"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती (फक्त) पत्रकार आहे असा त्याचा समज आहे. >>> हो हो. आणि शेवटपर्यंत तो तसाच राहिल असा माझा अंदाज आहे. कारण ते दोघे मिळून रॅकेट शोधतील. आणि अ सा ला कुणी मारलं हे शोधण्यात त्याच्या बायकोला इंट्रेस्ट नाहीये, त्यामुळे ते तसेच राहील.

रागिणीचा एकूण स्वभाव बघता ती शेवटी का होईना सांगून टाकलेच की तिने अभयचा खून केला ते. खरंतर तिला खूनही करायचा नसतोच. हॉस्पिटलमध्येही ती त्याला धमकावतच असते, पण तो ओरडायचा प्रयत्न करतो सारखा आणि झटापटीत स्काल्पेलने त्याची नस कापली जाते.

आता एक टेक्निकल प्रश्न- अभयच्या अंगठ्याने ती तो फोन उघडते, पण फोन त्यामुळे एकदाच अनलॉक होईल ना? पहिल्यांदा अनलॉक केल्यानंतर ती सेटिंग बदलते का?

पहिल्यांदा अनलॉक केल्यानंतर ती सेटिंग बदलते का?>> हो. तिने तसं रेकाॅर्डींग करताना सांगितलंय.

माझे तीन दिवसाचे भाग चुकलेत. ओझी रिस्पाॅन्डच करत नाहीये. Uhoh

हो पूनम, सेटिंग बदललं तिने. माबोवर किंवा कुठे वाचून गोष्ट नाही बदलणार असं वाटतं. शूटिंग कदाचित संपलंही असेल. रा आणि तिच्या आईची नोकझोक मस्त.

हो, त्या दिवशीच्या रेकॉर्डिंग मध्ये ती म्हणते की फोन अनलॉक केल्याबरोबर लगेच सेटिंग बदलले.

फोन अनलॉक केल्यावर फोन ऐरोप्लेन मोड वर टाकला तर कसलीही भीती नाही. लोकेशन नाही मिळू शकत. ती आरामात हवे ते बघू शकते मग.

NIdhii ओझीवर आहे की सगळे. पहिल्या दिवसापासूनच आहेत. मी काल छायाच्या खुनाचा परत पाहिला.

अरे मायबोलीवर वाचून कोणी गोष्टी किव्वा झालेल शूटिंग बदलत नसतात. शूटिंग कधीच झालाय.
सगळे भाग किव्वा बरेच भाग आधीच तयार असतात . त्यामुळे इथलं डिस्कशन वाचून कोणी त्याचं झालेलं शूटिंग बदलत असेल अशा गोड गैरसमजात राहू नका Wink

रागिणी ह्या केसच्या मुळापर्यंत जाणार हे कि क ला माहीतेय मग त्याला काय इंटरेस्ट ह्या केसमधे >> हे असू शकतं, आशिष चा लॅपटॉप चोरीला गेलाय म्हणजे नक्की कुणाला तरी माहीत होतं की त्याच्याकडे काहीतरी महत्वाचा डेटा आहे, कदाचित कि क किंवा राव रागिणी मार्फत तो डेटा मिळावा या साठी तिच्यावर पाळत ठेवून असतील

सगळे भाग किव्वा बरेच भाग आधीच तयार असतात . त्यामुळे इथलं डिस्कशन वाचून कोणी त्याचं झालेलं शूटिंग बदलत असेल अशा गोड गैरसमजात राहू नका >>>>> नाही ओ, ते असचं बोललो होतो. इतक तर कुणालाही कळत Wink

साधना, मी ओझीवरच बघते ही सिरियल. पण सद्ध्या प्रचंड पावसामुळे नेट व्यवस्थित चालत नाही आणि त्यामुळे ओझी पण रिस्पॉन्स देत नाहीये. Uhoh

डेटा आबाकडे आहे हे रागीणी साइ रानडेला सांगते त्यानंतर किका तीला बोलावतो का आधी ? नंतर >>>> सइ चा चेहरा पाहण्यासारखा होता, रागिणीने तीला आबा आणी डेटा बद्दल सांगीतले तेव्हा आणी ती लगेच उतरते पण गाडीतुन /रिक्षातुन.
ती कदाचित सांगत असेल किका ला कि लॅपटॉप शिवायही अजुन कोणाकडे तरी डेटा आहे.

ती लगेच उतरत नाही, रागिनीच तिला सांगते तिचा स्टॉप आल्याचे, तरी तो गोंधळलेलीच असते. आणि डेटा आबाकडे आहे हे मानसी रागिणीला सांगते. तिला आशिष सांगतो. आबा कोण हे दोघीनाही माहिती नाही. कदाचित आबा कोण जाणून घेण्यासाठी तिने सांगितले असावे.

धुरत आणि मोरे बार मधे असताना २ पेग नंतर थांबवा असं सांगून पण मोरे मुद्दाम थांबवत नाही का? काहीतरी माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करतो आणि धुरतला कळतं भारी सीन होता.
रच्याकने बघवत नव्हतं धुरतला असं काही करताना.

धुरत नशेत असं काही बोलेल बहुतेक मुक्तासमोर केसबद्दल की ते महत्वाचं असेल. धुरत आणि मुक्ताने मदत करायला हवीय एकमेकांना.

रागिणी सध्या मस्त चाललीये.. तिचा अभ्यास, आवाजाची नक्कल भारी.. त्यामुळे तिला आता पैसे परत मिळणार एवढं नक्की. फोनच्या लोकेशन वरुन ती सापडणार नाही बहुतेक कारण पुढील भागात सदा आणि रागिणी एकमेकांना भेटतात. होप सो आता केसच्या दृष्टीने दोघं एकत्र काम करतील.
सदा आणि रागिणीचा संवाद छान होता त्याच्या घरी. नशेतला अभिनय मस्त. दुसऱ्या दिवशी सकाळीही फसवले गेल्याचं दुःखं, हावभाव मस्तच.!

पाच लाखाची बातमी म्हणुन मुली कशा मेल्या ते सागिणी सांगेल कदचित. त्यांनतर कि़क ची रिऐक्शन काय असेल ते इंटरेस्टिंग असेल

पाच लाखाची बातमी म्हणुन मुली कशा मेल्या ते सागिणी सांगेल कदचित >>>>> पण तिला कुठे नक्की काही कळलयं ? तो तर सदाचा अंदाज आहे किंवा खात्री असली तरी पुरावा नाहीये ना.

रा विग घालून का उभी आहे सदा तिकडे येत असताना ?

काल अ‍ॅट लीस्ट ते दोघे समोरासमोर आले आणि दोघेही एकाच कामासाठी झटत आहेत ते कळलं एकमेकांना.

पण तिला कुठे नक्की काही कळलयं ? तो तर सदाचा अंदाज आहे किंवा खात्री असली तरी पुरावा नाहीये ना. >> त्याच्याकडे आहे ना - पोस्ट मार्टेम रिपोर्ट.
तो देइल तीला पुरावा बहुतेक

रा विग घालून का उभी आहे सदा तिकडे येत असताना ? ती रागिणी नाहीये. तो विग आता नाही वापरणार ती. चंदुदादाने सांगितलयं तिला तसं..

बरोबर. ती रागिणी नसेलच. आवाजाची नक्कल छान केली रा ने. रा पकडली गेली नाहीये फोन on करुनही हे बरं झालं. पण तिने फार causually घेतला हा प्रकार फोन on करण्याचा.

पण ती मुलगी वेषांतर करू शकते हे सदा लक्षातच घेत नाहीये. तो त्या गेटअपमधल्या मुलीवर संशय घेईल पण तो फोन ती दुस-या कोणालाही देऊ शकते. एक्झॅक्ट लोकेशन नाही कळत का. तसं असतं तर तो झडती घेऊ शकला असता हाॅटेलमधल्या सगळ्या लोकांची. तो वेटरही किती जवळ ऊभा होता राच्या जेव्हा ती फोन करत होती. तिने जर हे न्यूजमध्ये सांगितलं तर तिला मारूनही टाकतील. तिने नक्कल चांगली केली अनुराधाची.

मी प्रकरणाच्या मुळाशी जाणार हे धुरतने तोंडावर सांगून पण ही बाई पोलीस मोबाईल विसरले समजतेय. धुरतचया बहिणीला मिठबवकारला फोन करण्यासाठी फोन लागेल, ती भावाला फोनच्या मागे लावू शकते ही शक्यता तिने लक्षात घ्यायला हवीय.

बहुतेक मालिकेत तुम्ही जास्त हुशार नसला तरी जर इच्छा असेल तर कसलेही शोध लावू शकता हे दाखवायचे असेल.

आणि ती मुलींची बातमी 5 लाख वाली म्हणून देऊ शकते. पत्रकारांनी पुराव्याशिवाय बातमी द्यायची नाही असे ठरवले तर न्युज चॅनेलवर फक्त जाहिराती दाखवाव्या लागतील.

नशेतला अभिनय मस्त. दुसऱ्या दिवशी सकाळीही फसवले गेल्याचं दुःखं, हावभाव मस्तच.! >>>>> अगदी.

साधनाताई, तुमचा त्रागा योग्य आहे ! Happy

Pages