खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
पाचवा विषय : जरा अवघड घेऊ या का ?
तांत्रिक/ शास्त्रीय शब्द
(शास्त्रीय आणि तांत्रिक संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द)
पहिला क्लू :
आहे एक साधेसेच यंत्र पण हिच्या सहाय्याने पृथ्वी पण उचलून दाखवेन असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणाला होता! ३ अक्षरी.
- - -
वारंवारता आलेख बरोब्बर !
वारंवारता आलेख बरोब्बर ! किंवा वारंवारता सारणी
अंदाजपंचे....
अंदाजपंचे....
मी आजारी नाहीये, पण खंगत चाललोय. पण डॉ म्हणतात काळजीचे कारण नाही. वजनावर लक्ष ठेवायला सांगितलेय. एक ठराविक आकडाही दिलाय. तिथवर खाली आले, की आपोआप बरा होशील. नंतर वजन वाढले नाही, तरी उगाचच खालीही नाही जाणार म्हणाले.
मी कोण? (५+४)
भारी clue
भारी clue
कोणते शास्त्र ??
geostationary satellite ?
geostationary satellite ?
भूस्तरणीय (??) उपग्रह
किरणोत्सारी मूलद्रव्य?
किरणोत्सारी मूलद्रव्य?
उपग्रह नाही, सोनू ;
उपग्रह नाही, सोनू ;
शास्त्रे --- जीव, भौतिक, रसायन सगळीच.
आणि एक तक्रार, मला आधीच त्रास होतोय तर डॉ "मदतीला येत जा माझ्या" म्हणतायत. बरा झाल्यावर नाही आलास तरी चालेल म्हणे. माणुसकी नाही अजिबात. डॉ बदलू का????? कोतबो.
बरोबर अश्विनी के द्या पुढचे
बरोबर अश्विनी के द्या पुढचे
कुणीतरी द्या पुढचे कोडे. आता
कुणीतरी द्या पुढचे कोडे. आता बराच वेळ डोकावू शकणार नाही. आत्ता ५ मिनिटंच येवू शकलेय.
पुढचा clue देऊ का ?
पुढचा clue देऊ का ?
प्रकाशाच्या तरंगलांबीनुसार क्रमवार मांडणी
वर्णपट
वर्णपट
बरोब्बर !!
बरोब्बर !!
मी एक देऊ?
मी एक देऊ?
एकदम गमतीशीर संस्थेचे तसेच गमतीशीर दोरे.
४ अक्षरी.
उल्कापात ??
उल्कापात ??
अॅबेकस?
अॅबेकस?
जीवशास्त्र
जीवशास्त्रातले दोरे.
क्रोमोसोम ???पण मराठीत काय
क्रोमोसोम ???पण मराठीत काय
गुणसुत्रे ना ती?
गुणसुत्रे ना ती?
पण हे दोरे गमतीदार आहेत. ज्या संस्थेत बांधलेत ती ही गमतीदार.
गुणसूत्र
गुणसूत्र
मज्जारज्जू
मज्जारज्जू
हुम्म... मज्जातंतू
हुम्म.... मज्जातंतू
मज्जारज्जू व मज्जातंतू दोन्ही
मज्जारज्जू व मज्जातंतू दोन्ही बरोबर.
माझ्या मनात मज्जारज्जू होते.
अच्छा, मज्जा म्हणून गमतीशीर..
अच्छा, मज्जा म्हणून गमतीशीर....... मी हायड्रा, जेलीफिश करत बसले...
द्या पुढचं कोणीतरी
द्या पुढचं कोणीतरी
सोडवण्यापेक्षा कोडी देणे सोपे
सोडवण्यापेक्षा कोडी देणे सोपे
अजून एक
- फार पूर्वी कामाची होतं हे शेपूट. आता राहिली तर सूत नाहीतर भूत. त्रास दिला तर सरळ कापून काढा ते शेपूट.
अॅपेंडिक्स // आंत्रपुच्छ
अॅपेंडिक्स // आंत्रपुच्छ
पूर्वी कामाचं म्हणजे....... माकड असताना?
आंत्रपुच्छ - बरोबर.
आंत्रपुच्छ - बरोबर.
मेंदूचा मित्र,
मेंदूचा मित्र,
वर्गातला हुषार विद्यार्थी, मी; पहिल्या ओळीत, दुसर्या रांगेत असंच बसायला आवडतं.
हुशार असलो, तरी देऊन टाकण्याच्या बाबतीत दिलखुलास
थोडा तापट मात्र, सहज कुणी शेकहँड नाही करू शकणार
मोकळ्या हवेत खेळता येत नाही; सुगंधी (?) निळ्या द्रवातून जगाकडे बघत बसतो टुकुटुकु
किती अक्षरी ?
किती अक्षरी ?
अरे, विसरले..... ४ अक्षरी
अरे, विसरले..... ४ अक्षरी
मूलद्रव्य आहे का ?हेलियम
मूलद्रव्य आहे का ?हेलियम ऑक्सिजन वगैरे
वर्गातला हुषार विद्यार्थी, मी; पहिल्या ओळीत, दुसर्या रांगेत असंच बसायला आवडतं.>> म्हणून मला वाटलं आवर्त सारणी प्रमाणे कि काय
Pages