Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद पियू..
धन्यवाद पियू..
मस्त चर्चा.
मस्त चर्चा.
रुद्रम माईम शो बघायला लागणार
रुद्रम माईम शो बघायला लागणार मला आज . टिव्हीचा साऊंड गेलाय. मेकॅनिकला उद्या बोलावेन. डायलॉगसाठी ओझी बघायला लागेल, जेव्हा टाकतील तेव्हा.
मुक्ता कधी अकटिंग शिकणार देव
मुक्ता कधी अकटिंग शिकणार देव जाणे... काय तोच सेम सेम अभिनय.. थोडी तरी मेहनत घ्यावी ना उच्चरांवर... बोलण्याची स्टाईल पण सेमच प्रत्येक ठिकाणी.. मोवी असो किंवा शिरेल..
कसा काय लोक सहन करतात मुक्ता आणि स्वप्नील जोशी यांच्या अभिनयाला काय माहीत...
हा स्वप्नील बर्वे कोण हो?
हा स्वप्नील बर्वे कोण हो? रुद्रम् मधे आहे का? कुठला रोल त्याचा?
ऊद्या दुपार पर्यंत कोणी काही
ऊद्या दुपार पर्यंत कोणी काही लिहू नका प्लीज. सगळ्यांना बघू देत एपी.
आपल्याला वाटत होतं तसं हे
आपल्याला वाटत होतं तसं हे अनाथ मुलांच्या (विशेषतः मुलींच्या) विक्रीचंच आणि चाईल्ड पोर्नोग्राफीचं प्रकरण दिसतंय. सीडीजमध्ये तेच आहे.
सदाला सातवच्या केबिनमधून जाणार्या एका गुप्त रस्त्याचा शोध लागलाय. पण त्या दरवाज्याला कोड (पिन) आहे.
बाकी आज उल्लेख करावं असं अजून काहीच नाही घडलं. अल्बममधल्या फोटोजमध्ये मी आशिष, शिवा, बाबु, छाया यांचे फोटो नीट नोटीस केले आज. पैकी शिवाला तडीपार म्हणून मोरे हवालदाराने ओळखलं आणि आशिषला सातवच्या मठ्ठ मॅनेजरने.
सातवच्या बायकोने सदाला गळ घातली आहे कि हे प्रकरण शक्य तितकं गुप्त राहिलं पाहिजे. पण सदामधला सदाचारी पोलिस हा गुन्हा शोधल्याशिवाय / थांबल्याशिवाय गप्प बसेल असं वाटत नाही.
बाकी "पुढील भागात" मध्ये रागिणीने अजून एक चूक करुन आत्तापासुनच आपले ठोके थांबवले आहेत ती म्हणजे सातवच्या न्युजचं टिव्हीवर रिपोर्टींग तीच करणार म्हणून मंदारकडून माईक स्वतःच्या हातात घेते. यात चिक्कार धोके आहेत.
१. सातवच्या मुलीने टिव्हिवर ही बातमी बघताना तिला ओळखणे आणि मामाला सांगणे.
२. पानवाल्याने ही बातमी बघणे आणि मिठबावकरच्या माणसांना (शोधाशोध करत पानवाल्यापर्यंत आलीच तर) हिच ती मुलगी म्हणून सांगणे.
३. वेडाच्या भरात रागिणीने काही अश्या गोष्टी न्युज सांगताना बोलून जाणे ज्या अदरवाईज कोणाला माहित असण्याचं कारण नाही. किंवा भावनेच्या भरात जास्तीचे काहीतरी बोलून जाणे ज्यामुळे संशयाची सुई तिच्यावर जाण्याची बरीच शक्यता निर्माण होईल.
४. १% चान्स आहे कि वेषभुषा बदललेली असूनही नर्सला हिच ती असा अंदाज येणे आणि तिने पोलिसांना सांगणे.
असो.. "तुका म्हणे उगी राहावे.. जे जे होईल ते ते पाहावे".
सॉरी चैत्राली.. मी माझा
सॉरी चैत्राली.. मी माझा प्रतिसाद पोस्ट केला आणि मग तुमचा प्रतिसाद वाचला.
मी तिकडच्या लोकांसाठीच म्हणत
मी तिकडच्या लोकांसाठीच म्हणत होते पियू. मी पाहिलाय एपी आजचा.
बघितला एपिसोड आत्ता ozee वर.
बघितला एपिसोड आत्ता ozee वर. एक्सलंट एपिसोड.
अकराचा रिपीट का नाही दाखवला
अकराचा रिपीट का नाही दाखवला आज असे मधेच काय वेळ बदलतात.
आजचा एपिसोड भारी होता.
आजचा एपिसोड भारी होता.
मॅनेजर इतका माठ? बहुतेक सातवने मुद्दाम माठ निवडलाय नाहीतर हॉटेल धंद्यात त्यातही जिथे बार आहे तिथे इतका माठ असणे शक्य नाही.
सातवचा ह्या भानगडीत मोठा रोल आहे तर...
त्याची बायको अशी डीनायल मोडमध्ये बघून आधी आश्चर्य वाटलेले पण आता कळतंय की अशी परिस्थिती अली की सगळेच डीनायल मोडमध्ये जातात. हे असेच घडताना पाहिलंय प्रत्यक्ष जीवनात. कित्येक अपघातात, गुन्ह्यात, गुन्हेगाराची जवळची माणसे आपल्या माणसाचे किती समर्थन करताना दिसतात. आपल्या पोराने दारूच्या नशेत रस्त्यावर झोपलेल्यावर गाडी घातली तर हे लोक रस्ता झोपण्यासाठी आहे का म्हणून बोंब मारतात. जे काही घडले त्यात आपल्या माणसाचा हात आहे हे ढळढळीत दिसत असतानाही ते स्वीकारायची तयारी नसते कोणाचीच.
त्याची बायको रागिणीला मदत करायची शक्यता शुन्य आहे. तिला रागिणीबद्दल कळले तर शक्य असेल तर ती रागिणीला मारूनही टाकेल, पण असले काही करायला देणार नाही. आपल्या नवऱ्याबद्दल तिला असे काहीही बाहेर यायला नकोय ज्यामुळे कुटुंबाची बदनामी व पर्यायाने तिची मनशांती ढलेल.
एडिटर रागिणीमागे आता रिपोर्टइंग कर म्हणून का लागलाय? प्रेस रिपोर्टर म्हणून काम करायला काहीतरी बेसिक ट्रेनिंग व तयारी लागते ना? अशी qualufied माणसे उपलब्ध असताना नवीन माणसाला, तिला नको असताना, तू हे करच म्हणून का मागे लागावे? कैच्याकैच. उद्या हा एडिटर तिला, आता तूच एडिटर हो म्हणून मागे लागेल.
मॅनेजर माठ कसा? दोन
मॅनेजर माठ कसा? दोन वर्षापूर्वी आलेल्या आशिषला त्यानी ओळखले ना? शिवाय अ सा त्याला त्याच्या आतल्या खोलीत येऊ द्यायचा नाही. त्यातून तो पडला बॉस. तेव्हा मॅनेजर आपन बरं आपलं काम बरं असाच असणार ना?
किंवा असा ची काही काळी कृत्यं त्याला माहित असण्याचीही शक्यता आहे. पण त्याबद्द्ल बोललं तर उगीच त्यात गोवलं जाण्याचा धोका कशाला पत्करायचा? म्हणून तो काही माहित नसण्याचा बहाणा सुद्धा करत असेल.
आशिष आत येऊ देत नव्हता हे खरे
आशिष आत येऊ देत नव्हता हे खरे, आत काय चाललंय हे माहित नसेल पण बिल्डिंगची व्यवस्था तर माहीत असायला हवी. नुसते आत खात बसलेल्या लोकांवर लक्ष ठेवणे एवढेच काम नसते ना, सगळे नीट चाललेय, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, स्टाफ हे सगळे नीट सुरळीत ठेवायची जबाबदारी असते. म्हणजे त्याला हॉटेलच्या वास्तूची नीट माहिती हवीय. याला तर मला माहित नाही शिवाय काहीही माहीत नाही. बारचा मॅनेजर या भूमिकेत अतिशयच बावळट दाखवलाय. ह्या टाईपची माणसे टिकणार नाहीत. पण सातवने मुद्दाम असा बावळट निवडला असणार, ज्याला आजूबाजूला काय चाललेय त्याचा वासही यायला नको.
पहिल्याच प्रसंगात मुक्ताने
पहिल्याच प्रसंगात मुक्ताने अस्वस्थता भारी दाखवलीय. आईचे वाईट वाटते. बिचारी करायला जाते एक आणि होते भलतेच.
ती जाईल त्या कार्यक्रमाला असे वाटतेय. तिचे सगळे मार्ग बंद झालेत, फोन मधल्या नंबरचाही अजून काही उपयोग तिला झाला नाहीय. आशिष शेवटचे काम समन्वय चे करत होता व जे काय झाले असणार ते त्यामुळेच असणार हा विचार करून ती तिथे जायची शक्यता आहे.
मॅनेजर इतका माठ? बहुतेक
मॅनेजर इतका माठ? बहुतेक सातवने मुद्दाम माठ निवडलाय >> ही शक्यता जास्त वाटतेय,त्याला अमुक एक काम दिलंय तेवढं करायचं एवढंच सांगून ठेवत असेल.
सध्या अशा शक्यता वाटताहेत
आता रागिणी बातम्या देईल तेंव्हा अभय सातव ची मुलगी तिला ओळखेल,त्यावरून तो इन्स्पेक्टर तिची चौकशी करायला तिला भेटेल तेंव्हा तिच्या घरी/मोबाईलवर आशिष चा फोटो पाहून त्याला संशय येईल,शिवाय नर्सच्या वर्णनावरून जे चित्र बनेल तेही रागिनींच्या चेहऱ्याशी साम्य असणारं असेल,आणि हॉस्पिटलच्या cc tv फुटेजमध्ये त्याला रागिणी आत येताना दिसणार नाही कुठेच, फक्त बाहेर जाताना दिसेल,हे सगळे डॉट्स कनेक्त करून तो रागिणीला ट्रॅक करू शकतो ,फक्त त्याचा तपास जर खरच गुप्तपणे करणार असेल तर तो इतक्यात तिला अटक करणार नाही ,तिला एकतर मदत करेल (सातव चे कनेक्शन शोधण्यासाठी/त्याची बदनामी टाळण्यासाठी) किंवा तिच्यावर पाळत ठेवेल
दुसरीकडे,मिठबावकार त्या पानवल्या कडे चौकशी करून कुणीतरी बाई हे शोधतोय म्हणून सावध होईल आणि बॉसेसना इंफॉर्म करेल
पण मिठबावकर पानवाल्या पर्यंत
पण मिठबावकर पानवाल्या पर्यंत कसा पोचणार ?
आईचा खरंच काही रोल असेल का ह्या सगळ्यात ?
रागिणीला अचानक बातमी द्यायला सांगतात ते जरा ऑड आहे. अनुराधा बार समोर उभं राहून रागिणी बातमी देणार म्हणजे नको ते बोलून जाण्याची शक्यता जास्त.
अभय सातव ह्यात इतका गुंतला असेल असं नव्हतं वाटलं, तो पैसा पुरवत असेल किंवा जागा देत असेल हे असले धंदे करायला असंच वाटलं होतं. पण अशा सिडीज तो घरी का ठेवेल ? त्याला त्याचं बरं वाईट होईल अशी शंका होती ज्या अर्थी त्याने ते पत्र पाठवण्याची सोय करून ठेवली होती त्या अर्थी. गुप्त दरवाजा वगैरे भारी आहे एकदम.
रागिणीने कॅमेरासमोर नावानिशी
रागिणीने कॅमेरासमोर नावानिशी जाण्याचं जाणीवपूर्वक ठरवलेलं असणार असं मला वाटतंय.
पैसा पुरवत असेल किंवा जागा
पैसा पुरवत असेल किंवा जागा देत असेल हे असले धंदे करायला असंच वाटलं होतं. >> हो ना .
आणि ते पण त्या लहान मुलींबरोबर ? शी .आता रागिणी आणि पोलिसांचा तपास समांतर चालू राहील. पोलिसांना फक्त केस ची पाळ - मूळ खणून काढायची आहेत आणि गुन्हेगारांना शोधून काढायचं आहे पण रागिणीचा उद्देश मात्र गुन्हेगारांना शोधून बदला घेणं आहे हा या दोन शोधांमधला फरक . सगळ्यात शेवटी ती सापडेलच
त्या कोणाला' म्हणजे कोणाला? अ
त्या कोणाला' म्हणजे कोणाला? अ.सा. च्या वरची माणसं म्हणत असाल तर ती कोण आहेत हे प्रेक्षकांना माहित नाही अजुन. सो त्यांना प्रश्न पडला असेल तरी आपल्याला कळणार नाही.>>>> हो बरोबर चैत्रली.
पण मिठबावकर पानवाल्या पर्यंत
पण मिठबावकर पानवाल्या पर्यंत कसा पोचणार ?>>त्याच्या मोबाईल वर pco चा नंबर दिसलाय ,त्यावर कॉल बॅक करून
पण मिठबावकर पानवाल्या पर्यंत
पण मिठबावकर पानवाल्या पर्यंत कसा पोचणार ? >> विनी +१
पण मिठबावकर पानवाल्या पर्यंत
पण मिठबावकर पानवाल्या पर्यंत कसा पोचणार ? >> रागिणी त्याला काॅल करते तेव्हाच मिठबावकर त्याच्या माणसाला 'बघ रे हा फोन कुठून आलाय' वगैरे चौकशी करायला सांगतो. त्या नंबरचा माग घेत तो पानवाल्यापर्यंत पोहोचू शकतो.
रागिणीची दिसण्याची बोलण्याची वगैरे माहिती तो देऊ शकतो. पण रागिणीपर्यंत पोहोचणे अवघड आहे जर ती नेहमी त्या बाजूने जात नसेल तर.
पण रागिणीपर्यंत पोहोचणे अवघड
पण रागिणीपर्यंत पोहोचणे अवघड आहे जर ती नेहमी त्या बाजूने जात नसेल तर.
>> अर्थात. पण टीव्हीवर दिसायला लागल्यावर मात्र सगळ्यांच्या नजरेत येणे सहज शक्य आहे. पानवाल्याने ओळखून त्यांना कळवणे सुद्धा.
मागचे २ epi नाही पहिले पण
मागचे २ epi नाही पहिले पण रागिणी जर बातमी देणार असेल tv वर तर पोलीस पण ओळखेळच ना कि
अभय सातव जिथे पहिल्यांदा सापडला car मध्ये (live crime scene ) तेव्हा हीच रिपोर्टर म्हणून आली होती
(रागिणी तेव्हा कानातलं शोधायला गेली होती )
बाकी, इथेच कुणीतरी चाईल्ड
बाकी, इथेच कुणीतरी चाईल्ड पोर्नोग्राफीचा अंदाज वर्तवला होता, तो बरोबर निघाला.
अनुराधा हॉटेलच्या खाली बेसमेंटची शक्यता वर्तवलेली पाहून गेल्या वर्षीची ठाण्यातली एक केस आठवली. उपवन परिसरातलं वरवर साधंसं ८-१० रूम्सचं बी/सी ग्रेड हॉटेल होतं आणि त्याच्या खाली बेसमेंटमध्ये तब्बल २००+ खोल्या, (एसी, इतर सर्व सोयीसुविधांसकट) पोलिसांना सापडल्या होत्या. तेव्हा पोलीसही चक्रावले होते. आजकाल त्या केसबद्दल पेपरमध्ये काही छापून येत नाही.
उपवन परिसरातलं वरवर साधंसं ८
उपवन परिसरातलं वरवर साधंसं ८-१० रूम्सचं बी/सी ग्रेड हॉटेल होतं आणि त्याच्या खाली बेसमेंटमध्ये तब्बल २००+ खोल्या, (एसी, इतर सर्व सोयीसुविधांसकट) पोलिसांना सापडल्या होत्या. तेव्हा पोलीसही चक्रावले होते. आजकाल त्या केसबद्दल पेपरमध्ये काही छापून येत नाही.>>>>>>>>
वरचे पॉवरफुल लोक्स प्रत्य°क्षातही आहेत..
मॅनेजर मस्त होता, त्याला एकच
मॅनेजर मस्त होता, त्याला एकच डायलॉग मस्त दिलेला. मला काही माहीती नाही सर . फक्त दोन जणांना ओळखलं त्याने स रा आणि शिवा.
अपेक्षित स्टोरी. मला पेज ३
अपेक्षित स्टोरी. मला पेज ३ मूवी आठवलेली, त्यात लहान मुलांवर अत्याचार होते. मला ही सिरीयल सुरु झाल्यावर तेच वाटत होतं की लहान मुलांची तस्करी असणार.
मुक्ताला धोका जास्त नर्समुळे
मुक्ताला धोका जास्त नर्समुळे आहे. अ सा कडे पत्रकार म्हणून घुसली, बातमी मिळवायला हे ती सांगू शकते.
Pages