"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रागिणी भिरभिरी झाली आहे. मानसिक संतुलन ठीक नाहीये तिचं. त्यामुळे हे सगळं बरोबरच वाटतंय. ती एकदम प्रोफ्फेशनली आणि प्लॅन बिन करुन खुन पाडतेय हेच खरं तर पटलं नसतं.

रागिणी भिरभिरी झाली आहे. मानसिक संतुलन ठीक नाहीये तिचं. त्यामुळे हे सगळं बरोबरच वाटतंय. ती एकदम प्रोफ्फेशनली आणि प्लॅन बिन करुन खुन पाडतेय हेच खरं तर पटलं नसतं.>>>>> +1
सैरभर झालेय ती. आणि मुक्ता ने अप्रतिम अभिनय केलाय. ती एक सामान्य गृहिणी रागिणीच वाटते.

अरे हे कालच्या ( २९ ऑगस्ट ) रात्रीच्या एपिसोड बद्दल आज दुपारी लिहितेय . चालेल ना ?
मिताली जगतापाचं काम चांगलं आहे . पण मला नक्की माहिती नाही पण हॉस्पिटल मध्ये एवढी आरडाओरडी करतात का ? मी अर्थात प्रत्यक्ष असं कधी बघितलं नाहीये पण मालिकांमध्ये नेहमी असंच दाखवतात. रागिणीने " अभय सातव " चा काही काटा काढताना दाखवलाय तो प्रसंग अगदी अंगावर येतो . जबरदस्त . पण मला एक कळत नाहीये मुक्ताने हे सगळं हातात का घेतलं. ते कदाचित तिची ट्रीटमेंट चालू आहे आणि तिला ती हे जे काही सगळं करतेय ते तिला समजत नाहीये अशा अवस्थेत करतेय असं मालिका वाल्याना दाखवायचं आहे त्यामुळे तिला शिक्षा तर होईलच पण तिची मानसिक स्थिती चांगली नव्हती या आधारे तिला कमी शिक्षा झालेली दाखवतील . पण तिने कायद्याचा आधार घ्यायला पाहिजे होता असं राहून राहून वाटत राहत पण मग मालिकाच घडली नसती. पण एकंदर मालिका मात्र जबरदस्तच

तिने कायद्याचा आधार घ्यायला पाहिजे होता असं राहून राहून वाटत राहत>> ज्या बाबू ड्रायव्हरने पैसे घेऊन आशिषच्या गाडीवर त्याचा खून करण्यासाठी ट्रक घातला त्याचा "जेलमध्ये" पद्धतशीरपणे खून करून मग ती आत्महत्या भासवली गेली. कायद्याचा आधार घेऊ पाहण्या-या किर्तीकरांचा पण खून केला गेला मग तीने कायद्याचा आधार घ्यायचा ठरवला तरी ती कशी घेणार?? आधीच मारली नाही का जाणार ती??

कालचा भाग जाम अंगावर आला.
सीसीटिव्ही फुटेज बघितलं तरी मुक्ताला ओळखणं कठीण आहे असं मला वाटतं. कारण एकदा सीसीटीव्हीतून दिसणारं दृश्य दाखवलं तेव्हा मुक्ता मान खाली घालून आत जाताना दाखवलीय आणि तिचा एकंदर गेटअप 180 च्या कोनात बदलत असल्याने हिच ती रागिणी असं पटकन कोणी ओळखू शकेल असं नाही वाटतं.

कालच्या पियुच्या पोस्टला मम. रागिणीने लगेच खरं काय ते नको होतं सांगायला नर्सला.
काल ही तिने लगेच तिच्या channel वर कळवायची घाई का केली? तो सहकारी आल्यावर आपण नविन गेटप मधे आहोत हे तिचं तिलाच लक्षात आलं, वेळेवर. माझ्या ही लक्षात नव्हतं आलं..ती दचकुन मागे झाली तेंव्हाच मला strike झालं.

रागिणी खुप अडकत जाणारे यात व बाहेर पडणं, मागे फिरणं तिला आता मुश्किल आहे.

सस्मित बरोबर आहे. तिला plan करुन खुन करताना दाखवलं असतं तर ते पटलं नसतं..

<<<अरे फोडु नका ना. मी वाचले नाही वरचे तरीही. एक दिवस गॅप घेऊन मग चर्चा करा.

कांपो, एपिसोड बघितला नाही तर इथे येऊ नको ना Wink ह्या बाफचा उपयोग चर्चा करण्यासाठीच आहे ना? १-२ दिवसांनी डोक्यातून तो एपिसोड पूर्णपणे निघून गेलेला असतो Happy

कांपो, एपिसोड बघितला नाही तर इथे येऊ नको ना. ह्या बाफचा उपयोग चर्चा करण्यासाठीच आहे ना? १-२ दिवसांनी डोक्यातून तो एपिसोड पूर्णपणे निघून गेलेला असतो.

>> +१००
मी तर आज दुपारी टाकली होती पोस्ट. कालपासून लिहायचे होते पण दुपारपर्यंत थांबले ठरल्याप्रमाणे. आता तुमचा एपिसोडच मिस झाला तर इतरांनी लिहायचं नाही का त्यावर? Uhoh ऑलरेडी संपदा म्हणत आहेत त्याप्रमाणे तो भाग ताजा ताजा असतानाच्या भावनाही तेवढ्याच सच्च्या असतात. त्या आम्ही तुमच्यासाठी शिळ्या करून लिहितो. आता अजून काय करायचं?

करेक्ट पियू, इथे वाचून नवीन नवीन अँगल्स समजतात, आता तर दुसरा भाग सुरू होयची वेळ झाली. मी सुद्धा १०-१२ भाग झाल्यावर पहायला सुरूवात केली. तोपर्यंत धागा उघडलाही नव्हता. नंतर सगळी पानं वाचून काढली.

एपिसोड बघितला नाही तर इथे येऊ नको ना>> असे होत नाही ना. इथे लिहीले म्हणल्यावर वाचले जाते. असो.. तुम्हाला योग्य वाटते ते करा.

कांपो, एपिसोड बघितला नाही तर इथे येऊ नको ना Wink ह्या बाफचा उपयोग चर्चा करण्यासाठीच आहे ना? १-२ दिवसांनी डोक्यातून तो एपिसोड पूर्णपणे निघून गेलेला असतो Happy >>>+11111111

कालचा एपिसोड जास्त आवडला. निराश, हताश रागिणी मुक्ताने खूप छान उभी केली. तिच्या दृष्टीने हे प्रकरण इथेच संपलेय आणि आशीष का मारला गेला हे समजण्याची शक्यता धूसर झालीय. तिला परत जे जुने आठवतेय त्यातून कदाचित काही लिंक लागेल. फोटो त्यासाठीच पाहतेय ती आता.

अभय सातवची बायको सुरवातीपासून डेनायल मोड मध्ये आहे. हॉटेलतली त्याची स्पेशल रूम उघडली की जे काही बाहेर पडेल त्यावर ही बाई कसा विश्वास ठेवणार? आपण ज्यांना खूपच जवळचे समजतो त्यांच्या आयुष्यात आपल्याला माहीत नसणारे काही असणे एकवेळ ठीक, पण ते आपल्यालाच उध्वस्त करणारे असेल तर किती मोठा धक्का असेलतो. तिला असाच धक्का बसणार आहे, आणि तेही ती सगळेच नाकारत असताना.

खूप उत्तम अभिनय केलाय मिताली जगतापने. आधी नवऱ्याला प्रश्न विचारताना व नंतर त्याची दुखापत पाहून, तिचा विश्वास नाही बसत तो गेल्याचे. ते फार उत्तम दाखवले तिने. नर्सनेही छान काम केलंय. तिला अजून इंस्पेक्टरने प्रश्न विचारले नाहीत, आज घेईल तिला इंटेरोगेशनला बहुतेक. पण तिच्याकडे काहीच नाहीय जे रागिणीपर्यंत पोलिसांना पोचवेल.

नर्सनेही छान काम केलंय. तिला अजून इंस्पेक्टरने प्रश्न विचारले नाहीत, आज घेईल तिला इंटेरोगेशनला बहुतेक. >>>>> पण कदाचित ती रागिणीला साध्या वेषात ओळखू शकेल, तिने तसं जवळून पाहिलं आहे रागिणीला.

ह्या बाबतीत पुरूषांना वेष स्पेशली चेहरा दाढी मिशा वापरून चांगलाचं बदलता येऊ शकतो, रागिणीने विग वापरला तरी चेहरा फारसा वेगळा नाही होत.

अभय सातवची मुलगी हुषार आहे.

अभय सातव च्या मुलीने मामाला सांगितलं कि काही काही फोन आले कि बाबा आमच्या पासून लांब जाऊन बोलत असत. तेव्हा तिच्या आईने मात्र तिला झापलं आणि भावाला सांगितलं तिच्या कडे लक्ष देऊ नको म्हणून. नवरा असं का वागत होता याचा तिला संशय आला नाही का ? का आला असून नाही त्याच बाहेर काहीतरी वेगळं प्रकरण नव्हतं याच मोड मध्ये ती आहे. दरवेळी बाईचं प्रकरणच असेल असं नाही आणखीन काही वेगळं असू शकत हे तिच्या लक्षात येत नाहीये का ?

मला वाटतं तिचा भाऊ सारखं सारखं बाई बाई करतोय त्यामुळे ती अशा मोड वर जात्ये. का तिलाही काहीतरी माहीत आहे पण नवर्‍याची बदनामी नको म्हणून भावाला सांगत नाहीये ?

आजच्या भागात मुक्ता अभयच्या घरी कशी काय घुसल्ये ? पत्रकार मुलाखत घेऊ शकतात एक वेळ, पण गुप्तहेरांसारखं घरात घुसून पाहणी ?

मला वाटत होत काल तिला स रा मरताना "आबा" म्हणतो ते कळेल, अजून वेळ आहे वाटतं ते समजायला.

न्यूज चॅनलचा रिपोर्टर सुद्धा मस्त काम करतोय. परवाच्या भागात त्याने मुक्ताला मस्त विचारलं, इतका वेळ आत का होतीस वगैरे.

कांदेपोहे आणि भान.. तुम्हाला भारतातली दुपार म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार किती वाजतानंतर चर्चा अपेक्षित आहे हे सांगाल का?

अभय सातवची बायको सुरवातीपासून डेनायल मोड मध्ये आहे. हॉटेलतली त्याची स्पेशल रूम उघडली की जे काही बाहेर पडेल त्यावर ही बाई कसा विश्वास ठेवणार?

>> आपल्या नवऱ्याचे उत्पन्नाचे काही बेकायदेशीर स्रोत आहेत याची तिला कल्पना आहे असं मला वाटतं. म्हणजे अगदी रॅकेट बिकेट नाही पण काहीही छोटेमोठे. ती काल तिच्या भावाला "तुमच्यासाठी उदंड ठेवलं आहे.." असं काहीतरी अभय सातवच वाक्य सांगताना थबकते आणि लगेच विषय बदलून "तू त्या बाईला शोधून काढ" असं भाऊ कम पोलिसाला सांगते.

प्राजक्ता शिरीन आणि सुजाला अनुमोदन. अभय सातवची मुलगी हुशार आहे. नर्सला आता कसलीच भीती वाटत नाहीये. बायको डिनायल मोड मध्ये आहे. खुद्द अभय सातवला स्वतःच्या काळ्या धंद्यांमुळे पोलीस मेव्हण्याला काहीच सांगता आले नाही, बायकोने वेळीच सिरियसनेस समजून न घेता अभयच्या हातात त्याचा किंवा तिचा स्वतःचा फोन दिला नाही या गोष्टींमुळे रागिणी आज जिवंत दिसतेय.

काल "पुढील भागात" मध्ये रागिणी सरळ अभय सातवच्या घरी जाऊन त्याचे ड्रॉवर्स चेक करताना दाखवली आहे आणि अभयच्या चुणचुणीत मुलीने तिला रंगेहाथ पकडलेले पण दाखवले आहे. आधी स्वतःच्याच जीवाला धोका असताना अभय सातवला मारण्याची घाई आणि त्या घाईत, खुनाचा अनुभव नसताना रागिणीने केलेल्या चूका जरातरी जस्टीफाय होत होत्या. पण आतातरी एक प्रकरण मिटवल्यावर पुढच्या स्टेप्स विचार करून घ्याव्यात एवढं तरी रागिणीला कळावं एवढी माफक अपेक्षा आहे. तिला मानसिक उपचारांची गरज आहे पण ती ठार वेडी तर नाहीये ना? मग अजूनही ती इतक्या चुकीच्या स्टेप्स इतक्या इम्पलसिव्हली घेतेय हे मला डायजेस्ट होत नाहीये. एखाद्या विचाराने झपाटलेली माणसं सुद्धा यापेक्षा थोडा रॅशनल विचार करू शकतात (हेमावैम). बहुतेक मालिकेत आणि रागिणीत फार गुंतल्याचा परिणाम असावा Happy

खुनाचा अनुभव नसताना रागिणीने केलेल्या चूका जरातरी जस्टीफाय होत होत्या. पण आतातरी एक प्रकरण मिटवल्यावर पुढच्या स्टेप्स विचार करून घ्याव्यात एवढं तरी रागिणीला कळावं एवढी माफक अपेक्षा आहे. तिला मानसिक उपचारांची गरज आहे पण ती ठार वेडी तर नाहीये ना? मग अजूनही ती इतक्या चुकीच्या स्टेप्स इतक्या इम्पलसिव्हली घेतेय हे मला डायजेस्ट होत नाहीये. एखाद्या विचाराने झपाटलेली माणसं सुद्धा यापेक्षा थोडा रॅशनल विचार करू शकतात >>>>>+१

कांदेपोहे आणि भान.. तुम्हाला भारतातली दुपार म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार किती वाजतानंतर चर्चा अपेक्षित आहे हे सांगाल का? >>>>> पियू मी ""कांपो, एपिसोड बघितला नाही तर इथे येऊ नको ना Wink ह्या बाफचा उपयोग चर्चा करण्यासाठीच आहे ना? १-२ दिवसांनी डोक्यातून तो एपिसोड पूर्णपणे निघून गेलेला असतो Happy" " ह्याला अनुमोदन दिलं आहे.

ऊप्स.. सॉरी भान.

तरीही मला कांपो यांना अपेक्षित असलेली वेळ कळली तर मी तेवढी कळ काढायचा प्रयत्न करेन म्हणून विचारलं.

बाय द वे याही मालिकेत (झीच्या मालिकांसारखे) कधीकधी (मला वाटतं दुसऱ्या ब्रेकनंतर) हार्डली एक मिनिट सीन दाखवून लगेच पुन्हा ब्रेक सुरू होतो. वैतागायला होते तेव्हा.

रागिणीला आशिष्चे कळल्यापासून मॅनिया झालाय ज्याचे निदान डॉकटरानी आधीच केलेय. तिला सातवकडून का मारले याचे उत्तर हवे होते, जे मिळाले नाही व त्या भानगडीत तिच्या लक्षात येण्याआधीच तो मारला गेला. त्यामुळे ती अजून डेसपरेट झालीय, आता सातावच्या घरात शिरली तर नवल नाही. काल नर्सला उद्देशून ती काहीतरी म्हणते पॅशन असलेला माणूस कसा वागेल ते, मला नेमके आठवत नाही पण तो संवाद तिची मनस्थिती दाखवतोय. तिला मारले जाणे, पकडले जाणे याऐकी कशाचीही भीती नाहीय आता.

एखाद्या विचाराने झपाटलेली माणसं सुद्धा यापेक्षा थोडा रॅशनल विचार करू शकतात >> मान्य पण आणि मान्य नाही पण Happy
प्रत्येक केस किव्वा व्यक्ती वेगवेगळा विचार करू शकते
मी भलीमोठी पोस्ट टंकेपर्यंत एवढ्या पोस्ट आल्या आणि मला जे म्हणायचं आहे तेच वर सगळे म्हणालेत.>>पियू Lol
तिला मारले जाणे, पकडले जाणे याऐकी कशाचीही भीती नाहीय आता.>> साधना + १११

सध्या तरी रागिणीच्या मते अभय सातवच मुख्य सुत्रधार आहे. तो फक्त एक मामुली कडी होता हे तिच्या इंपल्सिव नेचरमुळे तिला अजुन लक्शात आलं नाहिये. त्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती काढायला ती कोणत्याही लेव्हलला जाउ शकते. साधना यांच्या म्हण्याप्रमाणे तिला मारले जाणे, पकडले जाणे याऐकी कशाचीही भीती नाहीय आता. फक्त लवकरात लवकर तिला तिच्या नवयाचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करायचं आहे. आणि तो जी माहिती लोकांसमोर आणु इच्चित होता ती आणणे हे आहे.

सध्या तरी रागिणीच्या मते अभय सातवच मुख्य सुत्रधार आहे. तो फक्त एक मामुली कडी होता हे तिच्या इंपल्सिव नेचरमुळे तिला अजुन लक्शात आलं नाहिये. त्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती काढायला ती कोणत्याही लेव्हलला जाउ शकते. >हे ही बरोबरच आहे.
तिला मारले जाणे, पकडले जाणे याऐकी कशाचीही भीती नाहीय आता.>>मान्य. +१

Pages