Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज मात्र रुद्रमला मी खूप मिस
आज मात्र रुद्रमला मी खूप मिस करते. मी टीव्ही एकदम नऊ वाजता kbc लावते मग साडेनऊला रुद्रम. आधी लावला तर news channel बघते. आज दोन्ही नसतं.
माखिजानं बिबट्याची स्टोरी
माखिजानं बिबट्याची स्टोरी कसली डेंजर पध्दतीने सांगितली! रागिणीला तो बिबट्याची उपमा देतो, पण तिला तो पिंजर्यात पकडून दगडं मारणारे की तिला आपल्या तालावर नाचवणारे की आणखी काही याचा अंदाज येत नाही.
माखिजाची एंट्री त्याच्या तर्जनीच्या काळ्या पडलेल्या नखापासून केली! (बारीकसारीक गोष्टींचाही सिग्निफिकन्स शोधला जातो )
@ अंजू.. सुहास चे बाबा मेन
@ अंजू.. सुहास चे बाबा मेन बॉस असतील हा विचारच केला नव्हता.. त्यांचा ट्रॅक वारंवार का दाखवतात तो प्रश्नच आहे मला. पण सुहास वर संशय येतो नेहमी
सुहास चे बाबा नाही वाटत
सुहास चे बाबा नाही वाटत महत्वाच्या रोल मध्ये, तो ट्रॅक वारंवार का दाखवत आहेत कोण जाणे.
शिपाई मोरेंना सदा रागिनीच स्केच पाठवायला सांगतो पेपर ला वगैरे तो ट्रॅक अर्धवट सोडला का ? स्केच च पुढे काय झालं आठवत नाही.
संदीप पाठक सारखा थंड डोक्याने
संदीप पाठक सारखा थंड डोक्याने सटासट खुन करणारा माणूस एक मुलगी सतत हसत आहे म्हणून बिथरला, Confused झाला, हे जरा संशयास्पद नाही आहे का?
तो कनफ्युज्ड पेक्षा पण हललेला
तो कनफ्युज्ड पेक्षा पण हललेला वाटला. अशा प्रकारचा अनुभव त्याला नवीन असणार. शिवाय त्याला त्या मुलींबद्दल वाईट वाटलं असण्याचीही शक्यता आहे.
संदीप पाठक जितक्या शांतपणे
संदीप पाठक जितक्या शांतपणे खून करतो,तो हलेलं असं वाटत नाही,त्याचा ब्लॅकमेलिंगचा प्लॅन असावा,किकची एकटिंग जबरदस्त होती कालच्या भागात, तो बॉस नसेल असं वाटतय, इतक्या सरळसरळ दाखवणार नाहीत की मेन बॉस ने आपल्या मागावर असलेल्या मुलीला आपल्याच चॅनल मध्ये कामावर ठेवणं.
जेंव्हा आशिष चा अकॅसिडेंट होतो,नेमकी त्याच वेळेस मानसी एक महिना बाहेर होती ,हे संशयास्पद आहे, तिला कुणीतरी मुद्दाम दूर ठेवलं असणार या सगळ्यापासून
पण सुहास वर संशय येतो नेहमी >
पण सुहास वर संशय येतो नेहमी >>> तो येतोच आहे.
तमाम पब्लिकला सर्वांवर संशय येऊ देण्याचं कसब लेखकाने आणि दिग्दर्शकाने छान दाखवलं आहे.
आता कोण राहीलंय ब्वा, धुरत त्याच्यावर संशय गेला नाहीये.
कमळाबाई पण राहिल्या की झालच
कमळाबाई पण राहिल्या की झालच तर सातवची मुलगी पण. मंदार आणि एडिटर. शोभाताई पण असू शकतात.
(No subject)
सर सर म्हणतो तो माणूस म्हणजे
सर सर म्हणतो तो माणूस म्हणजे मुख्य लेडी नसावी का, की असली तरी दुसऱ्या नावाने दुसऱ्याला हाताखालच्याला करायला लावत असेल फोन.
सर सर म्हणतो तो माणूस म्हणजे
सर सर म्हणतो तो माणूस म्हणजे मुख्य लेडी नसावी का, की असली तरी दुसऱ्या नावाने दुसऱ्याला हाताखालच्याला करायला लावत असेल फोन.
Submitted by अन्जू on 17 September, 2017 - 02:32
@ अन्जू अशी रिस्क कोणीही घेणार नाही. सिक्रसी आणि कंट्रोल जाते अशाने.
अन्जू अशी रिस्क कोणीही घेणार
अन्जू अशी रिस्क कोणीही घेणार नाही. सिक्रसी आणि कंट्रोल जाते अशाने. >>> पॉइंट आहे.
म्हणजे आत्ता आहे त्याच्या वरचा तरी सर आहे, मॅम नाही. अर्थात त्यावरचे कोणी असू शकतील वेगवेगळे.
आयला हे माझ्या लक्षात आले
आयला हे माझ्या लक्षात आले नाही.
सध्या तरी लेखकाने सगळीकडे
सध्या तरी लेखकाने सगळीकडे धुके पसरवले आहे.
वेट अॅण्ड वाॅच. पर्याय नाही
मज्जा येतेय पण, भन्नाट वाटतंय
मज्जा येतेय पण, भन्नाट वाटतंय इथे वाचताना.
संदीप पाठक जितक्या शांतपणे
संदीप पाठक जितक्या शांतपणे खून करतो,तो हलेलं असं वाटत नाही,त्याचा ब्लॅकमेलिंगचा प्लॅन असावा>> मलाही आरएमडी प्रमाणेच तो आतून हललेला वाटला.
ब्लॅकमेलिंग करायचं असतं तर तो त्या माणसाला, "तुमच्याकडे आणून सोडतो तुम्हीच बघा काय करायचं ते." असं नसता म्हणाला.
संदीप पाठकला लहान मुलगाही दाखवलाय का?? किर्तीकरांना मारायला जायचा फोन येतो त्याला तेव्हा तो बागेत एका लहान मुलासोबत असतो. त्या मुलाच्या हातात याने लोडेड पिस्तूल खेळायला दिलेली असते. फोन आल्यावर तो ती पिस्तूल घेऊन निघतो आणि त्याला मी येईपर्यंत इथेच खेळत राहा, असे सांगतो. तो बहुतेक त्याचाच मुलगा दाखवलेला असणार.
निधी, कसलं भारी observation
निधी, कसलं भारी observation आहे गं !! तो सीन पाहिला होता, पण।लक्षात राहील नव्हतं की त्याला लहान मुलगा असेल.
तो मुलगा त्याचा मुलगा नाही
तो मुलगा त्याचा मुलगा नाही वाटत, भाचा वगैरे असू शकेल असं त्यांच्या डायलॉग वरून वाटलं.
कधी पाहणार मी नवीन एपिसोड??
कधी पाहणार मी नवीन एपिसोड???खूप मिसलं मी रुद्रम शनी रवी..
मुक्ताचा मेक अप हळूहळू बदललाय
मुक्ताचा मेक अप हळूहळू बदललाय. सुरुवातीच्या भागांतला नीरस, तिचा डिप्रेसिव्ह मूड दाखवणारा होता. आता ती जगण्यात रस घ्यायला लागलीय हे सुचवणारा आहे मेक अप. विशेषतः ती माखीजाला भेटते आणि नंतर फर्स्ट न्यूजच्या ऑफीसमध्ये परत येते त्या सीन्समध्ये अगदी स्पष्ट जाणवलं.
बाय द वे, माखीजाने ती बिबट्याची उपमा का दिली ? रागिणी काही निरागस आणि निरपराधांच्या नरड्याचा घोट घ्यायला निघालेली नाही
रागिणी काही निरागस आणि
रागिणी काही निरागस आणि निरपराधांच्या नरड्याचा घोट घ्यायला निघालेली नाही >>
बाय द वे, माखीजाने ती
बाय द वे, माखीजाने ती बिबट्याची उपमा का दिली ? मला तर ती कथाच खरी वाटली नाही..
रुद्रम चा रिपिट टेलिकास्ट
रुद्रम चा रिपिट टेलिकास्ट नस्तो का?
रात्री साडे बारा वाजता .
रात्री साडे बारा वाजता . इथेच या धाग्यावर मागच्या कुठल्यातरी पानावर वाचल
बाय द वे, माखीजाने ती
बाय द वे, माखीजाने ती बिबट्याची उपमा का दिली ? मला तर ती कथाच खरी वाटली नाही.. >>> मला पण, काही रिलेट करूच शकले नाही मी.
मला तर ती कथाच खरी वाटली नाही
मला तर ती कथाच खरी वाटली नाही >>>> ती नसेलच खरी. ती त्याने रागिणीना परत घेण्यासाठी उगीच जास्त ड्रॅमॅटीक पद्धतीने वापरली. चंदुकाकांनी शिकवल्याप्रमाणे, रागिणीने त्यात काहीतरी वेगळं पाहिलं असणार, त्यामुळे परत यायला होकार दिला.
आधी ती बिना मेकप होती बहुतेक.
आधी ती बिना मेकप होती बहुतेक. आता मेकप स्पष्ट दिसतो. विगमध्ये तिचं नाक पसरट वाटतं, नाॅर्मली निमुळतं, मेकपची कमाल असणार.
रुद्रम मध्ये पाणी घालताहेत.
रुद्रम मध्ये पाणी घालताहेत. आजचे कोणाचेही वागणे पटले नाही, जे काही दाखवले त्याला कसलाच आधार नाही. हवालदाराचे, विवेकचे, सदाच्या साहेबाचे, सदाचे, मारेकऱ्याचे व शेवटी रागिणीचे. ह्या आठवड्यात पुढे असेच सुरू राहीले तर माझा रामराम.
हो तिची लिपस्टीक शेड मला खूप
हो तिची लिपस्टीक शेड मला खूप आवडली ती परत जेव्हा ऑफिसमधे येते.
Pages