सारेगमप - लि'ल चँप्स (झी टीव्ही)

Submitted by गजानन on 8 March, 2017 - 00:41

यंदाचे झीटीव्हीवर चालू झालेले सारेगमप लिटल चँप्स मधले स्पर्धक खूपच दमदार वाटतात. सध्या टॉप १४ ची निवड चालू आहे. अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास खूप धमाल आणणार असे वाटतेय.

तुम्ही पाहताय की नाही? हिमेसभाय परिक्षक म्हणून आहेत म्हणून सुरुवातीला पाहण्यात उत्साह नव्हता पण आता त्याचे एपिसोड चुकवावेसे वाटत नाहीत.

या स्पर्धेबद्दल इथे चर्चा करू या.

-----------------------------------------------
टॉप १४:
१) राजश्री बाग
२) रिया बिसवास
३) श्रेयन भट्टाचार्य
४) सोनाक्षी कर (सोनाक्षी याआधी सोनीच्या इंडियन आयडॉल ज्युनिअरमध्ये होती.)
५) ध्रुन टिक्कू
६) जस्सू खान मिर
७) युमना अजीन
८) सत्यजित जेना
९) उत्कर्ष वानखेडे
१०) तान्या तिवारी
११) शक्तीस्वरूपा पांडा
१२) शन्मुखप्रिया
१३) सायमन सेवा
१४) अदनान हुसेन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला तो जयेस सोबत जो टाईम पास करतात ना त्याचा फक्त कंटाळा येतो. वयाच्या मनाने तो गातो छानच त्यात शंका नाही तरीही........

एकदम बरोबर ..सेम माझही तसच होत...खूप पकवतात..सुरुवातीला छान वाटायच ,पण आता अतिच करतायत .....
तो हि मुद्दामहुन केल्यासारख करतो.........

मला तो जयेस सोबत जो टाईम पास करतात ना त्याचा फक्त कंटाळा येतो. वयाच्या मनाने तो गातो छानच त्यात शंका नाही तरीही........>>१०१ अतिच झालंय. मला तर त्याला गाण्यापेक्षा चाळ्याकरता घेतलय असेच वाटते. हे बघीतल विकिपेडीयावर. Jayas Kumar, a 5-year-old boy from Delhi is a special non-competitive participant of the show retained only for his entertainment quotient.

ती युमना झाली असे कुठेतरी बघीतले मी. मला रिया व शण्मुखप्रिया आवडतात.

फारच ताणतायेत शो आता... त्या बिचार्‍या पोरांच्या शाळेच्या अभ्यासाचा बोर्‍या.. तिथे काही जास्तीचे मार्क्स नाही देत शिक्षक..

नुसता अभ्यास नाही, पण इतके महिने सतत लाईमलाईटमध्ये रहायचं, छान कपडे, मेक अप करायचा, सर्वांकडून वाहवाही मिळवायची, मोठमोठ्या स्टार्सना भेटायचं- यानंतर शाळा आवडत असेल का या मुलांना? अर्धवट वयातलं हे दिखाऊ कौतुक पुढे या मुलांकरता घातक नसेल का होत?

अंजली-नंदिनंचा पहिला भाग होता, त्यात धाकटीचं गाणं आधी झालं, मग मोठीचं, तर मोठीला प्रश्न काय तर तुमच्यात तुलना होते का, तुमच्यात जेलसी आहे का? अरे काय हे! खरोखर स्वच्छ असलेली मनं या असल्या प्रश्नांमुळे उगाचच करप्ट होत नसतील का?

मुलं गातात चांगली. पण हा इतका हाईप डॅमेजिंग आहे असं माझं मत आहे.

मला सोनाक्षीचा आवाज आवडतो. आणि अंजली-नंदिनी मधली धाकटी जी आहे ती, तिचा आवाजही जबरदस्त आहे. फारच तयारीची आहे ती. पण तिचा साधेपणा असाच रहायला हवा!

@ पूनम >> + १११
अंजली-नंदिनी मधली धाकटी >> अंजली

संपली का स्पर्धा? मी मधले बरेच एपिसोड्स मिसलेत. तो बॅकलॉग अध्ये मध्ये ओझी वर बघुन भरत असते. पण अजून मला वाईल्ड कार्ड एन्ट्री वाल्या एपि पर्यंत यायलाही वेळ आहे बराच.

बाकी जयस कुमार आणि शण्मुखप्रीयाच्या आईची स्वप्ने या दोघांना प्रचंड कंटाळून मी ओझीकडे वळले. म्हणजे हे प्रकार न बघता फॉरवर्ड करता येतात. त्या जयसकुमारला पण त्या नेहाच्या प्रेमात पाडलेले आहे. त्याच्या आईवडिलांना यात काहीच कसे आक्षेपार्ह वाटत नाही? कि पब्लिसिटीने त्यांचे डोळे आंधळे झालेत?

Pages