"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा पहिला भाग रात्री ११ वाजता बघितला. मालिका सायको थ्रिलर आहे . नेहमीच्या कौटुंबिक मालिकेपेक्षा हटके म्हणूनच बघणार . पहिला भाग जबरदस्त वाटला Happy

सायको थ्रिलर? प्रोमो वरुन तर 'बदला' हा विषय वाटतोय. तिचा नवरा, सासु सासरे गेले दाखवलेत ना अपघातात? तो अपघात घडवुन आणलेला असतो.

कालचा भाग पाहिला. ठीक वाटला.
वेगळा विषय आहे पण पहिल्याच भागात बराच उलगडा आहे. सस्पेन्स काही रहात नाही मग.
म्हणजे एका रोड अ‍ॅक्सिडेंट मधे मुक्ताचा नवरा आणि मुलगा गेलेत. ती कोमातुन बाहेर आलीये. आतापर्यंत समजत होती की तो एक अन्फॉर्च्युनेट अ‍ॅक्सिडंट होता पण आता तिला काही असं कळलं की तो कुणीतरी मुद्दाम घडवुन आणलेला प्लॅन होता.
त्यातल्या एकाला ती काल पळवुन नेते. त्याच्याकडुन माहिती काढायचा प्रयत्न करते आणि त्याच्या हाताच्या नसा कापुन गाडीत सोडुन देते.
तो मेलाय की जिवंत आहे ते कळलं नाही मला.

सायको थ्रिलर वाटली नाही पहिल्या भागावरुन तरी. बघु पुढे.
प्रोमोत सायको थ्रिलर म्हटलेलं का?

मी बघतेय ही. एक सामान्य स्त्री बदला घेते आपल्या माणसांच्या हत्येचा. मुक्ताने छान केलंय. सिरीयल तीन, साडेतीन महीन्यात संपणार आहे. सोम मंगळ सोडून मी रिपिट बघेन कारण इतर दिवशी गजाली बघतेना.

रागिणीला एक प्रश्न पडलाय जे आपापल्या बाबतीत घडलाय ( कोणीतरी दुसर्यांनी घडवून आणलाय ) त्याचा बदला घ्यायचा कि जे घडलं ते आपलं नशीब होत . दुर्दैव आपलं म्हणून सोडून द्यायचं

पहिला एपिसोड भारी होता. बघणार आहे ही सिरिअल.

ही राजवाडेची मालिका आहे असं मला कोणीतरी सांगितलं होतं. पण डायरेक्टरचं नाव वेगळंच होतं काल. आणि राजवाडे थेट "खिळा, फोटो, हार" मोड मधे दिसलाय. ये क्या भानगड है?

आजच्या भागात कळतंय राजवाडे हा मुक्ताचा नवरा आहे . अर्थात ऍक्सिडेंट मध्ये गेलेला . असंभव नंतर राजवाडे आणि कालच्या भागातला "सागर तळाशीकर " ( दोघेही असंभव मध्ये होते ) बऱ्याच वर्षांनी मालिकेत दिसताहेत

प्रेझेन्टेशन छान आहे
कलाकार दमदार आहेत
स्टोरीने मार खाऊ नये म्हणजे झाले

काभाप्र :

१. काल मुक्ता बर्वे ज्याच्या हाताच्या नसा कापून त्याला कारमध्ये सोडून देते त्याला त्याचा पोलिस मेव्हणा सिमकार्डचे लोकेशन ट्रेस करून शोधतो असे दाखवले आहे (फोन स्विच ऑफ होता तरीही). मग याच टेक्निकने मुक्ता बर्वे ने तो फोन स्वतःच्या घरात ठेवुन घेतला आहे तर तेही २ मिनिटात ट्रेस होईल ना? तिने सिमकार्ड काढून फेकलेले वगैरे काही दाखवले नाही.

२. शिवाय तिला एक सोडून दोन व्यक्तींनी पाहिले आहे जे पोलिसांना भेटले तर २ मिनिटात उलगडा होऊ शकतो कि ती मुक्ताच होती. एकाने तिला छोट्या केसात पाहिले पण व्यवस्थित गाडीतून जाताना आणि एकाने मूळ रुपात आणि अत्यंत चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी, संशयास्पद उत्तरे देतांना.

३. कारच्या आसपास एवढे पोलिस असताना तिने पुन्हा बेरात्री त्या कारपाशी जाऊन पाहाणी करणे अत्यंत हलगर्जी डिसिजन होता.

असो..

या मालिकेमुळे माझे 'लव लग्न लोचा' चे रीपीट बुडते आहे. मला ११ लाच बघायला मिळायची लललो Sad

पियू, मोबाईल स्विच ऑन असताना तो शेवटचा येऊर रोडवर होता ते समजते. म्हणून त्या रस्त्याने शोधाशोध करतात.

पण कालच्या भागात मुक्ता मोबाईल स्विच ऑन करते आणि लगेचच स्विच ऑफ करते. तो सागर तळाशीकरचाच असतो ना?? मग त्यावरुन कळत नाही का??

पियु, 2 आणि 3 ला >> +1. तिने लोकेशनवर जाणेच चुक होते खरंतर. पण ती थोडी सायको दाखवलीय त्यामुळे ती असं करणं शक्य आहे.

कारच्या आसपास एवढे पोलिस असताना तिने पुन्हा बेरात्री त्या कारपाशी जाऊन पाहाणी करणे अत्यंत हलगर्जी डिसिजन होता. >>> मम.

मुक्ता रॉक्स मात्र. काय केलंय तिने काम. मालिका उत्कंठावर्धक आहे आणि लवकर संपणार आहे, त्यामुळे मी बघतेय.

आजच्या भागात मुक्ता चा अभिनय मस्त होता . वंदना गुप्ते पण >>>>>>> अगदी. डॉक समोर असतानाचा अभिनय काय भारी केलाय !

मी तरी तिच्यासाठीच पाहणार ही मालिका.

काल दोन्ही एपिसोड पाहिले, मुक्ता as usual भारी काम करतेय. बाकी सगळंच कास्टिंग चांगलं आहे.

पण सुरुवातीलाच इतकं भंकस प्लॅनिंग करून बदला घेणं पटत नाहीये. हॉटेलच्या बाहेर तो सा. त. तिला लिफ्ट देईल/ नाही देणार, घरापर्यंत/रिक्षपर्यंत सोडेल, गुंगीचे औषध वाली बाटली असणाऱ्या दुकानापर्यंत गाडी नेईल किंवा नाही एवढ्या शक्यता असताना ही खुनाचा प्लॅन कुठल्या बेसवर करते.

त्याचा फोन घरी आणून स्विचऑन करणे, भेटलेल्या लोकांशी संशयास्पद अडखळत बोलणे आणिस्वतः एक रिपोर्टर असताना खून करून त्याच जागी पोलिसांसमोर जाण्याचा हलगर्जीपणा तर महानच!

तिच्या लग्नापासून सासरचे लोक यांच्याशी काही संबंध ठेवत नाहीत, सासरची मोठी बिझनेस फॅमिली आहे आणि स रा समाजसेवा करतो त्यामुळे त्याच्याशी संबंध तोडले यावरून त्याच्या खुनात त्यांचाही हात असू शकतो.

इथे वंदना गुप्ते कोणाला सुजल्यासारखी नाही का वाटली? शब्दोच्चार पण जीभ जड असल्यासारखे आहेत.

तिच्या लग्नापासून सासरचे लोक यांच्याशी काही संबंध ठेवत नाहीत, सासरची मोठी बिझनेस फॅमिली आहे आणि स रा समाजसेवा करतो त्यामुळे त्याच्याशी संबंध तोडले यावरून त्याच्या खुनात त्यांचाही हात असू शकतो.>>
मॅगी, तिला कन्फर्म माहिती सांगणारी ती बाई भेटते बहुतेक. आजच्या भागात दाखवतील बहुतेक. आधी तिला तो ट्रकचा ताबा सुटून घडलेला अपघात वाटत असतो. पण नंतर कळतं की आशिषला काहीतरी असं कळलं होतं ज्यामुळे त्याला मारण्यासाठी तो अपघात घडवला गेलाय.

सा तच्या खुनाबद्दल तर ती रिस्क घेते असं म्हणायला हवं. (तिला त्याच्याकडून माहिती हवी असते) कारण ती ज्या गेटपमध्ये त्याला भेटते आणि स्वतःच्या गळ्यातली माळ वगैरे ओढून ज्या पद्धतीने बोलते त्यावरून तरी तो पाघळेल आणि तिचं ऐकेल अशी परिस्थिती ती निर्माण करते. गुंगीचं औषध तिचं बाटलीत मिसळत असणार कारण अजून कुणाला यामध्ये सामील करुन घेईल असंही वाटत नाही. आणि त्याची माहिती तिने काढलेली असणारच त्याशिवाय ती एवढा प्लान करणार नाही. एकंदर सा त चं कॅरॅक्टर ढीला दाखवलंय. हीला घरापर्यंत सोडायला जायला तयार होणं आणि बायको फोन करेल म्हणून तिला काहीच न कळवता मोबाईल स्विच ऑफ करणे वगैरे.
मला तरी या समजून घ्यायच्या गोष्टी वाटतायत. सिरियल अत्यंत बारकाईने बघावी वाटतेय.

त्याचा फोन घरी आणून स्विचऑन करणे, भेटलेल्या लोकांशी संशयास्पद अडखळत बोलणे आणिस्वतः एक रिपोर्टर असताना खून करून त्याच जागी पोलिसांसमोर जाण्याचा हलगर्जीपणा तर महानच! >> यासाठी +1.

कालचा भाग पाहिला. पण पहिले दोन भाग बुडले होते, त्यामुळे इथली बरीचशी चर्चा डोक्यावरून गेली Sad
मुक्ताने सुरू देखील केलंय का बदला घेणं?
मग कालच्या भागात ती मोहन आगाशेंशी बोलत होती, ते सगळं नाटकच होतं?
अभिनय मात्र भारी. वंदना गुप्तेंचाही. संवादही चांगले होते कालचे.

मग कालच्या भागात ती मोहन आगाशेंशी बोलत होती, ते सगळं नाटकच होतं? >>>> तो फ्लॅशबॅक होता. ती त्या सातवला मारून घरी येते आणि कॅमेर्‍यासमोर बसून सगळं रेकॉर्ड करत असते.

आम्ही तीनही एपिसोड काल पाहिले. अ‍ॅक्टींग भारी आहे सगळ्यांची ! मुक्ता बर्वेचा वेगळा रोल पहायला छान वाटतं आहे.

इथे वंदना गुप्ते कोणाला सुजल्यासारखी नाही का वाटली? शब्दोच्चार पण जीभ जड असल्यासारखे आहेत. >>>>> हो !! पहिल्याच दृष्याला "बापरे असं काय झालय" असं वाटलं.

खूप मोठा गुंता आणि खूपजण गुंतलेत बहुतेक. शेवटच्या एपिसोडला सर्व स्पष्ट होईल असं वाटत.

तो इन्स्पेक्टर मठ्ठ आहे का. खरं म्हणजे ती पहील्याच भागात स्वत:च्या कर्माने आपोआप जाळ्यात आली होती.

Pages