मूर्खपणामुळे चंदूदादा उगाच संशयाच्या भोव-यात सापडलेत. चॅनलला न कळवता अशा परस्पर न्यूज देता येतात म्हणजे गौप्यस्फोट वगैरे. वाहिनीची काहीच जबाबदारी नाही का. रा आजच्या भागात आगाऊ वाटली. सदा तीला पुराव्यांविषयी भोळेपणाने सांगतो की मुद्दाम.

धुरत म्हणजे निडाअ मधल्या सहा मेल पै़की एक ़इ. कधिआत्ठ्वत होते, रा च गडबडण , तेवढ चापलुस नसण , प्लॅन्स नसण , जमेल त्स हे सगळ अगदी नॅचरल आहे, ती सराइत गुन्हेगार नाही तिला या प्रकारच्या कामात म्हणजे माह्तिई काढण समन्वय चेतना यात काही रस नव्हता , हे सगळ ती आत्ता करतेय..स्वतःला व्हिडिओटेप करण्याचा मुर्खपणा कुणीही सराइत करणार नाही

ती सराईत गुन्हेगार किंवा अजिबात त्या mindची नसल्याने ती जे जे करतेय ते मला मनापासून पटतंय. ज्या चुका तिच्याकडून होतात. भांबावलेपण, बावरलेपण, आततायीपणा, हळूहळू आलेली थोडी हुशारी हे मला जाम पटतंय, natural वाटतंय. तिचे charactor उभं करताना खूप विचार केलाय असं जाणवतंय आणि ती जगतेय ती भूमिका असं मला personally वाटतं.

कालचा भाग मस्त हॅपनिंग होता. रा सुटेल का अडकेल ? सदाला माहीत आहेच ती छाया खताळ ला ओळखते ते, बघूया खोटं बोलते आणि सदासमोर पचते का.

ही मालिका सोडून इतर सर्व शनिवारी पण दाखवणार.

सोमवारी नक्की काय होईल काय माहीती. मंदार मदत करेल तसंच धुरत सहजासहजी मदत करेल असं वाटत नाहीये पण ही बातमी देऊन हलवणार आहे यंत्रणा पण पुराव्यासह की शिवाय ते नंतर कळेल. नवीन प्रोमो बघितला.

धुरत तिला मस्त कोपचित घेणार आहे. ती दादांना ओळखत नाही म्हणते तर छायाच्या मुलाला अनाथालयात कसे दाखल केले याचे काय उत्तर देणारे.

कालचा भाग जबरदस्त होता.
अन्जूच्या पोस्टला मम. रागिणीचं कॅरॅक्टर भारीच उभं केलंय. अगदी विचारपूर्वक.. ती गुन्हेगार नाही त्यामुळे तिच्याकडून होतात चुका.
मंदार खरचं मदत करेल का पण? एडिटरने विचारल्यावर फक्त हसला तो.. आणि पुराव्यानिशी बातमी टीवी वर आली तर रागिणीच्या जीवाला धोका आहे.
रागिणीने आता सदाला सांगावेच की ती छायाला ओळखत होती. नाहीतर तिला ह्या केसबद्दल एवढे डिटेल्स कसे माहीत याचं उत्तर देता येणार नाही. आणि ती खरं बोलली तर कदाचित इथून पुढे ते दोघं एकत्र काम करतील..
चंदुदादा साठी वाईट वाटतयं पण. उगीच अडकतील आता.
सदा एवढ्या इजीली कसं काय सांगतो पण पुराव्यांबद्दल.. सुरवातीला अगदी जपून बोलत होता..

चंदुदादा साठी वाईट वाटतयं पण. उगीच अडकतील आता. >>> उगीच कसे ? रागिणी अडकली तर तिच्या कारवायांचे अ‍ॅक्सेसरी आहेत नं चंदूदादा आणि त्यांची आधीची क्रिमीनल बॅकग्राऊंड आहेच!
मला अजूनही सदा धुरतचा नीट अंदाज येत नाहीये. अर्थात यातच लेखक - दिग्दर्शकाचं यश आहे.

रा मुळे चंदुदादा अडकणारेत ऊगाच. त्या पानवाल्याने बरोबर वाटेला लावलं पण त्या पोलिसाला.
मंदार जे तिरकस हसला त्यावरुन तो ऐनवेळी युनिट वेळेवर पोचणार नाही असं बघेल का असं वाटतय. तिची गोची करायला.
प्रोमो मधे तरी जे लोक टाळ्या वाजवताना दाखवले ते युनिटचे लोक नसुन खरच बाहेरची लोकं तिचं बोलणं ऐकुन थांबले असावेत, असं वाटतय.

उगीच म्हणजे रागिणी मुळे.
ही बातमी टीवी वर पाहिल्यावर समन्वय चेतना मध्ये काय होईल..!
@चैताली मलाही असेच वाटतयं की मंदार खरचं मदत करेल का? मे बी बातमी येईल पण पुरावे स्कॅन करेल का तो? माखिजाला सामिल तर नसेल ना?

खूप दिवसांनी एक छान मालिका बघायला मिळत आहे. एकही भाग चुकवू नये असे वाटायला लावणारी.
रागिणीचे कॅरेक्टर खूपच छान पद्धतीने उभारले आहे मुक्ताने. एवढा नीट विचार करून खोल लिहीलेला रोल मिळणे यासाठी नशीब असावे लागते आजकाल. आणि मुक्ताने त्या संधीचा फायदा छान उठवला आहे. बोलण्यातला बदल, बॉडे लँग्वेज एकदम मस्त.

ozee rudram असे टाईपले की गुगलवर लगेच लिंक येते.

मला वाटते धुरत आणि रा मिळून एकत्र काम करण्यापर्यंत अॅमिकेबल सेटलमेंट करतील.

मला अजूनही सदा धुरतचा नीट अंदाज येत नाहीये. अर्थात यातच लेखक - दिग्दर्शकाचं यश आहे.>>अगदी.

Pages