गणेशोत्सवातच नव्हे तर मायबोलीवरही पाककृती लिहायची ही पहिलीच वेळ आहे . त्यामुळे अस्मादिकास सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती.
तर आधीचे दोन प्रयोग फसल्यावर जाऊ दे आता म्हणून आधीच शस्त्र टाकून झाली होती.पण डोक्यातला किडा काही स्वस्थ बसवू देईना. त्यामुळे डोकं शिणवत असताना ही रेसिपी आठवली . आधीचे प्रयोग फसल्यावर (पक्षी -किचन मध्ये सांडलवंड केल्यावर ) आता मातेकडून हे शेवटचं असा अल्टिमेटम मिळाला होता .पण god help to them, those help themselves . तर आता बघूयात रेसिपी .
साहित्य
१) कलिंगडाची गोलाकार चकती
२) मध
३)दही
४)हाताला मिळतील ती फळे छोटे तुकडे करून .मी केळी , डाळींब , द्राक्ष वापरली
कृती
१) कलिंगडाच्या चकती वर दही लावून घ्या .
२) त्यावर आपल्या आपल्या डोक्यात असलेल्या पिझ्झाच्या कल्पनेप्रमाणे फळांचे टॉपिंग करा
३) त्यावर हलकासा मध टाका
४)आणि हेल्दी फ्रुट पिझा एंजॉय करा
हे फोटो .मोबाईलन काढले आहेत.समजून घेणे
अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे . फळं न खाण्याऱ्या गोड छोट्या आणि डामरट मोठ्या दोस्ताना आवडेल अशी अपेक्षा आहे.शिवाय अगदी बेसिक असल्यान जमू शकेल .
एका चॅनेलवर पाहिली होती .त्याच मी केलेलं हे व्हेरिएशन
मायबोली गणेशोत्सव २०१७ च्या
मायबोली गणेशोत्सव २०१७ च्या संयोजकांचे खूप आभार .न कंटाळता त्यांनी प्रश्नांना उत्तरे दिली .धन्यवाद संयोजक
वा ,पहिल्याच प्रयत्नात सिक्सर
वा ,पहिल्याच प्रयत्नात सिक्सर मारलीयेस हं जाई
मस्त रेसिपी . सजावट आणि फोटो पण सुंदर.
थँक्स ममो! तुमच्याकडून दाद
थँक्स ममो! तुमच्याकडून दाद येणं म्हणजे तेंडुलकरन रवींद्र जडेजाला दाद देण्यासारखं आहे
Mast....Good job Jai
Mast....Good job Jai
मस्त पा कृ आणि सजवलीये पण
मस्त पा कृ आणि सजवलीये पण छान
मस्त दिसतेय!
मस्त दिसतेय!
कलिंगडाची साल काढली तर चालेल (मला) म्हणजे आक्खा खाता येईल. मी डामरट क्याटेगरीतच मग!
मस्त.
मस्त.
छान दिसतोय!
छान दिसतोय!
कलिंगड, मध आणि दही एकत्र खाणे
कलिंगड, मध आणि दही एकत्र खाणे अतिशय चुकीचे आहे.
(No subject)
संयोजक ,काय सुंदर
संयोजक ,काय सुंदर प्रशस्तीपत्रक आहे ! आभार
खुपच गोड आणि किशोरवयीन
खुपच गोड आणि किशोरवयीन रेसिपी आहे
असा केक मी स्वप्नातही कल्पना नाही करू शकत!
या केक मध्ये सॉलीड बेस म्हणून काही वापरता येउ शकते का?