Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तमिळ? संस्कृत आहेना हा शब्द.
तमिळ? संस्कृत आहेना हा शब्द.
इथे वाचून बघायला सुरूवात
इथे वाचून बघायला सुरूवात केलीये.. आवडले पहिले दोन भाग....
अॅक्सिडेंट चा सीन काहीतरीच घेतलाय... तिने सीटबेल्ट लावला असतो मग अशी जमिनीवर सपशेल पालथी पडलेली दाखवलीये...
बाकी वंदना गुप्ते पण जरा गुढच वाटल्या..... एकदम फक्कन लाईट लावतात तेव्हा घाबरले ना मी २ मिनीटे
उत्सुकता चांगली निर्माण
उत्सुकता चांगली निर्माण करताहेत . आज त्या बाईची एंट्री आणखीन त्यांच्याच सोसायटीत नवीन राहायला आलेल्या त्या मुलाची एंट्री. बर त्या मुलाला नेमकी यांचीच बाईक का पाहिजे असते? आणि ती यांची आहे हे त्याला कसं कळत ? कदाचित वॉचमन कडून . ती बाई अचानक हा असतानाच आल्यावर तो कुठे पळून जातो ? का पळून जातो ? कदाचित त्याला तिथे थांबणं ऑकवर्ड वाटलं असेल. मुक्ताने चांगला अभिनय केलाय . सतत तीच ते पटकन चिडणं . अंगावर धावून येण . अगदी रात्री च्या वेळी बिनदिक्कत घराबाहेर पडणं . तिच्या डोक्यावर परिणाम झालाय खरंच
>>>तमिळ? संस्कृत आहेना हा
>>>तमिळ? संस्कृत आहेना हा शब्द.>>
काय माहित...पण 'रुद्रम्' या नावावरून मला एकदम अजय देवगणच्या 'दृश्यम्' सिनेमाची आठवण आली...
रुद्रम्' या नावावरून मला एकदम
रुद्रम्' या नावावरून मला एकदम अजय देवगणच्या 'दृश्यम्' सिनेमाची आठवण आली...>>> अगदी अगदी मला पण
2 एपिसोडस पाहिले..पाहिले 2
2 एपिसोडस पाहिले..पाहिले 2 मिसले.... सध्या तरी चांगली वाटती आहे मालिका...मुक्ता बर्वे आणि वंदना गुप्ते मूळे बघावीशी वाटतीये... सस्पेन्स मस्त वाटतोय...
मालिका चाचपडतेय >>>> मालिका
मालिका चाचपडतेय >>>> मालिका चाचपडते आहे असं मला तरी अजिबात वाटलं नाही. एखाद दोन न पटणारे प्रसंग होते जसं की रागिणीचं पुन्हा क्राईम सिनवर जाणे, मोबाईल सुरु करण्याबाबत जराही विचार न करणे वगैरे, पण तिच्या मनस्थितीमुळे बेनिफिट ऑफ डाऊट देऊ शकतो. उलट वातावरण निर्मिती, एक एक पात्र आणून गोष्ट विणणं हे चांगल्या प्रकारे चालू आहे की. अनुभवी कलाकार उत्तर अभिनय करतच आहेत. चांगला प्लॉट बनवून पुढे फुस्स करायला नको मात्र.
त्या मुलाला नेमकी यांचीच बाईक का पाहिजे असते? आणि ती यांची आहे हे त्याला कसं कळत ? >>>> ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या संवादांमधून आली होती की.
पराग +1.
पराग +1.
आशिष कुलकर्णी कदाचित तिला मदत करणारा असू शकतो, असं वाटतंय.
तो इन्स्पेक्टर मठ्ठ आहे का. खरं म्हणजे ती पहील्याच भागात स्वत:च्या कर्माने आपोआप जाळ्यात आली होती.>> नाही गं अंजूताई. ती चॅनेल न्यूज रिपोर्टर आहे असं सांगते. आयकार्डही दाखवते. आणि ही लोक न्यूज मिळवण्यासाठी असं बेधडक काहीही करायला तयार होतात. त्यातलीच वाटली असणार ती आधी त्याला. नंतर जर मुक्ता परत परत त्याला संशयास्पद रित्या वावरताना दिसेल तर त्याला मुक्ताचा संशय येऊ शकतो.
तमिळ? संस्कृत आहेना हा शब्द.>
तमिळ? संस्कृत आहेना हा शब्द.>>> हो, पण जनरली तामीळ मध्ये चित्रपटाच्या शेवटी म लावायचा प्रघात आहे ना म्हणून म्हटल.
नाही गं अंजूताई. ती चॅनेल
नाही गं अंजूताई. ती चॅनेल न्यूज रिपोर्टर आहे असं सांगते. >>> ओहह हा शॉट हुकला की काय माझा. ही सिरीयल अगदी एक मिनिट इथे तिथे न बघता, नीट बघायला हवी.
आशिष कुलकर्णी कदाचित तिला मदत करणारा असू शकतो, असं वाटतंय. >>> किंवा ऑपोझिट पार्टीतला पण असू शकतो. पण हा हिरो असेल तर मेन व्हिलन किरण करमरकर असेल का, कारण मोठी मोठी लोकं गुंतली आहेत ह्यात असं तो सागर म्हणाला होताना. कि क मदत करणारा पण असू शकतो. एनीवे मस्त वाटतेय बघायला आत्ता तरी.
मुक्ताने इतका भारी अभिनय
मुक्ताने इतका भारी अभिनय केलाय की बास! मी शक्यतो रहस्यकथा, भयकथा, खूनबिन असलेल्या सिरेलींच्या वगैरे वाटेला जात नाही. अस्वस्थ वाटत रहातं नि भितीही वाटते! पण मुक्तासाठी मुद्दाम बघितली. उगीच बघितली! कारण तिने इतकं अप्रतिम काम केलंय की मी पुन्हा अस्वस्थ झाले! शी रॉक्स पण मला बघवत नाहिये. अंगावर येतं असं काही बघितलं की. (मला झेपत नसलं तरी हे मी कौतुकाने म्हणतेय!) असो. पण इथे प्लीज अप्डेट्स द्या. धीर झाला की पुन्हा बघणार!
त्या मुलाला नेमकी यांचीच बाईक
त्या मुलाला नेमकी यांचीच बाईक का पाहिजे असते? आणि ती यांची आहे हे त्याला कसं कळत ? >>>> ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या संवादांमधून आली होती की.>> हो बरोबर वोचमन कडून ती त्यांची बाईक आहे हे त्याला समजलं पण त्याला ती का पाहिजे ? काय कारण सांगितलं त्याने . नेमकं आठवत नाहीये.
मला असं वाटतंय त्याला बाईकच्या निमित्ताने त्यांच्या घरात शिरून काही तरी जाणून घ्यायचाय. असो ते पुढे कळेलच कदाचित . आजच्या एपिसोड मध्ये मुक्ताच्या नवऱ्याचा लॅपटॉप चोरीला गेलाय हे समजतंय . पण मुक्ताला नवरा काय काम करतो /नक्की कामाचं स्वरूप काय ? याची जरा सुद्धा माहिती नसावी हे अजिबातच पटत नाही.
पण त्याला ती का पाहिजे ? काय
पण त्याला ती का पाहिजे ? काय कारण सांगितलं त्याने . नेमकं आठवत नाहीये. >> तीच पाहिजे असं नाही. आशिष अपघातात गेलाय तर गाडी विकायची असेल तर तो घ्यायला तयार असतो किंवा तो नवीन गाडी घेईपर्यंत त्याला ती गाडी वापरायला द्याल का?? असे तो विचारतो.
अर्थात त्याचा हेतू काय असतो त्याची कल्पना नाही. तो चांगला-वाईट काहीही असू शकतो.
आजचा भाग बघितलेला नाही. उद्या बघेन.
फक्त एका एनजीओ मध्ये काम करतो
फक्त एका एनजीओ मध्ये काम करतो एवढंच माहिती
मुक्ता खरंच खूप भारी काम
मुक्ता खरंच खूप भारी काम करतेय... रडणं, चिडणं, त्रागा सगळं खूप नॅचरली करतेय ती.
मुक्ता अक्षरशः जगतेय तो रोल,
मुक्ता अक्षरशः जगतेय तो रोल, अप्रतिम करतेय as usual.
कीर्तीकर सर (मिलिंद फाटक) -
कीर्तीकर सर (मिलिंद फाटक) - या पात्राचा पुढे (सिरियलीत पुढे, प्रत्यक्षात मुक्ता बर्वेच्या फ्लॅशबॅकमधे) काहीतरी पलटी खाणारा रोल असावा असं मला फार वाटतंय. ते पात्र जितकं निरुपद्रवी, फ्रेंडली दाखवलंय तितकं नसणार. प्लस न्यूज-चॅनलमधला तो कुणीतरी मोठा अधिकारी दाखवलाय. हा धागाही आहेच.
बाईक मागायला येणार्या मुलाचाही सर्व घटनांमध्ये काहीतरी रोल असणार.
काल त्या ट्रक-ड्रायव्हरच्या बायकोचे शब्दोच्चार बर्यापैकी गावरान-छाप होते; पण तिच्या नवर्याचे जवळपास नव्हतेच. तो प्रॉपर शहरी टोनमधे बोलत होता.
ट्रक-ड्रायव्हरची बायको
ट्रक-ड्रायव्हरची बायको स्वतःच्या मुलाच्या आजाराबद्दल सांगुन मुक्ताला त्याच्या डोक्यावर हात ठेवायची विनंती करते. पण मुक्त नकार देउन निघुन जाते.
इतर अतिआदर्श, अतिसहनशील, वैर्याशीही प्रेमाने वागणार्या (थोडक्यात अॅबनॉर्मल :-)) बायकांच्य सिरीयली बघणार्या माझ्या सासुला हे मुक्ताचं वागणं अजिबात आवडलं नाही. सासुबै म्हणे काय झालं जरा त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला असता तर? त्या लेकराचा काय दोष?
मी म्हणाले अहो तिची मनस्थिती तशी नाही आहे आता. तरी नाहीच. ह्या इतर गुडीगुडी कॅरेक्टरांमुळे बाईने कसं झीच्या हिरवणीसारखं असावं आणि नॉर्मल बाई अशी वागु शकते हेच पटेनासं झालांय लोकांना.
मुक्ता बर्वे माझी आवडती
मुक्ता बर्वे माझी आवडती अभिनेत्री आहे. अप्रतिम काम केल आहे
मोहन आगाशे ख-या आयुष्यातली
मोहन आगाशे ख-या आयुष्यातली भूमिका निभावत आहेत. आत्ताच सगळे भाग सलग दाखवले. मुक्ता कोणाला आणि का मारते ते नाही दाखवलं पण. म्हणजे ज्याला मारते तो माणूस आणि तो कुठे भेटला वगैरे, कि मधला एखादा भाग दाखवलाच नाही. आशिष कुलकर्णी किती वर्ष झाले असाच दिसतोय. किस चक्की का आटा खाता है हे निलम शिर्केला विचारायला पाहिजे.
कीर्तीकर सर (मिलिंद फाटक) -
कीर्तीकर सर (मिलिंद फाटक) - या पात्राचा पुढे (सिरियलीत पुढे, प्रत्यक्षात मुक्ता बर्वेच्या फ्लॅशबॅकमधे) काहीतरी पलटी खाणारा रोल असावा असं मला फार वाटतंय. ते पात्र जितकं निरुपद्रवी, फ्रेंडली दाखवलंय तितकं नसणार. प्लस न्यूज-चॅनलमधला तो कुणीतरी मोठा अधिकारी दाखवलाय. हा धागाही आहेच. >>> हो आहेच असं प्रोमोज वरुन वाटतं. ती त्याला ढकलते आणि काहीतरी बोलते.
ह्यातला छोट्यात छोटा रोल
ह्यातला छोट्यात छोटा रोल करणारा पण त्या घटनेशी निगडीत आहे असं मला वाटतं.
मुक्ता बर्वे चे काम आणि
मुक्ता बर्वे चे काम आणि सीरिअल मस्त आहे .वंदना गुप्ते चे पण काम भारी . झी मराठी च्या सध्या च्या मिळमिळीत सीरिअल पुढे छान वाटली ही सीरिअल .
आशिष कुलकर्णी किती वर्ष झाले
आशिष कुलकर्णी किती वर्ष झाले असाच दिसतोय >> अगदी संतूर डॅड .
मुक्ता च्याच " छापा काटा " नाटकात त्याला तिचा हिरो म्हणून बघितलंय
आशिष कुलकर्णी >>> कोण आहे????
आशिष कुलकर्णी >>> कोण आहे????
आशिष कुलकर्णी >>> कोण आहे????
आशिष कुलकर्णी >>> कोण आहे????>> मुक्ताकडे बाईक मागायला येणारा मुलगा.
पण मला आता आशिष कुलकर्णी थोडा सुजल्यासारखा वाटला.
मुक्ता कोणाला आणि का मारते ते नाही दाखवलं पण. म्हणजे ज्याला मारते तो माणूस आणि तो कुठे भेटला वगैरे>> हे सगळं पहिल्या भागातच दाखवलंय. आणि नंतर मुक्ता फ्लॅशबॅकमध्ये स्टोरी सांगतेय.
काल रात्री सगळे भाग सलग
काल रात्री सगळे भाग सलग दाखवले.
पुन्हा कधीतरी नक्की दाखवतील कारण ज्यांनी ते मिसले ते सिरियलच्या प्रवाहात यावेत म्हणून...
मी सुरवातीपासून ही मालिका पहातोय पण मुलाने पहिला भाग मिस केला होता म्हणून काल त्याच्या बरोबर पुन्हा पाहिला...
Was Worth Seeing Again...
कारण सोमवारी पहिल्यांदा पाहिला तेव्हा साहजिकच पुढचे भाग न पाहिल्याने तेव्हा लक्षात न आलेले बरेच बारकावे लक्षात आले...
बर्याच गोष्टी छान पेरल्यायत. विशेषतः पहिल्या भागात...
रुद्रम मधे किर्तीकर सर चांगले
रुद्रम मधे किर्तीकर सर चांगले निघाले. मारलं त्यांना बिचा-यांना. सटाटत मारतायेत लोकांना. बाबुला मारलं आता सरांना. पण मला एक काळात नाही कि एवढं channel हातात असताना किर्तीकरानी एकीकडे news का नाही चालवली, जेलमध्ये आत्महत्या नाही तर murder झालं असा आम्हाला संशय आहे अशी. मग पटापट सूत्र हालली असती बहुतेक. असो सिरीयलची कथा वेगळी आहे.
मारलं किर्तीकरांना पण? आई गं.
मारलं किर्तीकरांना पण? आई गं..
किर्तीकर प्लॉट फारच फ्लॉप
किर्तीकर प्लॉट फारच फ्लॉप होता!
न्यूज चॅनलचा एडीटर असा एकटाच तात्त्विक गप्पा मारत फिरेल का पोलिस स्टेशन टू पोलिस स्टेशन?!
आणि शिवाय आपले पुढचे प्लॅन उघड करत?
बाबुला मारणं अपेक्षित होतं पण हे जरा बोर वाटलं.
Pages