"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेली छाया. बाळावर पिस्तुल रोखल्यावर मला वाटतच होतं याचा हात कसा थरथरत नाहीये ईतक्या लहान मुलाला मारताना? thank God. बाळ वाचलं.

छाया मरणारच होती. रंगा दादाची (आणि माझीसुद्धा) भीती खरी ठरली. यात एपिसोडला किमान एक खून होतोय. तरी मालिका क्राईम पेट्रोल सारखी विकृत वाटत नाही बघायला. लहान बाळावर बंदूक रोखलेली असताना थरकाप मात्र झाला मिनिटभर.

मुक्ता तिकडे जाऊन रंगा दादाला सुद्धा उगाच माहिती देत बसते माझ्यामुळे झालंय वगैरे. भोळी आहे की वेडी. पुढे शिवाचा पाठलाग करताना दाखवली आहे आणि शिवाने तिला पकडले हेही आहे पुढील भागात.

आता शिवा मुक्ताला मारणार इतक्यात खिडकीतून त्याला कोण टपकवते याची उत्सुकता आहे. ९९.९९% हा संदीप पाठकच असावा. ०.१% चान्स आहे की तो रंगादादा असेल मुक्ताला वाचवायला आलेला.

या सगळ्यात एकमेव पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे छायाने मरताना सुद्धा मुक्ताचं नाव मध्ये येऊ दिलं नाही / घेतलं नाही. नाहीतर मुक्ताची ओव्हरॉल परिस्थिती बघता, तिला मारणे संदीप पाठकसाठी डाव्या हाताचा मळ आहे.

यातलं जे काही रॅकेट असेल ते, पण त्यातल्या तळातल्या दुव्यांना संदीप पाठक मारतो असं दाखवणार आणि वरच्या प्याद्यांना मुक्ता नडणार असं असणार असं मला वाटतंय.
कालचा मुक्ताचा डायलॉग - माझ्यामुळे हे सगळे मरतायत - हाच तिच्या वर्तमानकाळातल्या सैरभैर्+सनकी वागण्याचा बेस असेल. त्या विचाराने ती हळूहळू सटकते, असं असेल.

संदीप पाठकच्या पात्राचं नाव काय आहे, बाय द वे? तो काम जबरी करतोय.
तो फोनवर कुणाला मारायचं त्याची माहिती लिहून घेतो, ते सेम 'कहानी'मधल्या चष्मेवाल्या खुन्यासारखं आहे.

अगो, पुढे कधीतरी , बहुधा लॅपटॉपच्या चोरीसंबंधी बोलताना, असा उल्लेख आहे की रागिणी अपघातानंतर काही दिवसांनी शुद्धीवर येते. लगेच नाही.

रागिणीची बाइक मागणारा शेजारी प्रायवेट डिटेक्टिव असावा . त्याला कीर्तीकरांनी आणि सायकीअ‍ॅट्रीस्टनी मिळून नेमलेला असावा असा आपला माझा अंदाज.

अगो, पुढे कधीतरी , बहुधा लॅपटॉपच्या चोरीसंबंधी बोलताना, असा उल्लेख आहे की रागिणी अपघातानंतर काही दिवसांनी शुद्धीवर येते. लगेच नाही. >>> मी अपघातानंतर लगेच स्ट्रेचरवरुन नेत असताना म्हणतेय ... असो. मला ही मालिका आवडलीय त्यामुळे उगीच कीस नाही पाडायचाय. जाऊदेत तो मुद्दा...

काल सगळे भाग सलग पाहिले. फॉर्वर्ड करायला फार स्कोप नसल्यामुळे जरा ओव्हरडोसच झाला. स्वप्नातही हेच सगळं येत राहिलं Proud

>>>सेम 'कहानी'मधल्या चष्मेवाल्या खुन्यासारखं आहे>>
अगदी अगदी...मला पण अगदी त्याच्या पहिल्या एन्ट्री पासूनच कहानीतल्या कॉन्ट्रॅक्ट किलर ची आठवण आली...अगदी सामान्य माणूस दाखवला आहे दोन्हीकडे आणि फोन वर नाव आणि फोटो आला की एकदम शांततेत काम तमाम...

तो फोनवर कुणाला मारायचं त्याची माहिती लिहून घेतो, ते सेम 'कहानी'मधल्या चष्मेवाल्या खुन्यासारखं आहे.
>> अगदी अगदी.. मलाही कहानी मधला "जेकब" आठवला. काय योगायोग आहे Happy

रंगा दादाची >> का कोण आहे? चंदू दादा का? मेकअप आर्टिस्ट आणि पूर्वाश्रमीचा शार्प शूटर?
सागर तळाशीकरला काम कमी आहे, पण त्यानेही काम मस्त केलंय. संदीप पाठक तर भारीच. विनोदी कलाकाराच्या शिक्क्यातून लवकर बाहेर पडतोय हे एक बरंय.
रागिणीचा बाईकवाला शेजारी डिटेक्टिव्ह असावा हा अ‍ॅंगल चांगला आहे. ती एकटीच आहे बिचारी, तिला मदत हवीच कोणाचीतरी. बघूया तो नक्की कोण आहे ते.

रंगा दादाची >> का कोण आहे? चंदू दादा का? मेकअप आर्टिस्ट आणि पूर्वाश्रमीचा शार्प शूटर?

>> हो हो. सॉरी. मी बर्‍याच प्रतिसादामध्ये चंदू दादाच्या ऐवजी रंगा दादा लिहिलंय. (ते मेकप आर्टिस्ट असल्याने रंगादादा बसलं असेल का माझ्या डोक्यात?) असो.. आता प्रतिसाद संपादित करता येत नाहीये. सो राहूदे. पुढे नीट लिहिन नाव.

रुद्रमचे भाग मिसलेत त्यांच्यासाठी..

आत्ता 9.30 ते रात्री 12 पर्यंत ऑलमोस्ट 2ऱ्या की 3ऱ्या भागापासून सगळे भाग दाखवत आहेत.

छाया मेलीय म्हटल्यावर मला शुक्रवारचा भाग बघावासा वाटेना. तरीपण उत्सुकतेने आज ओझीवर बघितलाच.

रागिणी जेव्हा छाया मेल्यावर पोलिस तिथे असतानाच चंदूदादाच्या घरी जाते. तेव्हा नंतर चंदूदादा तिला म्हणतो की, "हे सर्व तुझ्यामुळे होतंय रागिणी." मुळात चंदूदादा रागिणीला कसा ओळखतो?? (रागिणीला अॅक्ट्रेस व्हायचं होतं म्हणून ओळख असू शकते कदाचित.) पण आणि या सगळ्या प्रकरणाशी रागिणीचा इतका संबंध आहे हे चंदूदादाला कसं कळतं?? त्याला तर मुळात बाबू मेलाय हेही आधी माहित नसतं मग हे सर्व कुठून कळतं??

रागिणी जेव्हा छाया मेल्यावर पोलिस तिथे असतानाच चंदूदादाच्या घरी जाते. तेव्हा नंतर चंदूदादा तिला म्हणतो की, "हे सर्व तुझ्यामुळे होतंय रागिणी."

>> हे मी मिसलं. बहुतेक शुक्रवारी बघताना मी ५ मिनिटे उशीरा लावला टिव्ही त्यात मिसलं. Sad
आधीच २४ मिनिटांचा भाग असतो त्यात ५ मिनिटं सुद्धा मिसलं कि वाईट वाटतं.

यीप्पी.. ०.१% अंदाजानुसार चंदू दादांनीच शिवाला मारलं. (मालिका आपल्या एक एपिसोड - एक खून या तत्वाला जागली Proud ) एवढंच नाही तर त्यांनी योग्य वेळी रागिणीला त्या जागेतून घरी नेलं. नाहीतर संदीप पाठकने तिलाही.. Sad

आता रागिणी त्यांना विनंती करून यातले छक्के पंजे आणि खाचाखोचा शिकून घेणारे.

बादवे मला का कोण जाणे असं वाटतंय की रागिणीची पर्स उचकताना शिवाने काही असं तर काढलं नसेल जे रागिणी पुन्हा पर्समध्ये घ्यायला विसरली आणि नंतर ते पोलिसांच्या हातात सापडले? आणि तिने घरी गेल्यावर त्या बारमालकाचा फोन स्विच ऑन केला होता थोडा वेळ ते अजून ट्रेस नाही झालं? Uhoh

पहिल्या भागात मुक्ता बर्वेने घातलेला विग चंदू दादांनी बनवला असेल हे कनेक्शन लावणाऱ्या इथल्या प्रेक्षकांना __/\__

मला वाटलय की त्या 'आबा' खेळण्यात काहीतरी क्लू असेल. तो सतिश राजवाडे मरताना 'बाबा' म्हणतो असं मुक्ताला वाटतय, ते आबा असेल.

रागिणी डोकं फिरल्यामुळे स्वतः शोध घ्यायला बाहेर पडतेय. आणि काल शिवाच्या ताब्यात सापडली पण चंदू दादाने आयत्या वेळी येऊन मदत केली म्हणून नाहीतर मालिकाच संपली असती . आता ती चंदू दादाला मला पिस्तूल चालवायला शिकवं अशी काहीतरी रिक्वेस्ट करतेय. एकंदर कालचा एपिसोड का कोण जाणे ढिला वाटला पकड सुटणार कि काय मालिकेवरची Sad

आणि तिने घरी गेल्यावर त्या बारमालकाचा फोन स्विच ऑन केला होता थोडा वेळ ते अजून ट्रेस नाही झालं?
>>> छायाचा खून, शिवाचा खून हे सगळं फ्लॅशबॅक चालू आहे.

एकंदर कालचा एपिसोड का कोण जाणे ढिला वाटला पकड सुटणार कि काय मालिकेवरची >>> टिपिकल स्त्री-व्यक्तिरेखा शिवाने पकडल्यावर घाबरून रडताना, गयावया करताना वगैरे दाखवल्या गेल्या असत्या. त्या उलट मुक्ता बर्वेचं buying time किती मस्त दाखवलं. तिचं मूळचं `अरे ला का रे' व्यक्तिमत्त्व छोट्या छोट्या प्रसंगांतून भारी दर्शवतात एकंदर.

वेषांतर केलेल्या संदीप पाठकच्या आतला माणूस चंदूदादांनी नेमका कसा ओळखला असेल हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. मुक्ताला ते त्यांची स्किल्स शिकवतात त्या दरम्यान ते कळेल अशी आशा आहे.

मला वाटलय की त्या 'आबा' खेळण्यात काहीतरी क्लू असेल. तो सतिश राजवाडे मरताना 'बाबा' म्हणतो असं मुक्ताला वाटतय, ते आबा असेल.
>> हे जर खरं निघालं तर आत्तापासूनच झेलम तुम्हाला ___/\___

वेषांतर केलेल्या संदीप पाठकच्या आतला माणूस चंदूदादांनी नेमका कसा ओळखला असेल हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. मुक्ताला ते त्यांची स्किल्स शिकवतात त्या दरम्यान ते कळेल अशी आशा आहे.
>> ते शिकवताना दाखवले तर भारीच होईल एकदम. पण मला वाटतं हि पारखी नजर इतर कशाहीपेक्षा चंदूदादांच्या अनुभवातून आली असावी.

बाय द वे आत्तापर्यंत "एक एपिसोड - एक खून" या तत्वाप्रमाणे पुढच्या एपिसोडमध्ये कोणाचा खून होईल हे गेस करता येत होते. आजच्या भागात कोणाचा खून होऊ शकतो? एनी गेसेस?

आत्तापर्यंत "एक एपिसोड - एक खून" या तत्वाप्रमाणे>> दर भागात कुठे खून होतोय यात?? अकरा भाग झालेत नि खून तर अभय सातव (जो नक्की मेलाय का हे माहित नाही ), बाबू, किर्तीकर, छाया आणि शिवा याचे पाच खून झाले. सुरुवातीचे आशिष, रागिणीचे बाबा नि सिद्धार्थ यांचे धरले (जे एकाच वेळी एकाच भागात झालेत) तरी आठ होतायत.

आजच्या भागात कोणाचा खून होऊ शकतो? एनी गेसेस?>>
आता कोणाचा दाखवणार ना खून...आता बहुतेक मुक्ताच करायला सुरुवात करेल चंदू दादांकडून शिकून ... नाही म्हणायला ती छायाची शेजारची आहे पण ती निरुपद्रवी वाटतेय..

ती दारातून आत शिरली हे फारच लेम वाटलं मला. शिवाला कुणीतरी पाठलाग करतोय अशी चाहूल लागते म्हणून तोच दार उघडं ठेवून तिला जाळ्यात पकडतो किंवा ती दुसर्‍या एखाद्या खिडकीतून किंवा मागच्या अंगणातल्या एखाद्या नुसत्याच लोटलेल्या दारातून आत शिरते असं तरी दाखवायचं.

निधी.. तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे. Happy
अगोशी सहमत. पण शिवा म्हणतो ना.. "मी मुद्दाम दरवाजे बंद करत नाही कधीच."

ए माझ्याकडे झी युवा दिसत नाही. पण रुद्रम बद्दल इतकं ऐकून ही सिरीयल बघावीशी वाटतेय. कुठे बघता येईल ....कोणीतरी सांगा ना प्लीज.

Pages