खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द

Submitted by संयोजक on 2 September, 2017 - 10:34

खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.

काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

पाचवा विषय : जरा अवघड घेऊ या का ?
तांत्रिक/ शास्त्रीय शब्द
(शास्त्रीय आणि तांत्रिक संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द)

पहिला क्लू :
आहे एक साधेसेच यंत्र पण हिच्या सहाय्याने पृथ्वी पण उचलून दाखवेन असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणाला होता! ३ अक्षरी.
- - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरफ

तरफ

गणितातल बहुपदी काय आहे ते पन सांगाल का ? शास्त्रीय झब्बू असल्यामुळे जर का कुणाचा त्या विषय शी संबंध आला नसेल किंवा आठवत नसेल / माहिती नसेल तर कळत नाही । जर का उत्तर काही अवघड असेल तर थोडक्यात त्याचा अर्थ पन द्या plz ( नियमात बसत असेल तर ...)

नियमात बसेल की नाही, माहीत नाही --- बहुपदी म्हणजे Polynomial
अशा प्रकारची समीकरणे असायची बीजगणितात (Algebra) ----- x2 − 4x + 7. किंवा x3 + 2xyz2 − yz + 1.

कोडे ३ ---- ६ अक्षरी // याची दोन रूपे आहेत, आपल्या आपल्या सोयीने शास्त्रज्ञ वापरतात
क्ल्यू २ -- हा पूर्ण अंतर्मुख झाला की आभास होतात.
क्ल्यू ३ -- एका रूपत बिलियर्ड्स खेळतो, दुसर्‍या रूपात झेब्रा क्रॉसिंग आखतो

वर्णमापक
नाभीय अंतर
बहिर्गोल भिंग
अंतर्गोल भिंग
प्रकाशचित्रण

अश्विनी के, उत्तर १, उत्तर २ त्याचे सवंगडी + एक रूपडं आहेत; उत्तर ३ आवळाजावळा भाऊ; पण जवळ आलात.
तो कॅमेराचा जिगरी दोस्त आहे,

खरंय..... मराठी नाही आठवत पटकन आणि खात्रीही करावी लागते जे अपेक्षित आहे त्याबद्दलच बोलतोय

२ अक्षरी.
२ प्रकार असतात याचे.
एका प्रकारात सावकार आणि कर्ज घेणारे तयार करतो.
दुसरा प्रकार म्हणजे एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ
Happy

अजून क्लू :
यात सामील होणारे स्वतः ला विसरून जातात Happy पूर्वी आपण कसे होतो काय होतो काही लक्षात रहात नाही

नाही, अवनी Happy
पण पहिल्या प्रकाराच्या आसपास आहेस

बंध

Pages