सहकारी/मैत्रीण गर्भवती आहे असे प्रथमच दिसते तेंव्हा...

Submitted by एक मित्र on 9 August, 2017 - 09:21

फार महत्वाचा नसलं तरी जरा नाजूक विषय आहे. पण चर्चा झाली तर बरे होईल.

परवाची गोष्ट. ऑफिसमध्ये जुन्या प्रोजेक्ट टीम मधली एक सहकारी गर्भवती आहे असे लक्षात आले. तशी हि गुड न्यूज तिच्या सध्याच्या टीम मध्ये तर सर्वांनाच कळली होती. पण मला ती अनेक दिवसांनी पहिल्यांदाच लिफ्ट मध्ये भेटली. प्रेग्नंट आहे लक्षात आले. तर हाय हेलो झाल्यावर मी सहज तिला अभिनंदन म्हणालो. पण तिची प्रतिक्रिया फारशी चांगली नव्हती. वाईटसुद्धा नव्हती. नुसतेच कसनुसे स्मितहास्य केल्यासारखे करून ती दुसरीकडे पाहू लागली. नंतर काही बोलली पण नाही. त्यानंतर लिफ्टमधून बाहेर पडल्यावर सुद्धा बाय वगैरे न करताच निघून पण गेली.

मी आपल्याशीच विचर करत राहिलो. माझे तर इथे काही चुकले नाही ना? प्रामाणिकपणे सांगायचे तर अशावेळी (जेन्वा सहकारी मैत्रीण अनेक दिवसांनी अचानक भेटते व प्रेग्नंट आहे असे लक्षात येते) अभिनंदन म्हणायचे असते कि नसते? कि एकदम बाळ झाल्यावरच अभिनंदन करायचे असते? याबद्दल मी आधीपासूनच कमालीचा कन्फ्युज्ड आहे. आणि विषय इतका नाजूक असल्याने याबाबत आजवर कुठे चर्चा पण करता आली नाही. बाकीचे कुणी मला अशावेळी अभिनंदन वगैरे म्हणताना कधी दिसले नाहीत. किंवा माझ्या पाहण्यात तरी आलेले नाहीत. तरीही त्यावेळी मी तिला सहज तोंडातून बाहेर आले आणि अभिनंदन म्हणून गेलो.

हे माझे चुकले का? याबाबत योग्य शिष्टाचार काय आहे?

Group content visibility: 
Use group defaults

>> तशी हि गुड न्यूज तिच्या सध्याच्या टीम मध्ये तर सर्वांनाच कळली होती.

इथे संदिग्धता आहे. न्यूज सध्याच्या टीम मध्ये सर्वांना कळली होती याचा अर्थ काय आणि हे तुम्हाला कसे कळले? म्हणजे तिने स्वत: बातमी सांगितली होती आणि इतरांनी त्याबद्दल अभिनंदन केले होते का? तसे असेल तर तुम्ही अभिनंदन करण्यात चुकीचे काहीच नाही. पण तिने सर्वांना स्वत: सांगितले आहे का याविषयी नक्की माहित नसेल किंवा टीम मध्ये परस्पर गॉसिप सुरु असेल तर अभिनंदन करणे प्रशस्त नाही.

>> याबाबत योग्य शिष्टाचार काय आहे?

अशा वेळी अभिनंदन करण्यापूर्वी काही अलिखित संकेतांचे पालन करावे लागते. व्यक्ती, स्थळ, तुमचे नातेसंबंध इत्यादीनुसार ते ठरते. तुम्ही अपेक्षित करताय तसे त्यासाठी एक असा शिष्टाचार ठरलेला नाही. त्यामुळे, इथे प्रतिक्रिया देणाऱ्या दोन्ही बाजू आपापल्या जागी बरोबर आहेत असे माझे मत आहे. तुमच्या या स्पेसिफिक केस मध्ये पूर्वी केवळ कामापुरते संबंध असलेल्या स्त्रीला तिने तुम्हाला हि बातमी स्वत: न सांगता किंवा हि बातमी पब्लिक झाली आहे का याची माहिती न घेता तुम्ही तिचे अभिनंदन करणे हे तसे योग्य नाहीच. पण याचा अर्थ तुमच्याकडून काही भयंकर गुन्हा झालाय असेही नाही. सो चिल Happy

टण्या म्हणजे नानाकळा का? >>> नाही म्हणजे टवणे सर. त्यांनी एकदा प्रवीण दवणेच्या लिखाणासारखे मस्त मजेशीर लिखाण केले होते कुठे ते आठवत नाहीये पण तेव्हाच id बदलून दवणे च्या टवणे सर आयडी घेतला

Happy Happy Happy
हो ग अनु केलं ग दुरुस्त .
बरं झालं सांगितलंस लगेच आता चार तासांनी दुरुस्त पण नाही करता येतं .

मी काय करू? किन्नव मला कोणाशी तरी बोलायचय, ..च्या प्रत्येक प्रश्न्नाला हो किन्वा नाही असा उत्तर नसत ना, जरा तारतम्य वापरुन आपणच आपले प्रश्ना निकालात कधायचे असतात.

Lol!!!

Pages