खग्रास चंद्रग्रहण आणि रक्षाबंधन - तातडीची मदत हवी आहे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 August, 2017 - 14:06

तातडीची मदत हवी आहे. ग्रहण वगैरे काही पाळायचे नसते हे एखाद्याला समजवाणार्‍या खात्रीशीर लिंक हव्या आहेत.
आमच्याकडे फर्मान निघाले आहे की रात्री दहाच्या आधी जेवायचे नाहीतर एकच्या नंतर.. त्यामध्ये नाही..
आणि त्यातही रात्री दहानंतर उरलेले सारे शिळे अन्न, खारी बटर बिस्कीट फरसाण वगैरे सुका खाऊ जो अजून चार दिवस खाता येईल तो टाकून देणार आहेत.
नको त्या चुकीच्या समजूतींमुळे अन्नाची नासाडी होत आहे.. आणि हे आमच्या माळ्यावरील सारेच जण करणार आहेत.. प्लीज हेल्प.. कदाचित मी फेकून दिले जाणारे अन्न वाचवू शकेन, कारण ते कोण्या गरजूलाही देण्याची लोकांची ईच्छा नाही Sad

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

आज खग्रास चंद्रग्रहण आहे. आज रक्षाबंधन देखील आहे. रक्षाबंधन ग्रहण काळात करावे का आणि केल्यास त्यात काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती हवी आहे. शक्य झाल्यास लवकरात लवकर जेणेकरून उद्या हाल्फ डे टाकून रक्षाबंधनला सटकायचे किंवा नेहमीसारखे कामालाच प्राधान्य देत संध्याकाळी रक्षाबंधन करायचे हे ठरवता येईल.

धाग्याच्या निमित्ताने एकूणच खग्रास चंद्रग्रहणाला काय काळजी घ्यावी हे समजले तरी चालेल. आमच्याकडे वायफाय बंद करा, त्यातून रेडीएशन बाहेर पडतात ईतपत सल्लेसूचना मिळत आहेत.

माहितीबद्दल थॅन्क्स ईन एडवान्स
आणि
मायबोलीवरच्या माझ्या सर्व बंधू भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेऽऽष, 'ग्रहणा' मुळे घरातील सुक्या खाऊवर आलेली 'संक्रांत' दूर झाली का???

सुका खाऊबद्दल गैरसमज झाला. शिजवलेल्या अन्नाची विल्हेवाट लावली. मला फक्त दोन कप चहा वाचवता आला. थर्मास मध्ये भरून मी आणि पिंट्याने गच्चीवर फडशा पाडला.

ते तिकडे पलीकडे होते ना.. मी अमेरीकेच्या भाकरया कश्याला भाजू..अमरावतीच्या पुढे ट्रेनने कधी गेलो नाही.

आमच्याईथे तर "वाचलो सुर्यग्रहण भारतात नव्हते" बोलणारेही महाभाग आहेत. जणू काही सुर्यग्रहणाचा फायदा ऊचलत याण्च्या घरात चोरयामारयाच घडणार होत्या

काय प्रश्न होते आणि नासाने काय उत्तरे दिली हे ईथे लिहिता येईल का? सर्वांना त्या माहितीचा फायदा होईल.

Pages