"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या अशा मालिकेकरता अर्ध्या तासाचा एक भाग कमी पडतो असं वाटतं. एका भागात खूपच कमी कथानक पुढे सरकतं. एकेक तासाचे भाग हवे होते.
जास्त मजा आली असती.
किर्तीकर मेलेच की फायनली. आपल्याला वाटला होता तसा काही कमबॅक करणार नाहीत ते.
चंदूदादा मेकअप आणि विग आर्टिस्ट आहेत. छायाला लपवण्याकरता त्याचा उपयोग करणार ते. छायाचं काम करणारी अभिनेत्री चांगली आहे. चांगलं काम करते आहे.

पहिल्या आणि दुसर्या अर्ध्या भागानंतरचे भाग flashback आहेत. मुक्ता बर्वे चे काम आणि सीरिअल मस्त आहे .वंदना गुप्तेंचे पण काम भारी

छायाचं काम करणारी अभिनेत्री चांगली आहे. चांगलं काम करते आहे. >>>> हो. आम्हांला पण तेच वाटलं. दिग्गज आहेतच पण त्यांच्यामध्ये ही पण चांगलं काम करते आहे.

न्यूज चॅनलमधला तो दुसरा माणूस (एलदुगो मधला दिग्याकाका) किर्तीकर मेले तरी एकदक चिल वाटत होता. त्याला काही धक्काबिक्का बसला नाही वाटतं.

मी तरी अजून यात इतकी गुंतले नाहीये. म्हणजे आता उद्या काय होईल याची उत्कंठा वाटत नाहीये तसंच काय होईल पुढे असा भुंगा अजून तरी लागला नाहीये डोक्याला.

सगळ्यांचीच काम चांगली त्यात संदीप पाठकच पण . मुक्ता आणि वंदना गुप्ते मधले संवाद चांगले आहेत . आज त्या संदीप पाठकचे संवाद डोकं वापरून लिहिलेत मी हि काकडी खातो अर्धीच ती संपायच्या आत मला पत्ता सांग. आता छायाचा ( किरण खोजे )गेम होणार बहुतेक आणि मुक्ता जेव्हा छायाला भेटायला जायचा विचार करतेय त्या आधीच तिचा गेम होणार. छाया ची शेजारीण राखेचा मधली ती यमुना आहे Happy

आता छायाचा गेम होणार Sad . सटासट मारतायेत माणसांना. नंतर मुक्ता मारेल सटासट, तिचं काही चुकणार नाही मग. छायाने मस्त काम केलंय.

न्यूज चॅनलमधला तो दुसरा माणूस (एलदुगो मधला दिग्याकाका) किर्तीकर मेले तरी एकदक चिल वाटत होता. त्याला काही धक्काबिक्का बसला नाही वाटतं. >>> अनुमोदन. एका लग्नाची दुसरी गोष्टमधे होता ना तो, सुनील अभ्यंकर.

काय असेल कारण या सर्व मर्डर नाट्याचं. ड्र्ग्ज बिझनेस की अजून काही.

एलदुगो मधले मुक्ता, किर्तीकर, दिग्याकाका नि मानव पण आहेत की यात. Happy

मला वाटतं सेक्स स्कँडल वगैरे असणार नि मोठे लोक म्हणजे राजकारणी वगैरे असणार गुंतलेले यात. कारण शिवा कालच्या भागात अभयला म्हणतो ना की, 'आपल्याकडचा माल जुना झालाय आता, नवीन भरायला पाहिजे.' हे दुसर्या कुठल्या संदर्भात असू शकतं असं लक्षात येत नाहीये. Uhoh

हो निधी असू शकतं तू म्हणतेस ते, काहीतरी भयंकर आहे पण. ड्रग्ज, मानव तस्करी त्यात काहीही लहान अनाथ मुलं वगैरेही असू शकतं, डोक्यात काहीही येतंय टोकाचं.

मानव कोण. सुनील अभ्यंकर लगेच एडिटरच्या खु्र्चीवर बसला आणि फारच चिल आहे तो. मुक्तालाच वेड्यात काढलं त्याने. तो शेजारचा मुलगा असा का दरवाजा वाजवत होता हातघाईला आल्यासारखा. आणि मुक्ता त्याला सगळं का सांगत असते. बहुतेक हे मुक्ताने बार मालकाला मारण्याच्या आधीचं आहे.

मुक्ता फारच भोळी दाखवली आहे फ्लॅशबॅक मध्ये. खूप लोकांना खूप डिटेल्स सहज देते आहे. तिच्याकडे तो गाडी मागायला येतो तो मुलगा / माणूस तिला अगदी सहज अरेतुरे करतोय ते मला सारखंच खटकतंय. त्यालासुद्धा ती किर्तीकरांच्या खुनाविषयी सांगते वेडी.

कीर्तिकर खरंच मेले म्हणजे ते यात नसावेत. उलट त्यांच्या जाण्यानंतरही चिल असणारा तो माणूस इन्व्हॉल्व्ह असू शकतो. यातला सस्पेन्स खरंच खरा आहे. संशयाची सुई सगळ्या दिशेला फिरतेय.

लहान मुलांची तस्करी ला अनुमोदन. कारण मुक्ताचा नवरा लहान मुलं दत्तक दिल्यावर नवीन घरी खुश आहेत ना हे चेक करणाऱ्या एनजीओ मध्ये होता. जेव्हा त्याला ती सो कॉल्ड सनसनाटी बातमी मिळाली तेव्हा तो अश्या काही दत्तक गेलेल्या रँडम मुलांच्या मुलाखती घेण्याच्या कामात होता किर्तीकरांच्या सांगण्यावरून. कदाचित रँडमली पाठपुरावा करताना त्याला अश्या एखाद्या मुलाची/ मुलीची स्टोरी कळली आणि त्या धाग्यावरून पूर्ण रॅकेटचा अंदाज आला / माहिती मिळाली.

शेजारणीला अखेर तोंड उघडायलाच लागलं संदीप पाठक पुढे. आणि चंदुदादांची भीती खरी ठरली. पुढील भागात म्हणून जे काही दाखवलं आहे त्यावरून तरी संदीप पाठकने त्या पानवाल्याला आणि छायाला सुद्धा सहज गंडवून छायाचा गेम केला असं वाटतंय. Sad छायाला कट्टा वापरायची हिम्मत आणि बुद्धी झाली असेल याची शक्यता खूप कमी वाटतेय पण अगदीच अशक्य नाहीये. छाया मेली तर चंदूदादांच्या विग आणि मेकपचा काही उपयोग नाही.

लहान मुलांची तस्करी ला अनुमोदन. कारण मुक्ताचा नवरा लहान मुलं दत्तक दिल्यावर नवीन घरी खुश आहेत ना हे चेक करणाऱ्या एनजीओ मध्ये होता. जेव्हा त्याला ती सो कॉल्ड सनसनाटी बातमी मिळाली तेव्हा तो अश्या काही दत्तक गेलेल्या रँडम मुलांच्या मुलाखती घेण्याच्या कामात होता किर्तीकरांच्या सांगण्यावरून. कदाचित रँडमली पाठपुरावा करताना त्याला अश्या एखाद्या मुलाची/ मुलीची स्टोरी कळली आणि त्या धाग्यावरून पूर्ण रॅकेटचा अंदाज आला / माहिती मिळाली. >>> मम. त्यावरुनच मला लहान मुलांची तस्करी डोक्यात येतंय.

लहान मुलांच्या तस्करीचा धागा माझ्या डोक्यात आला नव्हता. पॉईंट आहे !

बाईक मागणारा मुलगा आणि उपसंपादक - यांचा वापर केवळ प्रेक्षकांनी सर्वांवर संशय घ्यावा यासाठीही असेल, जो एक चांगला प्रयत्न आहे.

चंदूदादा-विगमेकर ही पाटी पाहिल्यावर मला पहिल्या एपिसोडमधल्या मुक्ता बर्वेच्या विगची आठवण झाली. ते कनेक्शन पण असू शकतं. (हे कालच लिहिणार होते, पण राहिलं.)

बाकी, चंदूदादांची बोलण्याची स्टाईल, शब्दोच्चारही अगदी शहरी, पांढरपेशी वाटले. त्यांची वेशभूषा, राहती जागा त्याच्याशी मिळतीजुळती नाही.

संदीप पाठकने भारी काम केलंय. त्याचे संवादही मस्त होते- मी कोणता रोल करू सांग! कोणालाही भीती वाटेल असे. त्या छायाकरता वाईट वाटायला लागलं आहे Sad

चंदूदादांची बोलण्याची स्टाईल, शब्दोच्चारही अगदी शहरी, पांढरपेशी वाटले. त्यांची वेशभूषा, राहती जागा त्याच्याशी मिळतीजुळती नाही.>> त्या छायाकडे येणारा माणुसु पण सुस्पष्ट बोलतो.

त्यावरुनच मला लहान मुलांची तस्करी डोक्यात येतंय.>> हे लक्षात आलेलं पण मग शिवाच्या "माल जुना झालाय." या वाक्याचा संदर्भ याच्याशी कसा जोडता येईल असं वाटलं मला.
पण आधीच असलेली मुलं मोठी झालेली असतील नि जर मागणी लहान मुलांची असेल तर मग नवीन लहान/ तान्ही मुलं पळवून आणायची वगैरे असा काही प्लान असू शकतो.

चंदूदादांची बोलण्याची स्टाईल, शब्दोच्चारही अगदी शहरी, पांढरपेशी वाटले. त्यांची वेशभूषा, राहती जागा त्याच्याशी मिळतीजुळती नाही.>> ते फिल्म सर्कलमध्ये वावरणारे आहेत त्यामुळेही त्यांची भाषा शहरी असेल.

कालचं चंदूदादांचं वाक्य `एक नटी आहे, ती मी मेक-अप केल्याशिवाय शूटिंग करत नाही' या वाक्यातही काहीतरी सूचक असावं असं मला वाटतंय.
नटी = छाया(च), शूटिंग = खरंखुरं बंदुकीचं शूटिंग,
ते घराबाहेर जाण्याचा फक्त बनाव रचणार आणि संदीप पाठकला ट्रॅप करणार अशी एक शक्यता वाटते आहे.

मला वाटतं स्टोरी शेवटच्या पंधरा दिवसात उलगडेल. सध्या फक्त एकेक मर्डर. किरण करमरकरचा आणि विवेक लागूचा काय रोल असेल याची उत्सुकता आहे. किरण करमरकर कदाचित मोठा सूत्रधार असेल किंवा मदत करणारा. शेवटी धागेदोरे नाहीतर इथे काहीजणांना शक्यता वाटते तसे मोहन आगाशेपर्यंत पोचतील की काय.

तो बाईक मागणारा (आशिष कुलकर्णी) अगदी नेमक्याच वेळी टपकतो. म्हणजे तो शेजारी राहून मुक्तावर लक्ष वगैरे ठेवून असावा असं वाटलं मला (जे काय ५-१० मिनिटं बघितलं त्यात Wink ) आणि केवळ तिच्याबद्दलचे अपडेट्स देणं हे कामही असू शकेल. (पण अपडेट्स तरी कशाला हा प्रश्न लगेच पडलाच मला!)

चंदूदादा-विगमेकर ही पाटी पाहिल्यावर मला पहिल्या एपिसोडमधल्या मुक्ता बर्वेच्या विगची आठवण झाली. ते कनेक्शन पण असू शकतं. (हे कालच लिहिणार होते, पण राहिलं.) >>> हो त्यांनीच तिची वेशभूषा करून दिली असणार कारण बाबू आणि आता बहुतेक छाया गेली तर ते नक्कीच मदत करणार मुक्ताला तिच्या मिशनमध्ये. vitamin G पण देतील तिला.

बर्‍याच वर्षांनी हा धागा वाचून एखादी सिरियल बघायला घेतली. आज पहिले दोन भाग बघितले. पुढच्या आठवड्यापर्यंत बॅकलॉग भरेन.
वेगळी आहे. तीन चार महिन्यांत संपणार असेल तर खरंच बघावीशी वाटेल सलग.

दुसर्‍या भागात अ‍ॅक्सिडेंटनंतर मुक्ताला स्ट्रेचरवरुन हॉस्पीटलमध्ये न्यायचा सीन आहे त्यात वंदना गुप्ते पांढर्‍या साडीत आणि मंगळसूत्र नाही. ते खटकलं. अ‍ॅक्सिडेंटची बातमी ऐकून धावत हॉस्पीटलमध्ये आलेल्या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र हवं होतं.

प्रज्ञा ९.. अनुमोदन.
पण जर मुक्तावर लक्ष ठेवायचे काम सुरु झाले असेल.. म्हणजे तिच्यावर संशय आला असेल व्हिलन ला.. तर लक्ष ठेवण्याऐवजी तिला टपकवले असते एव्हाना.. आत्तापर्यंतची हिस्टरी बघता.

अय्यो सस्मित.. सेम पिंच. मी लिहेपर्यंत तुमची कमेंट आलीसुद्धा. Happy

दुसर्‍या भागात अ‍ॅक्सिडेंटनंतर मुक्ताला स्ट्रेचरवरुन हॉस्पीटलमध्ये न्यायचा सीन आहे >>> तो मुक्ताच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतरचा सीन होता (ना?) आत्महत्येचा प्रयत्न ती अपघातानंतर वर्ष-सहा महिन्यांनी करते.

लोकहो कीस काढा , पण आजवरचे सगळे एपिसोड्स पाहिल्यावर मला तरी नेहमीच्या अत्यंत सुमार, रटाळ तेच तेच कथा-सादरीकरण-अभिनय असणाऱ्या सिरीयल्सच्या मानाने फारच छान वाटत आहे. वेळ फालतू वाया घालवलेला नाही, कच्चे दुवे अजून फारसे तरी नाहीत असे वाटते. हा टेम्पो असाच ठेवण्याची सुबुद्धी सिरीयलशी संबंधित सर्वांना होतो. किमान सीरिअलशी संबंधित माणसे काही अपेक्षा ठेवण्यासारखी तरी वाटतात, पुढे माती करणार नाहीत अशी आशा तरी आहे, कितीही म्हटले तरी आपल्या बुद्धी आणि अभिरुचीला अगदीच नेहमीप्रमाणे गुंडाळून ठेवले नाहीये या कल्पनेने जरा सुखावलेय. रच्याकने मालिकेचा लेखक पण एलदुगोमध्ये होता - गिरीश जोशी ( तोच असावा बहुतेक)

पियू, म्हणूनच म्हटलं मी पुढे की अपडेट्स तरी कशाला हा प्रश्न लगेच आलाच मनात. लगेच तिलाही मारणं अवघड नाही.

दुसर्‍या भागात अ‍ॅक्सिडेंटनंतर मुक्ताला स्ट्रेचरवरुन हॉस्पीटलमध्ये न्यायचा सीन आहे >>> तो मुक्ताच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतरचा सीन होता (ना?) आत्महत्येचा प्रयत्न ती अपघातानंतर वर्ष-सहा महिन्यांनी करते. >>> नाही. मी दोनच भाग पाहिलेत अजून. दुसरा भाग ती नस कापून घेते आणि वंदना गुप्ते धावपळ करते तिथे संपतो. हे अपघातानंतरच. मुक्ताच्या डोक्याला बँडेज आहे आणि ती रक्ताळलेल्या अवस्थेत दाखवलीय.

Pages