माझ्यासाठी

आत्ममग्न कविता

Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 August, 2017 - 01:40

आत्ममग्न कविता

( कविता लिहिता लिहिता कितीही त्रयस्त दृष्टीकोण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी कुठेतरी संस्कार किंवा जगण्याचे एकमेकांना चिकटलेले संदर्भ न कळत कवीला फसवत असावेत असे वाटले म्हणून हा काव्य प्रपंच )

एक कविता लिहावी
माझी माझ्यासाठी
बंधमुक्त , रंगहीन
असच सारं गाठी

थेंब असावा स्वतंत्र तळयात
गर्दीच्या गर्भी नांदावा एकांत
नग्न छकुले नाचावे घरभर
फूल ताटीत , दरवळे परीसर

संस्काराचे ओझे फेकून
संदर्भाचे धागे तोडून
खळाळत मुक्त सरीते परी
वाट स्वतःची स्वतः करी

प्लीज माझ्यासाठी

Submitted by pkarandikar50 on 26 February, 2016 - 02:17

प्लीज माझ्यासाठी

भूताच्या पायाची बोटे असतात, उफराटी.
भूताला सावली नसते म्हणे, अजिबात.
लहानपणी अगदी ठाम, ठसलेली समजूत.

आता वाटते, तेंव्हा विचारायला हवे होते,
'भूतांचे, एक वेळ ठीक, पण देवादिकांचे काय?
देवांच्या पायाला किती बोटे?
त्यांची सावली किती लांब?'

मला कधी भूत नाही दिसले, ना देव कुठे भेटला,
तुम्हाला दिसलेय का भूत, केंव्हा?
किंवा, निदान, गेला बाजार, देव तरी?
पडलीच चुकूनमाकून गाठ कुठे,
तर एव्हढी माहिती काढाल का,
प्लीज माझ्यासाठी?

बोलता आले तुम्हाला देवाच्या सावलीशी,
तर विचाराल का तीला,
प्लीज माझ्यासाठी?

Subscribe to RSS - माझ्यासाठी