Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
OZEE app वर बघता येईल. मी पण
OZEE app वर बघता येईल. मी पण ओझीवरच बघते.
पियू, प्लीजच तुम्ही वगैरे नको, तू म्हण.
मी अजून कालचा भाग पाहिला नाही. त्यामुळे बोलता येत नाही.
मी आपलीमराठी वर बघते.
मी आपलीमराठी वर बघते.
Desitvflix.com
Desitvflix.com
पण शिवा म्हणतो ना.. "मी
पण शिवा म्हणतो ना.. "मी मुद्दाम दरवाजे बंद करत नाही कधीच." >>> ते पण लेमच वाटलं ! आजकालच्या कुठल्या घरांना फक्त कड्या-कुलूपं असतात ? लॅच असतं. दार नुसतं ओढून घेतलं की आपोआप लॉक होतं. कुलूप लावावं लागत नाही.
तो दार उघडंच ठेवून जातो कारण आजूबाजूच्यांना माहीतेय इथे कोण राहतं आणि ते आत यायची हिंमत करत नाहीत हे फारच विनोदी आहे. त्याच्यासारख्या अवैध कामात गुंतलेले तर एस्पेशली असं दार उघडं टाकून जाणार नाहीत कुठे.
गंमत म्हणजे हे टाळणं सहज शक्य होतं...
दार अनलॉक ठेवण्याचं
दार अनलॉक ठेवण्याचं एक्सप्लनेशन अजिबातच न पटण्यासारखं होतं.
तसंच चंदूदादा आणि रागिणीची आधीची काय ओळख असेल हा गेस ही कळत नाहीये. मालिकेचं नाव आणि आत्तापर्यंतच्या घटना यांचाही ताळमेळ बसवता आलेला नाही. याचा अर्थ मालिका प्रेडीक्टेबल होत नाहीये असा चांगला काढावा काय?
'रुद्रम'चा अर्थ काय?
'रुद्रम'चा अर्थ काय?
'रुद्रम'चा अर्थ काय? >>>>
'रुद्रम'चा अर्थ काय? >>>> आम्हीही काल हाच विचार करत होतो. मालिकेचं नाव रुद्रम का?
दार अनलॉक ठेवण्याचं एक्सप्लनेशन अजिबातच न पटण्यासारखं होतं. >>>> अनुमोदन. शिवाला संशय आला म्हणून तो परत आला वगैरे काहीतरी दाखवता आलं असतं.
बाकी भारतात्ल्या मंडळींनो, एपिसोड झाल्या झाल्या (मध्यरात्री) त्या एपिसोडबद्दल इथे लिहिणं टाळाल का ? आम्ही आमच्या रात्री म्हणजे भारताच्या दुसर्या दिवशी सकाळी बघतो आणि त्या आधी माबोवर चक्कर झाली आणि ह्या बाफवर पोस्टी दिसल्या तर वाचल्या नाहीत असं होत नाही. मग कधी कधी काय होणार आहे हे आधीच कळतं. जसं की छाया मरणार..
रागिणीची पर्स उचकताना शिवाने
रागिणीची पर्स उचकताना शिवाने काही असं तर काढलं नसेल जे रागिणी पुन्हा पर्समध्ये घ्यायला विसरली>> ही भीती आहेच पण पोलिसांना सापडणं दूर ते संदीपच्या हातात मिळू नये.
दार अनलाॅक ठेवणं खरंच येडपटपणाचं दाखवलं.
पराग, समजू शकते कारण मीच एपिसोड फार उशीरा बघते. छाया मरणार हे मी सुद्धा आधी इथे वाचलं नंतर तो भाग पाहावासा वाटतंच नव्हता. काही स्पाॅयलर आधीच कळले की मग बघायला कंटाळा येतो.
सॉरी पराग. यापुढे नक्की
सॉरी पराग. यापुढे नक्की लक्षात ठेवेन.
मागच्या पानांवर लिहिल्याप्रमाणे मालिकेत फार गुंतलेली असल्याने १० ला भाग संपला रे संपला कि त्याविषयी इथल्या मालिका आवडणार्या लोकांशी शेअर करावेसे वाटते. पण हा अँगल लक्षात नव्हता आला. मी भारतातल्या दुसर्या दिवशीच्या सकाळनंतर लिहीत जाईन यापुढे.
बाकी भारतात्ल्या मंडळींनो,
बाकी भारतात्ल्या मंडळींनो, एपिसोड झाल्या झाल्या (मध्यरात्री) त्या एपिसोडबद्दल इथे लिहिणं टाळाल का ? >> हो
माझ्याकडून मान्य
एक्सलंट एपिसोड. एवढंच लिहीते
एक्सलंट एपिसोड. एवढंच लिहीते, बाकी उद्या.
धन्यवाद अंजू..... परागला मम
धन्यवाद अंजू..... परागला मम
सुहास पळशीकर अभिनय करताना
सुहास पळशीकर अभिनय करताना चंदूदादाच वाटतो, इतकी सहज त्याची डायलॉग डीलीव्हरी आहे. नाहीतर हल्ली प्रत्येक अक्षरावर नको तितका जोर देत अभिनय करायची फॅशन आलीये असं वाटतं.
मुक्ताला अशा भूमिकेत पहिल्यांदाच बघतेय त्यामुळे ती आणखीनच आवडलीये
बाकी भारतात्ल्या मंडळींनो,
बाकी भारतात्ल्या मंडळींनो, एपिसोड झाल्या झाल्या (मध्यरात्री) त्या एपिसोडबद्दल इथे लिहिणं टाळाल का ? >> +१०१
मुक्ताचे काम तुफान आहे. मजा येते आहे ही मालिका बघताना.
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
आजचा एपिसोड खरच भारी. मुक्ताचे बदलणारे मूड भारी दाखवले आहेत.
कालचा एपिसोड भारी होता.
कालचा एपिसोड भारी होता. (मलाही क्षणभर वाटलं- असं तर आपणही रिव्हॉल्वर चालवू शकू. )
ते माणसांचं निरिक्षण वगैरेही भारी दाखवलं; म्हणजे मराठी मालिकेच्या मानाने तर एकदमच!
पॉलिसीवाल्याचा एक संवाद जरा चुकला ना? तो म्हणतो- पॉलिसीचा हप्ता बराच मोठा आहे; तुम्हाला जमणारे का दर महिन्याला भरणं? - पण हा मुद्दा पॉलिसी काढायच्या आधीच विचारात घेतला जातो ना?
माझा विगचा अंदाजही बरोबर ठरला. विग चढवून आरश्यात पाहिल्यावर आपलं रूप केवढं बदललंय याचं आश्चर्य मुक्ताने फक्त एका सेकंदातल्या चेहर्यातल्या बदलाने दाखवलं.
भारी आहे ही मालिका.
भारी आहे ही मालिका.
मोहन आगाशेंच्या भूतकाळात काही तरी घडले असावे आणि ते त्याचा बदला मुक्तामार्फत घेत असावेत असे मला वाटू लागले आहे कालपासून. त्यांची ट्रीटमेंट सुरू झाल्यापासूनच मुक्ताच्या व्यक्तिमत्वात खूप बदल घडलाय.
सगळ्यांची भाषा शहरी पांढरपेशी आहे ते मला आवडले. मालिकेत भाषेच्या लहेजावर (तो अंगभूत असल्याशिवाय) काम करण्याइतका वेळ मिळत नसावा बहुतेक. लेखकाचे बेअरींग पण पुढे पुढे सुटते आणि मग ते खूपच खटकते. त्यापेक्षा साधी सरळ भाषा चांगली वाटली.
मलाही तोचं प्रश्न पडला होता
मलाही तोचं प्रश्न पडला होता की चंदूकाका आणि मुक्ताची ओळख कशी काय ? मला वाटलं ते मि मिसलं. इथली चर्चा वाचून काल १२ भाग ओझी वर सलग पाहिले. कलाकार फिट बसत आहेत रोल मधे, मजा येत्ये.
"तुम्हाला मदत मागायला" का
"तुम्हाला मदत मागायला" का "तुमची मदत मागायला" ?
"तुम्हाला मदत मागायला" का
"तुम्हाला मदत मागायला" का "तुमची मदत मागायला" ?>> माझ्या कानांना पण ते खूपच खटकलं. मुक्ताकडून ऐकल्यामुळे जास्तच.
पण असंच मराठी हल्ली अनेक ठिकाणी ऐकायला मिळतं.
माझी/तुझी मदत, नको हवं होतं (हे फार फार डोक्यात जातं) अजूनही बरेच वाक्यप्रयोग आहेत.
काल आमच्याकडे युवाचं
काल आमच्याकडे युवाचं प्रक्षेपण गंडलं होतं त्यामुळे ती जिमला जायला लागते त्यापुढचं काहीच बघायला मिळालं नाही आज सकाळी रिपीट लावले तेव्हाही तेच. आता बहुतेक ओझीवर बघावे लागेल.
कालचा भाग मस्त!
कालचा भाग मस्त!
विग चढवून आरश्यात पाहिल्यावर आपलं रूप केवढं बदललंय याचं आश्चर्य मुक्ताने फक्त एका सेकंदातल्या चेहर्यातल्या बदलाने दाखवलं.>> +1. किती पटकन चेहरा बदलला तिचा. मस्त.
चंदूदादा पण एकदम भारी.
कालचा भाग सर्वात आवडला. एकेक
कालचा भाग सर्वात आवडला. एकेक टप्याटप्याने चंदूदादा शिकवत होते आणि मुक्ता आकलन करत होती. मस्तच. अगदी बारीकसारीक गोष्टीही सांगितल्या त्यांनी.
मला वाटलय की त्या 'आबा'
मला वाटलय की त्या 'आबा' खेळण्यात काहीतरी क्लू असेल. तो सतिश राजवाडे मरताना 'बाबा' म्हणतो असं मुक्ताला वाटतय, ते आबा असेल. >>> झेलम,तूमचा तर्क बरोबरही असू शकेल कारण त्या खेळण्याबद्दल अगदी व्यवस्थित चर्चा दाखवलीय, शिवाय ते कुठल्याशा संस्थेत रागिणी देते,तेही दाखवलंय, त्यात स रा ने लॉकर ची चावी वगैरे ठेवली असावी
कालचा भाग मस्त होता, कालच्या भागातील मुक्ताचं ट्रेनिंग आणि नंतर ते दोघे रस्त्यावरच्या लोकाना observe करतात ,ते बघताना नाम शबाना ची आठवण झाली
विग चढवून आरश्यात पाहिल्यावर
विग चढवून आरश्यात पाहिल्यावर आपलं रूप केवढं बदललंय याचं आश्चर्य मुक्ताने फक्त एका सेकंदातल्या चेहर्यातल्या बदलाने दाखवलं.>> हे
कधी झालं ?मधेच स्वैपाकघरात गेल्यामुळे मिसलं बहुतेक.
मला अजुन एक भिती वाटतेय, संदिप पाठक ने चंदुदादाचं घर तर बघितलय, तर त्याला धोका नाही का?
झेलम,तूमचा तर्क बरोबरही असू
झेलम,तूमचा तर्क बरोबरही असू शकेल कारण त्या खेळण्याबद्दल अगदी व्यवस्थित चर्चा दाखवलीय, शिवाय ते कुठल्याशा संस्थेत रागिणी देते,तेही दाखवलंय, त्यात स रा ने लॉकर ची चावी वगैरे ठेवली असावी
कालचा भाग मस्त होता, कालच्या भागातील मुक्ताचं ट्रेनिंग आणि नंतर ते दोघे रस्त्यावरच्या लोकाना observe करतात ,ते बघताना नाम शबाना ची आठवण झाली
>>> हो विनी. म्हणूनच वाटतय. अगदी डीटेल मध्ये दाखवलय ते खेळणं. आणि सरा कुणाला वाचवण्याबद्दल सांगणार असेल तर आधी मुलाचं नाव घेईल ना?
हो ,मला तो सीन बघताना वाटलेलं
हो ,मला तो सीन बघताना वाटलेलं तो बाबा का म्हणतोय
मला वाटलय की त्या 'आबा'
मला वाटलय की त्या 'आबा' खेळण्यात काहीतरी क्लू असेल. तो सतिश राजवाडे मरताना 'बाबा' म्हणतो असं मुक्ताला वाटतय, ते आबा असेल. >>> हां. हे असू शकतं.
आधी कुठे लिहिलेलं मी मिसलं वाचायचं.
'रुद्रम'चा अर्थ काय? >>>>
'रुद्रम'चा अर्थ काय? >>>> आम्हीही काल हाच विचार करत होतो. Happy मालिकेचं नाव रुद्रम का?>>> शन्कर जेव्हा रागात असतो तेव्हा रुद्रावतार धारण करतो अस म्हणतात. सो, मुक्ता त्याच रागाच्या भरात सूड घेताना दाखवलीये म्हणून मालिकेचे नाव रुद्रम असावे.
दुसरा अर्थ- मुक्ताचा नवरा करत असलेल्या समाजोपयोगी कामाचे नाव मिशन रुद्रम किव्वा operation रुद्रम असेल. मुक्ताच्या सुडनाटयाचे नाव सुद्दा असू शकते.
मला वाटलय की त्या 'आबा'
मला वाटलय की त्या 'आबा' खेळण्यात काहीतरी क्लू असेल. तो सतिश राजवाडे मरताना 'बाबा' म्हणतो असं मुक्ताला वाटतय, ते आबा असेल. >>> वॉव, ग्रेट निरीक्षण. घरी आबा ठेवला असता तर बरं झालं असतं, आई सांगत असते.
Pages