प्रशासकांना कळकळीची विनंती.

Submitted by योग on 9 September, 2017 - 07:02

माननीय प्रशासक,

'एका पत्रकाराची हत्या' या निमित्ताने गेले काही दिवस आपल्या मायबोलीवर बरेच काही लिहीले जात आहे. कदाचित आपल्या सर्वसमावेशक व व्यक्तीस्वातंत्र्य पुरस्कृत धोरणात ते योग्यही असेल. निव्वळ हा एकच बाफ नाही तर अशा अनेक घटनांचे अनेक बाफ व त्यावरील अनेक चर्चा आजवर ईथे झाल्या आहेत. त्या होवू देणे, आपली मते मांडायला लोकांना जागा ऊपलब्ध करून देणे याबद्दल तुमचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत. आणि तरिही काही खोडसाळ व नुकत्याच जन्मलेल्या आयडींच्या वैयक्तीक हल्याकडे दुर्लक्षित करूनही तुम्ही ही सुविधा कायम ठेवली आहेत यासाठी फारच मोठे मन, शक्ती, वेळ, व यंत्रणा लागते ज्यासाठी कमीत कमी तुमचे वैयक्तीक व व्यावसायिक आभार मानणे हे ऊचित ठरेल .

मात्र, आतशा या चर्चा, मुद्दे, ई. सर्व यांचा रोख, हेतू, यावर अनेक शंका घेण्याईतके सर्व स्पष्ट आहे.

मुळात जे सुशिक्षीत, 'सुजाण' व जबाब्दार समाजात घडणेच अपेक्षित नाही त्याची जबाबदारी व तोडगा आपण फक्त दुसर्‍यावर ढकलू पहात आहोत. चार दिवस हे चर्चेत रहाते मग पुन्हा कुठेतरी भयानक, निर्घ्रुण व माणुसकीला लाजवणारे अपराध वा कृत्त्य घडते आणि मग नविन प्रश्णांचे ढोल पिटले जातात.

आताशा मन 'सुन्न' होते म्हणजे काय हेही विसरायला होते ईतक्या संख्येने व नियमीतपणे अशा घटना वाचनात येतात. अशा गुन्हेगारांना चौकात हातपाय पाय तोडून दगडाने ठेचून मारले तरी अशा घटना कमी होतील का? गुन्हेगारांच्या मानवी हक्क अधिकारासाठी किती निष्पाप जीवांचे बळी अजून जाणार आहेत? टॉप टू बॉटम सिस्टिमॅटीक फेल्युअर असणार्‍या सिस्टीम मध्ये कुणा कुणाला फासावर लटकवत रहायचे? असे प्रश्ण ऊपस्थित करणे देखिल आजच्या घडीला वादग्रस्त ठरते आहे...! आणि कुणी केलेच तर पुन्हा तेच तेच मुद्दे व घटना वापरून निव्वळ एकेमेकांवर कुरघोडी करण्या पलिकडे काहिही होत नाही. या निमित्ताने वैयक्तीक स्कोर ईथे आणि बाकी सोशल मिडीया वर सेटल केले जातात. पुन्हा नविन घटना घडेपर्यंत वाट पहात रहाणे... प्रत्येक घटना एका नव्या बाफ चा विषय होवू शकेल.. पण कुठेतरी थांबायला हवे.

अशा कुठल्याही प्रकारच्या घटनांसाठी ज्या न्यायप्रविष्ट आहेत, त्यावर कुठल्याही प्रकारचे बाफ काढायला ईथल्या प्रशासनाने बंदी घालावी अशी कळकळीची विनंती आहे. मायबोलीच्या माझ्या १५ वर्षे वास्तव्यातील ही अशी पहिलीच विनंती करायची वेळ आली आहे हे फार मोठे दुर्दैव आहे! पण रोगापेक्षा अ‍ॅनालिसीस जहरी असे आता गेले काही वर्षे चालू आहे.

किमान मायबोलीवर हे वाचायला मिळू नये एव्हडीच अपेक्षा आहे. निव्वळ माझ्यासाठी नविन, गृप साठी नविन असे ऑप्शन वापरून मूळ मुद्दा व त्यावरील ऊपाय याकडे दुर्लक्ष होईल असे वाटते. मुळात बाफ काढून मुद्दाम चूकीचे संदेश पसरवणे, वातावरण दूषित करणे हे कुणितरी केल्याने त्यास ऊत्तर म्हणून ईतर (विशेषतः जुन्या जाणत्या) सदस्यांना लिहीणे भाग पडतेच. पण अशानेच एकास दोन आणि दोनाचे दोनशे होतात. प्रत्येक वेळी वेमा ना सगळीकडे झाडू मारणे अशक्य आहे हे आपणही जाणतात. पूर्वी ईथे मॉडरेटर्स होते... पण तो भूतकाळ झाला.

मायबोली चा जन्म, ईतीहास, आणि परंपरा ही ऊच्च दर्जाचे साहित्य, वैचारीक देवाण घेवाण, सर्वसमावेशक कार्यक्रम, ऊपक्रम अशी आहे हे काही मी वेगळे तुम्हाला सांगायला नको. वेळो वेळी तुम्ही देखिल या बाबतीत मार्गदर्शन केलेच आहे. मी वैयक्तीक अजूनही मायबोलीवर येतो याचे कारण नविन, अभिनव, सुंदर वाचायला मिळावे म्हणून. आणि मला खात्री आहे ईथल्या बहुतांशी सभासदांची देखिल तशीच अपेक्षा असावी. (आताशा वैयक्तीक ईथे येणे व लिहीणे कमी झाले आहे हे नक्की. )

तरिही निदान काही काळ तरी, जी जी प्रकरणे गंभीर आहेत, न्यायप्रविष्ट आहेत, ज्यात एक व्यक्ती नाही तर समाज, देश यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशा प्रकरणांवर कुठल्याही प्रकारचा निव्वळ चर्चेचा बाफ ऊघडण्याची संमती दिली जाऊ नये. किंबहुना बंदी घालावी. फार तर अशा विषयावर केलेल्या कविता वा एखादे चित्र, किंवा निव्वळ त्याची लिंक देणे यास संमती असावी. याही पलिकडे ज्यांना ऊघडायचेच असेल त्यांना 'रंगीबेरंगी' वर ही सोय ठेवावी. नाही तर अशा सर्व बाफ चा 'वाहता धागा' केला जावा.

मला माहित आहे, माझी विनंती कदाचित तुमच्या धोरणात बसणारी नसेल, पण कुठेतरी कुणितरी थांबायला हवे. पब्लिक फोरम वर हे रोखण्याची संधी, हक्क, व काही प्रमाणात जबाब्दारी ही प्रशासक म्हणून तुमची आहे असे समजून मी ही विनंती करत आहे. तेही फक्त काही काळासाठी. प्रयोग म्हणून करून पहायला काही हरकत नसावी?
अगदी एकीकडे गणेशोत्सवा सारखे सुंदर ऊपक्रम सुरू असताना ईथे असे ईतर बाफ काढले जात होते... ते देखिल खटकले. आपण वातावरण दूषित करत नसलो तरी ते दूषित होवू देत रहाणे हे देखिल ऊचित नव्हे ना?

असो.
फार विचार करून व एकंदरीत मायबोलीचा १५ वर्षाचा सभासद, साक्षीदार या नात्याने ही विनंती करत आहे. यावर कृपया जरूर विचार व्हावा.
(ज्या ईतर सभासदांना माझी विनंती मान्य असेल त्यांनी ईथे खुशाल तसे नमूद करावे.)
आभारी.
योग

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ बी.एस @ सिम्बा
तुम्ही दिलेल्या सूचनेवर काम चालू आहे. पण त्या अंमलात आणायला काही पायाभूत सुविधांची गरज होती. त्या आधी आणल्याशिवाय तुमच्या सूचना उपयोगी ठरणार नाहीत. नुकताच केलेला बदल ही त्या दिशेने सुरू असलेली वाटचाल आहे.
धन्यवाद वेमा..

मी पहिल्या पानावर योग यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. पण फारएंड यांच्या बर्याचशा पोस्ट्स पटल्या. प्रशासकांनी केलेल्या नवीन सोयींचा फायदा झाला तर चांगलंच आहे.
इथे परत परत मला अशा ' वादग्रस्त' ( pun intended Happy )
धाग्यांच्या टीआरपीचा मुद्दा दिसला, म्हणून ही पोस्ट. केवळ प्रतिसाद जास्त म्हणजे टीआरपी जास्त असं असतं का? त्याच त्याच आयडींचे जास्त प्रतिसाद असणं वेगळं आणि अनेक आयडींचे ( एकेक का होईना) प्रतिसाद असणं वेगळं असं मला वाटतं. उदा. मनीमोहोर यांच्या आगराबद्दलच्या ललित लेखाला जे ४८ प्रतिसाद मिळाले ते ४३ वेगवेगळ्या आयडींचे आहेत ( त्या स्वतः + ४२ इतर). जीएस यांच्या ' अजून एक संधी' वाल्या धाग्याच्या ७५ प्रतिसादांमध्ये २५ आयडींचेच परत परत प्रतिसाद आहेत. TRP मधला हा qualitative फरक महत्त्वाचा नाही का?

टीआरपी हा प्रेक्षक संख्येवर अवलंबून आहे , कलाकार संख्येवर नाही,

जास्तीत जास्त प्रतिसाद हे धागा उघडल्या जाण्याचे कारण ठरते, प्रयोग पाहिजे तर करून बघा.

एक अतिशय बिनमहत्त्वाचा विषय घ्या, त्यात शंभर प्रतिसाद स्वतःच किंवा दोघे तिघे मिळून द्या, मग पुढचे प्रतिसाद बघा कसे 'काय फलतुगिरी आहे' असे वैतागलेले येतील का नाही. प्रतिसाद संख्या हि टीआरपी खेचायची टेक्निक आहे, जिथे गर्दी दिसते तिथे आपसूक माणूस खेचले जाते

टीआरपी हा प्रेक्षक संख्येवर अवलंबून आहे , कलाकार संख्येवर नाही >> तसं पहायला गेलं तर धागालेखक हा एकटाच ' कलाकार' म्हणावा लागेल. प्रतिसाद लिहिणारे आयडीज प्रेक्षक आणि कलाकार या दोन्ही भूमिका हव्या तेव्हा घेऊ आणि सोडू शकतात, ते त्यांचं permanent status नसतं.

जास्तीत जास्त प्रतिसाद हे धागा उघडल्या जाण्याचे कारण ठरते, प्रयोग पाहिजे तर करून बघा.>> मान्य आहे.

एक अतिशय बिनमहत्त्वाचा विषय घ्या, त्यात शंभर प्रतिसाद स्वतःच किंवा दोघे तिघे मिळून द्या, मग पुढचे प्रतिसाद बघा कसे 'काय फलतुगिरी आहे' असे वैतागलेले येतील का नाही. >> हा धागा म्हणजे तेच आहे असं नाही का वाटत तुम्हाला? Happy

म्हणजे तुम्हाला वाटतंय का?>>
' तेच' म्हणजे ' मग पुढचे प्रतिसाद बघा कसे 'काय फलतुगिरी आहे' असे वैतागलेले येतील का नाही' हा भाग.
हा धागा म्हणजे अशीच वैतागून आलेली रिअॅक्शन आहे असं मला वाटतं.

नाना कसे आहे हे..
इतकी वर्ष प्रचंड टिका, बोल इतरांवर हवे तितके लावून झाले.
आता जेव्हा बाजू पलटली तेव्हा यांना इतक्यावर्षाचे आठवले. आपल्या आवडत्या पक्षा बाबतीत ही असे ऐकायला मिळू नये कारण प्रतिवाद करण्यासाठी हाती काहीच नाही या प्रचंड भीतीने हे सर्व काही सुरू आहे.
हत्येचे समर्थन कोण करत आहे, सोशलमिडीयावर कोण आनंदोत्सव साजरा करत आहे ते स्पष्ट आहे पण त्यावरून कोणी बोलू नये ही यांची इच्छा. आम्ही काहीही केले तरी तुमची वेळ आल्यावर तुम्ही मात्र बोलायचे नाही हे यामागची वनलाईन

Absolutely correct!!

नाना , प्राण तुमचे वरचे मत पटले,
2014ची इलेक्शन ची हवा तापायला लागली होती तेव्हा कोणीतरी खूप ग्राफ वगैरे घालून विकासासाठी मत द्या वगैरे प्रॉपर प्रपोगंडा लेख लिहिला होता,
त्या आकड्यांच्या औथेंटीसीटी वर नंतर घनघोर संग्राम झालेला,
2014 पर्यंत bjp विरोधकांच्या हाती " असं होऊ शकेल" हे एकच हत्यार होते, तर प्रो bjp वाल्यांकडे "असे झाले आहे" हे मल्टिपल पात्याचे हत्यार,
पण 3 वर्षात परिस्थिती पालटली आहे,
आता bjp विरोधक जास्त डेटा घेऊन ठामपणे जाब विचारू लागले आहेत, आणि हार्डकोर bjp सपोर्टर ना नेमके तेच नको आहे, करण लॉजिकल अर्ग्युमेंट , डेटा सक्त लोकांसमोर मांडले की कुंपणावरचा मतदारबीजो 2014 मध्ये मोठा मार्केटिंग चा खर्चकरून त्यांच्या कडे वळवला होता तो दुरावले,
आणि याच भीतीतून विषय बॅन करा, धागे बॅन करा आशा फॅसिस्ट कल्पना पुढे येतात,
जेव्हा या लोकांना स्वतः चे घोडे पुढे रेटायचे असेल तेव्हा कोणाला आदरांजली, किंवा जनरल chichid करणारे धागे काढून तेही साधून घेतात.

सातीतै यांनी पेट्रोल दरवाढ वर धागा काढलेला तेव्हा त्या धाग्यावर तत्कालीन सरकार विरोधी वापरलेली भाषा बघा.
तेव्हा पेट्रोल मात्र ५०-५२ होता.
आज ८० रुपये पर्यंत झाले. तेव्हा सरकार विरोधी आवाज करणारे लोक आज मात्र त्यावर काही बोलू नका म्हणून विनंती करत आहे.
यांचा प्रोपगॉंडा एकच आहे.

पेट्रोलच्या धाग्यावर आत्ताच कुणीतरी एक डुढ्ढाचार्य तुम्हाला पेट्रोल भावाबद्दल बोलायचा अधिकार कसा नाही, ते समजवून सांगून गेलेत.
*
माझी एथिक्स कमिटीत विनामूल्य सर्ववेळ सेवा द्यायची ऑफर वेमांना खटकली का? का? माझा ती ऑफर देणारा प्रतिसाद उडवलेला दिसतोय.

रोजच्या रोज पेट्रोलचे भाव बदलायला लागल्यापासून एकदाही भाव कमी झालेले दिसत नाहीत.. फक्त वरच जात आहेत..

मध्ये मी काहीतरी वाचलेले,
सुप्रीम कोर्टाने दारू दुकाने बंद करायला सांगितल्यावर सरकारचा महसूल बुडाला, तो भरून काढण्यासाठी पेट्रोल वर 2 रुपये अधिभार लावला,
आता वर्क आराउंड काढून दारू दुकाने सुरू झाली, महसूल परत मिळू लागला, तर महाराष्ट्र सरकार तो 2 रु चा अधिभार कॅन्सल करायला चक्क विसरली, त्यांना आठवण करून दिल्यावर पण त्यांनी नकार दिला.

त्या 2014 च्या जनता माफ नहीं करेगी वाल्या काकूंची द्या येते, बिचाऱ्या 50-60 रुपये पेट्रोल असताना स्कुटर उभी करून बस ने जाते सांगत होत्या, आता 79 असताना काय करत असतील मोदी जाणे.
#जनतामाफनहींकरेगी

महाराष्ट्र सरकार तो 2 रु चा अधिभार कॅन्सल करायला चक्क विसरली, त्यांना आठवण करून दिल्यावर पण त्यांनी नकार दिला.

दक्षिणा एकदा दिली तर परत मिळते का ?

Petrol che bhav padle tevha jagatik bajarpeth karanibhut aani vadhale tar BJP state ani central govt.

Please move this BB to chalu ghadamodi. As now people here are talking about bhartatalya chalu ghadamodi.

I have unsubscribed from that group.

Petrol che bhav padle tevha jagatik bajarpeth karanibhut aani vadhale tar BJP state ani central govt.

>> आता आहे ते आहे हो. तुम्ही कितीही नाक मुरडले तरी ते बद्लू शकत नाही. तेव्हा बॅरल कितीला होते आणि आता कितीला आहे ते बघा...

December 27, 2013 $100. per barrel || पेट्रोलः 78.56

September 11, 2017 is $48.03 per barrel || पेट्रोल : 78.67

Pages