Submitted by गजानन on 8 March, 2017 - 00:41
यंदाचे झीटीव्हीवर चालू झालेले सारेगमप लिटल चँप्स मधले स्पर्धक खूपच दमदार वाटतात. सध्या टॉप १४ ची निवड चालू आहे. अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास खूप धमाल आणणार असे वाटतेय.
तुम्ही पाहताय की नाही? हिमेसभाय परिक्षक म्हणून आहेत म्हणून सुरुवातीला पाहण्यात उत्साह नव्हता पण आता त्याचे एपिसोड चुकवावेसे वाटत नाहीत.
या स्पर्धेबद्दल इथे चर्चा करू या.
-----------------------------------------------
टॉप १४:
१) राजश्री बाग
२) रिया बिसवास
३) श्रेयन भट्टाचार्य
४) सोनाक्षी कर (सोनाक्षी याआधी सोनीच्या इंडियन आयडॉल ज्युनिअरमध्ये होती.)
५) ध्रुन टिक्कू
६) जस्सू खान मिर
७) युमना अजीन
८) सत्यजित जेना
९) उत्कर्ष वानखेडे
१०) तान्या तिवारी
११) शक्तीस्वरूपा पांडा
१२) शन्मुखप्रिया
१३) सायमन सेवा
१४) अदनान हुसेन
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पण सोनी वर तर indian idol,
पण सोनी वर तर indian idol, the kapil sharma show हे २च शो सध्या आहे ना???
आणि त्याचे होस्ट तर करन वाही,कपिल हे आहेत...तुम्ही कुठल्या शो बद्दल बोलताय???
लिम्बू जी,मला वाततय तुम्ही
लिम्बू जी,मला वाततय तुम्ही दुसर्या शो मधे पाहिलं असेल...बहुदा..
हुश्श! कुठे होता हा धागा...
हुश्श! कुठे होता हा धागा...
मला अक्षरश: तुमचं नाव शोध मधे टाकून ...मग हा धागा मिळाला... किती शोधलं..
काल मी ध्रुन्,रिया आणि
काल मी ध्रुन्,रिया आणि तान्या ह्या तिघांचे परफॉरमन्स पाहिले... रायजिन्ग स्टार्स मुळे पुर्ण पाहता येत नाही...
तान्याने खूपच छान गायलं काल,"भरे नैना" ...१नंबर.. हे गाणं...
रियातर माझी फेवरेट आहे... हवा हवाई..मस्त गायलं..
कालचा भाग इथे पाहू शकता
रायजिंग स्टार्स चे एपिसोड
रायजिंग स्टार्स चे एपिसोड voot वर पाहू शकता...
कालचा भागः
part-1..
part-2
सगळेच चॅनल्स मुर्खासारखे एकाच
सगळेच चॅनल्स मुर्खासारखे एकाच वेळी गाण्याचे नाचण्याचे कार्यक्रम ठेवतात. उलट वेगवेगळ्या वेळेस ठेवले तर त्या चॅनलची टीआरपी वाढेल इतके या खुळ्यांना समजत नाही?
सगळेच चॅनल्स मुर्खासारखे एकाच
सगळेच चॅनल्स मुर्खासारखे एकाच वेळी गाण्याचे नाचण्याचे कार्यक्रम ठेवतात. उलट वेगवेगळ्या वेळेस ठेवले तर त्या चॅनलची टीआरपी वाढेल इतके या खुळ्यांना समजत नाही?>>>> एकदम बरोबर!
नाहीतर काय्,कळायला नको का ह्यांना....
दिपस्त,सेम डायलॉग मी बोलत अस्ते... रायजिन्ग स्टार्स पहाताना...
पण,हे काय तुम्ही एवढ्चं लिहिलं... मी तुमचा निशेध करते...
अहो तुम्ही जो शो पाहता त्याबद्द्ल लिहा कि...
तुम्हाला जे परफोर्मन्स आवदले त्यान्ची लिन्क द्या ना...आम्ही पाहू...त्याबद्दल चर्चा करा...
मला नावं आठवत नाहीत, पण एका
मला नावं आठवत नाहीत, पण एका मुलीनं 'हंसी बन गए' हे श्रेया घोषालचं गाणं खूप सुरेख गायलं- अभिजीतचं चॅलेन्ज होतं ते. आणि चष्मा-दोन वेण्या घातलेल्या मुलीनंही जबरदस्त गाणं गायलं.
मुलांमध्ये एक उंदीरवाला मुलगा आहे तो आणि आणखी एक तसाच गोड आहे- ते आवडले.
चष्मा-दोन वेण्या घातलेल्या
चष्मा-दोन वेण्या घातलेल्या मुलीनंही जबरदस्त गाणं गायलं <<< तान्या.
'हंसी बन गए' <<< सोनाक्षी
उंदीरवाला मुलगा आहे <<< उत्कर्ष
आणखी एक तसाच गोड आहे <<< अदनान किंवा श्रेयन किंवा सायमन असू शकतो.
काल-परवाचे ह्हागही अप्रतिम
काल-परवाचे भागही अप्रतिम होते.
शक्तीस्वरुपा आणि सायमन गेले. सोनाक्षीला तिचा मूळ सूर परवाच्या भागात गवसला आहे, असे म्हणता येईल (नाम गुम जायेगा). आधीच्या भागांमध्ये तिच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्यापेक्षा कमी वाटत होती. काही ज्युरींनी तिला कमी गुण दिले म्हणून परिक्षकांनी आणि इतर ज्युरींनी त्या ज्युरींवर नापसंती दर्शवली. हे योग्य आहे का? ज्युरींना तुम्ही पाचारण केले आहे तर त्यांना मोकळेपणाने गुणांकन करू द्या की. त्यांच्यावर तुम्ही का दडपण आणताय? व्यक्तिशः सोनाक्षी माझी आवडती स्पर्धक असली तरी परिक्षक आणि इतर ज्युरींची शेरेबाजी आवडली नाही. (बच्चों को कम मार्क देने के पहले जरा सोचो आप भी इतने परपेक्ट गाते हैं क्या? अश्या आशयाचे शेरे...)
युमना, श्रेयन तुफान गायले. रिया थोडी कमी वाटली. तान्याचे गाणे मी मिस केले.
मुलगे विरुध्द मुली अशी कुरघोडी सुरू झालेली आहे.
पुढच्या आठवड्यात आशा भोसले उपस्थित असणार आहेत. माझे ते भाग हुकणार.
त्या श्रेयननी लाल इश्क गाणं
त्या श्रेयननी लाल इश्क गाणं कसलं तुफान गायलं रे बाबा.... १००% एकदम डिझर्व्हिंग.. बाकीची काही नाही ऐकता आली पण..
काही ज्युरींनी तिला कमी गुण
काही ज्युरींनी तिला कमी गुण दिले म्हणून परिक्षकांनी आणि इतर ज्युरींनी त्या ज्युरींवर नापसंती दर्शवली. हे योग्य आहे का? ज्युरींना तुम्ही पाचारण केले आहे तर त्यांना मोकळेपणाने गुणांकन करू द्या की. त्यांच्यावर तुम्ही का दडपण आणताय? व्यक्तिशः सोनाक्षी माझी आवडती स्पर्धक असली तरी परिक्षक आणि इतर ज्युरींची शेरेबाजी आवडली नाही. (बच्चों को कम मार्क देने के पहले जरा सोचो आप भी इतने परपेक्ट गाते हैं क्या? अश्या आशयाचे शेरे...)
>> अगदी अगदी. मागे त्या अदनान ने 'मेरा पिया घर आया' गायलं होतं तेव्हा त्या रोमाने 10 ऐवजी 9 मार्क्स दिले होते तर तिला टार्गेट केलं सगळ्यांनी. अरे? अश्याने मुलं कशी आदर करणार ज्यूरींचा? ज्युरी म्हणून बसण्याची त्यांची पात्रता नाही असं आता तुम्हाला वाटत असेल तर त्यांना रिप्लेस करा ना. किंवा बोलावूच नका. असं नॅशनल टीव्ही वर टार्गेट करणं नको वाटतं.
अश्याने मुलं कशी आदर करणार
अश्याने मुलं कशी आदर करणार ज्यूरींचा? <<< पियू, तेच की.
हिम्स, त्या भागातले इतरांचेही गाणे ऐकायला मिळाले तर नक्की ऐक.
मी हिमेशच्या कमेंटला उठून
मी हिमेशच्या कमेंटला उठून जाते टिव्ही समोरुन आणि बाकीचा भाग आवर्जून बघतेय. सगळीच मुलं खूप मस्त गातायत.
मला सोनाक्षी तान्या आवडतायत.
सायमनला मी डायरेक्ट गातानाच बघितलं नि फारच ओळखीचा चेहरा गातोय असं वाटायला लागलं.. नंतर लक्षात आलं अरे हा तर आकाश ठोसर.
तान्या तिवारी या भागात इतकं
तान्या तिवारी या भागात इतकं खास नाही गायली. आणि आता प्रत्येक भागात "तिला आई नाही" याचं भांडवल करण्याचा प्रयत्न इतरांवर अन्याय करणारा वाटतो आहे. तिची बहिण तर मठ्ठ वाटली मला या भागात. काहीच रेफरन्स नसताना गाणं चांगलं झालं नाही हे ऐकल्यावर आई वाला टॉपिक.
अदनान आणि श्रेयन एक नंबर गायलेत. अदनान प्रोफेशनली प्रोग्राम्स करतो का ऑलरेडी? बहुतेक तसं ऐकल्याचं आठवतंय. षण्मुखप्रिया चं यॉडलिंग ऐकायचा कंटाळा आलाय आता मला बहुतेक. आणि तिच्या आईच्या बाहुबली उर्फ प्रभासच्या स्वप्नांचा पण
सायमन या भागात तान्यापेक्षा खूप चांगलं गायला होता. त्यामुळे त्याच्या जाण्याचे फार वाईट वाटले. शक्तीस्वरूपा जाणारच होती या सगळ्यांच्या तुलनेत. जयस पण चांगला गातो वयाच्या मानाने. पण त्याला या कार्यक्रमात अजुन किती फुटेज देणारेत?
ध्रुण टिक्कुच्या वजनावर आणि खाण्यावर किती त्या कमेंट्स? मला ते अजिबातच योग्य वाटत नाही. उत्कर्ष वानखेडे या भागात माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच छान गायला.
तान्या तिवारी या भागात इतकं
तान्या तिवारी या भागात इतकं खास नाही गायली. आणि आता प्रत्येक भागात "तिला आई नाही" याचं भांडवल करण्याचा प्रयत्न इतरांवर अन्याय करणारा वाटतो आहे. तिची बहिण तर मठ्ठ वाटली मला या भागात. काहीच रेफरन्स नसताना गाणं चांगलं झालं नाही हे ऐकल्यावर आई वाला टॉपिक. <<< विथ ड्यु रिस्पेक्ट, पियूशी सहमत.
मधले दोन आठवडे हुकले. काल
मधले दोन आठवडे हुकले. काल आणि परवाचे दोन्ही भाग लाजवाब झाले. परवा युमना-शण्मुखप्रिया (मुक्काबला) ज ब र द स्त होते.
कालचे शण्मुखप्रियाचे 'दिल से रे' ही भा री होते.
जस्सू खानप्रमाणेच सत्यजितही चांगले गातो पण जरा तोंड उघडून गायला तर अजून चांगले होईल. रिया जरा आगाऊच आहे. अदनान वेगळ्या शैलींशी स्वतःला सहज अॅडजस्ट करून घेईल असे वाटतेय. काल तान्या स्पर्धेबाहेर गेली. जस्सू आणि सत्यजित यांनी मेहनत घ्यायला पाहिजे. युमना-शण्मुखप्रिया-अदनान-श्रेयन-राजश्री-सोनाक्षी हे तरी अजून आपली जागा पक्की करून बसलेत, असं माझं मत आहे. ज्युरीज चॅलेंज मध्ये उरलेले पुढच्या भागात येणार का?
>>> काही ज्युरींनी तिला कमी
>>> काही ज्युरींनी तिला कमी गुण दिले म्हणून परिक्षकांनी आणि इतर ज्युरींनी त्या ज्युरींवर नापसंती दर्शवली. हे योग्य आहे का? <<<< अत्यंत अयोग्य आहे.
पण काये ना? "टीआरपीसाठी काय पण" या सदरातील असे वागणे, मुद्दामहून असे सनसनाटीखेच घडवुनही आणले जात असेल असे मानायला जागा आहे. त्यापुढे "ऑव्हियस" रिझस्ट्सचेही काहि वाटेनासे होते. ते त्यांची सनसनाटीखेच पब्लिकच्या भावनेशी टीआरपीची गणिते खेळणार, अन आपण आपले उगाचच हा येईल की ती येईल म्हणुन टिव्हीच्या स्क्रिनला नाकडोळे चिकटवुन बसणार...... असो.
Satyajeet fast Chan gayi pan
Satyajeet faar Chan gato pan gelya don athavdya pasun tyacha galaa tyachi sath det nahiye, , maybe vaya nusar jo aavaj badalnyachi kiva kanth phutanyavhi process suru hote na tyamule Ho asel ,,
Wow A R r Reheman ne tyala
Wow A R r Reheman ne tyala bolavle ek aaThavada training sathi
आता कोणीच बघत नाही का?
आता कोणीच बघत नाही का?
मी पहाते...पण हा धागा वर
मी पहाते...पण हा धागा वर नसतो.
लिहीत रहा म्हणजे धागा वर
लिहीत रहा म्हणजे धागा वर राहील.
ओके... पुढच्यावेळी लिहिन...
ओके...
पुढच्यावेळी लिहिन...
महाराष्ट्राच्या अंजली आणि
महाराष्ट्राच्या अंजली आणि नंदिनी यांनी या कार्यक्रमाची लज्जत वाढवली आहे. फार सुरेख गातायत या दोघी बहिणी. खणखणीत.
हो मी हेच लिहिणार होते गजानन.
हो मी हेच लिहिणार होते गजानन...
खूप छान वाटतय आपल्या मराठमोळ्या मुली पुढे जातायत हे पाहुन...
पण ऑडिशन च्या वेळी ती मोथी जशी गायली ना तशी परवा नाही गायली.. निराश केल तिन पार..
छोटि मस्त गाते...तीन एक गाण रेकॉर्ड केलय ए आर रहमान च ...यू टुबवर आहे..पहा...
मला त्या साऊथच्या मुलाने
मला त्या साऊथच्या मुलाने गायलेल "बिन तेरे" पण फार आवडलं
हो ताई,तो आधी सोनीवरच्या
हो ताई,तो आधी सोनीवरच्या इण्डियन आयडल मधे होता..३-४ जण आहेत त्यातली या शो मधे..भारि आवाज आहे त्याचा....
ती केरळाची मुलगी झाली ना
ती केरळाची मुलगी झाली ना लिटील चँप?
मस्त आहे पण कार्यक्रम.
अजुन फायनल नाही झाले...
अजुन फायनल नाही झाले...
Pages