१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.
स्वाती, तुझी रेसेपी स्टेप बाय
स्वाती, तुझी रेसेपी स्टेप बाय स्टेप स्वतंत्र लिही आणि तिथे सायोला श्रेय दे
(डोळे मारण्याचीही सोय राहिली नाही आता)
पयल्या फटक्यात जमली असती तर
पयल्या फटक्यात जमली असती तर लिहिणार होते स्वतंत्र रेसिपी.
फुल चौदा आउंस कंडेंसड मिल्क
फुल चौदा आउंस कंडेंसड मिल्क घेतलं होतं का स्वाती ?
मॅन्गो बर्फी कातिल दिसतेय.
मॅन्गो बर्फी कातिल दिसतेय. मला ती मावा पावडर वापरून केलेली मब आत्ताच्या आत्ता हवी आहे.
शोनू, हो.
शोनू, हो.
थेट चितळ्यांसारखी आंबा
थेट चितळ्यांसारखी आंबा बर्फी!!!! हे वाचून स्फुर्ती घेतली आहे
स्वाती, मॅन्गो बर्फी मस्त
स्वाती, मॅन्गो बर्फी मस्त दिसतेय..
दिवाळीत मब करु म्हणुन सामान आणुन ठेवलं होतं आता उद्याचा मुहुर्त बघुन करणार
फार मस्त दिसतेय बर्फी.
फार मस्त दिसतेय बर्फी. आंबाबर्फी तर लाळगाळू दिसतेय!
करू की नको या विचारात अनेक महिने धाडस होत नाहिये, त्यात मावे नाही, औंसा-पाऊंडाची आणि त्यंच्या कन्वर्जनची भानगड, आणि "आता गोड बंद करू" म्हणत मग मी करत नसलेलं डाएट हे सगळे फॅक्टर्स आडवे येतायत.
मस्त दिसत आहेत लटेस्ट मब
मस्त दिसत आहेत लटेस्ट मब ..
मी आजवर कोणतंही व्हेरिएशन केलेलं नाहीये. करायचा विचार आला तरी बिघडायच्या भितीने तो विचार नकोच होतो. >>>> सायो तूच अस म्हणतीयेस :)???
माझे आतांपर्यंत साधी, चॉकलेट, आंबा हे व्हेरीएशन्स झाले आहेत
पुर्वी ओरिजिनल बर्फी केलेली.
पुर्वी ओरिजिनल बर्फी केलेली. परवा आंबा घालून केली.
टिन मध्ये मिळणारा अर्ध्याहून अधिक पल्प आधी पातेल्यात घेऊन बऱ्यापैकी आटवला. मिल्क पावडर संगीताल्यापेक्षा थोडी कमी घातली, साखर अजिबात घातली नाही आणि बटरची १/४ स्टिकच घालती असेल.
आमरासामुळेा मावे मध्ये मूळ रेसिपी पेक्षा जास्त इटरेशन ठेवावी लागली, पण चव एकदम चितळे आम्बाबर्फी + भारी टेक्स्चर आणि अती मिट्ट गोड नाही. एकदम बेस्ट.
मावे मध्ये अजून १ इटरेशन ठेवायला हवी होती, जरा मउ आहे आणि त्यामुळे एकमेकांना चिकटतायत वड्या.
यावेळी मिल्क पावडरऐवजी मावा
यावेळी मिल्क पावडरऐवजी मावा पावडर वापरली - आणि बर्फीऐवजी पेढे केले.
बटरची पाव स्टिकच वापरली आणि सुरुवातीला मिश्रण करतानाच थोड्या दुधात केशर खलून घातलं.
मब चिरायू होवो!
केशर पेढे किस खुषी मे स्वाती?
केशर पेढे किस खुषी मे स्वाती? मस्त दिसत आहेत.
पेढे खुशी में होत नाहीत, खुशी
पेढे खुशी में होत नाहीत, खुशी पेढोंसे होते.
बरबर. आम्ही मग पुढच्या
बरबर. आम्ही मग पुढच्या महिन्यत खुष होउ निवांत.
भारी दिसताहेत पेढे. आपल्या
भारी दिसताहेत पेढे. आपल्या त्या ह्यांनी हाताला धरून म.ब. शिकवली काय अन बघता बघता चांगलाच हात बसला तुमचा.
वा, मस्त दिसतायत पेढे.
वा, मस्त दिसतायत पेढे.
यावेळी गणपतीसाठी ही रेसिपी
यावेळी गणपतीसाठी ही रेसिपी वापरून मोदक करायचा विचार आहेत, साच्यात घालून. तर मध्यम आकाराचे ६० -७० मोदक करायला किती सामान लागेल? आणि एक दिवस आधी करून फ्रीज मधे ठेवली तर चालेल का?
आली परत मब वरती :ड
आली परत मब वरती :ड
स्वाती, पेढे भारी दिसताहेत
स्नेहा, इथल्या सुगरणी सांगतीलच पण मी खालील प्रमाणे माप घेतले होते त्याचे ४०-४५ पेढे झाले होते... त्यावरून तुला अंदाज येतोय का बघ -
कन्डेन्स्ड मिल्कचा 397G कॅन (१४ ounces)
अंदाजे २ कप पेक्षा थोडीशी च जास्त मिल्क पाउडर
1/2 cup बटर
आणि एक काचेचा बोल मँगो पल्प (आटवून इतका झाला होता )
दिवाळी साठी बनवली आज, चॉकलेट
दिवाळी साठी बनवली आज, चॉकलेट मोल्ड मधे घालून
मस्त दिसतेय.
मस्त दिसतेय.
मी बेसनाच्या वड्या बिघडवल्यावर मला मबचीच आठवण आली म्हणून एक लॉट केला आहे. आणखीन एक नंतर करणार आहे.
मस्त!!
मस्त!!
सायो, बेसनाच्या कशा बिघडवल्यास ते लिही की.
आता काय सांगू!!! बेसनाच्याच
आता काय सांगू!!! बेसनाच्याच नाही तर मलई बर्फीच्या सेकंड लॉटचीही वाट लावली. अर्थात माझ्याच मूर्खपणामुळे. तर त्याची डिटेल्ड रेसिपी देते नंतर.
>> त्याची डिटेल्ड रेसिपी
>> त्याची डिटेल्ड रेसिपी
म्हणजे "हाऊ टू सॅबोटाज (मलई) बर्फी" ची?
यप सशल.
यप सशल.
मलई बर्फीच्या सेकंड लॉटचीही
मलई बर्फीच्या सेकंड लॉटचीही वाट लावली. >>> अरे ! ये कैसन हुवा, इतना पॉपिलर है ये रेसिपी ,मतलब के आलटाइम फेव्हरेट माबोली पे, कोनो व्हेरिएशन कर रहे थे का?
नाही, वेरिएशन नाही. माझ्या
नाही, वेरिएशन नाही. माझ्या मावेची पावर बर्यापैकी जास्त आहे. जनरली दोन मिनिटांची फेज संपली की पुन्हा लावावी लागत नाही. शेवटचं एक मिनिट स्कीप करुन चालतं. काल मी दोन मिनिटांच्या राऊंडनंतर जास्तीचं तूप्/बटर काढून एक मिनिट लावलं पुन्हा. त्याने बरीच ड्राय झाली आणि मैत्रीण आली होती त्यामुळे लगेच थापायची राहून गेली. आता सगळा रवाळ भुगा शिल्लक राहिलाय.
एका माणसाचा कॉन्फिडन्स इतका
एका माणसाचा कॉन्फिडन्स इतका वाढलाय म्हणून सांगू!
अस्मादिकांचा का?
अस्मादिकांचा का?
चांगले दिसतायत. मला गुरुवारपासून बर्फ्या करुन नॉशिया आलाय आता.
कन्डेन्स्ड मिल्क कोणत्या
कन्डेन्स्ड मिल्क कोणत्या ब्रॅन्डचे वापरू?
भारतात का? तर वरचे मेसेजेस
भारतात का? तर वरचे मेसेजेस (पान १० बघा) चाळल्यास भारतातला ब्रँड लिहिला आहे. अमेरिकेत असल्यास मिल्कमेड किंचा कुठल्याही ब्रँडचं स्विटन्ड कन्डेन्स्ड मिल्क चालेल कारण वेगळी साखर घालायची नाहीये.
Pages