Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>बरेचदा नावाजलेले बॅट्समन
>>बरेचदा नावाजलेले बॅट्समन इतके हुकतात तेव्हा ते आपल्याला दिसते तितके ढोबळ नसते. बहुतांश वेळा स्विंग जमेस धरलेला असतो, पण तो किती होईल याचा अंदाज चुकतो. रोहित चे काय झाले नक्की माहीत नाही.
ईतके अॅनॅलिसीस रोहित ने पण केले नसावे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोच साठी अॅप्लाय करा..
फा, परत हाय लाईट्स बघितले
फा, परत हाय लाईट्स बघितले तेंव्हा एकदम आठवले कि रोहित (नि राहाणे) ह्याच बॉल वर वर्षाभरापूर्वी एशिया कप मधे असेच बाद झाले होते आमिर विरुद्ध. कोहली ने तेंव्हा मॅच काढून दिली होती. बांग्लादेशच्या मॅचमधे र्होत नि कोहली ह्यांचा स्टान्स, forward stride नि head position while playing shots ह्याची तुलना दाखवलेली आठवतेय का ? रोहित (नि राहाणे) मिडल- लेग वर असतात, स्ट्राईड कमी असते. left arm swing बॉलर तोही आमीरसारखा पेसी नि उशिरा स्विंग करणारा असेल तर बाहेर जाणारा बॉल उशिरा आत वळून येणे बॅट नि बॉडी मधल्या गॅप मूळे कमकुवत असलेला दुवा होउ होतो. कोहली इंग्लंड सिरीज नंतर ऑफ वर गार्ड घेतो, परत त्याची forward stride मोठी आहे त्यामूळे बॉल खेळताना तो ह्या दोघांपेक्षा अधिक खाली असतो. अर्थात त्यामूळे ह्या delivery चा त्रास त्याला कमी होतो. ह्याउलट सरळ निघून जाणार्या किंवा बाहेर स्विंग होणार्यां बॉल ला तो बळी पडू शकतो. mental resolve of not chasing these deliveries is of course his strength so it works for him better than it would have otherwise. थोडक्यात टेक्निक पेक्षा रोहितला बाद करण्याचे श्रेय आमिरचे - रोहितचा कमकुवत दुवा हेरून तिथे अचूक मारा करणे - आहे.
ईंग्लंड - द. अफ्रिका टेस्ट
ईंग्लंड - द. अफ्रिका टेस्ट सिरीज सुरू झालीये. पहिलं सेशन द. अफ्रिकेच्या बॉलर्स ने ४ विकेट्स घेत त्यांच्या बाजूनं झुकवलं, पण रूट आणी स्टोक्स ने दुसर्या सेशन मधे काऊंटर अॅटॅक सुरू केलाय. मस्त चाललीये मॅच.
भारताची आज विंडीज शी शेवटची वन-डे आहे. भारताची बॅटींग - मधली फळी कमकुवत वाटते. आज जिंकू बहूदा, पण युवराज-धोनी च्या जागी - २०१९ च्या वर्ल्डकप चा विचार करता बाकी पर्याय तपासले पाहीजे. युवराज ची जागा जास्त डळमळीत आहे. एके काळच्या भारताच्या उत्कृष्ट फिल्डर ला थर्डमॅन - फाईन लेग ला लपवायची वेळ येणं किंवा अधे-मधे खेळलेल्या एखाद्या इनिंग च्या जीवावर त्याची जागा डिफेंड करायला लागणं हे चांगलं लक्षण नाहीये. धोनी ची विकेट किपींग अजूनही अप टू द मार्क असली, तरी फिनिशर म्हणून त्याची क्षमता दिवसेंदिवस धूप-छाँव व्हायला लागलीये. वर्ल्ड कप ला अजून दोन वर्ष आहेत.
Women's world cup कुणी फॉलो
Women's world cup कुणी फॉलो करतय का? चांगला चाललाय. भारत, ईंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणी न्यूझिलंड / वेस्ट ईंडीज मधे सेमी-फायनल्स रंगणार आहेत. आत्तापर्यंत भारताची कामगिरी चांगली झालीये.
भारत, ईंग्लंड, ऑस्ट्रेलिया
भारत, ईंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणी न्यूझिलंड / वेस्ट ईंडीज>> इथे वेस्ट इंडिजच्या ऐवजी साऊथ आफ्रिका असा बदल करा.. १२ तारखेच्या मॅच नंतर पहिले दोन नक्की फिक्स होतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया किंवा ऑस्ट्रेलिया आणि भारत.. ३, ४ नंबर साठी जास्त चुरस असेल इंग्लंड, न्यूझीलंड आणि सा. आफ्रिके मध्ये.
"इथे वेस्ट इंडिजच्या ऐवजी
"इथे वेस्ट इंडिजच्या ऐवजी साऊथ आफ्रिका असा बदल करा" - you are right!
"इथे वेस्ट इंडिजच्या ऐवजी
"इथे वेस्ट इंडिजच्या ऐवजी साऊथ आफ्रिका असा बदल करा" - you are right! >>> येस येस, यु इज म्हणिंग राईट.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हरमनप्रीत कौर ११५ चेंडूत
हरमनप्रीत कौर ११५ चेंडूत नाबाद १७१ !!!
http://zeenews.india.com/marathi/sports/australia-need-282-to-win-agains...
हो जबरी खेळली. आधी स्कोअर
हो जबरी खेळली. आधी स्कोअर पाहिला तेव्हा आपले कमी होते रन्स. ऑसीज चे ३ गेले (गेल्या
) सुद्धा.
फारच जोरदार खेळत आहेत आपल्या
फारच जोरदार खेळत आहेत आपल्या खेळाडू
व्हिलानी आऊट! उडवा पटापट! चक
व्हिलानी आऊट! उडवा पटापट! चक दे इंडिया!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाचवी विकेट पेरी! सगळ्यांचे
पाचवी विकेट पेरी! सगळ्यांचे नंबर लागू दे! गो गो गो!
मी पण फॉलो करते आहे ऑनलाइन,
मी पण फॉलो करते आहे ऑनलाइन, मस्त चाललीय . ६ वी विकेट !! गो गर्ल्स!!
सहावी गेली हिली! गो गर्ल्स!
सहावी गेली हिली! गो गर्ल्स!
सातवी विकेट पडली!
सातवी विकेट पडली!
मी इकडे जरा चीयरलीडींग करतोय, असं समजा.
शेवटी आपण नाही तर कोण करणार?
एवढं लिहीपर्यंत आठवी विकेट
एवढं लिहीपर्यंत आठवी विकेट डाऊन!
गुंडाळून टाका!
काय हे! लास्ट पेअर ची इतकी
काय हे! लास्ट पेअर ची इतकी फटकेबाजी ??? आवरा!
जिंकलो एकदाचे! ये!
जिंकलो एकदाचे! ये!
मस्त खेळल्या बायका.
मस्त खेळल्या बायका. हरमन्प्रीत बाईनी चांगलाच धुतला की. आता फायनल. Bravo Team India!!
अप्रतिम फलंदाजी, नेमकी
अप्रतिम फलंदाजी, नेमकी क्षेत्ररक्षण रचना, चांगली गोलंदाजी व त्यातील बदल व छान संघभावना . मजा आली व अभिमान वाटला सामना बघताना !! अभिनंदन व शुभेच्छा .
मस्त खेळल्या भारतीय मुली.
मस्त खेळल्या भारतीय मुली. मुख्य म्हणजे महत्वाच्या सामन्यात टॉस जिंकल्यावर बॅटींग घेतली. जरा कोहली भाउंनी अस केल असत तर चँपियन्स ट्रॉफीचा निकाल वेगळा लागला असता.
८३ च्या टीम बरोबर मला एक साम्य जाणवत. दर वेळेला नविन खेळाडू चमकते. ही टीम कुठल्याही एका खेळाडूवर अवलंबून नाही. कधी स्मृती, कधी झूलन, कधी शर्मा , कधी पूनम , कधी मिथाली तर कधी राजश्री. कालची मॅच मात्र हरमनने गाजवली.
मला मात्र काल एकच चेंडू बघायला मिळाला. मी घरात पाउल टाकल आणि शेवटची दांडी उडाली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फायनल बघत नाहिये का कुणी?
फायनल बघत नाहिये का कुणी?
इन्ग्लंड ७३/३.
काल सेमीफायनल पूर्ण रीकॅप होता विलो वर. पहिल्यांदाच बघितले वीमेन्स इन्टरनॅशनल क्रिकेट.
हरमनप्रीत ची इनिंग्ज स्पेक्टॅक्युलर होती!! लहान चणीच्या तिला पाहून वाटले नसते ही असे बॉल स्टेडियम च्या बाहेर फटकावऊ शकेल! पावरफुल शॉट्स. आणि मला सगळ्यात आवडलं ते म्हणजे अतिशय ग्रेसफुल फुटवर्क, मॉडेलिंग केल्यासारखे नजाकतदार शॉट्स होते तिचे. मजा आ गया!
इन जनरल वीमेन्स क्रिकेट मधे ही खासियत वाटली. नैसर्गिकच ग्रेस म्हणा किंवा कसे ते माहित नाही पण बर्याच मुली टेक्स्टबुक स्टाइल तंत्रशुद्ध खेळतात असे वाटले. बघायला मस्त वाटते एकदम!
<< अतिशय ग्रेसफुल फुटवर्क,
<< अतिशय ग्रेसफुल फुटवर्क, मॉडेलिंग केल्यासारखे नजाकतदार शॉट्स होते तिचे. मजा आ गया! >> सहमत. << लहान चणीच्या तिला पाहून वाटले नसते ही असे बॉल स्टेडियम च्या बाहेर फटकावऊ शकेल! >> उत्तम टायमींग व चांगला स्ट्रोक असलेल्या आतांच्या बॅटस यामुळे शक्य होत असावं. आत्तां राजने मारलेली सरळ सिक्सर याचंच प्रतिक ! शुभेच्छा.
पूर्ण अप्रस्तुत पोस्ट आहे खर
पूर्ण अप्रस्तुत पोस्ट आहे खर तर पण भारतीय बायका WC जिंकल्यावर त्यांची चँपियन्स कप अच्या कामगिरीची तुलना, पूनम राऊतचा फायनल मधाला खेळ नि तिचे मुंबईचे असणे ह्या अशा बंडल पोस्ट्स WP वर पुरासारख्या येणार ह्याच्या धास्तीने फायनला ची मजाही नीट लुटता येत नाहिये![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अतिशय ग्रेसफुल फुटवर्क, मॉडेलिंग केल्यासारखे नजाकतदार शॉट्स होते तिचे. मजा आ गया! > in general बर्याच जणींचे तसेच वाटते. अगदि फास्ट बॉलरसुद्धा नजाकतदार वाटतात बॉलिंग टाकताना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुलींचा अनुभव कमी पडला जरा.
मुलींचा अनुभव कमी पडला जरा. पण शेवटपर्यन्त चान्सेस होते! वेल प्लेड!
लॉर्ड्स वर पब्लिक ने बर्यापैकी गर्दी केलेली बघून छान वाटले. असाच सपोर्ट मिळायला हवा त्यांना.
सुंदर खेळत होत्या पोरी.
सुंदर खेळत होत्या पोरी. मिताली राजने आळशीपणा करुन विकेट फेकली. रनिंग बिटविन विकेट फक्त वेदा आल्यावर दिसायला लागले. तेच जर हरमन व राऊतने केले असते तर त्या ९ रन जमा झाल्या असत्या. जवळ जवळ ५ का ६ ओव्हर मेडन गेल्या होत्या. शेवटी प्रेशर वेदावर यायला लागले होते.
साधारण ८ का ९ ओव्हर शिल्लक असताना मांजरेकर समालोचनास आला व त्याने लगेच वेदा लिव्हिंग डेंजरसली म्हणले व पनवतीला सुरुवात झाली. आल्या आल्या ३ विकेट् खाल्या मांजराने.
असो. पण वेल प्लेड गर्ल्स. पुरुषांच्या तुलनेत खुपच भारी फाईट दिली.
थोडक्यात गेली राव कालची मॅच..
थोडक्यात गेली राव कालची मॅच... जिंकायचा फुल चान्स होता... वेल प्लेड गर्ल्स..
हिम्स्कूलः वि.पू. बघ तुझी...
हिम्स्कूलः
वि.पू. बघ तुझी...
केवळ अननुभवामुळे कालची मॅच
केवळ अननुभवामुळे कालची मॅच गेली. कुठल्याही स्टेज ला आवश्यक धावगती ६ च्या वर गेली नव्हती. शिल्लक चेंडू नेहेमीच आवश्यक धावांपेक्षा जास्त होते. शेवटच्या ओव्हर पर्यंत खेचली असती, तर ईंग्लंड वर प्रेशर येण्याची शक्यता जास्त होती. कौर आणी राऊत अजून २०-२२ बॉल्स खेळल्या असत्या, तरी कदाचित ईंग्लिश टीम प्रेशर मधे आली असती (एक स्टंपिंग मिस झालं आणी एक कॅच सुटला होता). कौर आऊट झाल्यावर सुद्धा शर्मा ऐवजी वेदा ला पाठवण्याची गरज नव्हती. ९९ बॉल्स मधे ९१ रन्स असताना, पुनम राऊत आणी दिप्ती शर्मा शांतपणे खेळून मॅच काढू शकल्या असत्या. असो. पण जबरदस्त फायनल झाली आणी the team that handled pressure better, won the game. वेल प्लेड मिथाली अँड टीम ईंडिया. ह्या वर्ल्ड कप च्या निमित्ताने, भारतीय संघ (मुलींचा) ईतका प्रसिद्ध झाला हे ही चांगलं झालं. गूड लक!
इंग्लंडने ऑफ स्टंपच्या बाहेर
इंग्लंडने ऑफ स्टंपच्या बाहेर बव्हंशी मारा केला व त्यामुळे चौकार व षटकार मारणं भारतीय महिलाना अवघड गेलं असावं ; त्यामुळेच , धांवसंख्या मोठी नसूनही त्यांच्यावर दडपण आलं असावं.
Pages