फार महत्वाचा नसलं तरी जरा नाजूक विषय आहे. पण चर्चा झाली तर बरे होईल.
परवाची गोष्ट. ऑफिसमध्ये जुन्या प्रोजेक्ट टीम मधली एक सहकारी गर्भवती आहे असे लक्षात आले. तशी हि गुड न्यूज तिच्या सध्याच्या टीम मध्ये तर सर्वांनाच कळली होती. पण मला ती अनेक दिवसांनी पहिल्यांदाच लिफ्ट मध्ये भेटली. प्रेग्नंट आहे लक्षात आले. तर हाय हेलो झाल्यावर मी सहज तिला अभिनंदन म्हणालो. पण तिची प्रतिक्रिया फारशी चांगली नव्हती. वाईटसुद्धा नव्हती. नुसतेच कसनुसे स्मितहास्य केल्यासारखे करून ती दुसरीकडे पाहू लागली. नंतर काही बोलली पण नाही. त्यानंतर लिफ्टमधून बाहेर पडल्यावर सुद्धा बाय वगैरे न करताच निघून पण गेली.
मी आपल्याशीच विचर करत राहिलो. माझे तर इथे काही चुकले नाही ना? प्रामाणिकपणे सांगायचे तर अशावेळी (जेन्वा सहकारी मैत्रीण अनेक दिवसांनी अचानक भेटते व प्रेग्नंट आहे असे लक्षात येते) अभिनंदन म्हणायचे असते कि नसते? कि एकदम बाळ झाल्यावरच अभिनंदन करायचे असते? याबद्दल मी आधीपासूनच कमालीचा कन्फ्युज्ड आहे. आणि विषय इतका नाजूक असल्याने याबाबत आजवर कुठे चर्चा पण करता आली नाही. बाकीचे कुणी मला अशावेळी अभिनंदन वगैरे म्हणताना कधी दिसले नाहीत. किंवा माझ्या पाहण्यात तरी आलेले नाहीत. तरीही त्यावेळी मी तिला सहज तोंडातून बाहेर आले आणि अभिनंदन म्हणून गेलो.
हे माझे चुकले का? याबाबत योग्य शिष्टाचार काय आहे?
आजिबात काही चुकले नाही.
आजिबात काही चुकले नाही.
सहकार्याचे अभिनंदन करण्याला काही शिष्टाचार नाहीत. अगदीच मिटिंग मधून बाहेर बोलावून , रात्री ११ वाजता कॉल करून अभिनंदन करणेही बरोबर असेही नाही.
तुम्ही तुमचे सहृदय सहकारी असण्याचे कर्तव्य पार पाडले... सहकारी कसे रिअॅक्ट करतील ते त्यांची परिस्थिती ठरवते.
ह्यबद्दंल कुठलेही वैषम्यं मनात बाळगू नका आणि ह्यावर विचार करणे सोडून द्या.
माझ्यामते, कोण्याही गर्भवतीने
माझ्यामते, कोण्याही गर्भवतीने स्वतःहून खास तुम्हाला (तुम्ही म्हणजे कोणीही, सहकारी, शेजारी, नातेवाईक) ती बातमी सांगितल्याशिवाय आपणहून अभिनंदन करु नये, चौकशी करु नये, हिंट करु नये. यात दोन तीन मुद्दे आहेत, असतात. (हे तुमच्या केस शी संबंधित नसतीलही कदाचित)
१. मुड स्विंग्स. गर्भधारणेच्या काळात अनेकदा मुडस्विंग्स असतात. कोणत्या वेळी स्त्री कोणत्या मुडमध्ये कशी असेल सांगता येत नाही. तेव्हा ती आपणहून सांगायच्या मुडमध्ये नसेल, किंवा निगेटीव मूड मध्ये असेल, त्रयस्थ व्यक्तीने डिस्टर्ब केले असेल तर संकोचू शकते.
२. काही कॉम्प्लीकेशन्स. कॉम्प्लीकेशन्स काहीही असू शकतत, मेडिकल, फिजिकल, सोशल, घरातल्या लोकांचे, नातेवाईकांमधले. अशा वेळेस कदाचित कालपर्यंत प्रेग्नंसीबद्दल आनंदी असणारी व्यक्ती आजच्या दिवसभरात चिडलेली असू शकते. कॉम्प्लिकेशन्स सॉर्ट आउट झाल्यावर कदाचित उद्या परत आनंदी असू शकेल, यु नेवर नो व्हाट शी इज गोइंग थ्रू.....
३. अनोळखी व्यक्ती. अनोळखी म्हणजे अनोळखीच नव्हे. त्रयस्थ. गर्भवतीच्या भावविश्वाचा भाग नसलेले. सहकारी जरी असले तरी भावविश्वाचा भाग असतीलच असे नाही. तुम्ही कितीही मैत्रीपुर्ण व्यवहार आणी सामंजस्य ठेवले असेल तरी एक होणारी आई म्हणून ती प्रोटेक्टीव झालेली असते. त्यात तिसर्या कोणी न सांगता भोचकपणा केल्यास नक्की काय करावे हे सुचत नाही त्यामुळे रिअॅक्शन अनपेक्षित असू शकते. भोचकपणा इथे जो शब्द वापरला आहे तो वाईट अर्थाने नाही. संबंधित व्यक्तीस तुम्ही चांगल्या मनाने वा वाईट मनाने विचारा, विषय तुमच्याशी संबंधित नसेल तर तो भोचकपणाच....
मला जे योग्य वाटले, सुचले ते लिहिले. अधिक उणे असल्यास क्षमस्व!
नाना, हे पॅरलिसिस बाय अ
नाना, हे पॅरलिसिस बाय अॅनालिसिस झाले. अभिनंदन हा शब्दं फार ईनफॉर्मल, कॅज्युअल आणि पॉझिटिव कनोटेशन असणारा आहे, हो.
ही एक फ्री फ्लोईंग हॅपी थॉट आहे. प्रेग्नंट स्रियांना बघून आनंद न वाटणारी व्यक्ती विरळाच.
अभिनंदन तर लांब मग तर हाय, हॅलो म्हणण्याआधीही दुनियेतल्या अगणित निगेटिव गोष्टींपैकी एखादी हिच्या/ह्याच्या बाबतीत घडली नसेल ना असा विचार करत बसावा लागेल.जुजबी वैयक्तिक आणि प्रोफेशनल लेवलवर ओळख असलेल्या एवढे कॉम्प्लेक्स विचार करण्याची आजिबात गरज नाही. आजच्या सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात तर नाहीच नाही.
अभिनंदन तर लांब मग तर हाय,
अभिनंदन तर लांब मग तर हाय, हॅलो म्हणण्याआधीही दुनियेतल्या अगणित निगेटिव गोष्टींपैकी एखादी हिच्या/ह्याच्या बाबतीत घडली नसेल ना असा विचार करत बसावा लागेल.
>>>> हे खरं तर पॅरलिसिस बाय अॅनालिसिस म्हणावे लागेल...
प्रेग्नंट स्रियांना बघून आनंद न वाटणारी व्यक्ती विरळाच.
>> प्रश्नकर्त्याला 'आपल्याला का आनंद झाला' हा प्रश्न नाही पडलाय.... 'गर्भवती सहकारी अशी का वागली' हा प्रश्न पडलाय. तेव्हा त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलंय..
कसले काय हो,आवडत्या पुरुषाने
कसले काय हो,आवडत्या पुरुषाने या बायकांना काहीही प्रश्न विचारलेले त्यांना आवडतात.
आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती,मी तिला एक दिवस कॉलेज मध्ये जीन्स डे ला " तू छान दिसतेस असे म्हंटल्यावर साधं हसलीही नाही ,तोंडावर रागिट भाव् आणून निघून गेली.नंतर प्रॅक्टीकलला त्यांच्याच गृपमधल्या त्यांच्या छाव्याने " आज सगळ्या फटाका दिसत आहात" अशी कॉम्प्लीमेंट दिल्यावर चित्कारनाट्यात ही ललनाही सामिल होती.
मॉरल ऑफ स्टोरी--- स्त्रीला आवडणार्या पुरुषाने तिला काहीही विचारले तरी चालते ,नावडत्या वा न्युट्रल रिलेशनमधल्या पुरुषाने काहीही विचारलेले चालत नाही.
हायझेनबर्ग तुम्ही म्हणताय
हायझेनबर्ग तुम्ही म्हणताय तसाच मी तंतोतंत विचार करतो. आनंदाची गोष्ट वाटली अभिनंदन केले प्रश्न मिटला. पण नानाकळा यांनी माझे कन्फ्युजन नक्की का होतेय ते शब्दात मांडलेय त्यबद्दल त्यांचे खरेच आभार. विशेषकरून आजकाल काही कॉम्प्लीकेशन्स वागिरे असतात. ती व्यक्ती तणावात असते. डॉक्टरनी काय सांगितलेय आपल्याला माहित नसते. आणि आपण अभिनदन बोलून जातो. म्हणूनच कदाचित मी फार कोणाला अशा वेळी अभिनंदन म्हणताना पाहिलेले नाही.
पण याबाबत जनरल सामाजिक ट्रेंड/पद्धत काय आहे हे जाणण्यासाठी धागा काढला. रिप्लाय बद्दल आभार.
सिंथेटिक जिनियस... तुमचा एंगल
सिंथेटिक जिनियस... तुमचा एंगल पण बरोबर आहे. मी काही तिचा आवडत वगैरे नव्हतो. पण नावडता सुद्धा नव्हतो. तसे आमचे कामाव्यतिरिक्त जास्त कधी बोलणे झाले नाही ती टीम मध्ये होती तेंव्हा.
नानाकळा +१ हायझेनबर्ग -१
नानाकळा +१
हायझेनबर्ग -१
हे खरं तर पॅरलिसिस बाय अ
हे खरं तर पॅरलिसिस बाय अॅनालिसिस म्हणावे लागेल... Happy >> आपला तो बाब्या आणि दुसर्याचं
प्रश्नकर्त्याला 'आपल्याला का आनंद झाला' हा प्रश्न नाही पडलाय.... 'गर्भवती सहकारी अशी का वागली' हा प्रश्न पडलाय. तेव्हा त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलंय.. >> ही अमूक कारणे असू शकतात म्हणून अभिनंदन करू नये (असा अर्थ लागतो आहे)
ह्या अमूक कारणांमुळे तिने अभिनंदनाचा स्वीकार केला नसेल (असे लिहायचे होते का तुम्हाला? तसा अर्थ मला लागला नाही).
लेखक महाशय, समजा ह्यापूर्वी तुम्ही असेच एखाद्या सहकारी स्त्रीचे अभिनंदन केले असते आणि तिने हसून, मनमोकळेपणाने त्याचा स्वीकार केला असता आणि त्यानंतर तुम्हाला हा वरचा अनुभव आला असता तर मग तुमची काय भावना झाली असती?
खरं सांगायचं तर मला असं
खरं सांगायचं तर मला असं कॉन्ग्रॅटस पुरुष कलिग ने केलेलं विशेष आवडणार नाही(मि शेअर केलं नसल्यास).का ते सांगता येत नाही.मे बी 'उद्या हा शाणा नुसतं जंक खाऊन पोट वाढलं/थायरॉईड ने ब्लोटिंग झालं असलं तरी अभिनंदन म्हणेल' वगैरे काही डॉक्यात येईल.
पण असे विचार फक्त मी करतेय, त्याने चांगल्या मनाने अभिनंदन केलंय हे लक्षात घेऊन थॅन्क्स म्हणेन.मनात 'भला मानूस हाय वो!!' ची फिकट नोंद वगैरे होईल.
टोन अल्सो मॅटर्स
हाब, माझं अनालिसिस
हाब, माझं अनालिसिस प्रेग्नन्सीशीच संबंधित तीन स्पष्ट मुद्दे घेऊन केलेलं आहे, व्हेग नाहीये...
तुम्ही मात्र अगणित मुद्दे म्हणत आहात, बघा बॉ...
अरे त्या व्यक्तीनी स्वतःहून
अरे त्या व्यक्तीनी स्वतःहून येऊन तुम्हाला सांगितलेलं नसेल तर अवॉईड करावं माझ्यामते अभिनंदन करणे. बाकी प्रेगनन्सी रिलेटेड काही मुद्द्यांपेक्षा मला वाटतं ऑफिस एनवायर्नमेंट मध्ये प्रत्येक व्यक्तीचे लोकांना कधी सांगावे आणि कधी नाही ह्या बद्दलचे निकष वेगळे असतात. तुम्हाला वाटलं, की बरीचशी विझिबल आहे प्रेगनन्सी तरी त्या व्यक्तीनी ऑफिशियली त्यांच्या मॅनेजेर (बॉस) ला सांगितलेलं नसेल आणि त्यांना सध्या सांगायचं नसेल असंही असू शकतं. थोडक्यत, अगदी साधी गोष्ट वाटली अभिनंदन करणे, तरी तसं पब्लिकली करण्याचे त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही इम्प्लीकेशन्स असू शकतात हे लक्षात ठेवावं.
प्रेग्नंट आहे लक्षात आले. तर
प्रेग्नंट आहे लक्षात आले. तर हाय हेलो झाल्यावर मी सहज तिला अभिनंदन म्हणालो. पण तिची प्रतिक्रिया फारशी चांगली नव्हती. वाईटसुद्धा नव्हती.
>>>>>
एक्स गिर्लफ्रेंड किंवा क्रश होता का तिचा तुमच्यावर
बात कहाँ से कहाँ तक लेके गये
बात कहाँ से कहाँ तक लेके गये आप च्रप्स्मामा!
तुम्ही कितीही मैत्रीपुर्ण
तुम्ही कितीही मैत्रीपुर्ण व्यवहार आणी सामंजस्य ठेवले असेल तरी एक होणारी आई म्हणून ती प्रोटेक्टीव झालेली असते. >> 'अभिनंदन' शब्दं ऐकून प्रोटेक्टिव होण्याईतपत मनात भिती ऊत्पन्न होऊ शकते ह्याचे पॅरालिसिस आपलं अॅनालिसिस करा पाहू एकदा.
त्यात तिसर्या कोणी न सांगता भोचकपणा केल्यास नक्की काय करावे हे सुचत नाही त्यामुळे रिअॅक्शन अनपेक्षित असू शकते. >> ओळख असतांना अभिनंदन करणे म्हणजे भोचकपणा. मग भोचकपणा शब्दाच्या अर्थाचं अॅनालिसिसही करूनच टाका एकदा.
अगदी साधी गोष्ट वाटली अभिनंदन करणे, तरी तसं पब्लिकली करण्याचे त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही इम्प्लीकेशन्स असू शकतात हे लक्षात ठेवावं. >> इम्प्लीकेशन्स
बसमध्ये जर मी माझी जागा अनोळखी प्रेग्नंट व्य्कतीला बसायला दिली तर अशी प्रेग्नंन्सी विजिबल आहे म्हणून रिकगनाईझ करणे ही भोचकपणाच का? मग असे करण्यबद्दल ती व्यक्ती आणि ईतर लोक तुमच्यावर ऊखडले तर वाईट वाटण्याचे कारण नाही, वरची तीन कारणे तर माहितंच आहेत आपल्याला.
आणि समजा मी माझ्या जागेवरून ऊठलोच नाही तर तेही शिष्टाचाराला धरूनच असावे, कारण त्या व्यक्तीने कुठे मला सांगितले की मी प्रेग्नंट आहे म्हणून, भलेही ती जागा प्रेग्नंट व्यक्तींसाठी राखीव का असेना.
>>> लेखक महाशय, समजा
>>> लेखक महाशय, समजा ह्यापूर्वी तुम्ही असेच एखाद्या सहकारी स्त्रीचे अभिनंदन केले असते आणि तिने हसून, मनमोकळेपणाने त्याचा स्वीकार केला असता आणि त्यानंतर तुम्हाला हा वरचा अनुभव आला असता तर मग तुमची काय भावना झाली असती?
तरीही मला आश्र्चर्य आणि त्याहून जास्त कन्फ्युजन झाले असतेच. पण हा, जर मी नेहमी किंवा अनेकदा पूर्वी तुम्ही म्हणताय तसे अनुभवले असते तर मात्र कदाचित "अरे हिला की झाले नर्वस व्हायला" असा म्हणून विचार सोडून दिला असता. तेच तर आहे ना. नक्की नियम माहित नाही आपल्यकडे काय पद्धत असते त्याचा म्हणून कन्फ्युजन. अभिनंदन करायचे असते कि नसते.
mi_anu, वैद्यबुवा.. तुमच्या प्रतिक्रियांनी अजून गोंधळात भर पडली मग मी पुढल्या वेळी कुणाला अभिनंदन करू कि नको? अभिनंदन केले नाही तर "काय रूड आहे हा. मी ओळखते त्या सर्वांनी अभिनंदन केले. एक्सेप्ट हा" अशी प्रतिक्रिया आली तर?
च्रप्स, तसे काहीही नाही फोर्मल रिलेशन होते आमचे. ऑफिसच्या कामापुरते.
हाबं, I think you would know
हाबं, I think you would know this stuff. People sometimes don't announce it right away given possible implications on promotions etc. Ideally, I understand there should be no implications in a workplace that treats everyone fairly but every person has her own perception of what the implications could or couldn't be. As I mentioned above, it may seem very natural for someone to congratulate a pregnant person but in an office environment, things could get tricky and that's why I think its best to be careful and let them announce first.
In a bus, you don't really have to acknowledge the person is pregnant, you just get up and offer your seat.
The point here is, congratulating someone may turn into an unintended announcement which may not be acceptable to the person given their own situation.
तरीही मला आश्र्चर्य आणि
तरीही मला आश्र्चर्य आणि त्याहून जास्त कन्फ्युजन झाले असतेच. पण हा, जर मी नेहमी किंवा अनेकदा पूर्वी तुम्ही म्हणताय तसे अनुभवले असते तर मात्र कदाचित "अरे हिला की झाले नर्वस व्हायला" असा म्हणून विचार सोडून दिला असता. तेच तर आहे ना. नक्की नियम माहित नाही आपल्यकडे काय पद्धत असते त्याचा म्हणून कन्फ्युजन. अभिनंदन करायचे असते कि नसते. >> तेच मी आधीही म्हणालो होतो. तुम्हाला त्या क्षणी बरोबर वाटले अभिनंदन करणे, करून टाका आणि आपल्या कामाला लागा. कुणाचे 'अभिनंदन' करणे ही काही वाईट गोष्टं नाही. ईतरांना काय वाटेल त्यावर तुमचे वागणे ठरवत बसलात तर नेहमीच कन्फ्यूज रहाल.
साधे हॅलो म्हंटले म्हणून तोंड फिरवणारेही लोक असतात, म्हणून आपण आपल्याला बरोबर वाटणार्या गोष्टी सोडू नयेत.
कुणाचे 'अभिनंदन' करणे ही काही
कुणाचे 'अभिनंदन' करणे ही काही वाईट गोष्टं नाही. ईतरांना काय वाटेल त्यावर तुमचे वागणे ठरवत बसलात तर नेहमीच कन्फ्यूज रहाल.
साधे हॅलो म्हंटले म्हणून तोंड फिरवणारेही लोक असतात, म्हणून आपण आपल्याला बरोबर वाटणार्या गोष्टी सोडू नयेत. >>+१११
बुवा हे वाचा,तशी हि गुड न्यूज
बुवा हे वाचा,
तशी हि गुड न्यूज तिच्या सध्याच्या टीम मध्ये तर सर्वांनाच कळली होती.
In a bus, you don't really have to acknowledge the person is pregnant, you just get up and offer your seat. >> म्हणजे. अनोळखी माणसाने प्रेग्नंट आहे हे ओळखून बसायला दिलेली सीट चालते पण ओळखी माणसाने प्रेग्नंट आहे म्हणून अभिनंदन म्हंटलेले चालत नाही?
>> ईतरांना काय वाटेल त्यावर
>> ईतरांना काय वाटेल त्यावर तुमचे वागणे ठरवत बसलात तर नेहमीच कन्फ्यूज रहाल.
बहुतांश सहमत पण थोडा असहमत. अनेकदा आपण जिथे राहतो काम करतो तिथले रीतीरिवाज पद्धती परिणाम इत्यादी विचारात घ्याव्या लागतात. ओके. बाकीचे जाऊदे, माझ्यामुळे मैत्रिणीला ऑकवर्ड झाले हे फिलिंग मला नकोय. आणि "साधे अभिनंदन पण म्हणाला नाही" हे सुद्धा नकोय.
हाब +१
हाब +१
मी प्रेग्नंट नसताना, माझ्या
मी प्रेग्नंट नसताना, माझ्या पोटाकडे बघून मला बसमध्ये लोकांनी सीट दिलेली आहे मला नाही बाबा काही वाटलं एवढ्या गर्दीत व्हॉल्बो मध्ये उभं राहण्यापेक्षा बसलेलं बरं. बाकी मी बाई असून ओळखीच्या / जुजबी ओळखीच्या कोणाचच कधी खात्रीलायक माहिती असल्याशिवाय किंवा त्या व्यक्तीने प्रेग्नन्सी कन्फर्म केल्याशिवाय अभिनंदन केलेलं नाही. वरील कारणं! There are 'n' number of reason why the stomach may look like that. बाकी बायका सहसा अभिनंदन करण्यापेक्षा मॉर्निंग सिकनेस, cravings, झोपेचं खोबरं, acidity इ. चर्चा करतात.
तुम्ही तिच्या पोटाकडे
तुम्ही तिच्या पोटाकडे न्याहाळून बघितलं याचा पण राग आलेला असू शकतो की तिला.
हाब, आपण दोघे पुरुष इथे अतिशय
हाब, आपण दोघे पुरुष इथे अतिशय वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलत आहोत असे दिसतं. तुम्ही अभिनंदनकर्त्याच्या भूमिकेतून बघताय मी गर्भवती च्या...
, सो लेट्स स्टॉप हिअर... आणि स्त्री सदस्यांना बोलू देत कसं असावं, काय वाटतं ते... आपण बघू...
एक लिहू का, जरी प्रेग्ननसी
एक लिहू का, जरी प्रेग्ननसी डिक्लेअर झाली तरी पहिले तीन महिने क्रिटिकल असतात. कदाचित न्युज हळू हळू पसरल्यावर टर्मिनेट झाली असेल किम्वा करायचे असे कॉम्प्लिकेशन काही असेल मेडिकली. तर त्या बाईंना कान कोंडे झाले असेल अभिनंदन ऐकून. असे असेलच असे नाही एक शक्यता.
दुसरे म्हणजे सरोगेट वगैरे असेल कुणासाठी तर आपण अभिनंदन करून उपयोग नाही.
तस्मात बेबी शॉवरचे निमंत्रण किंवा जोडप्याकडून ऑफिशिअल अनाउस्मेंट येत नाही तोपरेन्त गप्प राहावे.
कामापुरते संबंध म्हणजे तितकेच ठेवावे.
@राजसी हाहा! सच ए स्पोर्ट!
@राजसी
हाहा! सच ए स्पोर्ट!
बहुतांश सहमत पण थोडा असहमत.
बहुतांश सहमत पण थोडा असहमत. अनेकदा आपण जिथे राहतो काम करतो तिथले रीतीरिवाज पद्धती परिणाम इत्यादी विचारात घ्याव्या लागतात. ओके. >> आपली मानसिक अवस्था पॉझिटिव्/निगेटिव काही असेल/नसेल पण प्रामाणिक भावनेने जुजबी ओळखीवर हितचिंतन करणार्या व्यक्तीप्रती सदभावनेला धरून प्रतिसाद द्यावा हा ही सोशल जीवनाचाच शिष्टाचार आहे. एखाद्या व्यक्तीने काही कारणाने तो न पाळल्यास तो त्याचा प्रश्नं आहे. तुम्ही त्या बद्दल वैषम्य वाटून घेऊन नका हेच सांगणे आहे.
माझ्यामुळे मैत्रिणीला ऑकवर्ड झाले हे फिलिंग मला नकोय. आणि "साधे अभिनंदन पण म्हणाला नाही" हे सुद्धा नकोय. >> मग काय करायचं म्हणताय? 'मी तुमचे प्रेग्नंसी बद्दल अभिनंदन केल्यास तुम्हाला ऑकवर्ड वाटेल का' असे विचारून घेत चला.
राजसी >> त्यांची मैत्रिण प्रेग्नंट आहे हे त्यांना खात्रीने माहित आहे हे त्यांनी वरती लिहिल्याचे मी एकट्यानेच वाचले की काय असे मला वाटून गेले.
तुमचे ऑफिसातील रेप्युटेशन काय
तुमचे ऑफिसातील रेप्युटेशन काय आहे, तुम्ही कशा प्रकारे अभिनंदन म्हणालात, यावर देखील रिअॅक्शन अवलंबुन आहे.
हाब, आपण दोघे पुरुष इथे अतिशय
हाब, आपण दोघे पुरुष इथे अतिशय वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलत आहोत असे दिसतं. तुम्ही अभिनंदनकर्त्याच्या भूमिकेतून बघताय मी गर्भवती च्या... >> धन्यवाद नाना.. हे नमूद केल्याबद्दल. प्रॉब्लेम पुरूषाचाच आहे ना मग त्याने ईतर पुरुषांशी शेअर केला आणि त्यावर पुरुषांनी आपला दृस्।टीकोन मांडला. हे बरोबर आहे.
' मी लेखकाला तुम्ही काहीही चूक केले नसून झालेल्या कृतीबद्दल वैषम्य बाळगू नका ' ह्या अँगलने लिहित आहे.
स्त्रीच्या दृष्टीकोनातून अभिनंदन स्वीकारण्याची स्थिती नसण्याची हजार कारणे असू शकतात हे मला माहित आहे. पण म्हणून कोणी अभिनंदन केले म्हणून त्याने एक अतिशय चुकीची कृती केली आहे असा त्याचा अर्थ होत नाही.
Pages