...तिथे ती भेटते !

Submitted by अनन्त्_यात्री on 20 July, 2017 - 04:34

ढगांच्या आतले
विजेचे वेटोळे
सुटून मोकळे
डोंगरा भिडते...तिथे ती भेटते !

निबिड रानात
पोपटी पानात
झुकून बघत
मोतिया थेंबात ... अस्फुट हासते !!

भणाण वाऱ्यात
लाटेच्या गाजेत
चांदीच्या वर्खात
किनारा शोधत ... गारूड टाकते !!!

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे
अस्फुट हासते<<<<
"हसते" हवाय ना?

निस्तुला, आभार !
हासते सुद्धा योग्य आहे. ( उदा. "लाजून हासणे अन हासून ते पहाणे..." हे गीतातले शब्द)

वा!