आत्ममग्न कविता

Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 August, 2017 - 01:40

आत्ममग्न कविता

( कविता लिहिता लिहिता कितीही त्रयस्त दृष्टीकोण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी कुठेतरी संस्कार किंवा जगण्याचे एकमेकांना चिकटलेले संदर्भ न कळत कवीला फसवत असावेत असे वाटले म्हणून हा काव्य प्रपंच )

एक कविता लिहावी
माझी माझ्यासाठी
बंधमुक्त , रंगहीन
असच सारं गाठी

थेंब असावा स्वतंत्र तळयात
गर्दीच्या गर्भी नांदावा एकांत
नग्न छकुले नाचावे घरभर
फूल ताटीत , दरवळे परीसर

संस्काराचे ओझे फेकून
संदर्भाचे धागे तोडून
खळाळत मुक्त सरीते परी
वाट स्वतःची स्वतः करी

जन्मापासून केली हमाली
जात, धर्म, नात्यांची दलाली
अशी आशयघन नसली तरी
आत्ममग्न असलेली बरी

दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Use group defaults

पहिल्या चार ओळी आवडल्या. खरच सगळं कसं रंगहीन असतं आणि बंधमुक्त असण्याची अपेक्षा चुकीची नाही. पु.ले.शु.

कुणाला काय वाटेल आपली कविता वाचून हा विचार भिरकावून ...एकदातरी कविता मुक्तपणे उतरायला हवी आत्मलयीशी एकरुप होवून ,असा विचार बरेच वेळा मनात
येतो खरा..

स्वमग्न म्हणजे autistic. आपल्याला बहुतेक आत्ममग्न हा शब्द वापरायचा आहे.

चिनूक्सजी खूप , खूप धन्यवाद . मी हा शब्द समानार्थी समजत होतो . पुढील लिंक त्यावर अधिक प्रकश टाकते .
https://www.google.co.in/amp/m.maharashtratimes.com/editorial/column/nas...
तीत म्हटले आहे बासरी वाजवणारा वाजवण्या आधी स्वमग्न असतो व तो त्या सुरांची अनुभूती घेतो म्हणजे आत्ममग्न होतो तेव्हा ते इतरांच्या पर्यंत पोहचतात .
योग्य तो बदल करत आहे . पुनश्च धन्यवाद.

फार छान कविता...
असंच असावं आत्ममग्न
शोधणं स्वतःला.
हळूवार त्या मोकळ्याने
व्यक्तावं स्वतःला !