Submitted by satish_choudhari on 18 July, 2017 - 12:29
"ती तुझीच चुक होती ..."
सोडून जेव्हा तू गेली तेव्हा
वाटलं माझी चूक होती..
पण पाहून आज तुला वाटलं
ती तुझीच चूक होती ...
प्रेमाचे वारे वाहत होते
माझ्याच मनामध्ये ..
तुला मात्र फ़क्त ती
झुळुक वाटत होती ..
पण पाहून तुला आज वाटलं
ती तुझीच चूक होती ..
पावसाच्या थेम्बांमध्ये सुद्धा
तुझीच चित्रं रंगवीली होती..
पाऊस उत्तरल्यावर आता
तू आठवणीत हरवून बसती ..
पण पाहून तुला आज वाटलं
ती तुझीच चूक होती ...
अनेक प्रश्न मनात लपलेली
त्यांची उत्तरे मिळत नसती
आग लावली स्वताच्या जीवनाला
आता तू राखेला सांगत बसती
पण पाहून तुला आज वाटलं
ती तुझीच चूक होती ...
कवी - सतीश चौधरी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खुप सुन्दर !!
खुप सुन्दर !!