"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'रुद्रम'चा अर्थ काय? >>> मी पण विचार करतेय. रुद्र हा शंकराचा अकरावा अवतार मानतात, तोच मारुती. असं मी कुठेतरी वाचलं होतं. बलरामाला पण रुद्रावतार मानतात. मे बी मी चुकत असेन. अधे मधे वाचनात आलंय त्यावर लिहीतेय. रुद्रावतार हा शब्द आपल्याकडे फेमस आहे पण रुद्रला म का लावलाय काय माहीती.

मी पोस्टी वाचल्या नाहियेत आणि मालिकाही अगदीच एखादा एपिसोड बघतेय पण असेच काही अंदाज
१. मोहन आगाशेंचा केवळ मानसोपचारतज्ञ यापेक्षा काहीतरी महत्त्वाचा रोल
२. कुठलासा तो बाहुला ज्याला बघून सिद्धांत झोपायचा तो. कारण ज्या संस्थेत तिने खेळणी दिली ती संस्था 'समन्वय-चेतना' शी पण संबंधित आहे आणि त्या समन्वय...साठीच रागिणीचा नवरा काम करत होता त्यामुळे काहीतरी धागा तिथे असणार. (जेचा ती सगळी खेळणी पिशवीत भरते आणि तिची आई तो बाहुला ठेव म्हणते तेव्हाच हा विचार माझ्या मनात आला होता! बहुतेक ३-४ एपिसोड्स झाले असावेत तेव्हा. पण उगीच निष्कर्ष काढायची घाई नको ना! Proud )
३. छाया ची मैत्रीण (सुमन?) ही या खूनसत्राशी किंवा ज्यामुळे रागिणीचा नवरा मरतो त्याच्याशी संबंधित नसली तरी तिच्याकडून सकृद्दर्शनी किरकोळ वाटणारी अशी काहीतरी माहिती रागिणीला मिळू शकते जी तिच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरू शकते.
४. सागर तळाशीकरच्या बायकोला जर नवर्‍याचे काळे धंदे माहिती नसतील तर ते समजल्यावर (कधीतरी तो मेलाय हे समजेल फ्लॅशबॅक संपताना) ती रागिणीला अप्रत्यक्षपणे मदत करणार.

हे सगळे केवळ अंदाज आहेत Proud आणि काहीच अपडेट्स वाचले नाहीत त्यामुळे अजून कोण्या महत्त्वाच्या पात्राची एंट्री झाली असेल (विवेक लागू वगैरे) तर माहिती नाही.

जो मारला गेलाय त्याची बायको रागिणी ( नाव पण रागिणीचं ) रुद्रावतार धारण करते आणि स्वतःच सूड घेते म्हणून " रुद्रम " नाव असावं Happy

सागर तळाशीकरच्या बायकोला जर नवर्‍याचे काळे धंदे माहिती नसतील तर ते समजल्यावर ती रागिणीला अप्रत्यक्षपणे मदत करणार >>>
पॉइंट आहे! टायटल साँगच्या दृश्यात कुणीतरी मागून तिचा गळा आवळताना दाखवतात.
शिवाय परवाच्या एपिसोडमध्ये तो बिटकॉईन्सचा धागा आणलाय. त्याकडे अजून डिटेक्टिव्ह माबोकरांचं लक्ष गेलेलं दिसत नाही Wink

टायटल साँगमध्ये संदीप पाठकच्या जस्ट आधी दाढीवाला कलाकार कोण दाखवतात? मला आधी संतोष जुवेकर वाटला होता. पण कुणीतरी वेगळाच आहे.

रागिणीच्या नवयर्‍याने कदाचित व्हिडीओ शुटींग केलेली चिप त्या आबा खेळण्यात लपवली असेल जशी काल रागिणीनी घड्याळामागे लपवली. तो मरताना तिला तेच सांगण्याचा प्रयत्न करत असेल.

सागर तळाशीकर अजून मेला नाहीये, आता तो शुद्धीवर येऊन रागिणीला एक्स्पोज करतो का वाचतच नाही हे पहायला हवं. रागिणीला तो जिवंत आहे हे समजलंय, ती आता हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचा काटा काढते का, का नुसतंच वेट अ‍ॅन्ड वॉच करते बघूया.
काल तळाशीकरचा फोन स्विच ऑन झाल्याझाल्या १० एक मिनिटात पोलिस जागेवर येतात. हे इतकं फास्ट ट्रॅकिंग होऊ शकतं?

प्रोमोमध्ये रागिणी गेट अप बदलून हाॅस्पीटलमध्ये गेलेली दाखवली आहे. आता ती अभयला मारणार की काय करणार ते बघणं इंटरेस्टींग असेल.

चैत्राली +१

शिवाय आता चंदू दादांच्या सल्ल्यानुसार सगळं संपलंय (म्हणजे अभय सातव मेला तर). बहुतेक अभय सातव मरणार नाही आणि मुक्ता पुन्हा त्याला मारायचा प्रयत्न करेल किंवा पुन्हा त्याच्या मागावर राहून पुन्हा त्याच्याकडून सो कॉल्ड इन्फर्मेशन काढून घेईल किंवा तसा प्रयत्न करेल.

आता तेवढं करेपर्यंत फोनमुळे पकडली गेली नाही म्हणजे मिळवली. बायदवे.. मुक्ताने फोन तिच्या स्वतःच्या घरी पोचल्यावर सुद्धा ऑन केला होता ना? ते लोकेशन कसं रजिस्टर नाही झालं ट्रेस करणाऱ्यांकडे?

मधेच काही नाही. तिचा काहीतरी प्लान असेल यामागे. तिचं काही बरंवाईट झालं तर आईला कोणीतरी सोबत असावी.दुसरे कोणी नातेवाईक दाखवले नाहीयेत त्यांचे एकदा पण.
शिवाय चंदू दादाच्या ओळखीने आलीय म्हणजे विश्वासू असणार. किंवा असंच काही तरी. आता नीट लक्षात येत नाहिये काय कारण असेल यामागे.

इथले वाचून मालिका पाहायला लागले. ओझीवर 17 ऑगस्ट पासून आहे, त्यामुळे आधीचे भाग नाही बघितले पण ठिकाय.
आईच्या आजाराचे, बाईक वाल्या मुलाचे व त्याच्या बाबाचे प्रकरण मध्येच का घुसवले कळले नाही.

आणि ज्या इंजेक्शनची भारतात गरज पडणार नाही असे इंजेक्शन केमिस्टकडे स्टॉकमध्ये असेल का? तिने 1का केमिस्टला विचारले ज्याने प्रिस्क्रिप्शनशिवाय द्यायला नकार दिला व बहुतेक दुसर्याकडन घेतले. जरी 1ल्याकडूनच घेतले असेल तरीही इतके सेन्सिटिव्ह इंजेक्शन इतक्या आरामात मिळेल असे वाटत नाही. वर त्याने 4 5 बाटल्या दिल्या.... कथेत ही खूपच मोठी लिबर्टी घेतल्या सारखे मला वाटले. तिने मुळात त्याला इंजेक्शनबद्दल विचारून मोठी रिस्क घेतलीय, ती जर रिक्षात बसून लिहू शकते तर मोबाईलवर सर्च पण करू शकते. तिच्यासारखी सायको, जिला काम संपवायची घाई झालीय ती दुसऱ्या कोणाची मदत घ्यायला वेळ देईल असे वाटत नाही.

मुक्ता खूप छान काम करतेय, आज एकदम सायको वाटली. पण परत, वेळेच्या बाबतीत खूप लिबर्टी घेतली जातेय असे वाटते. दिवस सुरू होऊन ऑफिस साठी म्हणून बाहेर पडल्यावर बाईकवाल्याच्या घरी जाऊन नंतर त्याच्याशी हॉटेलात बोलणे, चंदूदादांच्या घरी जाणे, नंतर हॉस्पिटलचे प्रसंग. या सगळ्यात किती वेळ गेलाय याचा अंदाज येत नाही.

आधीचे भाग पाहताना हे जे कोणी मूळ सूत्रधार आहेत ते ह्याला त्याला मारत बसण्याऐवजी थेट रागिणीलाच संपवून सगळ्या प्रश्नांचा निकाल का लावत नाहीत असे वाटत होते, आज चंदूदादांच्या बोलण्यातून उलगडा झाला की वरवर पाहता या मागे रागिणी आहे हे कळणे शक्य नाही त्यामुळे ती आजवर सुरक्षित राहिली पण या पुढे ती तशी राहणे कठीण आहे. त्यात ती सराईत गुन्हेगार किंवा गुप्तहेर नसल्यामुळे खूप चूका करतेय, अभय सातवला ती कोण आहे हे तिने स्वतःच सांगीतलेय त्यामुळे यापुढे तिचे कठीण आहे.

सौमित्रचे बाबा छान काम करतात. बरेच नवीन आणि काही जुने चेहरे ब-याच वर्षांनी दिसत आहेत त्यामुळे छान वाटतंय. मला वाटलेलं की ती त्याला गोळया घालेल पण ईंजेक्क्षनचं काहीतरी अचाटच दाखवत आहेत. ती मधेच एका क्लिनीकमध्ये घुसते काय आणि त्या डाॅकला उल्लू बनवते काय. पोलिसाचं काम करणारा सदा आधी अवघाची संसारमध्ये होता आणि त्याची बहिण दाखवलीये ती मैथिलीच ना जी वादळवाटमध्ये होती.

सौमित्रचे बाबा छान काम करतात. बरेच नवीन आणि काही जुने चेहरे ब-याच वर्षांनी दिसत आहेत त्यामुळे छान वाटतंय. मला वाटलेलं की ती त्याला गोळया घालेल पण ईंजेक्क्षनचं काहीतरी अचाटच दाखवत आहेत. ती मधेच एका क्लिनीकमध्ये घुसते काय आणि त्या डाॅकला उल्लू बनवते काय. पोलिसाचं काम करणारा सदा आधी अवघाची संसारमध्ये होता आणि त्याची बहिण दाखवलीये ती मैथिलीच ना जी वादळवाटमध्ये होती.

सौमित्रचे बाबा छान काम करतात. बरेच नवीन आणि काही जुने चेहरे ब-याच वर्षांनी दिसत आहेत त्यामुळे छान वाटतंय. मला वाटलेलं की ती त्याला गोळया घालेल पण ईंजेक्क्षनचं काहीतरी अचाटच दाखवत आहेत. ती मधेच एका क्लिनीकमध्ये घुसते काय आणि त्या डाॅकला उल्लू बनवते काय. पोलिसाचं काम करणारा सदा आधी अवघाची संसारमध्ये होता आणि त्याची बहिण दाखवलीये ती मैथिलीच ना जी वादळवाटमध्ये होती.

सौमित्रचे बाबा छान काम करतात. बरेच नवीन आणि काही जुने चेहरे ब-याच वर्षांनी दिसत आहेत त्यामुळे छान वाटतंय. मला वाटलेलं की ती त्याला गोळया घालेल पण ईंजेक्क्षनचं काहीतरी अचाटच दाखवत आहेत. ती मधेच एका क्लिनीकमध्ये घुसते काय आणि त्या डाॅकला उल्लू बनवते काय. पोलिसाचं काम करणारा सदा आधी अवघाची संसारमध्ये होता आणि त्याची बहिण दाखवलीये ती मैथिलीच ना जी वादळवाटमध्ये होती.

अरे त्या ओझीवर फक्त ५ मिनिटांचेच व्हिडियो आहेत. संपूर्ण एपिसोड्स कुठे बघता येतील ?? सांगा ना कुणीतरी ....

काल जरा जास्तच झालं त्या इंजेक्शन वैगेरे मिळवणं, डॉच्या क्लिनिकमधुन त्याच लेटरहेड मिळवणं

http://www.ozee.com/shows/rudram/video/rudram-episode-8-august-16-2017-f...

जयश्री, इथे पाहा, पूर्ण एपिसोड आहेत, मध्ये जाहिराती येतात त्या स्कीप करता येतात. All एपिसोड वर क्लिक केले तर पहिल्या एपिसोड पासून मिळतील.

मला काल सिरीयल लावायला थोडा उशीर झाला आणि घरात गणपतीची गडबड असल्याने तो शेजारचा सुहास तिला हॉटेल मध्ये भेटून काय सांगतो कळले नाही. त्याच्या वडिलांचं मध्येच काय तेही कळलं नाही.

आता अभय सातव शुद्धीवर आल्यावर मुक्ताची काळजी वाटतेय. तिने त्या नर्सला इंजेक्शन द्यायच्या कामाला लावलं तरी ती ऐनवेळी घाबरते हे दाखवलं "पुढील भागात" मध्ये. तीही भिरभिरल्यासारखी जे शक्य ते काय वाट्टेल ते करत सुटली आहे.

असो.. बघूया आता गुंतागुंत वाढल्यावरही मालिका तेवढीच इंटरेस्टिंग राहतेय का ते.

ओझीचे पूर्ण एपिसोड फक्त भारतातच पाहायला मिळत आहेत असे वाटते. एकदा झी युवाच्या fb पेजवर विचारून पहा.

एक शक्यता....
रागिणी जे करतेय ते शेवटी कायद्याच्या बाहेर असल्याने शेवटी तीला थोडीफार शिक्षा होईलच.. तर तिच्या आईची काळजी घेण्यासाठी आणि सुहासचे वडिलही आता एकाकी आहेत तर सेकंड इनिंग म्हणून ह्या मालिकेत त्यांचे लग्न लावून देतील का..?
तसेही त्या दोघांच्या व्यक्तिरेखा या उद्दिष्टासाठी समर्पक आहेत..

हम्मम.. विचार चांगला आहे.

मालिकेचे भाग मर्यादित आहेत असे वर वाचलेय. कदाचित त्यामुळेच काळवेळेचा फारसा विचार न करता यातल्या व्यक्तिरेखा धडाधड कामे करत असतात हे पाहता असले नाजूक काम करण्याइतका वेळ त्या दोघांना मिळेल का हा प्रश्न आहे.

प्रोमो मध्ये रागिणी त्या अभय सातव च्या खोलीत शिरून त्याच्या तोंडावर हात ठेवतेय असं काही तरी दाखवलाय आणि त्याच वेळी तिने ज्या सिस्टर ला इंजेक्शन द्यायला सांगितलेले असत ती अभयच्या मेव्हण्याला असं असं मला एका बाईंनी काम करायला सांगितलं असं सांगते त्यामुळे अभयचा मेहुणा लगेच खोलीत येतो आणि मुक्ताला त्याच्या तोंडावर हात ठेऊन काही तरी म्हणतेय असं दिसतंय असं दाखवलं . पण माझ्या मते तरीसुद्धा कदाचित अभय सातव मुक्ताला वाचवेल कि ती काही करत नव्हती . जर का ती पोलिसांच्या तावडीत सापडली तर अभय सातव चे काळे धंदे उघडकीस येतील ते त्याला उघड व्हायला नको असणारच म्हणून तो तिला वाचवेल असं वाटत

मुक्ताची आई विसरल्याचं नाटक करते का, त्या शेजारच्या मुलाचा काही संशय आला नसेल ना तिला. तिचा पण रोल खूप महत्वाचा आहे बहुतेक.

रागिणीच्या आईला खरेच त्रास होतोय. आधी एकदा तिला मुलीला कुठली भाजी आवडते ते माहीत आहे पण वांगे हे नाव आठवत नसल्याचे दाखवलेय. मला तरी अजून डॉक्टर, आई, शेजारी, नवा एडिटर यांच्यावर काही संशय वाटत नाहीय. रागिणीमुळे बाबूपासूनच्या घटनांना सुरवात झालीय हेच मुळात पडद्याआडच्या पॉवरफुल लोकांना माहीत नाही. आता अभय सातवमुळे त्यांना ते कळेल. सातव पोलिसांना जरी काही बोलला नाही तरी कोणी किरण नावाचा त्याचा बॉस आहे त्याला सांगेल. नाही सांगितले तर तो रागिणी किंवा किरण यापैकी एका कडून मारला जाणार हे त्याला माहित आहे.

शेजारचा पोरगा यांच्या भानगडीत उगीच अडकलाय असे वरकरणी दिसतेय. आधी तो बाईक मागायला आला त्याची गरज म्हणून. छाया येते तेव्हा तो स्वतःहून निघून जातो. रागिणीची आई एकाच जागी तासभर उभी असल्याचे त्याला दिसते तेव्हा तो मदत करायला येतो, नंतर रागिणी स्वतःच त्याच्या घरी गेली आभार मानायला.

रागिणीवर लक्ष ठेवायची आजवर गरज नव्हती कारण गुन्हेगारांना तिचे अस्तित्वच माहीत नव्हते. पण आता तिने सापाच्या बिळात हात घातलाय.

Pages

Back to top